Hsslive.co.in: Kerala Higher Secondary News, Plus Two Notes, Plus One Notes, Plus two study material, Higher Secondary Question Paper.

Saturday, February 5, 2022

इयत्ता दहावी जगणं कॅक्टसचं मराठी स्वाध्याय PDF

 

इयत्ता दहावी जगणं कॅक्टसचं मराठी स्वाध्याय PDF
इयत्ता दहावी जगणं कॅक्टसचं मराठी स्वाध्याय PDF


या लेखात, आम्ही जगणं कॅक्टसचं विषयासाठी इयत्ता दहावी मराठी सोल्यूशन्स देऊ. इयत्ता दहावी मधील विद्यार्थी पाठ्यपुस्तकांमध्ये उपस्थित असलेल्या व्यायामांसाठी प्रश्न आणि उत्तरे डाउनलोड आणि कॉपी करण्यास सक्षम असतील.

इयत्ता दहावी जगणं कॅक्टसचंाच्या पुस्तकात महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमातील सर्व प्रश्नांचा समावेश आहे. येथे सर्व प्रश्न पूर्ण स्पष्टीकरणासह सोडवले आहेत आणि डाउनलोड करण्यासाठी विनामूल्य उपलब्ध आहेत. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी जगणं कॅक्टसचंाचे पुस्तक खाली दिले आहे. आम्‍हाला आशा आहे की आमच्‍या इयत्‍ता दहावी वीच्‍या जगणं कॅक्टसचंाचे पुस्‍तक तुमच्‍या अभ्यासात मदत करेल! जर तुम्हाला आमचे इयत्ता दहावी चे पुस्तक आवडले असेल तर कृपया ही पोस्ट शेअर करा.


इयत्ता दहावी जगणं कॅक्टसचं स्वाध्याय

मंडळाचे नाव

Maharashtra Board

ग्रेडचे नाव

दहावी

विषय

जगणं कॅक्टसचं

वर्ष

2022

स्वरूप

PDF/DOC

प्रदाता

hsslive.co.in

अधिकृत संकेतस्थळ

mahahsscboard.in


समाधानासह महाराष्ट्र बोर्ड आठवा स्वाध्याय कसे डाउनलोड करायचे?

महाराष्ट्र बोर्ड दहावी स्वाध्याय PDF डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

  1. वेबसाइट- Hsslive ला भेट द्या. 'स्वाध्याय' लिंकवर क्लिक करा.
  2. महा बोर्ड दहावी स्वाध्याय PDF पहा.
  3. आता महाराष्ट्र बोर्ड दहावी स्वाध्याय तपासा.
  4. डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भांसाठी जतन करा.

इयत्ता दहावी जगणं कॅक्टसचं स्वाध्याय उपाय

इयत्ता दहावी स्वाध्याय मधील विद्यार्थी खालील लिंक्सवरून जगणं कॅक्टसचंाचे उपाय डाउनलोड करू शकतील.


प्रश्न 1.
‘निसर्ग हा मोठा जादूगार आहे’, हे विधान वाळवंटी प्रदेशाच्या संदर्भात कसे लागू पडते, ते पाठाच्या आधारे सविस्तर लिहा.
उत्तर:
‘जगणं कॅक्टसचं’ या पाठात ‘वसंत शिरवाडकर’ यांनी वाळवंटी प्रदेशातील कॅक्टसवर विशेष माहिती दिली आहे. निसर्ग हा मोठा जादूगार आहे हे पटवून दिले आहे. साधारणपणे पाण्याशिवाय वनस्पती जगू शकत नाही. वाळवंटात अगदीच थोडे पाणी मिळते. पण निसर्ग एक जादूगार आहे. त्या थोड्याशा पाण्यातही तो वनस्पती फुलवतो. तेथील प्राणी जगवतो.वाळवंटी प्रदेशातील खास अशी जीवसृष्टी आहे. वनस्पती व प्राणी तेथेही जगू शकतात. कॅक्टसच्या झाडांवरची लाल-पिवळी फुले चित्रमय वाटतात. वाळवंटातील जीवनसृष्टी हा खरोखर पृथ्वीवरचा एक चमत्कारच आहे. त्यामुळेच प्रतिकूल परिस्थितीतही जीवसृष्टी निर्माण करणारा निसर्ग खरेच मोठा जादूगार आहे.

प्रश्न 2.
‘थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॅक्टस!’ या विधानाची यथार्थता लिहा.
उत्तरः
वाळवंटी प्रदेशात वर्षातून एखादाच पाऊस पडतो. कधी तर दोन-दोन, तीन-तीन वर्षे पावसाचा ठिकाणा नसतो, एरवी तेथे वाळवंटातसूर्यआगओकतअसतो.हवातापलेलीअसते.सूर्याच्या आगीमध्ये पाने, फुले, गवत करपून जातात. वाळवंटात ओसाड, भकास जीवन असते. कॅक्टस अवर्षणाचा प्रतिकार करणारा आहे. जे काही पाणी मिळेल तेवढे स्वत:मध्ये साठवून घ्यायचे आणि कोरड्या हंगामात अगदी मंद गतीने वाढत रहायचे. अशी कॅक्टसची जगण्याची किमया असते. सग्वारो कॅक्टस तर २०० वर्षे जगतो. कॅक्टसमध्ये पाणी साठवण्याची रचना असते.

मिळेल तेवढे पाणी तो साठवतो. त्याची सगळी अंगरचना पाणी साठवण्यासाठी बनलेली असते. पाऊस पडतो तेव्हा वाळवंटाची जमीन फारच थोडे पाणी शोषून घेते. त्यामुळे थोड्यावेळात पुष्कळ पाणी शोषून घेता येईल अशी कॅक्टसच्या मुळांची खास रचना असते. आपली मुळे लांब पसरवून भोवतालच्या जास्तीत जास्त क्षेत्रातील पाणी तो शोषून घेतो. झाडातले बरेचसे पाणी त्यांची पाने बाष्पीभवनाने गमावतात म्हणून कॅक्टसच्या झाडाने पान ही गोष्टच काढून टाकली आहे. म्हणूनच म्हटले आहे ‘थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॅक्टस!

प्रश्न 3.
टिपा लिहा.

उत्तरः
सग्वारो कॅक्टस वाळवंटी प्रदेशाचाअगदी खास प्रतिनिधी आहे. कॅक्टसच्या अनेक जातींमध्ये सग्वारो हा कॅक्टसचा राजा मानला जातो. तो ५० फूट उंचीपर्यंत वाढतो. त्याची वाढ मंद असते इतकी, की ५० वर्षात तो फक्त ३ फूट वाढतो आणि २०० वर्षे जगतो. सग्वारो कॅक्टसची फुले गेंदेदार असतात ही फुले फुलली की थोडा काळ तरी ओसाड वाळवंट सौंदर्यपूर्ण होते. सग्वारो कॅक्टसला फळे येतात. त्यातील गर कलिंगडासारखा असतो. सग्वारो कॅक्टस हात वर करून उभ्या राहिलेल्या एखाद्या मोठ्या बाहुल्यासारखा दिसतो. सम्वारो कॅक्टसचा उपयोग अमेरिकेतील रेड इंडियन करीत असत. अवर्षणाच्या काळात कॅक्टस चेचून ते त्याचे पाणी काढत आणि तहान शमवण्यासाठी हे पाणी पीत. सग्वारो फॅक्टसची फळे ही कलिंगडाच्या गरासारखी असल्याने खाण्यासाठी उपयोग होतो. फळाच्या गरात साखर घालून तो मोरावळ्यासारखा टिकवता येतो. रेड इंडियन लोकांचे हे ही एक खादय असते.

प्रश्न 4.
वाळवंटी प्रदेशातील झाडांना काटे असण्याची कोणकोणती कारणे असावीत, असे तुम्हाला वाटते ते लिहा.
उत्तरः
कॅक्टसच्या झाडामध्ये रसदार गर असतो, म्हणून त्यावर प्राण्यांच्या धाडी पडण्याचा धोका असतो. त्यासाठी खबरदारी म्हणून कॅक्टस झाडांच्या अंगावर धारदार बोचरे काटे पसरलेले असतात. वाळवंटी प्रदेशात बहुतेक झाडांना काटे असतात. त्याला खास कारण झाडे जनावरांनी ओरबाडून खाऊन टाकली तरी पाण्याची पंचाईत नसल्याने ती पुन्हा लवकर उगवून येतात. वाळवंटी प्रदेशात हे शक्य नाही. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे झाड एकदा गेले की गेले. यासाठी या प्रदेशातील झाडांना स्वत:च्या रक्षणासाठी काटे असतात.

प्रश्न 5.
‘पाणी हेच जीवन!’ या विधानासंबंधी तुमचे विचार लिहा.
उत्तरः
पाण्याला समानार्थी शब्द ‘जीवन’ असा आहे. त्यावरून पाण्याचे अमूल्य महत्त्व लक्षात येते. जीवनात पाणी नसेल तर तहानेने व्याकूळ होऊन माणूस मरेल. स्वच्छता राहणार नाही. पशू-पक्षी, झाडे निसर्ग टिकणार नाही. सर्व सृष्टी उजाड होईल. वाळवंट, ओसाड राने तयार होतील. जीवसृष्टी राहणार नाही. जलचर प्राण्यांची सृष्टी नष्ट होईल. सूर्य आग ओकेल. जमिनीला मोठे तडे जातील. पाण्यावाचून हाहा:कार होईल. जीवनच संपुष्टात येईल. म्हणून पाण्याचा योग्य वापर करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

प्रश्न 6.
पाठाच्या आधारे कॅक्टसच्या प्रकारांची माहिती थोडक्यात लिहा.
उत्तरः
कॅक्टसच्या सुमारे १००० जाती आहेत. त्यातील अनेकांचे आकार मोठे चित्रविचित्र आहेत. ‘सायाळ’ कॅक्टस – कुंपणाच्या आश्रयाने राहणाऱ्या सायाळासारखा (शत्रुने हल्ला करताच काटे सोडणारा प्राणी) दिसतो.
(ii) ‘अस्वल’ कॅक्टस – हा कॅक्टस अस्वलासारखा दिसतो.
(iii) “पिंप’ कॅक्टस – हा कॅक्टस थेट पिंपासारखा दिसतो. 
(iv) ‘सांबरशिंग’ कॅक्टस – ‘सांबरशिंग’ कॅक्टस सांबराच्या शिंगासारखा दिसणाऱ्या कॅक्टसला म्हणतात.
(v) सग्वारो कॅक्टस – सग्वारो कॅक्टस हा हात वर करून उभ्या राहिलेल्या एखादया मोठ्या बाहुल्यासारखा दिसतो. काही कॅक्टसना सुंदर फुले व रसदार फळे येतात. सग्वारो कॅक्टसला शेंड्यावर येणारी फुले पुष्कळशी फुलासारखी गेंदेदार असतात. ही फुले फुलली की थोडा काळ का होईना बिचाऱ्या ओसाड वाळवंटाला सौंदर्याला स्पर्श होतो. याला कॅक्टसचा राजा म्हणतात.

जगणं कॅक्टसचं Summary in Marathi

जगणं कॅक्टसचं पाठपरिचय

‘जगणं कॅक्टसचं’ हा पाठ लेखक ‘वसंत शिरवाडकर’ यांनी लिहिला आहे. या पाठात लेखकाने वाळवंटी प्रदेशात उगवणाऱ्या ‘कॅक्टस’ या वनस्पतीची वैशिष्ट्ये, तिचे उपयोग, कमी पाण्यातही टिकून राहण्याची तिची क्षमता याचे सूक्ष्म वर्णन केले आहे.


इयत्ता दहावी मराठी स्वाध्याय उपाय

निष्कर्ष

आम्हाला आशा आहे की महाराष्ट्रावरील हा लेख तुम्हाला 'दहावी जगणं कॅक्टसचं स्वाध्याय' मदत करेल. तुम्हाला काही प्रश्न असल्यास, त्यांना खाली टिप्पणी विभागात मोकळ्या मनाने पोस्ट करा. आम्ही लवकरात लवकर तुमच्याकडे परत येऊ.
Share:

0 Comments:

Post a Comment

Plus Two (+2) Previous Year Question Papers

Plus Two (+2) Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Physics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Chemistry Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Maths Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Zoology Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Botany Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Computer Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Computer Application Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Commerce Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Humanities Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Economics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) History Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Islamic History Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Psychology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Sociology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Political Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Geography Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Accountancy Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Business Studies Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) English Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Hindi Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Arabic Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Kaithang Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Malayalam Previous Year Chapter Wise Question Papers

Plus One (+1) Previous Year Question Papers

Plus One (+1) Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Physics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Chemistry Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Maths Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Zoology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Botany Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Computer Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Computer Application Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Commerce Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Humanities Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Economics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) History Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Islamic History Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Psychology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Sociology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Political Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Geography Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Accountancy Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Business Studies Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) English Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Hindi Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Arabic Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Kaithang Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Malayalam Previous Year Chapter Wise Question Papers
Copyright © HSSlive: Plus One & Plus Two Notes & Solutions for Kerala State Board About | Contact | Privacy Policy