Hsslive.co.in: Kerala Higher Secondary News, Plus Two Notes, Plus One Notes, Plus two study material, Higher Secondary Question Paper.

Wednesday, February 2, 2022

इयत्ता १२ मराठी कथा-साहित्यप्रकार-परिचय मराठी स्वाध्याय PDF

 

इयत्ता १२ मराठी कथा-साहित्यप्रकार-परिचय मराठी स्वाध्याय PDF
इयत्ता १२ मराठी कथा-साहित्यप्रकार-परिचय मराठी स्वाध्याय PDF


या लेखात, आम्ही मराठी कथा-साहित्यप्रकार-परिचय विषयासाठी इयत्ता १२ मराठी सोल्यूशन्स देऊ. इयत्ता १२ मधील विद्यार्थी पाठ्यपुस्तकांमध्ये उपस्थित असलेल्या व्यायामांसाठी प्रश्न आणि उत्तरे डाउनलोड आणि कॉपी करण्यास सक्षम असतील.

इयत्ता १२ मराठी कथा-साहित्यप्रकार-परिचयाच्या पुस्तकात महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमातील सर्व प्रश्नांचा समावेश आहे. येथे सर्व प्रश्न पूर्ण स्पष्टीकरणासह सोडवले आहेत आणि डाउनलोड करण्यासाठी विनामूल्य उपलब्ध आहेत. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता १२ मराठी कथा-साहित्यप्रकार-परिचयाचे पुस्तक खाली दिले आहे. आम्‍हाला आशा आहे की आमच्‍या इयत्‍ता १२ वीच्‍या मराठी कथा-साहित्यप्रकार-परिचयाचे पुस्‍तक तुमच्‍या अभ्यासात मदत करेल! जर तुम्हाला आमचे इयत्ता १२ चे पुस्तक आवडले असेल तर कृपया ही पोस्ट शेअर करा.


इयत्ता १२ मराठी कथा-साहित्यप्रकार-परिचय स्वाध्याय

मंडळाचे नाव

Maharashtra Board

ग्रेडचे नाव

१२

विषय

मराठी कथा-साहित्यप्रकार-परिचय

वर्ष

2022

स्वरूप

PDF/DOC

प्रदाता

hsslive.co.in

अधिकृत संकेतस्थळ

mahahsscboard.in


समाधानासह महाराष्ट्र बोर्ड आठवा स्वाध्याय कसे डाउनलोड करायचे?

महाराष्ट्र बोर्ड १२ स्वाध्याय PDF डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

  1. वेबसाइट- Hsslive ला भेट द्या. 'स्वाध्याय' लिंकवर क्लिक करा.
  2. महा बोर्ड १२ स्वाध्याय PDF पहा.
  3. आता महाराष्ट्र बोर्ड १२ स्वाध्याय तपासा.
  4. डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भांसाठी जतन करा.

इयत्ता १२ मराठी कथा-साहित्यप्रकार-परिचय स्वाध्याय उपाय

इयत्ता १२ स्वाध्याय मधील विद्यार्थी खालील लिंक्सवरून मराठी कथा-साहित्यप्रकार-परिचयाचे उपाय डाउनलोड करू शकतील.


कृती 

1. कृती करा.

प्रश्न अ.
करेचे घटक

उत्तर :

प्रश्न आ.
करेचर वैविषट

उत्तर :

2. उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
कथा म्हणजे काय ते थोडक्यात स्पष्ट करा.
उत्तर :
कथेमध्ये घटना असतात. या घटनांना एखादया सूत्रानुसार गुंफण्यासाठी कथानक असते. कथानकात पात्रे असतात. वास्तवातल्या माणसांसारखीच ही पात्रे चित्रित केलेली असतात. वास्तवातली माणसे जशी एकमेकांशी वागतात, तशीच पात्रेसुद्धा एकमेकांशी वागतात. ती एकमेकांशी भांडतात. एकमेकांना मदत करतात. एकमेकांवर प्रेम करतात. राग, लोभ, प्रेम, असूया, दया, सहानुभूती वगैरे भावभावना वास्तवातल्या माणसांमध्ये असतात. तशाच भावभावना पात्रांमध्येही असतात. पात्रांच्या एकमेकांशी वागण्यातून घटना निर्माण होतात. तसेच, कथेमध्ये स्थळ, काळ, वेळ यांचेही चित्रण केलेले असते. कथेच्या विषयानुसार वातावरणही असते. पात्रांच्या परस्परांशी वागण्यातून ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंत निर्माण होते. या सर्व घटकांनी युक्त अशी रचना घेऊन कथा निर्माण होते. तिला समर्पक शीर्षक मिळाले की कथा परिपूर्ण होते.

प्रश्न आ.
कथेचे कोणतेही दोन घटक सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर :
(१) कथाबीज : कथेत अनेक घटना असतात. लेखक या घटनांची सुंदर गुंफण करतो. ही सुंदर गुंफण म्हणजे कथा होय. ही संपूर्ण कथा म्हणा किंवा घटनांची मालिका म्हणा, आपण आत्यंतिक संक्षिप्त स्वरूपात दोन-तीन वाक्यांत सांगू शकतो. संपूर्ण कथेची ही संक्षिप्त घटना होय. हे संक्षिप्त रूप म्हणजे कथाबीज होय.

उदा., पुढील कथाबीज पाहा : “हा आपलाच मुलगा आहे’, असा एकाच मुलाच्या बाबतीत दावा करणाऱ्या दोन स्त्रियांचे भांडण न्यायाधीशांकडे जाते. आपल्या बुद्धिचातुर्याने न्यायनिवाडा करून न्यायाधीश खऱ्या आईला तिचा मुलगा मिळवून देतात.

(२) पात्रचित्रण : पात्र म्हणजे कथानकातील व्यक्तीच होत. वास्तवातील माणसांसारखेच पात्रांचे चित्रण लेखक करतो. या व्यक्तींच्या वृत्ती-प्रवृत्ती, त्यांच्या भावभावना, त्यांचे विचार, कल्पना, त्यांचे वागणे वगैरे सर्वच बाबी लेखक वास्तवातील माणसांसारखेच रंगवतो. त्यांचे राग, लोभ, प्रेम, द्वेष, हेवेदावे वास्तवातील माणसांसारखेच रंगवलेले असते. वाचकांना ही पात्रे खऱ्याखुऱ्या माणसांसारखी वाटतात. त्यांच्याशी ते समरस होतात आणि कथेचा आस्वाद घेतात. पात्रांच्या वागण्यातून कथानक हळूहळू उलगडत जाते. पात्रचित्रण हा घटक कथेमध्ये यामुळे खूप महत्त्वाचे कार्य करतो.

प्रश्न इ.
कथेची कोणतीही दोन वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर :
(१) कथा मनोरंजन करते : कथा मनोरंजन करते म्हणजे कथा वाचताना वाचकाला आनंद मिळतो. त्याचे मन कथेत गुंतून राहते. वाचक कथा वाचताना कथेतील पात्रांच्या जगात प्रवेश करतो. त्याला नेहमीच्या ताणतणावांनी भरलेल्या जगाहून वेगळ्या जगात विहार करायला मिळते. वास्तवातील ताणतणावांपासून तो काही काळ दूर जातो. या घटनेतून त्याला आनंद मिळतो. कथेमार्फत वाचकाला ५ मनुष्यस्वभावाचे अनेक नमुने पाहायला मिळतात. माणसाच्या स्वभावाविषयीची त्याची जाण वाढते. याचा त्याला आनंदच होतो. काही कथा तर विनोदनिर्मितीसाठीच लिहिल्या जातात. त्या कथांमुळे वाचक खळखळून हसतो. या सर्व बाबींमुळे वाचकाचे मनोरंजनच होते. कथेचे ते एक मोठे वैशिष्ट्य ठरते.

(२) कथेमुळे सुसंस्कार होतात : कथेमध्ये पात्रे असतात. ती वास्तवातील माणसांसारखीच रंगवलेली असतात. त्यांच्या वागण्याबोलण्यातून, घटना-प्रसंगांतून, चांगल्या-वाईट मूल्यांचे दर्शन घडते. कथेमध्ये चांगल्या व वाईट मूल्यांच्या संघर्षात चांगल्या मूल्यांचा विजय दाखवलेला असतो. या संघर्ष-दर्शनाने वाचकाला प्रेरणा मिळते; . स्फूर्ती मिळते. वाचक त्यातून बोध घेतो. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, न्याय, मानवता अशा कितीतरी उदात्त मूल्यांचा वाचकाच्या मनावर संस्कार होतो. आपण स्वत:च्या जीवनात कोणत्या मार्गाने जावे, कोणता मार्ग टाळावा याचे दिग्दर्शन होते. हे सुसंस्कारच होत.

प्रश्न ई.
‘कथाकथनासाठी कथेची निवड करणे फार महत्त्वाचे आणि तितकेच जबाबदारीचे काम असते’, हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर :
कथाकथनासाठी कथा निवडताना श्रोते कोणत्या वर्गातील आहेत, हे प्रथम लक्षात घ्यावे लागते. ग्रामीण, शहरी, शिक्षित, अशिक्षित, उच्चभ्रू वर्गातील की सर्वसाधारण वर्गातील, स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक, कारखान्यातील कामगार, मंत्रालयातील कर्मचारी, महाविदयालयीन अशांपैकी कोणत्या वर्गातील श्रोते बहुसंख्येने असतील, हे आधी पाहावे लागते, कारण या प्रत्येक वर्गातील श्रोत्यांच्या जीवनविषयक धारणा वेगवेगळ्या असतात. त्यांच्या अभिरुचीचा स्तर वेगवेगळा असतो. तसेच, कथाकथनाचा कालावधी किती, हाही मुद्दा खूप महत्त्वाचा असतो. श्रोत्यांच्या अवधानकाळाचेही भान बाळगावे लागते. एवढे पाहिल्यावर कथा कोणत्या प्रकारची, तिची लांबी किती हेही ठरवावे लागते. या सर्व कसोट्यांना उतरणारी कथा निवडावी लागते. ही निवड जबाबदारीने केली नाही, तर कथाकथनाचा कार्यक्रम साफ कोसळण्याचा धोका असतो.

प्रश्न उ.
कथेच्या लोकप्रियतेची कारणे लिहा.

उत्तर :

प्रश्न ऊ.
कथेच्या सादरीकरणासाठी आवश्यक भाषिक कौशल्ये लिहा.

उत्तर :

3. कथेच्या शीर्षकाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर :
कथा पूर्ण झाल्यावर एक अवघड कामगिरी लेखकाला पार पाडावी लागते. ती म्हणजे कथेचे शीर्षक निश्चित करणे. शीर्षक निश्चित करणे हे खूप जिकिरीचे काम असते. कारण शीर्षकाकडून खूप अपेक्षा सर्वांच्या मनात असतात. शीर्षक हे कथेचा चेहेरा असते. चेहेऱ्यावरून जशी माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची खूण पटते, तशी शीर्षकावरून कथेच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख पटत असते.

शीर्षक आकर्षक हवे, त्यासाठी आकर्षक शब्दयोजना करण्याचा प्रयत्न लेखकाकडून होतो. मग एखादी लोकप्रिय म्हण, वाक्प्रचार, सुप्रसिद्ध लोकोक्ती, प्रचलित प्रभावी शब्दप्रयोग यांचा विचार केला जातो. या घटकांमुळे वाचकांचे कथेकडे लक्ष आकर्षिक व्हायला हवे. शीर्षकाने वाचकाच्या मनात कुतूहल निर्माण केले पाहिजे. हे सर्व आवश्यक असते. तरीही हा बराचसा बाह्य भाग झाला. शीर्षकातून कथेतील मूल्यांचा संघर्ष, नैतिक संघर्ष यांचे सूचन झाले पाहिजे. कथेचे सारच जर शीर्षकातून व्यक्त करता आले, तर ते फारच उत्तम. शीर्षक ही आकाराने खूप लहानशी गोष्ट आहे. पण ती खूप वेळ व शक्ती खर्च करायला लावणारी मोठी बाब आहे.

4. ‘कथा आजही लोकप्रिय आहे’, या विधानाबाबतचे तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर :
कथावाङ्मय हे आजही लोकप्रिय आहे. मनोरंजन करणे आणि उद्बोधन करणे या दोन कारणांसाठी कथावाङ्मय खूप वापरले गेले आहे. द. मा. मिरासदार, शंकर पाटील, व. पु. काळे, पु. ल. देशपांडे हे दोन पिढ्यांमागचे लेखक आजही लोकप्रिय आहेत. राजकीय, सामाजिक, धार्मिक कारणांनी समाजात प्रचंड उलथापालथी चालू आहेत, या उलथापालथीमध्ये आपापल्या मतांचा प्रचार करण्यासाठी, लोकांचे मन वळवण्यासाठी समाजमाध्यमांवर कथांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला आहे. हे कथावाङ्मयाच्या लोकप्रियतेचे लक्षण आहे.

सध्याचा काळ हा खूप धावता काळ आहे. लोकांकडे वेळ खूप कमी आहे. अशा वेळी कमी वेळात कथाच प्रभावीपणे सादर होऊ शकली आहे. दुसरे असे की मराठी कथेने आता विविध विषयांना स्वीकारले आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रांचे प्रतिबिंब मराठी कथेत पडू लागले आहे. म्हणून कथा लोकप्रिय झाली आहे.

5. प्रभावी कथाकथनासाठी कथाकथन करणाऱ्याने कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे?
उत्तर :
कथाकथन करणाऱ्याने प्रथम श्रोत्यांचे स्वरूप लक्षात घेतले पाहिजे. श्रोत्यांच्या स्वरूपानुसार कथेची निवड करावी लागते. कथाकथनाचा कालावधी व श्रोत्यांचा अवधानकाल या बाबीही लक्षात घ्याव्या लागतात. श्रोत्यांशी संवाद साधत साधत आणि त्यांचा प्रतिसाद घेत घेत कथाकथन करायचे असल्याने शब्दफेक, प्रभावी उच्चारण, उच्चारांतील चढ-उतार, स्पष्टता इत्यादी बाबी खूप महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे कथाकथन करणाऱ्यांकडे वाचिक अभिनयाचे कौशल्य असावेच लागते. आणखी एक बाब लक्षात घ्यायला हवी. कथाकथन करताना हातात लिखित मजकूर नसतो; त्यामुळे पाठांतर उत्तम असावेच लागते. या सर्व बाबींची काळजी कथाकथन करणाऱ्याने घेतली पाहिजे,

6. तुम्ही वाचलेली कथा थोडक्यात सादर करा.

कथा-साहित्यप्रकार-परिचय प्रस्तावना

कथा म्हणजे गोष्ट, कहाणी, हकिगत, प्रसंग इत्यादी. गोष्ट सांगण्याची व ऐकण्याची आवड माणसाला पूर्वीपासूनच आहे. ‘कथ् ‘ या धातूपासून ‘कथा’ हा शब्द तयार झाला आहे. कथ् म्हणजे कथन करणे, सांगणे, वर्णन करणे. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. त्यामुळे आपल्या कल्पना, भावना, आपले विचार, आपले अनुभव इतरांना सांगावेत व इतरांचे आपण ऐकावेत, अशी त्याला तीव्र इच्छा असते. त्यातूनच ‘कथा’ या वाङ्मयप्रकाराचा जन्म झाला.

कथा-साहित्यप्रकार-परिचय कथा म्हणजे काय?

कथेत घटना-प्रसंग असतात. पात्रे असतात. घटना-प्रसंग असल्याने स्थळ, काळ, वेळ या बाबी असणारच, या सगळ्यांना व्यवस्थित गुंफण्यासाठी कथानक असते. कथेमध्ये या सर्व बाबी आवश्यक असतात. कथेतील पात्रांचे एकमेकांशी बरेवाईट संबंध असतात. त्यांतून ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंत निर्माण होते. पात्रांतले ताणतणाव, संघर्ष वाढले की, उत्कर्षबिंदू निर्माण होतो. हे सर्व घटक कथेचे अंगभूत घटक असतात. तसेच, कथेला एक शीर्षकही असते.

कथेची व्याख्या आपल्याला अशी करता येईल :

“एका विशिष्ट स्थलकालात पात्रांच्या परस्परसंबंधातून घडलेल्या घटनांचे विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा होय.’

कथेचे वर सांगितलेले अंगभूत घटक सर्व कथांमध्ये सारख्याच प्रमाणात असतात असे नाही. लेखकाच्या हेतूनुसार ठरावीक घटकांना जास्त महत्त्व मिळते.

कथा-साहित्यप्रकार-परिचय कथेची पूर्वपीठिका

१८०६ साली छापलेले ‘बालबोधमुक्तावलि’ हे मराठीतील गोष्टीचे पहिले पुस्तक होय. त्यानंतर पंचतंत्र (१८१५), हितोपदेश (१८१५), सिंहासनबत्तिशी (१८२४), इसपनीतिकथा (१८२८), वेताळपंचविशी अशी अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली. ‘मराठी ज्ञानप्रसारक’ या १८५० साली सुरू झालेल्या नियतकालिकातून अनेक लहान लहान गोष्टी प्रसिद्ध झाल्या. यांतील बहुतेक सर्व गोष्टी रचनेच्या दृष्टीने अत्यंत प्राथमिक स्वरूपाच्या होत्या. आजच्या कथेची खऱ्या अर्थाने सुरुवात १८९० साली झाली. प्रख्यात कादंबरीकार ह. ना. आपटे यांनी त्या वर्षी ‘करमणूक ‘ साप्ताहिक सुरू केले. त्यातून त्यांनी दैनंदिन जीवनाचे प्रतिबिंब असलेल्या स्फुट गोष्टी लिहिल्या.

पुढे अनेक कथाकारांनी अनेक अंगांनी मराठी कथा समृद्ध करीत नेली. ग्रामीण कथा, दलित कथा असे नवनवीन प्रवाह निर्माण झाले. स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचा प्रसार झाला. विविध जातिधर्माचे लोक शिक्षणाच्या कक्षेत आले. स्त्रियांमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढले. या सगळ्या समाजघटकांमधून कथालेखक निर्माण झाले. त्यामुळे जीवनाचे विविधांगी दर्शन घडवणाऱ्या कथा मराठीत लिहिल्या जाऊ लागल्या.

कथा-साहित्यप्रकार-परिचय कथेचे घटक

(१) कथाबीज : कथा म्हणजे अनेक घटनांची मालिका असते. ही घटनांची मालिका आपण आत्यंतिक संक्षिप्त रूपात दोन-तीन वाक्यांत सांगू शकतो. ही कथेची मूळ घटना होय, या घटनेलाच ‘कथाबीज’ म्हणतात.

(२) कथानक : कथेत अनेक घटना असतात. लेखक या घटना विशिष्ट क्रमाने रचत जातो. या रचनेतून पात्रांच्या कृती, त्यांची स्वभाववैशिष्ट्ये, भोवतालचे सामाजिक वातावरण, परस्परसंबंधांतून निर्माण होणारे संघर्ष हे सर्व घटक उलगडत जातात. कथेच्या भावाशयासहित पात्रांच्या कृतींतून निर्माण होणाऱ्या घटनांची मालिका म्हणजे कथानक.

(३) पात्रचित्रण : पात्र म्हणजे कथानकातील शब्दरूप व्यक्तीच होत. या व्यक्तीची वृत्ती, प्रवृत्ती, तिच्या भावभावना, विचार, कल्पना, तिच्या कृती, अन्य व्यक्तींशी असलेले परस्परसंबंध हे सर्व लेखक वास्तवातील माणसासारखे रेखाटतो. यातून जे. शब्दरूप चित्रण निर्माण होते, ते ‘पात्रचित्रण’ होय.

(४) वातावरण निर्मिती : आपल्या अवतीभोवतीच्या परिसरात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, भौगोलिक इत्यादी घटकांनी एक विशिष्ट वातावरण निर्माण होते. ते स्थळकाळाप्रमाणे बदलते. असे वातावरण लेखक कथेत निर्माण करतो. वाचक या वातावरणामुळे कथेशी जवळीक साधू शकतो. शब्दांतून व्यक्त झालेली कथा मानवी आयुष्यात घडणारी कथा भासली पाहिजे. वातावरण निर्मितीतून हे कार्य घडत असते.

(५) नाट्यमयता/संघर्ष : कथेतील भावभावना एका क्षणाला उत्कट, तीव्र होतात. पात्रांमधील संघर्षही तीव्र होत जातो. आता पुढे काय होईल, पुढे काय होईल अशी वाचकाला उत्कंठा वाटत राहते. वाचकाच्या कल्पनेप्रमाणे पुढे घडले नाही की त्याची उत्कंठा आणखी वाढते. भावभावनांचा हा जो खेळ लेखकाने मांडलेला असतो, ती नाट्यमयता होय,

(६) संवाद : कथेतील संवाद पाल्हाळीक असता कामा नयेत. तर ते चटपटीत, आकर्षक व भाववाही असावेत. पात्रांचे व्यक्तिमत्त्व त्या संवादांतून व्यक्त व्हायला हवे. कथानक नाट्यमयतेने पुढे पुढे सरकायला हवे. कथेची भावनात्मकता त्यांतून व्यक्त झाली पाहिजे. असे संवाद कथेची उंची वाढवतात.

(७) भाषाशैली : कथेतील पात्रांच्या तोंडची भाषा व कथेच्या उर्वरित भागातील भाषा हे कथेतील भाषेचे दोन ढोबळ भाग पडतात, पात्रांच्या तोंडची भाषा ही पात्राचे वय, शिक्षण, सामाजिक दर्जा, आर्थिक स्तर, त्याची मनोवृत्ती इत्यादी अनेक घटकांवर अवलंबून असते. पात्राच्या स्वरूपानुसार त्याच्या तोंडची भाषा लेखकाला लिहिता आली पाहिजे. पात्रांच्या तोंडच्या भाषेखेरीज उरलेली भाषासुद्धा कथेचे व्यक्तिमत्त्व घडवत असते. ती भाषा पात्रांचे चित्रण करते. वातावरण उभे करते. कथानकाला पुढे नेते. ती वाचकाशी संवाद साधत असते. या भाषेत वापरलेले शब्द, प्रतिमा – प्रतीके – अलंकार हे महत्त्वाचे असतातच; पण लेखकाचा दृष्टिकोन, त्याचे विचार, त्याची मानसिकता इत्यादींचाही त्या भाषेवर परिणाम होत असतो. हे सर्व म्हणजे लेखकाची ‘भाषाशैली’ होय.

कथा-साहित्यप्रकार-परिचय कथेची वैशिष्ट्ये

(१) कथा मनोरंजन करते : कथा वाचताना आपण कथेतील पात्रांच्या जगात प्रवेश करतो. नेहमीच्या ताणतणावांनी भरलेल्या जगाहून वेगळ्या जगात विहार करायला मिळते, याचा आनंद होतो. काही वेळा असेही घडते – माणसाला मनुष्यस्वभावाविषयी अमाप कुतूहल असते. कथेमार्फत मनुष्यस्वभावाच्या अनेक तहांशी परिचय होतो, त्यामुळे आपल्याला आपले कुतूहल शमवण्याचा आनंद मिळतो. काही कथाच मुळात विनोदनिर्मितीसाठी लिहिलेल्या असतात. अशा विविध कारणांनी कथेमुळे आनंद मिळतो. मनोरंजन होते.

(२) कथेमुळे सुसंस्कार होतात : कथेमध्ये पात्रे असतात. ती वास्तवातील माणसांसारखीच दाखवलेली असतात. त्यांच्या वागण्याबोलण्यातून, घटना-प्रसंगांतून चांगल्या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले जाते. चांगली मूल्ये व वाईट मूल्ये यांच्या संघर्षात चांगल्या मूल्यांचा विजय होताना दाखवलेला असतो. कथा वाचकाला प्रेरणा, स्फूर्ती व बोध देते. समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, न्याय, मानवता अशा कितीतरी मूल्यांचा संस्कार वाचकांवर होतो. आपण कोणत्या मार्गाने जावे, कोणता मार्ग टाळावा, याचा बोध माणसाला होतो. हे सर्व सुसंस्कार होत.

(३) कथा वाचकांची उत्कंठा वाढवते : कथेत सतत ‘पुढे काय होणार?’ अशी वाचकाला उत्सुकता वाटत राहते, वाचक स्वत:चे काही अंदाज बांधतो. लेखक घटनांची गुंफण इतक्या कौशल्याने करतो की वाचकाचे अंदाजही कोलमडून पडतात. त्यामुळे त्याची उत्सुकता आणखी वाढते. मनुष्यस्वभावाचे अकल्पित नमुने वाचकासमोर येतात. त्यांच्या ज्ञानामुळे वाचक अधिक प्रगल्भ होतो. प्रगल्भ होत जाण्याचा एक उदात्त आनंद वाचकाला मिळतो. या उत्कंठावर्धक रचनेमुळे वाचकावर नकळत संस्कार होत जातात.

(४) कथा एककेंद्री असते : कमीत कमी पात्रे कमीत कमी घटना – प्रसंग, कमीत कमी परिसर, कमीत कमी मूल्यांचा संघर्ष यांमुळे कथेचा एकच परिणाम साधला जातो.

(५) कथा भूतकाळात लिहिली जाते : आपण वर्तमानकाळात जगतो, तेव्हा सर्वजण एकाच पातळीवर असतो. प्रत्येकजण आपापली कृती करीत असतो. प्रत्येकाच्या कृतीचे परिणाम काय होतील, हे कोणालाही माहीत नसतात. ते भविष्यकाळात दिसणार असतात. साहजिकच कोणत्या कृतीचे, मूल्याचे कोणते परिणाम होतील, ते अंधारातच राहते. खरे तर, घटना पूर्ण झाली, कथानक पूर्ण झाले की ते सर्व भूतकाळात जमा होते. तसेच, वाचकाची उत्कंठा शमण्याच्या दृष्टीने, त्याच्यावर संस्कार होण्याच्या दृष्टीने वर्तमानकाळातील रचना उपयुक्त नसते. म्हणून साधारणपणे कथा भूतकाळात लिहिली जाते.

(६) कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो : जीवनातील घटना, भावभावना, वैचारिक उलथापालथी यांचे दर्शन कथांतून घडत असते. मानवी जीवनाची अगणित रूपे कथांतून दिसतात. आपण स्वतःच्या जीवनात अनुभवतो, त्यापेक्षा कितीतरी व्यापक, विराट जीवनदर्शन कथांमधून घडते.

(७) श्रवणीयतेमुळे कथेचे सादरीकरण करता येते : समोर उपस्थित असलेल्या श्रोत्यांसमोर कथा कथन करता येते, म्हणजे सांगता येते, कथा श्रवणीय असल्यामुळे हे शक्य होते. कथा श्रवणीय का होते? कारण ती उत्कंठावर्धक असते. वाचकाच्या मनाला ती गुंतवून ठेवते. तसेच, कमी पात्रे, कमी प्रसंग, कमी संघर्ष, कथेतील जीवनाचा मर्यादित परीघ यांमुळे कथा एककेंद्री होते. कधी कधी कथेतील विनोदामुळे आकर्षकता वाढते. हे सगळे घटक श्रवणीयता वाढवायला मदत करतात.

कथा-साहित्यप्रकार-परिचय कथेचे सादरीकरण

सादरीकरणाचे अभिवाचन व कथाकथन हे दोन भाग आहेत :
(२) अभिवाचन लिहिलेली किंवा छापलेली कथा आहे तशीच वाचणे म्हणजे अभिवाचन होय. अभिवाचनात विरामचिन्हे लक्षात घेऊन वाचन करावे लागते. कथेतील भावनांचे चढउतार लक्षात घ्यावे लागतात. वाचनाची द्रुत लय व संथ लय यांचा गरजेप्रमाणे उपयोग करून घ्यावा लागतो. ऐकून समजून घेता येईल, असा वेग ठेवावा लागतो. थोडक्यात, कथेचे भावपूर्णतेने वाचन केले जाते. येथे वाचिक अभिनय महत्त्वाचा असतो.

(२) कथाकथन कथाकथनासाठी कथा प्रथम पूर्णपणे पाठ केली जाते. गप्पांच्या जवळ जाणाऱ्या शैलीत कथा सादर केली जाते. वाचिक अभिनयाची गरज असतेच; शिवाय काही प्रमाणात हावभाव, क्वचित हालचाली यांचाही उपयोग केला जातो. शब्दफेक, प्रभावी उच्चारण, स्पष्टता, गर्भितार्थ श्रोत्यांपर्यंत थेट पोहोचवणे हे फार मोठे कौशल्य असते.

कथा-साहित्यप्रकार-परिचय समारोप

छपाईचे तंत्रज्ञान निर्माण होण्यापूर्वी कथा मौखिक रितीने एकमेकांना सांगितली जात होती. आजची कथाकथनाची पद्धत टिकून आहे. निबंध, लेख, वैचारिक वाङ्मय, कादंबरी हे प्रकार कथनाद्वारे वाचकांपर्यंत पोहोचवणे कठीण असते. पण कथा मात्र अजूनही कथन पद्धतीने वाचकांपर्यंत नेता येते.

कथा-साहित्यप्रकार-परिचय शब्दार्थ

  • लक्षवेधी – लक्ष, मन वेधून घेणारी.
  • मौखिक – मुखावाटे चालत आलेली.
  • उत्तरोत्तर – क्रमाक्रमाने, अधिकाधिक.
  • चित्ताकर्षक – चित्ताला, मनाला आकषून घेणारी.
  • उत्कर्षबिंदू – नाट्यमयता, संघर्ष शिगेला पोहोचण्याची स्थिती.
  • बहुआयामी – खूप बाजू असलेला/ली.
  • कथात्म – कथा हा आत्मा असलेले.
  • चटपटीत – तल्लख, चलाख, हुशार.
  • रसपरिपोष – रसाचा उत्कट व सर्वांगांनी परिपूर्ण आविष्कार झालेला असण्याची स्थिती.
  • श्रवणीय – ऐकताना उच्च आनंद देणारे.
  • संहिता – मूळ लेखन.

कथा-साहित्यप्रकार-परिचय वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

  • वृद्धिंगत होत जाणे – वाढ होत जाणे,
  • भंडावून सोडणे – अतिशय त्रास देणे,

इयत्ता १२ मराठी स्वाध्याय उपाय

निष्कर्ष

आम्हाला आशा आहे की महाराष्ट्रावरील हा लेख तुम्हाला '१२ मराठी कथा-साहित्यप्रकार-परिचय स्वाध्याय' मदत करेल. तुम्हाला काही प्रश्न असल्यास, त्यांना खाली टिप्पणी विभागात मोकळ्या मनाने पोस्ट करा. आम्ही लवकरात लवकर तुमच्याकडे परत येऊ.
Share:

0 Comments:

Post a Comment

Plus Two (+2) Previous Year Question Papers

Plus Two (+2) Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Physics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Chemistry Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Maths Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Zoology Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Botany Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Computer Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Computer Application Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Commerce Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Humanities Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Economics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) History Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Islamic History Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Psychology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Sociology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Political Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Geography Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Accountancy Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Business Studies Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) English Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Hindi Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Arabic Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Kaithang Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Malayalam Previous Year Chapter Wise Question Papers

Plus One (+1) Previous Year Question Papers

Plus One (+1) Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Physics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Chemistry Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Maths Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Zoology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Botany Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Computer Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Computer Application Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Commerce Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Humanities Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Economics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) History Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Islamic History Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Psychology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Sociology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Political Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Geography Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Accountancy Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Business Studies Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) English Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Hindi Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Arabic Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Kaithang Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Malayalam Previous Year Chapter Wise Question Papers
Copyright © HSSlive: Plus One & Plus Two Notes & Solutions for Kerala State Board About | Contact | Privacy Policy