Hsslive.co.in: Kerala Higher Secondary News, Plus Two Notes, Plus One Notes, Plus two study material, Higher Secondary Question Paper.

Saturday, February 12, 2022

इयत्ता नववी उजाड उघडे माळरानही मराठी स्वाध्याय PDF

 

इयत्ता नववी उजाड उघडे माळरानही मराठी स्वाध्याय PDF
इयत्ता नववी उजाड उघडे माळरानही मराठी स्वाध्याय PDF


या लेखात, आम्ही उजाड उघडे माळरानही विषयासाठी इयत्ता नववी मराठी सोल्यूशन्स देऊ. इयत्ता नववी मधील विद्यार्थी पाठ्यपुस्तकांमध्ये उपस्थित असलेल्या व्यायामांसाठी प्रश्न आणि उत्तरे डाउनलोड आणि कॉपी करण्यास सक्षम असतील.

इयत्ता नववी उजाड उघडे माळरानहीाच्या पुस्तकात महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमातील सर्व प्रश्नांचा समावेश आहे. येथे सर्व प्रश्न पूर्ण स्पष्टीकरणासह सोडवले आहेत आणि डाउनलोड करण्यासाठी विनामूल्य उपलब्ध आहेत. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता नववी उजाड उघडे माळरानहीाचे पुस्तक खाली दिले आहे. आम्‍हाला आशा आहे की आमच्‍या इयत्‍ता नववी वीच्‍या उजाड उघडे माळरानहीाचे पुस्‍तक तुमच्‍या अभ्यासात मदत करेल! जर तुम्हाला आमचे इयत्ता नववी चे पुस्तक आवडले असेल तर कृपया ही पोस्ट शेअर करा.


इयत्ता नववी उजाड उघडे माळरानही स्वाध्याय

मंडळाचे नाव

Maharashtra Board

ग्रेडचे नाव

नववी

विषय

उजाड उघडे माळरानही

वर्ष

2022

स्वरूप

PDF/DOC

प्रदाता

hsslive.co.in

अधिकृत संकेतस्थळ

mahahsscboard.in


समाधानासह महाराष्ट्र बोर्ड आठवा स्वाध्याय कसे डाउनलोड करायचे?

महाराष्ट्र बोर्ड नववी स्वाध्याय PDF डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

  1. वेबसाइट- Hsslive ला भेट द्या. 'स्वाध्याय' लिंकवर क्लिक करा.
  2. महा बोर्ड नववी स्वाध्याय PDF पहा.
  3. आता महाराष्ट्र बोर्ड नववी स्वाध्याय तपासा.
  4. डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भांसाठी जतन करा.

इयत्ता नववी उजाड उघडे माळरानही स्वाध्याय उपाय

इयत्ता नववी स्वाध्याय मधील विद्यार्थी खालील लिंक्सवरून उजाड उघडे माळरानहीाचे उपाय डाउनलोड करू शकतील.


1. कारणे लिहा.

प्रश्न (अ)
कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले, कारण …………………..
उत्तरः
कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले, कारण वसंत ऋतूच्या स्वागतासाठी.

प्रश्न (आ)
जगातील सर्व फूले मनात झुरू लागली कारण ………………………..
उत्तरः
जगातील सर्व फूले मनात झुरू लागली कारण पळसफुले मातीच्या अंकावरती फुलून आली.

(आ) खालील आकृतिबंध पूर्ण करा.

प्रश्न 1.
खालील आकृतिबंध पूर्ण करा.

उत्तरः

(इ) पृथ्वीचे रूप खालील बाबतींत स्पष्ट करा.

प्रश्न 1.
पृथ्वीचे रूप खालील बाबतींत स्पष्ट करा.

उत्तरः

2. सृष्टीतील खालील घटक वसंतऋतूच्या आगमनाने कसे सजले, ते स्पष्ट करा.

प्रश्न 1.
सृष्टीतील खालील घटक वसंतऋतूच्या आगमनाने कसे सजले, ते स्पष्ट करा.

उत्तरः

घटक त्यांचे सजणे
1. लिंबोणी गर्द पोपटी रंगाची वस्त्रे घालून सजली आहे.
2. नागफणी जर्द तांबडी कर्णफुले घालून नागफणी सजली आहे.
3. घाणेरी दुरंगी चुनरीत सजली आहे.
4. पळसफुले मातीच्या अंकावरती बहरून आली आहेत.

3. खालील शब्दांसाठी कवितेत आलेले समान अर्थाचे शब्द शोधा.

प्रश्न 1.
खालील शब्दांसाठी कवितेत आलेले समान अर्थाचे शब्द शोधा.
उत्तरः

  1. भेटवस्तू – [नजराणा]
  2. सजली – [नटुनी]
  3. अरुंद रस्ता – [पाणंद]
  4. अंक – [चिन्ह]

4. भावार्थाधारित.

प्रश्न 1.
‘सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी’ या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.
उत्तरः
वरील काव्यपंक्ती ‘उजाड उघडे माळरानही’ या कवितेतील आहे. या कवितेच्या कवयित्री ‘ललिता गादगे’ आहेत. यांनी या ठिकाणी वसंतऋतूच्या आगमनामुळे सृष्टीच्या निसर्गसौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केले आहे.

प्रश्न 2.
‘उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान’ या ओळीतील तुम्हांला कळलेले अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तरः
वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीतील प्रत्येक गोष्टीला अतिशय आनंद झाला आहे. वसंतऋतूच्या आगमनाने उजाड उघडे माळरानही रंगबिरंगी फुलांनी, पानांनी बहरून आलेले आहेत. जणू काही ते माळरानही अतिशय आनंदाने वसंतऋतूचे गीत आनंदाने गात आहे.

5. अभिव्यक्ती:

प्रश्न (अ)
वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा.
उत्तरः
‘कृती: 3 काव्यसौंदर्य’ मधील प्र. (3) चे उत्तर पहा.

प्रश्न (आ)
सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हांला सुचतील असे उपाय लिहा.
उत्तरः
‘कृती : 3 काव्यसौंदर्य’ मधील प्र. (4) चे उत्तर पहा.

Marathi Akshar Bharati Class 9 Textbook Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही Additional Important Questions and Answers

पुढील पदयाच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः


2. जोड्या जुळवा.

प्रश्न 1.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. रंग उधळले (अ) सृष्टी
2. बेरड कोरड (ब) लिंबोणी
3. गर्द पोपटी (क) कर्णफुले
4. जर्द तांबडी (ड) दिशा-दिशांन

उत्तरः

‘अ’ गट ‘ब’ गट
1. रंग उधळले (ड) दिशा-दिशांन
2. बेरड कोरड (अ) सृष्टी
3. गर्द पोपटी (ब) लिंबोणी
4. जर्द तांबडी (क) कर्णफुले

प्रश्न 2.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. लुसलुस पाने अंगोपांगी (अ) पिंपळ पाने
2. दुरंगी चुनरीत उभी (ब) सांबर वृक्ष
3. मऊ मुलायम मोरपिसारी (क) घाणेरी
4. लाल कळ्यांनी लखडून उभे (ड) वड वृक्ष

उत्तर:

‘अ’ गट ‘ब’ गट
1. रंग उधळले (ड) दिशा-दिशांन
2. बेरड कोरड (क) कर्णफुले
3. गर्द पोपटी (अ) सृष्टी
4. जर्द तांबडी (ब) लिंबोणी

3. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1.
दिशा-दिशांना रंग का उधळले आहेत?
उत्तरः
वसंतऋतूच्या स्वागतासाठी दिशा दिशांना रंग उधळले आहेत.

प्रश्न 2.
वसंतऋतूच्या स्वागतासाठी कोण नजराणा घेऊन आली आहे?
उत्तरः
वसंतऋतूच्या स्वागतासाठी बेरड, कोरड सृष्टी नजराणा घेऊन आली आहे.

प्रश्न 3.
वसंतऋतूच्या स्वागतासाठी लिंबोणी कशी आली आहे?
उत्तर:
गर्द पोपटी रंगाची वस्त्रे परिधान करून, मुरडत लिंबोणी आली आहे.

प्रश्न 4.
वसंतऋतूच्या स्वागतासाठी नागफणी कशी सजली आहे?
उत्तरः
वसंतऋतूच्या स्वागतासाठी जर्द तांबडी कर्णफुले घालून नागफणी सजली आहे.

प्रश्न 5.
लुसलुस पाने अंगावरती घेऊन कोण झुलत आहे?
उत्तर:
लुसलुस पाने अंगावरती घेऊन वड झुलत आहे.

प्रश्न 6.
दुरंगी चुनरीत कोण नटुन थटुन आली आहे?
उत्तरः
दुरंगी चुनरीत घाणेरी नटुन थटुन आली आहे.

प्रश्न 7.
पिंपळाची पाने कशी आहेत?
उत्तरः
पिंपळाची पाने मऊ मुलायम मोरपिसासारखी आहेत.

प्रश्न 8.
पाणंदीवर कोण उभा आहे?
उत्तर:
सांबर वृक्ष पाणंदीवर उभा आहे.

प्रश्न 9.
लाल कळ्यांनी लखडून कोण आहे?
उत्तर:
लाल कळ्यांनी लखडून सांबर वृक्ष आहे.

प्रश्न 10.
मातीच्या अंकावरती कोण बहरून आले आहेत?
उत्तरः
मातीच्या अंकावरती पळसफुले बहरून आली आहेत.

प्रश्न 11.
पळसफुलांना पाहून कोण झुरत आहेत?
उत्तरः
पळसफुलांना पाहून जगातील सारी कुसुमे झुरत आहेत.

प्रश्न 12.
आंब्याच्या मोहरातून काय आली आहे?
उत्तरः
आंब्याच्या मोहरातून कोकिळेची सुरेल तान आली आहे.

प्रश्न 13.
उजाड उघडे माळरान काय करत आहे?
उत्तरः
उजाड उघडे माळरान वसंतगान गाऊ लागले आहे.

प्रश्न 14.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

  1. बेरड कोरड इथली …………….. घेऊन आली ती नजराणा. (दृष्टी, सृष्टी, कष्टी, मस्ती)
  2. गर्द ……………. लेऊन वसने मुरडत आली लिंबोणी. (पिवळी, लाल, तांबडी, पोपटी)
  3. जर्द तांबडी कर्णफुलेही घालून सजली ……………….. (नागफणी, लिंबोणी, घाणेरी, पिंपळ)
  4. स्वागत करण्या …………… ऋतूचे रंग उधळले दिशादिशांना. (शिशिर, श्रावण, वसंत, ग्रीष्म)
  5. ………….. पाने अंगोपांगी झुले वड हा दंग होऊनी. (मळमळ, झळझळ, लुसलुस, मुरडत)
  6. दुरंगी …………. उभी ही घाणेरी ही नटुनी थटुनी. (कळ्यांनी, मोरपिसारी, मुलायम, चुनरीत)
  7. सळसळ झळझळ …………….. पाने मऊ मुलायम मोरपिसापरी. (वड, पिंपळ, आंबा, पळस)
  8. सांबर …………….. कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी. (पोपटी, तांबडा, लाल, हिरवी)
  9. आंब्याच्या मोहरातून आली ………….. सुरेल तान. (पोपटाची, चिमणीची, कोकिळेची, कावळ्याची)
  10. ……….. सारी या जगातली पाहून त्यांना मनात झुरती. (सुरेल, स्वागता, सजली, कुसुमे)

उत्तर:

  1. सृष्टी
  2. पोपटी
  3. नागफणी
  4. वसंत
  5. लुसलुस
  6. चुनरीत
  7. पिंपळ
  8. लाल
  9. कोकिळेची
  10. कुसुमे

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
सहसंबंध शोधा.

  1. गर्द : पोपटी : : जर्द : ………….
  2. लुसलुस : पाने : : दुरंगी : ………………
  3. आंबा : मोहर : : कोकिळा : …………….

उत्तर:

  1. तांबडी
  2. चुनरी
  3. तान

प्रश्न 2.
समान अर्थाच्या काव्यपंक्ती शोधून लिहा.

  1. वसंतात रंगाची उधळण झालेली असते.
  2. वसंतात लिंबोणी नटल्याप्रमाणे भासते.
  3. वडाचे झाड वसंतऋतूत आनंदाने डुलत आहे.
  4. सांबर वृक्ष लाल कळ्यांनी बहरून वसंतऋतूच्या स्वागतासाठी उभे आहेत.
  5. पळसाची फुले पाहून इतर फुले झुरतात.
  6. माळरानही वसंतऋतूचे गीत गात आहे.

उत्तर:

  1. स्वागत करण्या वसंत ऋतूचे रंग उधळले दिशा-दिशांना.
  2. गर्द पोपटी लेऊन वसने मुरडत आली लिंबोणी.
  3. लुसलुस पाने अंगोपांगी झुले वड हा दंग होऊनी.
  4. सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी
  5. कुसुमे सारी या जगातली पाहून त्यांना मनात झुरती.
  6. उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान.

3. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

प्रश्न 1.
सळसळ झळझळ पिंपळ पाने ……………………
(अ) दुरंगी चुनरीत उभी ही
(ब) उभे स्वागता पाणंदीवरीत
(क) मऊ मुलायम मोरपिसापरी
(ड) लुसलुस पाने अंगोपांगी
उत्तर:
सळसळ झळझळ पिंपळ पाने मऊ मुलायम मोरपिसापरी.

प्रश्न 2.
सांबर लाल कळयांनी लखडून
(अ) लुसलुस पाने अंगोपांगी
(ब) सळसळ झळझळ पिंपळ पाने
(क) झुले वड हा दंग होऊनी
(ड) उभे स्वागता पाणंदीवरी
उत्तर:
सांबर लाल कळयांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी.

4. काव्यपंक्तींचा योग्य क्रम लावा.

प्रश्न 1.
(अ) बेरड कोरड इथली सृष्टी
(ब) रंग उधळले दिशा-दिशांना
(क) स्वागत करण्या वसंत ऋतूचे
(ड) घेऊन आली ती नजराणा
उत्तरः
(अ) स्वागत करण्या वसंत ऋतूचे.
(ब) रंग उधळले दिशा-दिशांना
(क) बेरड कोरड इथली सृष्टी
(ड) घेऊन आली ती नजराणा

प्रश्न 2.
(अ) घालून सजली नागफणी
(ब) मुरडत आली लिंबोणी
(क) जर्द तांबडी कर्णफुलेही
(ड) गर्द पोपटी लेऊन वसने
उत्तरः
(अ) गर्द पोपटी लेऊन वसने
(ब) मुरडत आली लिंबोणी
(क) जर्द तांबडी कर्णफुलेही
(ड) घालून सजली नागफणी

प्रश्न 3.
(अ) झुले वड हा दंग होऊनी,
(ब) घाणेरी ही नटुनी थटुनी
(क) लुसलुस पाने अंगोपांगी
(ड) दुरंगी चुनरीत उभी ही
उत्तरः
(अ) लुसलुस पाने अंगोपांगी,
(ब) झुले वड हा दंग होऊनी,
(क) दुरंगी चुनरीत उभी ही
(ड) घाणेरी ही नटुनी थटुनी

प्रश्न 4.
(अ) मऊ मुलायम मोरपिसापरी,
(ब) सळसळ झळझळ पिंपळ पाने
(क) उभे स्वागता पाणंदीवरी
(ड) सांबर लाल कळयांनी लखडून
उत्तरः
(अ) सळसळ झळझळ पिंपळ पाने,
(ब) मऊ मुलायम मोरपिसापरी,
(क) सांबर लाल कळयांनी लखडून
(ड) उभे स्वागता पाणंदीवरी

प्रश्न 5.
(अ) कुसुमे सारी या जगातली
(ब) पळसफुले ही बहरून आली
(क) पाहून त्यांना मनात झुरती
(ड) या मातीच्या अंकावरती
उत्तर:
(अ) पळसफुले ही बहरून आली,
(ब) या मातीच्या अंकावरती,
(क) कुसुमे सारी या जगातली
(ड) पाहून त्यांना मनात झुरती

प्रश्न 6.
कोण ते लिहा.
उत्तर:

प्रश्न 7.
काव्यपंक्तीवरून शब्दांचा योग्य क्रम लावा.

  1. नजराणा, बेरड, वसंत, उधळले
  2. तांबडी, लिंबोणी, नागफणी, पोपटी
  3. घाणेरी, वड, दुरंगी, पाने
  4. सांबर, पिंपळ, मोरपिसापरी, पाणंदीवरी
  5. कुसुमे, झुरती, मातीच्या, पळसफुले
  6. माळरानही, वसंतगान, मोहरातून, कोकिळेची

उत्तर:

  1. वसंत, उधळले, बेरड, नजराणा
  2. पोपटी, लिंबोणी, तांबडी, नागफणी
  3. पाने, वड, दुरंगी, घाणेरी
  4. पिंपळ, मोरपिसापरी, सांबर, पाणंदीवरी
  5. पळसफुले, मातीच्या, कुसुमे, झुरती
  6. मोहरातून, कोकिळेची, माळरानही, वसंतगान

प्रश्न 8.
चूक की बरोबर लिहा.

  1. जर्द तांबडी कर्णफुले घालून लिंबोणी सजली आहे.
  2. गर्द पोपटी वसने घालून सृष्टी आली आहे.
  3. नागफणी बेरड कोरडी झाली आहे.
  4. लुसलुस पाने अंगोपांगी घेऊन वड दंग झाले आहे.
  5. सांबर दुरंगी चुनरीत पाणंदीवर उभे आहे.

उत्तर:

  1. चूक
  2. चूक
  3. चूक
  4. बरोबर
  5. चूक

कृती 3: काव्यसौंदर्य

1. खालील काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्पष्ट करा.

प्रश्न 1.
स्वागत करण्या वसंत ऋतूचे
रंग उधळले दिशा-दिशांना
उत्तरः
वसंतऋतूच्या आगमनाच्या स्वागताचे वर्णन करताना कवयित्री सांगतात, वसंत ऋतूमध्ये वेगवेगळ्या रंगानी पाने, फुले, निसर्ग सारी सृष्टी सजलेली आहे. विविध रंगाच्या फुलांनी निसर्ग बहरलेला आहे. यामुळे आजूबाजूचे पशु-पक्षी सुद्धा आनंदित झाले आहेत. जणू काही वसंतऋतूच्या स्वागतासाठी हे होत आहे. सर्व दिशा वेगवेगळ्या रंगानी उजळून निघाल्या आहेत.

प्रश्न 2.
गर्द पोपटी लेऊन वसने
मुरडत आली लिंबोणी
उत्तरः
वसंतऋतूत सर्व परिसर नटलेला सजलेला आहे. नानाविध रंगांनी निसर्गाचे रूप मनमोहक झालेले आहे. या वसंतऋतूत झाडांना नवी पालवी फुटते. त्या हिरव्या पालवीला बघून असे वाटते की, गर्द पोपटी म्हणजे हिरव्या रंगाची वस्त्रे परिधान करून लिंबोणी लचकत, मुरडत आली आहे.

2. पुढील ओळींचा अर्थसौंदर्य स्पष्ट करा.

प्रश्न 1.
स्वागत करण्या वसंत ऋतूचे, रंग उधळले दिशा-दिशांना.
उत्तरः
वसंतऋतूच्या आगमनाच्या स्वागताचे वर्णन करताना कवयित्री सांगतात, वसंत ऋतूमध्ये वेगवेगळ्या रंगाची पाने, फुले फुलतात. सारा निसर्ग, सारी सृष्टी वेगवेगळ्या रंगांनी सजलेली आहे. जणू काही वसंत ऋतूच्या स्वागतासाठी हे होत आहे. रंग उधळल्यामुळे दिशा उजळून निघाल्या आहेत.

प्रश्न 2.
जर्द तांबडी कर्णफुलेही घालून सजली नागफणी.
उत्तरः
गर्द तांबड्या रंगाची कर्णफुले घालून नागफणीची झाडे वसंतऋतूच्या स्वागतासाठी सजली आहेत. वसंतऋतूच्या आगमनाने साऱ्या सृष्टीत आनंद पसरलेला आहे.

प्रश्न 3.
दुरंगी चुनरीत उभी ही घाणेरी ही नटुनी थटुनी
उत्तरः
घाणेरी सुद्धा दोन रंगाची ओढणी आपल्या अंगाखांदयावर परिधान करून वसंतऋतूच्या स्वागतासाठी नटून थटून उभी आहे.

प्रश्न 4.
सळसळ झळझळ पिंपळ पाने मऊ मुलायम मोरपिसारी,
उत्तरः
वसंतऋतूच्या स्वागतासाठी पिंपळ मोरपिसाप्रमाणे मऊ व मुलायम पाने आपल्या अंगावर घेऊन सळसळ करत उभा आहे.

प्रश्न 5.
पळसफुले ही बहरून आली या मातीच्या अंकावरती
उत्तरः
पळसाच्या फुलांना बहर आला आहे. या बहरलेल्या फुलांनी वसंतऋतूच्या स्वागतासाठी आपला सडाच या मातीवर पसरलेला आहे. ती अतिशय आनंदाने या मातीवर पसरलेली, सुखावलेली आपल्याला पाहायला मिळतात.

प्रश्न 6.
आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेल तान.
उत्तरः
वसंतऋतूत सृष्टीत अनेक बदल घडतात. वसंतऋतूत आंब्याच्या झाडाला मोहर येतो.अशा या आनंददायी वातावरणात आंब्याच्या झाडावर बसून कोकिळा सुरेल तान घेत असते.

प्रश्न 7.
वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा.
उत्तरः
वसंतऋतू हा भारतातील सर्व ऋतूचा राजा मानला जातो. म्हणूनच त्याला ‘ऋतुराज’ देखील म्हणतात. वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीत बदल होतात. ती निसर्गसौंदर्याने न्हाऊन निघते. जणू वसंतऋतूचे स्वागत करण्यासाठी ती बहरते. झाडांना नवी पालवी येते. पाने फुले बहरतात. लिंबोणी, अबोली, जाई, जुई, केवडा, रातराणी, चंपा, चमेली अशी विविध फुले फुलतात. त्यांचा सुगंध जणू वसंतऋतूचे स्वागत करण्यासाठी सज्ज होतो. वसंतऋतूचे आगमन होणार म्हणून पक्षीही खुश होतात.

वसंतऋतूचे स्वागत पक्षीही करतात. त्यांचे कलरव कानी पडतात. कोकिळा कुहू कुहू करून आपले गाणे सुरू करते. जणू ती वसंतऋतू आल्याची ग्वाही देते. वसंतऋतूत संपूर्ण सजीव सृष्टीत एक नवीन उत्साह व आनंद आपल्याला पहायला मिळतो.

प्रश्न 8.
मानवी जीवनात वसंतऋतूला एक आगळेवेगळे स्थान दिले गेलेले आहे. या विधानावर चर्चा करा.
उत्तरः
वसंतऋतू सृष्टीच्या बहराचा ऋतू आहे. या ऋतूत सृष्टी नटते म्हणून मानवप्राणी वसंतपंचमी साजरी करतो. या ऋतूच्या निमित्ताने नृत्य व संगीताचे कार्यक्रम आयोजित केले जातात. भारताच्या विविध राज्यात हा उत्सव वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. दक्षिण भारतीय व उत्तर भारतीय हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. राजस्थानी लोक या उत्सवाच्या निमित्ताने सूर्याची पूजा करून त्याच्या रथाची मिरवणूक काढतात. भारताच्या काही राज्यात लोक रंगीबेरंगी वस्त्रे परिधान करून विविध रंग व गुलाल उडवून हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

प्रश्न 9.
सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हाला सुचतील असे उपाय लिहा.
उत्तरः
सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी मी माझ्या परीने सर्व प्रयत्न करेन. झाडे लावून त्यांचे संवर्धन करेन. इतरांना देखील झाडे लावण्यास प्रेरित करेन. पशु-पाखरे, नदी, तलाव हे देखील सृष्टीचेच अंश आहेत. या सर्वाचे रक्षण करण्याची जबाबदारी मी स्वीकारेन, वनसंवर्धनसाठी समाजात जागरूकता निर्माण करेन. सृष्टी ईश्वराचे दुसरे रूप आहे ही भावना मनी बाळगून तिचे पूजन करेन, प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करेन. ‘झाडे । लावा व झाडे जगवा’ या मंत्राचे सर्वांना पालन करण्यास सांगेन. जमीन, पाणी, हवा, वनस्पती आणि ऊर्जा यांचा अवास्तव वापर टाळण्याचा प्रयत्न करीन. सृष्टीचा समतोल राखण्यासाठी मी प्रयत्न करेन.

प्रश्न 2. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा.

प्रश्न 1.
कवी / कवयित्रीचे नाव –
उत्तरः
ललिता गादगे.

प्रश्न 2.
संदर्भ –
उत्तरः
‘उजाड उघडे माळरानही’ ही कविता कवयित्री ‘ललिता गादगे’ यांनी लिहिली आहे.

प्रश्न 3.
प्रस्तावना –
उत्तरः
‘उजाड उघडे माळरानही’ ही कविता कवयित्री ‘ललिता गादगे’ यांनी लिहिली आहे. या कवितेमध्ये वसंतऋतूच्या आगमनामुळे सृष्टीच्या निसर्गसौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केले आहे.

प्रश्न 4.
वाङमयप्रकार –
उत्तरः
निसर्ग कविता

प्रश्न 5.
कवितेचा विषय
उत्तरः
निसर्गातील बदलांचे मनमोहक वर्णन करणारी ‘उजाड उघडे माळरानही’ ही एक निसर्ग कविता आहे.

प्रश्न 6.
कवितेतील आवडलेली ओळ –
उत्तरः
पळसफुले ही बहरून आली
या मातीच्या अंकावरती

प्रश्न 7.
मध्यवर्ती कल्पना –
उत्तरः
वसंतऋतू हिवाळ्यानंतर सुरू होतो. या ऋतूत निसर्ग हिरवागार दिसतो. कारण वसंतऋतूमध्ये झाडांना नवीन पालवी फुटलेली असते. सारा आसमंत विविध रंगात आणि विविध गंधातही न्हाऊन जातो. सर्व झाडेवेली हिरवीगार व टवटवीत दिसू लागतात. नवचैतन्याने सळसळू लागतात. सारी सृष्टी आनंदित होते. कवयित्रीने अशा सुंदर बदलांचे वर्णन ‘उजाड उघडे माळरानही’ या कवितेत केलेले दिसून येते.

प्रश्न 8.
कवितेतून मिळणारा संदेश-
उत्तरः
हिरवीगार झाडे, झुळझुळ वाहणारे झरे, खळाळणाऱ्या सरिता, उंचच उंच पर्वत या साऱ्यांनी तयार झालेली सृष्टी खूपच सुंदर आहे. ही सृष्टी माणसाला भरभरून देत असते. माणूस मात्र स्वत:च्या स्वार्थासाठी या सुंदर सृष्टीचा नाश करतो. त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. या सुंदर व मनमोहक निसर्गाचे संगोपन करून निर्सगाचा समतोल साधला पाहिजे. निसर्गसौंदर्यातील बदलांचे जाणीवपूर्वक स्वागत करा. असा संदेश उजाड उघडे माळरानही या कवितेतून मिळतो.

प्रश्न 9.
कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे –
उत्तरः
‘उजाड उघडे माळरानही’ ही कविता मला खूप आवडली आहे. उजाड झालेले, मोकळे असलेले माळरान वसंतऋतूच्या आगमनाबरोबर चैतन्याने भरून येते. झाडांना नवीन पालवी फुटते. सारा निसर्ग हिरव्या रंगात न्हाऊन जातो. रानफुले लेऊन, हिरव्या वाटा सजून जातात. कोकीळेचा सुमधूर आवाज सारे वातावरण बेधुंद करणारे असते. या साऱ्या सौंदर्यांचे सुरेख वर्णन आपल्याला या कवितेत वाचायला मिळते, म्हणून ही कविता मनापासून आवडली.

प्रश्न 10.
भाषिक वैशिष्ट्ये
‘उजाड उघडे माळरानही’ या कवितेमध्ये कवयित्री ललिता गादगे यांनी प्रमाण मराठी भाषेचा वापर केलेला आहे.

प्रश्न 3. खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

प्रश्न 1.
स्वागत करण्या वसंत ऋतूचे रंग उधळले दिशा-दिशांना, बेरड कोरड इथली सृष्टी घेऊन आली ती नजराणा।।
उत्तरेः
‘उजाड उघडे माळरानही’ ही कविता कवयित्री ललिता गादगे यांनी लिहिली आहे. या कवितेत कवयित्रीने वसंतऋतूच्या आगमनामुळे झालेल्या निसर्गसौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केले आहे.

वसंत ऋतूच्या आगमानाच्या स्वागताचे वर्णन करताना कवयित्री सांगतात, वसंत ऋतूमध्ये वेगवेगळ्या रंगाची पाने, फुले फुलतात. सारा निसर्ग, सारी सृष्टी वेगवेगळ्या रंगांनी सजलेली असते. जणू काही वसंत ऋतूच्या स्वागतासाठी हे होत असते. सर्व दिशा वेगवेगळ्या रंगानी उजळून निघालेल्या असतात. शिशिर ऋतूमध्ये सारी सृष्टी कोरडी, रुक्ष झालेली असते. अशी ही कोरडी, रुक्ष झालेली सृष्टी असा वेगवेगळ्या रंगाचा नजराणा वसंत ऋतूसाठी घेऊन आली आहे असे वाटते.

या काव्यपंक्तींमध्ये कवयित्री ललिता गादगे यांनी प्रमाण मराठी भाषेचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर यमक अलंकाराचा केलेला वापर शोभून दिसतो.

प्रश्न 2.
गर्द पोपटी लेऊन वसने मुरडत आली लिंबोणी,
जर्द तांबडी कर्णफुलेही घालून सजली नागफणी।।
उत्तर:
‘उजाड उघडे माळरानही’ ही कविता कवयित्री ललिता गादगे यांनी लिहिली आहे. या कवितेत कवयित्रीने वसंतऋतूच्या आगमनामुळे झालेल्या निसर्गसौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केले आहे.

वसंत ऋतूमध्ये झाडांना नवी हिरवी पालवी फुटते, त्या हिरव्या पालवीला बघून असे वाटते की, गर्द पोपटी म्हणजे हिरव्या रंगाची वस्त्रे परिधान करून लिंबोणी लचकत, मुरडत आली आहे. गर्द तांबड्या रंगाची कर्णफुले घालून नागफणीची झाडे देखील सजली आहेत. वसंतऋतूच्या आगमनाने साऱ्या सृष्टीत आनंद पसरलेला आहे.

या काव्यपंक्तींमध्ये कवयित्री ललिता गादगे यांनी प्रमाण मराठी भाषेचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर यमक अलंकाराचा केलेला वापर शोभून दिसतो.

प्रश्न 3.
लुसलुस पाने अंगोपांगी झुले वड हा दंग होऊनी,
दुरंगी चुनरीत उभी ही घाणेरी ही नटुनी थटुनी।।
उत्तर:
‘उजाड उघडे माळरानही’ ही कविता कवयित्री ललिता गादगे यांनी लिहिली आहे. या कवितेत कवयित्रीने वसंतऋतूच्या आगमनामुळे झालेल्या निसर्गसौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केले आहे.

वसंतऋतूत सर्व झाडांना नवीन पालवी फुटते. अशीच मऊ, कोवळी पालवी वडाच्या झाडाखाली फुटते. अशी ही लुसलुशीत पाने अंगोपांगी घेऊन वडाचे झाड दंग होऊन अतिशय आनंदाने डुलत आहे. एवढेच नव्हे तर घाणेरी सुद्धा दोन रंगाची ओढणी आपल्या अंगाखांदयावर परिधान करून वसंतऋतूच्या स्वागतासाठी नटून थटून उभी आहे असे वाटते.

या काव्यपंक्तीमध्ये कवयित्री ललिता गादगे यांनी प्रमाण मराठी भाषेचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर यमक अलंकाराचा केलेला वापर शोभून दिसतो.

प्रश्न 4.
सळसळ झळझळ पिंपळ पाने मऊ मुलायम मोरपिसापरी,
सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी।।
उत्तरः
‘उजाड उघडे माळरानही’ ही कविता कवयित्री ललिता गादगे यांनी लिहिली आहे. या कवितेत कवयित्रीने वसंतऋतूच्या आगमनामुळे झालेल्या निसर्गसौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केले आहे.

वसंतऋतूत सर्व झाडांना नवीन पालवी फुटते. अशीच मऊ, कोवळी पालवी पिंपळाच्या झाडालाही फुटते. असे वाटते जणू वसंतऋतूच्या स्वागतासाठी पिंपळाचे झाड मोरपिसाप्रमाणे असणारी मऊ व मुलायम पाने आपल्या अंगावर घेऊन सळसळ करत उभे आहे. तसेच सांबर नावाचा वृक्षदेखील रानातल्या चिंचोळ्या वाटेवर (पाणंद) दोन्ही बाजूला लाल कळ्यांनी बहरून वसंतऋतूच्या स्वागतासाठी उभा आहे.

या काव्यपंक्तीमध्ये कवयित्री ललिता गादगे यांनी प्रमाण मराठी भाषेचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर यमक अलंकाराचा केलेला वापर शोभून दिसतो.

प्रश्न 5.
पळसफुले ही बहरून आली या मातीच्या अंकावरती,
कुसुमे सारी या जगातली पाहून त्यांना मनात झुरती।।
उत्तर:
‘उजाड उघडे माळरानही’ ही कविता कवयित्री ललिता गादगे यांनी लिहिली आहे. या कवितेत कवयित्रीने वसंतऋतूच्या आगमनामुळे निसर्गसौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केले आहे.

पळसांच्या फुलांना बहर आला आहे. या बहरलेल्या फुलांनी वसंतऋतूच्या स्वागतासाठी आपला सडाच या मातीवर पसरलेला आहे. ती अतिशय आनंदाने या मातीवर पसरलेली, सुखावलेली आपल्याला पाहायला मिळतात. पळसाला आलेली व मातीवर पसरलेली ती फुले व त्यांची सुंदरता पाहून जगातील सर्व फुले मनातल्या मनात झुरतात.

या काव्यपंक्तीमध्ये कवयित्री ललिता गादगे यांनी प्रमाण मराठी भाषेचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर यमक अलंकाराचा केलेला वापर शोभून दिसतो.

प्रश्न 6.
आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेल तान,
उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान।।
उत्तरः
‘उजाड उघडे माळरानही’ ही कविता कवयित्री ललिता गादगे यांनी लिहिली आहे. या कवितेत कवयित्रीने वसंतऋतूच्या आगमनामुळे झालेल्या निसर्गसौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केले आहे.

वसंत ऋतूत सृष्टीत अनेक आनंददायी बदल घडतात. वसंतऋतूत आंब्याच्या झाडाला मोहर येतो. अशा या आनंददायी वातावरणात आंब्याच्या झाडावर बसून कोकिळा सुरेल तान घेत असते. वसंतऋतूच्या आगमनाने उजाड उघडे माळरानही फुलांनी पानांनी बहरून आलेले असते. जणू काही ते माळरानही अतिशय आनंदाने वसंतऋतूचे गीत गात आहे असेच वाटते.

या काव्यपंक्तीमध्ये कवयित्री ललिता गादगे यांनी प्रमाण मराठी भाषेचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर यमक अलंकाराचा केलेला वापर शोभून दिसतो.


इयत्ता नववी मराठी स्वाध्याय उपाय

निष्कर्ष

आम्हाला आशा आहे की महाराष्ट्रावरील हा लेख तुम्हाला 'नववी उजाड उघडे माळरानही स्वाध्याय' मदत करेल. तुम्हाला काही प्रश्न असल्यास, त्यांना खाली टिप्पणी विभागात मोकळ्या मनाने पोस्ट करा. आम्ही लवकरात लवकर तुमच्याकडे परत येऊ.
Share:

0 Comments:

Post a Comment

Plus Two (+2) Previous Year Question Papers

Plus Two (+2) Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Physics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Chemistry Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Maths Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Zoology Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Botany Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Computer Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Computer Application Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Commerce Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Humanities Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Economics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) History Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Islamic History Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Psychology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Sociology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Political Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Geography Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Accountancy Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Business Studies Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) English Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Hindi Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Arabic Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Kaithang Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Malayalam Previous Year Chapter Wise Question Papers

Plus One (+1) Previous Year Question Papers

Plus One (+1) Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Physics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Chemistry Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Maths Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Zoology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Botany Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Computer Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Computer Application Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Commerce Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Humanities Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Economics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) History Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Islamic History Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Psychology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Sociology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Political Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Geography Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Accountancy Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Business Studies Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) English Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Hindi Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Arabic Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Kaithang Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Malayalam Previous Year Chapter Wise Question Papers
Copyright © HSSlive: Plus One & Plus Two Notes & Solutions for Kerala State Board About | Contact | Privacy Policy