Hsslive.co.in: Kerala Higher Secondary News, Plus Two Notes, Plus One Notes, Plus two study material, Higher Secondary Question Paper.

Friday, February 25, 2022

इयत्ता आठवी मराठी आम्ही हवे आहोत का? मराठी स्वाध्याय PDF

 

इयत्ता आठवी मराठी आम्ही हवे आहोत का? मराठी स्वाध्याय PDF
इयत्ता आठवी मराठी आम्ही हवे आहोत का? मराठी स्वाध्याय PDF


या लेखात, आम्ही मराठी आम्ही हवे आहोत का? विषयासाठी इयत्ता आठवी मराठी सोल्यूशन्स देऊ. इयत्ता आठवी मधील विद्यार्थी पाठ्यपुस्तकांमध्ये उपस्थित असलेल्या व्यायामांसाठी प्रश्न आणि उत्तरे डाउनलोड आणि कॉपी करण्यास सक्षम असतील.

इयत्ता आठवी मराठी आम्ही हवे आहोत का?ाच्या पुस्तकात महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमातील सर्व प्रश्नांचा समावेश आहे. येथे सर्व प्रश्न पूर्ण स्पष्टीकरणासह सोडवले आहेत आणि डाउनलोड करण्यासाठी विनामूल्य उपलब्ध आहेत. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता आठवी मराठी आम्ही हवे आहोत का?ाचे पुस्तक खाली दिले आहे. आम्‍हाला आशा आहे की आमच्‍या इयत्‍ता आठवी वीच्‍या मराठी आम्ही हवे आहोत का?ाचे पुस्‍तक तुमच्‍या अभ्यासात मदत करेल! जर तुम्हाला आमचे इयत्ता आठवी चे पुस्तक आवडले असेल तर कृपया ही पोस्ट शेअर करा.


इयत्ता आठवी मराठी आम्ही हवे आहोत का? स्वाध्याय

मंडळाचे नाव

Maharashtra Board

ग्रेडचे नाव

आठवी

विषय

मराठी आम्ही हवे आहोत का?

वर्ष

2022

स्वरूप

PDF/DOC

प्रदाता

hsslive.co.in

अधिकृत संकेतस्थळ

mahahsscboard.in


समाधानासह महाराष्ट्र बोर्ड आठवा स्वाध्याय कसे डाउनलोड करायचे?

महाराष्ट्र बोर्ड आठवी स्वाध्याय PDF डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

 1. वेबसाइट- Hsslive ला भेट द्या. 'स्वाध्याय' लिंकवर क्लिक करा.
 2. महा बोर्ड आठवी स्वाध्याय PDF पहा.
 3. आता महाराष्ट्र बोर्ड आठवी स्वाध्याय तपासा.
 4. डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भांसाठी जतन करा.

इयत्ता आठवी मराठी आम्ही हवे आहोत का? स्वाध्याय उपाय

इयत्ता आठवी स्वाध्याय मधील विद्यार्थी खालील लिंक्सवरून मराठी आम्ही हवे आहोत का?ाचे उपाय डाउनलोड करू शकतील.


Marathi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 10 आम्ही हवे आहोत का? Textbook Questions and Answers

1. पुढील वाक्ये कोणत्या प्राण्यासंदर्भात आहेत त्या प्राण्याचे नाव लिहा.

प्रश्न अ.
“जन्मापासून आंधळी आहे ती!” [ ]
उत्तरः
मांजरी

प्रश्न आ.
“सावरीच्या कापसाचे जणू मऊमऊ गोळेच!” [ ] पिलं
उत्तरः
कुत्रीची

2. आकृत्या पूर्ण करा.

प्रश्न 1.
आकृत्या पूर्ण करा.

उत्तरः
अ.

आ.

इ.

ई.

3. ‘सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात’ हे विधान पाठाच्या आधारे पटवून दया. 

प्रश्न 1.
‘सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात’ हे विधान पाठाच्या आधारे पटवून दया.
उत्तरः
मुके प्राणी हे माणसाच्या प्रेमासाठी नेहमीच भुकेलेले असतात. माणसांनी गोंजारलेले, मिशा, डोक्यावरुन फिरवलेला मायेचा हात त्यांना नेहमीच हवा असतो. त्या क्रियेतून, भावनेतून प्रकट झालेली माया, आर्जवता, प्रेम हे प्राण्यांना कळत असते. लेखिकेचे मांजरांना खाजवणे, कुरवाळणे या ममतेच्या स्पर्शानी मांजरे खूश होऊन पोटातून ‘गुर्रगुर्र’ असा आवाज काढून समाधानाची पावती देतात.

प्राण्यांना प्रेमाने जवळ घेतले की ती आपली होतात. माणसांपेक्षाही अधिक लळा लावतात. प्राण्यांमध्येही एक लहान मूल, बालकत्व असते. ती प्रेमाची, मायेची भूकलेली असतात. त्यांच्या डोळ्यातही एक अफाट कारुण्य असतं. त्याची जाणीव माणसाला व्हायला पाहिजे व मुक्या प्राण्यांवर प्रेम केले पाहिजे.

 

व्याकरण व भाषाभ्यास

(अ) कंसातील शब्दसमूहांचा वाक्यातील रिकाम्या जागी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा. (लक्ष वेधून घेणे, आवाहन करणे, निभाव लागणे)

प्रश्न अ.
सुधाकरचा कबड्डीच्या सामन्यात आपल्या मित्रासमोर काहीच ………………………………
उत्तरः
सुधाकरचा कबड्डीच्या सामन्यात आपल्या मित्रासमोर काहीच निभाव लागला नाही.

प्रश्न आ.
चिमुकली मिताली आपल्या आवाजाने सगळ्यांचे ………………………….
उत्तरः
चिमुकली मिताली आपल्या आवाजाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेते.

प्रश्न इ.
पोलिसांनी गावकऱ्यांना मदतीसाठी ………………………….
उत्तरः
पोलिसांनी गावकऱ्यांना मदतीसाठी आवाहन केले.

(आ) दिलेल्या शब्दांपुढे कंसातील विरुद्धार्थी शब्द लिहा. (इवले, शांत, खरखरीत)

प्रश्न (आ)
दिलेल्या शब्दांपुढे कंसातील विरुद्धार्थी शब्द लिहा. (इवले, शांत, खरखरीत)
(अ) रागीट
(आ) मोठे
(इ) मऊमऊ
उत्तरः
(अ) शांत
(आ) इवले
(इ) खरखरीत

 

(इ) जोडशब्द लिहा.

प्रश्न (इ)
जोडशब्द लिहा.
(अ) चढ
(आ) अंथरुण
(इ) इकडून
(ई) आले
उत्तरः
(अ) उतार
(आ) पांघरूण
(इ) तिकडून
(ई) गेले

विचार करा. सांगा.

प्रश्न 1.
आम्हांला तुमची गरज आहे; तुम्हांला आम्ही हवे आहोत का? या वाक्यातून तुम्हांला प्राण्याबाबतची जाणवणारी संवेदनशीलता तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
हे वाक्य प्राण्यांच्या तोंडचे आहे. इस्पितळातील असहाय्य प्राणी आपल्याला सूचवित आहेत की आम्ही समाजाचेच घटक आहोत. जैव विविधतेचे सभासद आहोत. पर्यावरणासाठी उपयुक्त आहोत. तेव्हा आम्हांला तुम्ही सांभाळले तर पर्यावरण संतुलन राहील. मानवाला लाभच होईल. आम्हांला तुम्ही हवे आहात पण तुम्ही आमच्यावर प्रेम कराल नं? आम्ही तुम्हांला हवे आहोत का? असा मार्मिक सवाल प्राणी करीत आहेत व आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करीत आहेत.

 

प्रश्न 2.
लेखिकेने अनुभवलेली इस्पितळातील प्राण्यांची दुनिया तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
लेखिकेने प्राण्यांच्या इस्पितळाला भेट दिली. कुत्र्यांचे, मांजराचे विविध भाग न्याहाळले. त्यातील सोयी कशा आहेत ते पाहिले. प्राण्यांना हवे असलेले प्रेम तिला जाणवले. प्रत्येक प्राणी प्रेमाकरिता आसुसला होता. आम्हांला घरी जायचेच आम्हांला कुरवाळा, आम्ही तुम्हांला हवे आहोत का? जणू असे आपल्या डोळ्यांनी बोलत होता. कोणी चिडून तर कोणी शांतपणे पेशंटच्या भूमिकेत बसले होते. भरतने सर्व इस्पितळ दाखविले. छानशी माहिती दिली. तेथून बाहेर पडतांना लेखिकेला वाटले आज आपण एक वेगळेच जग पाहिले.

लिहिते होऊया.

प्रश्न 1.
पाऊस कोसळत असताना एक कुत्र्याचे छोटे पिल्लू दाराशी येऊन बसले आहे, अशावेळी तुम्ही काय कराल ते लिहा. किंवा कुत्र्याचे पिल्लू भर पावसात दारात आले तर तुम्ही कोणती काळजी घ्याल?
उत्तरः
भर पावसात कुत्र्याचे पिल्लू दारात आले तर मी प्रेमाने स्वागतच करीन, त्याचे ओले अंग मऊ कापडाने पुसून घेईन. त्याला मऊ सुती कापडाचे अंथरुण तयार करून देईन. एक वाटी दूधाची व एक वाटी खाऊची त्याच्याजवळ ठेवीन. त्याच्या पाठीवरुन प्रेमाने हात फिरवून त्याला आपलेसे करीन. पावसात जाऊ देणार नाही. त्याला कुशीत घेऊन मायेची ऊबही देईन.

 

प्रश्न 2.
मित्रमैत्रिणींमध्ये चर्चा करून ‘जैव विविधतेची गरज’ या विषयावर आठ ते दहा ओळी लिहा.
उत्तरः
जैव विविधता म्हणजे पृथ्वीवरील निरनिराळे सजीव. सामान्यपणे जैव विविधता म्हणजे जातिमधील विविधता व जीवशास्त्रीय संपन्नता. जैव विविधता परिसंस्था टिकवते. निसर्गातील कार्बनडायऑक्साईडचे चक्र सुरळीत ठेवते. सर्व घटक संतुलित ठेवते. म्हणून जलचक्र ही सुरक्षित राहते. पाणी शुद्ध ठेवते. जमिनीची धूप थांबवते. जैव विविधतेच्या नाशामुळे मानवी आरोग्य धोक्यात येईल. वेगवेगळे आजार होतील. बर्ड फ्ल्यू, स्वाईन फ्ल्यू चे विषाणू पसरतील. अगदी कीटकही आपणास उपयुक्त आहेत. परागकण पसरवून ते झाडांची निर्मिती करतात. त्यामुळे परिसंस्था टिकते. पर्यावरण संरक्षण आणि जैव विविधता संवर्धन कायदा 1999 चा अभ्यास करून जैव विविधता संपन्न करू या.

उपक्रम:

तुमच्या परिसरातील ज्या घरी पाळीव प्राणी आहेत अशा पाच घरांना भेटी दया. त्या घरातील लोक पाळीव
प्राण्यांची काळजी कशी घेतात याची खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती मिळवा व वर्गात सांगा.

सूचनाफलक

प्रश्न 1.
सूचनाफलक तयार करणे.

एखाद्या गोष्टीची माहिती दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे सूचना हे एक माध्यम आहे. दैनंदिन व्यवहारात अनेक ठिकाणी आपल्याला सूचना याव्या लागतात. दुसऱ्याने दिलेल्या सूचना वाचून त्याचा अर्थ समजून घ्यायचा असतो. अपेक्षित कृती योग्य तव्हेने होण्यासाठी दिलेल्या सूचनांचे आकलन होण्याचे कौशल्य निर्माण व्हायला हवे. यापूर्वी तुम्ही सूचनाफलक या घटकाचा अभ्यास केलेला आहे. या इयत्तेत तुम्ही स्वतः सूचनाफलक तयार करायला शिकणार आहात.

 

प्रश्न 2.
सूचनाफलकाचे विषय

 1. शाळेतील सुट्टीच्या संदर्भात सूचना.
 2. सहलीसंदर्भात सूचना.
 3. रहदारीसंबंधी सूचना.
 4. दैनंदिन व्यवहारातील सूचना.

प्रश्न 3.
सूचना तयार करताना लक्षात घ्यायच्या गोष्टी

 1. सूचना कमीत कमी शब्दांत असावी.
 2. सूचेनेचे लेखन स्पष्ट शब्दांत, नेमके व विषयानुसार असावे.
 3. सूचनेतील शब्द सर्वांना अर्थ समजण्यास सोपे असावेत.
 4. सूचनेचे लेखन शुद्ध असावे.

प्रश्न 4.
सूचनाफलक तयार करा. त्यासाठी खालील नमुना कृतींचा अभ्यास करा.
विषय- ‘उदया शहरातील पाणीपुरवठा बंद राहील.’
नमुना कृती 1

विषय- ‘कणखर’ गिर्यारोहण संस्थेतर्फे कॅम्पचे आयोजन.
नमुना कृती 2

 

प्रश्न 5.
तुमच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांना आवाहन
करणारा सूचनाफलक तयार करा.

भाषासौंदर्य

प्रश्न 1.
खालील म्हणी पूर्ण करा.

 1. मूर्ती लहान पण ………………. .
 2. शितावरून …………………….. .
 3. सुंठीवाचून …………………….. .
 4. …………………. सोंगे फार.
 5. …………… खळखळाट फार.
 6. दोघांचे भांडण ……………… .
 7. ………………… सव्वालाखाची.
 8. ………………… चुली.
 9. ……………….. आंबट.
 10. अंथरूण पाहून…………… .
 11. इकडे आड…………………. .
 12. ………………… गावाला वळसा.

Class 8 Marathi Chapter 10 आम्ही हवे आहोत का? Additional Important Questions and Answers

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः

2. वाक्यपूर्ती करा.

प्रश्न 1.
1. ‘आम्हांला तुमची गरज आहे;
2. माणसाच्या दयाबुद्धीला, करुणेला ………..
उत्तरः
1. ‘आम्हांला तुमची गरज आहे; तुम्हांला आम्ही हवे आहोत का?
2. माणसाच्या दयाबुद्धीला, करुणेला मुक्या प्राण्यांना केलेलं ते आवाहन होतं.

 

कृती 2: आकलन कृती

खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1.
जनावरांचे इस्पितळ कुठे आहे?
उत्तरः
मुंबईच्या परळ भागात जनावरांचे इस्पितळ आहे.

प्रश्न 2.
गलेलठ्ठ बोका काय करत होता?
उत्तरः
गलेलठ्ठ बोका आपल्या मिशा साफ करत बसला होता.

प्रश्न 3.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः

प्रश्न 4.
ओघतक्ता पूर्ण करा.
उत्तरः

कृती 3: व्याकरण कृती

प्रश्न 1.
विशेषण व विशेष्य यांच्या जोड्या लावा.

विशेषण विशेष्य
1.  छोटीशी अ. तसबीर
2. गलेलठ्ठ आ. रंग
3. उदी इ. बोका
4. मोठी ई. इमारत

उत्तर:

विशेषण विशेष्य
1. छोटीशी ई. इमारत
2. गलेलठ्ठ इ. बोका
3. उदी आ. रंग
4. मोठी अ. तसबीर

 

प्रश्न 2.
खालील शब्दांचा, शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा.
उत्तर:
1. योग येणे – वाक्य: आज ताजमहालचा ‘लाईट शो’ पाहण्याचा योग आला.
2. कार्यालय – वाक्यः सरकारी कार्यालय कागदपत्रांनी भरलेले असते.

कृती 4: स्वमत

प्रश्न 1.
अफाट आणि निरपेक्ष प्राणी प्रेमाचे तुम्ही अनुभवलेले वा वाचलेले एखादे उदाहरण तुमच्या शब्दांत थोडक्यात मांडा.
उत्तर:
निरपेक्ष प्राणीप्रेम म्हणजे डॉ. प्रकाश आमटे. जणू प्राणी आणि डॉ.प्रकाश हे समीकरणच जुळले आहे. त्यांनी आदिवासींच्या सेवेसह हेमलकसा येथे अनाथ प्राण्यांचाही सांभाळ केला आहे. ज्यांची आई मेली, अशा प्राण्यांना भक्ष्य न होऊ देता त्यांनी प्राणी अनाथालयात आणले. त्यांना हवा असलेला आहार, औषध-पाणी या गोष्टींची सोय केली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यावर पोटच्या मुलासारखे ते प्रेम करतात.

त्यांच्या संग्रहालयात कोल्हे, चित्ते, जंगली मांजरी, सांबर, हरिण, रानडुकरे, ससे, साप, अजगर, मगरी, सुसरी, नीलगाई आणि अन्य बरेच प्राणी आहेत. त्यांच्याशी ते गळाभेट करतात, त्यांच्याशी बोलतात, त्यांना गोंजारतात. हे सर्व प्राणी म्हणजेच त्यांचा परिवार आहे, इतक्या आपुलकीने व दयाबुद्धीने ते वागतात. www. anandwan.in या आंतरजालावर भेट देऊन त्यांचे कार्य पाहून आपण सारेच भूतदया शिकूया.

प्रश्न 2.
पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:

प्रश्न 2.
कोण ते लिहा.
1. बोक्याचे डोके कुरवाळले – [साहेबांनी]
2. इस्पितळ पाहण्याची परवानगी मागितली – [लेखिका]

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
कोण कोणास म्हणाले?
“बाई, हा मांजराचा विभाग बघायचाय?”
उत्तरः
भरत लेखिकेस म्हणाले.

 

2. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1.
प्रत्येक खोलीत कोण होते?
उत्तरः
प्रत्येक खोलीत एक एक पेशंट होता.

प्रश्न 2.
लेखिकेने उत्सुकतेने कोठे पाऊल टाकले?
उत्तरः
लेखिकेने उत्सुकतेने मांजरांच्या विभागात पाऊल टाकले.

कृती 3: व्याकरण कृती

प्रश्न 1.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

 1. मोठे
 2. अस्वच्छ
 3. डावीकडे
 4. बाहेर

उत्तरः

 1. छोटे
 2. स्वच्छ
 3. उजवीकडे
 4. आत

 

प्रश्न 2.
वचन बदलाः

 1. कट्टा
 2. जाळी
 3. पेशंट
 4. ओटा
 5. विभाग
 6. खण

उत्तरः

 1. कट्टे
 2. जाळ्या
 3. पेशंट
 4. ओटे
 5. विभाग
 6. खण

कृती 4: स्वमत

प्रश्न 1.
तुम्ही प्राण्यांचा डॉक्टर (व्हेटरनरी) झालात तर प्राण्यांवर कसे उपचार कराल? तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
डॉक्टर सदैव पेशंटला मानसिक आधार देतात. त्यानेच त्यांचा अर्धा रोग बरा होतो. मी प्रेमाने प्राण्यांना कुरवाळेन. त्यांना गोंजारून त्यांच्याशी बोलेन. स्पर्शाची भाषा त्यांना लवकर कळते. मग योग्य ते औषधोपचार करून त्यांना बरे करीन.

 

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः

प्रश्न 2.
कोण ते लिहा.
उत्तरः

 1. हिरव्या डोळ्यांनी, व्याकुळ नजरेने बघणारा – [काळाभोर बोका]
 2. कावरंबावरं झालेलं – [कबरं पिलू]
 3. चिडलेल्या वाघिणीसारखी – [एक मांजरी]
 4. आपल्या पंजानं तोंड, मिशा, ठिपक्याचं डोळे पुसून साफ करणारे – [ठिपक्याचं मांजर]

प्रश्न 3.
सकारण लिहा. एक मांजर खूप आजारी असावं –
उत्तरः
कारण ते डोळे मिटून पुढल्या दोन पंजांवर तोंड ठेवून गप पडलं आहे.

 

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः

प्रश्न 2.
एक ते दोन शब्दांत उत्तर लिहून चौकट पूर्ण करा.
उत्तरः
1. प्रकृतीचे चढउतार दाखवतो – [तक्ता]
2. प्रत्येक पेशंटला बसायला हे आहे – [मऊ अंथरुण]

प्रश्न 3.
एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रत्येकजण काय म्हणत आहे, असे लेखिकेस वाटते?
उत्तरः
प्रत्येकजण जणू म्हणते आहे, मला इथं फार एकट वाटतंय. जरा माझ्याकडे याहो, मला कुरवाळा.

 

प्रश्न 4.
घटना व परिणाम लिहा.
उत्तरः

घटना परिणाम
लेखिका व
भरत खोलीत
पाऊल
टाकतात.
1. सारी मांजरं चमकतात,
2. त्यांच्या डोळ्यात आतुरता भरली होती.
3. काही मांजर जाळीवर नाक घासतात.
4. काही नखांनी जाळ्या खरवडू लागतात.

कृती 3: व्याकरण कृती

प्रश्न 1.
वचन बदला

 1. बशी
 2. तक्ता
 3. मांजर
 4. खोली
 5. भिंत
 6. पिलू
 7. डोळा
 8. ठिपका

उत्तरः

 1. बश्या
 2. तक्ते
 3. मांजरी
 4. खोल्या
 5. भिंती
 6. ठिपके
 7. पिल्ले
 8. डोळे
 9. ठिपके

 

प्रश्न 2.
खालील शब्दांचा / वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा.
उत्तरः

 1. कावरंबावरं होणे – गावाहून आलेला मुलगा शाळेच्या पहिल्या दिवशी वर्गात कावराबावरा झाला होता.
 2. व्याकूळ होणे – हरवलेल्या मुलाला शोधण्यासाठी आई व्याकूळ झाली होती.
 3. लक्ष वेधून घेणे – जादुगाराने आपल्या जादूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
 4. कलकलाट होणे – मधल्या सुट्टीत मुलांचा कलकलाट होतो.

प्रश्न 3.
‘कलकलाट’ या शब्दासारखे ४ शब्द लिहा.
उत्तरः

 1. चिवचिवाट
 2. घमघमाट
 3. थरथराट
 4. झगमगाट

कृती 4: स्वमत

प्रश्न 1.
तुम्ही आपल्या आजोबांबरोबर वसतिगृहाला भेट दिली तेव्हाचा अनुभव तुमच्या शब्दात लिहा.
उत्तरः
मला आजोबांनी मुद्दाम वसतिगृह कसे असते ते दाखविण्यासाठी नेले होते. आम्ही जाताच मुलांचा एकच किलकिलाट सुरू झाला. आजोबांनी त्यांच्याशी गप्पा मारल्या. छोटीशी गोष्ट सांगितली. त्यांची राहण्याची, झोपण्याची जागा सुव्यवस्थित होती. गाडीच्या बर्थ सारखे झोपण्यासाठी बर्थ होते. मला खूप आश्चर्य वाटले. मुले स्वत:च स्वत:ची कामे करत होती.

 

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः

प्रश्न 2.
घटना व परिणाम लिहा.
उत्तरः

घटना परिणाम
लेखिका जाळीच्या छिद्रातून
बोट घालून कुणाचं डोक  खाजवते
कुणा गळा खाजवते.
1.  मांजर खूश होतात.
2. पोटांतून गुर्रगुर्र आवाज काढून समाधानाची पावती देतात.

एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
लेखिकेला निरोप देताना कोणता गजर झाला?
उत्तरः
लेखिकेला निरोप देताना ‘मियाँव’ चा गजर झाला.

प्रश्न 2.
माजरांना एकटं का वाटत असलं पाहिजे?
उत्तरः
घरी लाड करून घ्यायची सवय असल्याने मांजरांना एकटं वाटत असल पाहिजे.

 

प्रश्न 3.
परत जाताना लेखिकेला मांजराच्या चेहऱ्यावर काय दिसले?
उत्तरः
परत जाताना लेखिकेला मांजराच्या चेहऱ्यावर खिन्नता दिसली.

कृती 2: आकलन कृती

कोण कोणास म्हणाले ते लिहा.

प्रश्न 1.
“या मांजरांना औषधपाणी माणसांसारखं करतात का रे?”
उत्तरः
लेखिका भरतला म्हणाल्या.

प्रश्न 2.
“त्याचं खाणंपिणं पथ्याचं असतं, बाई.”
उत्तरः
भरत लेखिकेला म्हणाल्या.

प्रश्न 3.
“शेजारी कुत्र्यांचा विभाग आहे, तिथ जाऊ या जरा”
उत्तरः
भरत लेखिकेला म्हणाला.

 

प्रश्न 4.
उत्तरे लिहा.
उत्तरः

 1. हे टोपलीत होते – पिलं
 2. पिलं या रंगाची होती. – पांढरी
 3. कुत्रीचा रंग – तपकिरी
 4. पिलं हा आवाज करीत होते – कुई कुई

कृती 3: व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील शब्दांचा, वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा.
उत्तरः

 1. निरोप देणे – इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांना आम्ही वर्षा अखेर निरोप देतो.
 2. विलक्षण – पाच वर्षांचा मुलगा एकटा विमान प्रवास करतो हे ऐकून मला विलक्षण आश्चर्य वाटले.
 3. खिन्न – क्रिकेट मॅचमध्ये भारत हरला, तेव्हा सगळे खिन्न झाले.

2. खालील अधोरेखित शब्दांसाठी उताऱ्यात आलेला समानार्थी शब्द लिहा.

प्रश्न 1.
एक भली दांडगी अतिशय सुंदर कुत्री तिथं निजलेली दिसली.
उत्तरः
एक भली दांडगी अतिशय देखणी कुत्री तिथं निजलेली दिसली.

खालील अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून पुन्हा लिहा.

प्रश्न 1.
त्यांची आई तपकिरी रंगाची आहे.
उत्तरः
त्यांचे बाबा तपकिरी रंगाचे आहेत.

 

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः

‘का?’ ते लिहा.

प्रश्न 1.
एक कुत्रा सारखा झेप घेऊ लागतो.
उत्तरः
पुढचे दोन्ही पंजे जुळवून नमस्कार करण्यासाठी.

प्रश्न 2.
साखळीला सारखे हिसके देणारे कुत्रे.
उत्तरः
सुटण्याचा प्रयत्न करण्यासाठी.

 

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
ओघतक्ता पूर्ण करा.
उत्तरः

कोण कोणास म्हणाले ते लिहा.

प्रश्न 1.
‘इथं आणखी कोणते प्राणी येतात रे?’
उत्तरः
लेखिका भरतला म्हणाल्या.

प्रश्न 2.
‘पुष्कळ येतात बाई,
उत्तरः
भरत लेखिकेला म्हणाला.

 

वाक्य पूर्ण करा.

प्रश्न 1.
आम्ही बोलतो आहोत, एवढ्यात …………………..
उत्तरः
आम्ही बोलतो आहोत, एवढ्यात माझ्या पायांजवळून एक मांजरी चाललेली दिसते.

प्रश्न 2.
भरत मला म्हणतो, …………………
उत्तरः
भरत मला म्हणतो, ‘हात लावा बाई तिला.’

उचित पर्याय निवडून खालील रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.
1. एका कुत्र्याच्या ……………… मोठं गळू झालं आहे. (कानामागं, पाठीवर, मानेवर)
2. एकाचा मोडलेला पाय …………….. घालून ठेवला आहे. (टबमध्ये, प्लॅस्टरमध्ये, वाळूमध्ये)
उत्तरः
1. कानामागं
2. प्लॅस्टरमध्ये

कृती 3: व्याकरण कृती

प्रश्न 1.
विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावा.

उत्तरेः

 1. लठ्ठ × रोड
 2. चिडकी × शांत
 3. स्वस्थ × अस्वस्थ
 4. आल्या × गेल्या

 

प्रश्न 2.
वचन बदला.

 1. शेळी
 2. मेंढी
 3. ससा
 4. माकड
 5. कुत्रा
 6. मांजर

उत्तर:

 1. शेळ्या
 2. मेंढ्या
 3. ससे
 4. माकडं
 5. कुत्रे
 6. मांजरी

लिंग बदला.

प्रश्न 3.

 1. पाहुणा
 2. मेंढी
 3. कुत्री
 4. बैल

उत्तर:

 1. पाहुणी
 2. मेंढा
 3. कुत्रा
 4. गाय

 

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:

प्रश्न 2.
ओघतक्ता पूर्ण करा.
उत्तर:

कृती 2: आकलन कृती

एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
आंधळ्या मांजरीला बाहेर का सोडत नाही?
उत्तरः
तिचा बाहेर निभाव लागणार नाही म्हणून तिला बाहेर सोडत नाही.

 

प्रश्न 2.
लेखिकेला इस्पितळातून बाहेर आल्यावर काय वाटले?
उत्तरः
एक वेगळच जग पाहिलं असं तिला वाटलं.

रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.
1. जन्मापासून ……… आहे ती.
2. आता मोठी …………………. झाली आहे.
उत्तर:
1. आंधळी
2. मांजरी

कृती 3: व्याकरण कृती

प्रश्न 1.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

 1. विश्वास
 2. आंधळे
 3. आत
 4. मोठी

उत्तरेः

 1. अविश्वास
 2. डोळस
 3. बाहेर
 4. लहान, छोटी

 

प्रश्न 2.
खालील आकृतीत नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद यांची उदाहरणे दिली आहेत. त्या शब्दांचा उपयोग करून अर्थपूर्ण वाक्ये तयार करा.

उत्तरः

 1. ती मांजर आंधळी आहे.
 2. ते पिल्लू दचकले.
 3. कुत्रा इमानदार आहे.
 4. बिचारी मांजर दचकली.
 5. पिलू घाबरले.
 6. आम्ही कुत्र्याला घेऊन फिरून आलो.
 7. मांजरीचा विश्वासाने वावर आहे.
 8. ती आंधळी असली तरी आम्हांला आवडते.

कृती 4: स्वमत

प्रश्न 1.
आम्हांला तुमची गरज आहे; तुम्हांला आम्ही हवे आहोत कां? या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ तुमच्य शब्दांत मांडा.
उत्तरः
हे वाक्य प्राण्यांच्या तोंडचे आहे. इस्पितळातील असहाय्य प्राणी आपल्याला सूचवित आहेत की आम्ही समाजाचेच घटक आहोत. जैव विविधतेचे सभासद आहोत. पर्यावरणासाठी उपयुक्त आहोत. तेव्हा आम्हांला तुम्ही सांभाळले तर पर्यावरण संतुलन राहील. मानवाला लाभच होईल. आम्हांला तुम्ही हवे आहात पण तुम्ही आमच्यावर प्रेम कराल नं? आम्ही तुम्हांला हवे आहोत का? असा मार्मिक सवाल प्राणी करीत आहेत व आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करीत आहेत.


इयत्ता आठवी मराठी स्वाध्याय उपाय

निष्कर्ष

आम्हाला आशा आहे की महाराष्ट्रावरील हा लेख तुम्हाला 'आठवी मराठी आम्ही हवे आहोत का? स्वाध्याय' मदत करेल. तुम्हाला काही प्रश्न असल्यास, त्यांना खाली टिप्पणी विभागात मोकळ्या मनाने पोस्ट करा. आम्ही लवकरात लवकर तुमच्याकडे परत येऊ.
Share:

0 Comments:

Post a Comment

Plus Two (+2) Previous Year Question Papers

Plus Two (+2) Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Physics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Chemistry Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Maths Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Zoology Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Botany Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Computer Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Computer Application Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Commerce Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Humanities Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Economics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) History Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Islamic History Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Psychology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Sociology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Political Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Geography Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Accountancy Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Business Studies Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) English Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Hindi Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Arabic Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Kaithang Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Malayalam Previous Year Chapter Wise Question Papers

Plus One (+1) Previous Year Question Papers

Plus One (+1) Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Physics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Chemistry Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Maths Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Zoology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Botany Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Computer Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Computer Application Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Commerce Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Humanities Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Economics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) History Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Islamic History Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Psychology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Sociology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Political Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Geography Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Accountancy Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Business Studies Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) English Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Hindi Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Arabic Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Kaithang Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Malayalam Previous Year Chapter Wise Question Papers
Copyright © HSSlive: Plus One & Plus Two Notes & Solutions for Kerala State Board About | Contact | Privacy Policy