Hsslive.co.in: Kerala Higher Secondary News, Plus Two Notes, Plus One Notes, Plus two study material, Higher Secondary Question Paper.

Wednesday, February 2, 2022

इयत्ता १२ समास मराठी स्वाध्याय PDF

 

इयत्ता १२ समास मराठी स्वाध्याय PDF
इयत्ता १२ समास मराठी स्वाध्याय PDF


या लेखात, आम्ही समास विषयासाठी इयत्ता १२ मराठी सोल्यूशन्स देऊ. इयत्ता १२ मधील विद्यार्थी पाठ्यपुस्तकांमध्ये उपस्थित असलेल्या व्यायामांसाठी प्रश्न आणि उत्तरे डाउनलोड आणि कॉपी करण्यास सक्षम असतील.

इयत्ता १२ समासाच्या पुस्तकात महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमातील सर्व प्रश्नांचा समावेश आहे. येथे सर्व प्रश्न पूर्ण स्पष्टीकरणासह सोडवले आहेत आणि डाउनलोड करण्यासाठी विनामूल्य उपलब्ध आहेत. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता १२ समासाचे पुस्तक खाली दिले आहे. आम्‍हाला आशा आहे की आमच्‍या इयत्‍ता १२ वीच्‍या समासाचे पुस्‍तक तुमच्‍या अभ्यासात मदत करेल! जर तुम्हाला आमचे इयत्ता १२ चे पुस्तक आवडले असेल तर कृपया ही पोस्ट शेअर करा.


इयत्ता १२ समास स्वाध्याय

मंडळाचे नाव

Maharashtra Board

ग्रेडचे नाव

१२

विषय

समास

वर्ष

2022

स्वरूप

PDF/DOC

प्रदाता

hsslive.co.in

अधिकृत संकेतस्थळ

mahahsscboard.in


समाधानासह महाराष्ट्र बोर्ड आठवा स्वाध्याय कसे डाउनलोड करायचे?

महाराष्ट्र बोर्ड १२ स्वाध्याय PDF डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

 1. वेबसाइट- Hsslive ला भेट द्या. 'स्वाध्याय' लिंकवर क्लिक करा.
 2. महा बोर्ड १२ स्वाध्याय PDF पहा.
 3. आता महाराष्ट्र बोर्ड १२ स्वाध्याय तपासा.
 4. डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भांसाठी जतन करा.

इयत्ता १२ समास स्वाध्याय उपाय

इयत्ता १२ स्वाध्याय मधील विद्यार्थी खालील लिंक्सवरून समासाचे उपाय डाउनलोड करू शकतील.


कृती

1. अधोरेखित शब्दांमध्ये दडलेले दोन शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा.

(अ) प्रतिक्षण – [ ]
(आ) राष्ट्रार्पण – [ ]
(इ) योग्यायोग्य – [ ]
(ई) लंबोदर – [ ]
उत्तर :
(अ) प्रतिक्षण – [प्रति] [क्षण]
(अ) राष्ट्रार्पण – [राष्ट्र] [अर्पण]
(अ) योग्यायोग्य – [योग्य] [अयोग्य]
(अ) लंबोदर – [लांब] [उदर]

(अ) प्रतिक्षण → प्रति (प्रत्येक) व क्षण या दोन शब्दांचा एक शब्द केला आहे.
(अ) राष्ट्रार्पण → राष्ट्र व अर्पण या दोन शब्दांचा एक शब्द केला आहे.
(अ) योग्यायोग्य → योग्य व अयोग्य या दोन शब्दांचा एक शब्द केला आहे.
(अ) लंबोदर → लंब व उदर या दोन शब्दांचा एक शब्द केला आहे.

2. अव्ययीभाव समास
खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा.

प्रश्न 1.
(a) वैभव वर्गातील कोणत्याही तासाला गैरहजर राहत नाही.
(b) नागरिकांनी गरजू विदयार्थ्यांना यथाशक्ती मदत केली.
(c) रस्त्याने चालताना जाहिरातींचे फलक सध्या पावलोपावली दिसतात.
उत्तर :
(a) वैभव वर्गातील कोणत्याही तासाला गैरहजर राहत नाही.
(b) नागरिकांनी गरजू विदयार्थ्यांना यथाशक्ती मदत केली.
(c) रस्त्याने चालताना जाहिरातींचे फलक सध्या पावलोपावली दिसतात.

वरील वाक्यांतील अधोरेखित शब्द हे सामासिक शब्द आहेत.

सामासिकशब्द →

 1. गैरहजर
 2. यथाशक्ती
 3. पावलोपावली.

प्रश्न 2.
खालील तक्ता पूर्ण करा.

उत्तर :

3. तत्पुरुष समास
खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा.

प्रश्न 1.
(a) मेट्रो रेल्वेचा लोकार्पण सोहळा थाटामाटात पार पडला.
(b) सुप्रभाती तलावात नीलकमल उमललेले दिसले.
(c) शिक्षण प्रक्रियेत पालक, शिक्षक आणि विदयार्थी हा आदर्श त्रिकोण असतो.
उत्तर :
(a) मेट्रो रेल्वेचा लोकार्पण सोहळा थाटामाटात पार पडला.
(b) सुप्रभाती तलावात नीलकमल उमललेले दिसले.
(c) शिक्षण प्रक्रियेत पालक, शिक्षक आणि विदयार्थी हा आदर्श त्रिकोण असतो.

वरील वाक्यांतील अधोरेखित शब्द हे सामासिक शब्द आहेत.
सामासिक शब्द →

 1. लोकार्पण
 2. नीलकमल
 3. त्रिकोण.

प्रश्न 1.
खालील तक्ता पूर्ण करा.

उत्तर :

प्रश्न अ.
विभक्ती तत्पुरुष समास
पुढील उदाहरणांचा अभ्यास करून तक्ता पूर्ण करा.

उत्तर :

प्रश्न आ.
कर्मधारय समास
पुढील वाक्ये अभ्यासून तक्ता पूर्ण करा.
(१) गुप्तहेर वेशांतर करून खऱ्या माहितीचा शोध घेतात.
(२) अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ पडला.
(३) काही माणसे केलेल्या कामाचे मानधन घेणे टाळतात.
(४) निळासावळा झरा वाहतो बेटाबेटांतुन.

उत्तर :

प्रश्न इ.
द्विगू समास
खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून दिलेला तक्ता पूर्ण करा.
(१) सूर्याच्या सोनेरी किरणांनी दशदिशा उजळून निघाल्यात.
(२) नवरात्रात ठिकठिकाणी गरबा नृत्याचे कार्यक्रम चालतात.
(३) सुरेखाला वन्यजीव सप्ताहानिमित्त झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला.

उत्तर :

प्रश्न 2.
तत्पुरुष समासाचे प्रकार ओळखून खालील तक्ता पूर्ण करा.

उत्तर :

4. द्वंद्व समास

प्रश्न 1.
खालील उदाहरणांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा.
(a) पतिपत्नी ही संसाररथाची दोन महत्त्वाची चाके आहेत.
(b) योग्य पुरावा उपलब्ध झाला, की खरेखोटे कळतेच.
(c) स्नेहमेळाव्यात मित्रमैत्रिणींच्या गप्पागोष्टी रंगात आल्या.
उत्तर :
(a) पतिपत्नी ही संसाररथाची दोन महत्त्वाची चाके आहेत.
(b) योग्य पुरावा उपलब्ध झाला, की खरेखोटे कळतेच.
(c) स्नेहमेळाव्यात मित्रमैत्रिणींच्या गप्पागोष्टी रंगात आल्या.

प्रश्न 2.
खालील तक्ता पूर्ण करा.

उत्तर :

प्रश्न 3.
खालील तक्ता पूर्ण करा.

उत्तर :

5. बहुव्रीही समास

प्रश्न 1.
खालील उदाहरणे अभ्यासा व त्यातील सामासिक शब्द अधोरेखित करा.
(१) कृष्णा हा माझा सहाध्यायी आहे.
(२) काल रात्री आमच्या परिसरात नीरव शांतता होती.
(३) रावणाला दशमुख असेही संबोधले जाते.
उत्तर :
(१) सहाध्यायी → जो माझ्यासह अध्ययन करतो असा तो → (कृष्णा)
(२) नीरव → अजिबात आवाज जीत नसतो अशी → (शांतता)
(३) दशमुख → दहा मुखे आहेत ज्याला असा तो → (रावण)

प्रश्न 2.
खालील तक्ता पूर्ण करा.

उत्तर :

Marathi Yuvakbharati 12th Digest व्याकरण समास Additional Important Questions and Answers

प्रश्न 1.
पुढील वाक्ये वाचा व अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष दया :
(a) प्रत्येकाने प्रतिक्षण सतर्क असावे.
(b) स्वातंत्र्यवीरांनी आपले तन–मन राष्ट्रार्पण केले.
(c) सज्जन माणूस योग्यायोग्यतेचा निवाडा करतो.
(d) लंबोदर विदयेची देवता आहे.
उत्तर :
(a) प्रतिक्षण
(b) राष्ट्रार्पण
(c) योग्यायोग्यतेचा
(d) लंबोदर

 • वरील प्रत्येकी दोन शब्दांतील मधले काही शब्द व विभक्ती प्रत्यय गाळून जोडशब्द तयार केले आहेत.
कमीत कमी दोन शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. एकत्रीकरणाने जो नवीन जोडशब्द तयार होतो, त्याला सामासिक शब्द म्हणतात आणि तयार झालेला सामासिक शब्द फोड करून सांगण्याच्या प्रक्रियेला समासाचा विग्रह असे म्हणतात.

सामासिक शब्द – विग्रह

 • प्रतिक्षण – प्रत्येक क्षणाला
 • राष्ट्रार्पण – राष्ट्राला अर्पण
 • योग्यायोग्य – योग्य किंवा अयोग्य
 • लंबोदर – लंब आहे उदर (पोट) असा तो

समासात कमीत कमी दोन शब्द असतात.
समासातील शब्दांना पद म्हणतात.
पहिला शब्द म्हणजे पहिले पद.
दुसरा शब्द म्हणजे दुसरे पद.
समासातील कोणते पद महत्त्वाचे किंवा प्रधान आहे, यावरून समासाचे प्रकार ठरतात.

महत्त्वाचे पद म्हणजे प्रधान पद (+)
कमी महत्त्वाचे पद म्हणजे गौण पद (-)

पहिले पद दुसरे पद समासाचा प्रकार

 • प्रधान गौण = अव्ययीभाव समास (+–) (प्रतिक्षण)
 • गौण प्रधान = तत्पुरुष समास (– +) (राष्ट्रार्पण)
 • प्रधान प्रधान = वंद्व समास (++) (योग्यायोग्य)
 • गौण गौण = बहुव्रीही समास (––) (लंबोदर)

अव्ययीभाव समास

 • या सामासिक शब्दांतील पहिले पद हे महत्त्वाचे आहे व संपूर्ण शब्द वाक्यात क्रियाविशेषण अव्ययाचे कार्य करतो.
ज्या समासातील पहिले पद महत्त्वाचे असते व जो सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्ययाचे कार्य करतो, त्या समासाला अव्ययीभाव समास म्हणतात.

आ, प्रति, यथा इत्यादी संस्कृत उपसर्ग आणि दर, बिन, बे यांसारखे फारशी उपसर्ग यांच्या साहाय्याने अव्ययीभाव समासातले सामासिक शब्द तयार होतात. तसेच, काही मराठी शब्दांची द्विरुक्ती होऊनही काही सामासिक शब्द तयार होतात. उदा., पुढील शब्द पाहा.

आणखी काही सामासिक शब्द [अव्ययीभाव समास] :

 • आजन्म
 • आमरण
 • प्रतिदिन
 • यथावकाश
 • यथाक्रम
 • बिनधास्त
 • बिनचूक
 • दरसाल
 • दररोज
 • बेपर्वा
 • दारोदारी
 • गावोगाव
 • दिवसेंदिवस
 • गल्लोगल्ली
 • जागोजागी
 • बेशिस्त

तत्पुरुष समास

 • या सामासिक शब्दांतील दुसरे पद हे महत्त्वाचे आहे.
ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्तिप्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो, त्यास तत्पुरुष समास म्हणतात.

म्हणून,

तत्पुरुष समासाच्या तीन उपप्रकारांचा अभ्यास करू या :

 • विभक्ती तत्पुरुष
 • कर्मधारय
 • द्विगू.

विभक्ती तत्पुरुष :
विभक्ती तत्पुरुष समासातील सामासिक शब्दात विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय गाळलेले असते.

उदा.,

 • क्रीडेसाठी अंगण → क्रीडांगण
 • विदयेचे आलय → विदयालय

वरील पहिल्या उदाहरणात ‘साठी’ हे शब्दयोगी अव्यय तर दुसऱ्या उदाहरणात ‘चे’ हा विभक्तिप्रत्यय गाळला आहे.

म्हणून,

ज्या तत्पुरुष समासात विभक्ती प्रत्ययाचा किंवा शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात, त्यास विभक्ती तत्पुरुष समास म्हणतात.

काही विभक्ती तत्पुरुष समासाचे सामासिक शब्द :

 • ईश्वरनिर्मित
 • गुणहीन
 • तोंडपाठ
 • मतिमंद
 • लोकप्रिय
 • देवघर
 • वसतिगृह
 • दुःखमुक्त
 • आम्रवृक्ष
 • कार्यक्रम
 • गणेश
 • दीनानाथ
 • मन:स्थिती
 • मोरपीस
 • वातावरण
 • स्वभाव
 • सूर्योदय
 • हिमालय
 • ज्ञानेश्वर
 • स्वाभिमान
 • घरकाम
 • स्वर्गवास
 • वनमाला
 • सिंहगर्जना

कर्मधारय समास :

प्रश्न 1.
पुढील सामासिक शब्द नीट अभ्यासा :
(a) अमृतवाणी→ दोन्ही पदे ‘प्रथमा’ विभक्तीत
(b) नीलकमल → पहिले पद विशेषण व दुसरे नाम
(c) घननीळ → दुसरे पद विशेषण व पहिले नाम
(d) नरसिंह → पहिले पद उपमेय व दुसरे उपमान
(e) कमलनयन → पहिले पद उपमान व दुसरे उपमेय
(f) मातृभूमी → दोन्ही पदे एकरूप
(g) शुभ्रधवल → दोन्ही पदे विशेषणे.
उत्तर :
(a) अमृतवाणी → अमृतासारखी वाणी
(b) नीलकमल → निळे असे कमळ
(c) घननीळ → निळा असा घन
(d) नरसिंह → सिंहासारखा नर
(e) कमलनयन → कमलासारखे डोळे
(f) मातृभूमी → भूमी हीच माता.

ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे साधारणतः प्रथमा विभक्तीत असतात आणि त्यातील एक पद विशेषण व दुसरे नाम असते, त्यास कर्मधारय समास म्हणतात.

कर्मधारय समासाचे काही सामासिक शब्द :

 • मुखचंद्रमा
 • श्यामसुंदर
 • कृष्णविवर
 • विदयाधन
 • दीर्घकाळ
 • महादेव
 • भारतमाता
 • महर्षी
 • महाराष्ट्र
 • सुदैव
 • ज्ञानामृत
 • महाराज
 • महात्मा
 • पांढराशुभ्र
 • तपोधन
 • गुणिजन

द्विगू समास :

प्रश्न 1.
पुढील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून दिलेला तक्ता पूर्ण करा :
(a) सूर्याच्या सोनेरी किरणांनी दशदिशा उजळून निघाल्यात.
(b) नवरात्रात ठिकठिकाणी गरबा नृत्याचे कार्यक्रम चालतात.
(c) सुरेखाला वन्यजीव सप्ताहानिमित्त झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
उत्तर :
(a) दशदिशा = दश + दिशा → पहिले पद संख्याविशेषण
(b) नवरात्र = नऊ + रात्र → पहिले पद संख्याविशेषण
(c) सप्ताह = सप्त + आह → पहिले पद संख्याविशेषण

ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद संख्याविशेषण व दुसरे पद नाम असते, त्यास द्विगू समास म्हणतात.

द्विगू समासाचे काही सामासिक शब्द :

 • द्विदल
 • त्रिखंड
 • त्रिकोण
 • त्रिभुवन
 • चौकोन
 • पंचगंगा
 • षट्कोन
 • षण्मास
 • सप्तसिंधू
 • सप्तस्वर्ग
 • सप्तपदी
 • पंचारती
 • पंचपाळे
 • अष्टकोन
 • आठवडा
 • दशदिशा

वंद्व समास

ज्या समासातील दोन्ही पदे प्रधान (समान दर्जाची) असतात, त्यास दुवंद्व समास म्हणतात.

सामासिक शब्दाच्या विग्रहावरून वंद्व समासाचे तीन प्रकार पडतात :

 • इतरेतर द्वंद्व
 • वैकल्पिक द्वंद्व
 • समाहार वंद्व.

इतरेतर द्वंद्व समास :

प्रश्न 1.
पुढील वाक्ये वाचा व अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष या :
(a) आईवडील ही घरातील दैवते आहेत.
(b) भाऊबहीण दोघेही एकाच महाविदयालयात आहेत.
उत्तर :
(a) आईवडील → आई आणि वडील.
(b) भाऊबहीण → भाऊ व बहीण.

जेव्हा द्वंद्व समासातील सामासिक शब्दांचा विग्रह करताना ‘आणि, व’ या उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो, तेव्हा त्यास इतरेतर द्वंद्व समास म्हणतात.

बह्वीही समासाचे काही सामासिक शब्द :

 • लंबोदर
 • गजानन
 • नीलकंठ
 • भालचंद्र
 • अष्टभुजा
 • अनाथ
 • दशानन
 • निर्धन
 • पंचमुखी
 • कमलनयन
 • अभंग
 • निबल

इयत्ता १२ मराठी स्वाध्याय उपाय

निष्कर्ष

आम्हाला आशा आहे की महाराष्ट्रावरील हा लेख तुम्हाला '१२ समास स्वाध्याय' मदत करेल. तुम्हाला काही प्रश्न असल्यास, त्यांना खाली टिप्पणी विभागात मोकळ्या मनाने पोस्ट करा. आम्ही लवकरात लवकर तुमच्याकडे परत येऊ.
Share:

0 Comments:

Post a Comment

Plus Two (+2) Previous Year Question Papers

Plus Two (+2) Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Physics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Chemistry Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Maths Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Zoology Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Botany Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Computer Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Computer Application Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Commerce Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Humanities Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Economics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) History Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Islamic History Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Psychology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Sociology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Political Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Geography Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Accountancy Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Business Studies Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) English Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Hindi Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Arabic Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Kaithang Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Malayalam Previous Year Chapter Wise Question Papers

Plus One (+1) Previous Year Question Papers

Plus One (+1) Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Physics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Chemistry Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Maths Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Zoology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Botany Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Computer Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Computer Application Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Commerce Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Humanities Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Economics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) History Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Islamic History Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Psychology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Sociology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Political Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Geography Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Accountancy Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Business Studies Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) English Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Hindi Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Arabic Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Kaithang Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Malayalam Previous Year Chapter Wise Question Papers
Copyright © HSSlive: Plus One & Plus Two Notes & Solutions for Kerala State Board About | Contact | Privacy Policy