Hsslive.co.in: Kerala Higher Secondary News, Plus Two Notes, Plus One Notes, Plus two study material, Higher Secondary Question Paper.

Friday, February 11, 2022

इयत्ता नववी ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ मराठी स्वाध्याय PDF

 

इयत्ता नववी ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ मराठी स्वाध्याय PDF
इयत्ता नववी ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ मराठी स्वाध्याय PDF


या लेखात, आम्ही ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ विषयासाठी इयत्ता नववी मराठी सोल्यूशन्स देऊ. इयत्ता नववी मधील विद्यार्थी पाठ्यपुस्तकांमध्ये उपस्थित असलेल्या व्यायामांसाठी प्रश्न आणि उत्तरे डाउनलोड आणि कॉपी करण्यास सक्षम असतील.

इयत्ता नववी ऑलिंपिक वर्तुळांचा गोफाच्या पुस्तकात महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमातील सर्व प्रश्नांचा समावेश आहे. येथे सर्व प्रश्न पूर्ण स्पष्टीकरणासह सोडवले आहेत आणि डाउनलोड करण्यासाठी विनामूल्य उपलब्ध आहेत. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता नववी ऑलिंपिक वर्तुळांचा गोफाचे पुस्तक खाली दिले आहे. आम्‍हाला आशा आहे की आमच्‍या इयत्‍ता नववी वीच्‍या ऑलिंपिक वर्तुळांचा गोफाचे पुस्‍तक तुमच्‍या अभ्यासात मदत करेल! जर तुम्हाला आमचे इयत्ता नववी चे पुस्तक आवडले असेल तर कृपया ही पोस्ट शेअर करा.


इयत्ता नववी ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ स्वाध्याय

मंडळाचे नाव

Maharashtra Board

ग्रेडचे नाव

नववी

विषय

ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

वर्ष

2022

स्वरूप

PDF/DOC

प्रदाता

hsslive.co.in

अधिकृत संकेतस्थळ

mahahsscboard.in


समाधानासह महाराष्ट्र बोर्ड आठवा स्वाध्याय कसे डाउनलोड करायचे?

महाराष्ट्र बोर्ड नववी स्वाध्याय PDF डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

  1. वेबसाइट- Hsslive ला भेट द्या. 'स्वाध्याय' लिंकवर क्लिक करा.
  2. महा बोर्ड नववी स्वाध्याय PDF पहा.
  3. आता महाराष्ट्र बोर्ड नववी स्वाध्याय तपासा.
  4. डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भांसाठी जतन करा.

इयत्ता नववी ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ स्वाध्याय उपाय

इयत्ता नववी स्वाध्याय मधील विद्यार्थी खालील लिंक्सवरून ऑलिंपिक वर्तुळांचा गोफाचे उपाय डाउनलोड करू शकतील.


1. आकृतिबंध पूर्ण करा.

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.

उत्तरः
(अ)

(आ)

2. योग्य पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहा.

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहा.
1. पहिले ऑलिंपिक व्हिलेज ………….. येथे वसले. (ग्रीस, मेलबोर्न, फ्रान्स, अमेरिका)
2. पहिले ऑलिंपिक सामने ………….. साली झाले. (1894, 1956, इ.स.पूर्व७७६, इ.स. पूर्व 394)
उत्तर:
1. मेलबोर्न
2. इ.स.पूर्व 776

3. खालील वाक्य वाचा. अधोरेखित केलेल्या शब्दांबाबत माहिती भरून तक्ता पूर्ण करा. एखादया शब्दाला खालील मुद्दे लागू नसतील तर तिथे – हे चिन्ह लिहा. उदा., ‘व’ यासाठी लिंग, वचन, विभक्ती सगळीकडे – हे चिन्ह येईल.

प्रश्न 1.
पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात.

उत्तरः

4. स्वमत

प्रश्न (अ)
‘ऑलिंपिक म्हणजे विश्वबंधुत्व’ ही संकल्पना स्पष्ट करा.
उत्तरः
मानवाच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासात खेळाचे महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळेच सर्व स्तरांवर खेळले जाणारे क्रीडासामने हे जगभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेतात. संपूर्ण जगभरातील क्रीडासामन्यांत, ऑलिंपिक क्रीडासामन्यांना एक मानाचे स्थान आहे. या ऑलिंपिक सामन्यांचे स्वतंत्र निशाण म्हणजे, एक भलामोठा ध्वज असतो. ध्वजाच्या पांढऱ्याशुभ्र रंगावर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या व काळ्या रंगांची वर्तुळे एकमेकांत गुंफलेली असतात. ही पाच वर्तुळे म्हणजे जगातील पाच खंड आणि ध्वजाचा पांढराशुभ्र रंग म्हणजे विशाल अंतराळ होय. जगभरातील सर्व राष्ट्रांतील सुमारे पाच ते सहा हजार खेळाडू या सामन्यांमध्ये भाग घेतात. देशादेशांतील मैत्री वाढून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी ऑलिंपिक सामने दर चार वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जातात.

या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती नेमलेली असते. या स्पर्धांत भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे एक ते तीन प्रतिनिधी या समितीमध्ये असतात. या सामन्यांसाठी लागणारा सारा पैसा स्पर्धक देश उभा करतात. क्रीडेच्या क्षेत्रात जातिभेद नाही, धर्मभेद नाही की वर्णभेद नाही. येथे सर्वांना समान संधी मिळते. ऑलिंपिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात तेव्हा खेळाडूंना पराक्रमाचा व प्रयत्नवादाचा संदेश देणारा ध्वज डौलाने फडकत असतो. त्या ध्वजावरील पाच खंडांची पाच वर्तुळे समतेचा व विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात.

उपक्रम:

सन 2016 साली झालेल्या ऑलिंपिक सामन्यातील सुवर्ण, रजत व कांस्यपदक मिळवणाऱ्या खेळाडूंची माहिती आंतरजालाचा वापर करून खालील तक्त्यात लिहा.

Marathi Akshar Bharati Class 9 Textbook Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ Additional Important Questions and Answers

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः

प्रश्न 2.
जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. वेगवेगळे रस्ते (अ) पाच वर्तुळे
2. एकमेकांत गुंफलेली (ब) ऑलिंपिक सामन्यांचे
3. स्वतंत्र निशाण (क) विशाल अंतराळ
4. शुभ्रधवल पार्श्वभूमी (ड) येण्याजाण्यासाठी

उत्तर:

  1. येण्याजाण्यासाठी
  2. पाच वर्तुळे
  3. ऑलिंपिक सामन्यांचे
  4. विशाल अंतराळ

खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1.
संपूर्ण जगभरातील क्रीडासामन्यात कशाला मानाचे स्थान आहे?
उत्तरः
संपूर्ण जगभरातील क्रीडासामन्यात ऑलिंपिक क्रीडासामन्यांना मानाचे स्थान आहे.

प्रश्न 2.
ऑलिंपिकच्या ध्वजावर किती रंगांची वर्तुळे काढण्यात आली आहेत?
उत्तर:
ऑलिंपिकच्या ध्वजावर पाच रंगांची वर्तुळे काढण्यात आली आहेत.

प्रश्न 3.
लेखकांची मोटार भरधाव वेगाने कुठे जात होती?
उत्तर:
लेखकांची मोटार ऑलिंपिक गावाकडे भरधाव वेगाने जात होती.

प्रश्न 4.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
1. मनुष्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासात महत्त्व अनन्यसाधारण आहे. (क्रीडेचे, मेहनतीचे, कामाचे, शाळेचे)
2. …………. गावाकडे आमची मोटार भरधाव वेगाने जात होती. (वडिलांच्या, आवडत्या, ऑलिंपिक, दूरच्या)
उत्तर:
1. क्रीडेचे
2. ऑलिंपिक

प्रश्न 5.
सहसंबंध लिहा.
1. शुभ्रधवल : पार्श्वभूमी :: विशाल : …………….
2. प्रचंड : गर्दी :: भलामोठा : ………………
उत्तर:
1. अंतराळ
2. ध्वज

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
गर्दी प्रचंड असली तरी रहदारीला अडचण मुळीच नव्हती; कारण ……………………….
(अ) येण्याजाण्यासाठी एकच रस्ता होता.
(ब) रस्त्यावर सिग्नल होते.
(क) लोकांमध्ये शिस्त होती.
(ड) येण्याजाण्यासाठी वेगवेगळे रस्ते होते.
उत्तरः
गर्दी प्रचंड असली तरी रहदारीला अडचण मुळीच नव्हती, कारण येण्याजाण्यासाठी वेगवेगळे रस्ते होते.

प्रश्न 2.
काय ते लिहा.

  1. उंच स्तंभावर फडकणारा – [ ]
  2. ध्वजावरील पांढऱ्याशुभ्र पार्श्वभूमीवर एकमेकांत गुंफलेली – [ ]
  3. जगभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेणारे – [ ]

उत्तर:

  1. ऑलिंपिकच्या सामन्यांचा भलामोठा ध्वज
  2. पाच रंगांची वर्तुळे
  3. सर्व स्तरांवर खेळले जाणारे क्रीडासामने

प्रश्न 3.
चूक की बरोबर ते लिहा.
1. संपूर्ण जगभरातील क्रीडासामन्यांत आशियाई क्रीडासामन्यांना एक मानाचे स्थान आहे.
2. ही पाच वर्तुळे म्हणजे जगातील पाच खंड.
उत्तर:
1. चूक
2. बरोबर

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्य लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा. ऑलिपिंक सामन्यांचे ते स्वतंत्र निशान होते.
उत्तर:
ऑलिंपिक सामन्यांचे ते स्वतंत्र निशाण होते.

प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन विशेषणे शोधून लिहा.
उत्तर:

  1. मानाचे
  2. लाल
  3. पिवळा
  4. निळा
  5. हिरवा
  6. काळा
  7. वेगवेगळे
  8. भलामोठा
  9. पांढऱ्याशुभ्र
  10. पाच
  11. विशाल
  12. एक

प्रश्न 3.
अचूक शब्द लिहा.
1. क्रिडासामने, क्रीडासामने, क्रीडासामणे, कीडासामने – [ ]
2. क्षितिज, क्षीतिज, क्षितीज, शितिज – [ ]
उत्तर:
1. क्रीडासामने
2. क्षितिज

प्रश्न 4.
लिंग बदला
मैत्रीण – [ ]
उत्तर:
मित्र

प्रश्न 5.
समानर्थी शब्द लिहा.

  1. ठिकाण – [ ]
  2. क्रीडांगण – [ ]
  3. खूण – [ ]
  4. नयन – [ ]

उत्तर:

  1. स्थान
  2. मैदान
  3. निशाण
  4. डोळे

प्रश्न 6.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. अपमान × [ ]
  2. पराजय × [ ]
  3. बुटके × [ ]
  4. विकेंद्रित × [ ]

उत्तर:

  1. मान
  2. जय
  3. उंच
  4. केंद्रित

प्रश्न 7.
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
उत्तर:

  1. क्रीडासामने
  2. रस्ते
  3. वर्तुळे
  4. डोळे

प्रश्न 8.
खालील अधोरेखित शब्दांची जात ओळखा.
तसे आमचे डोळे समोरील क्षितिजाकडे लागले.
उत्तरः
आमचे – सर्वनाम, डोळे – नाम

प्रश्न 9.
वाक्यातील काळ ओळखा.
ऑलिंपिक गावाकडे आमची मोटार भरधाव वेगाने जात होती.
उत्तर:
भूतकाळ

प्रश्न 10.
वाक्यातील काळ बदला. (वर्तमानकाळ करा)
येण्याजाण्यासाठी वेगवेगळे रस्ते होते.
उत्तरः
येण्याजाण्यासाठी वेगवेगळे रस्ते आहेत.

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
मनुष्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासात क्रीडेचे महत्त्व अनन्यसाधारण असते, यावर तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तरः
क्रीडा व्यक्तिविकासांचे महत्त्वाचे साधन आहे. खेळ खेळल्याने व्यक्ती चपळ, सुदृढ व प्रवीण बनते. मैदानी खेळ जसे की, क्रिकेट, बॉस्केट बॉल, हॉकी वा कबड्डी अशा प्रकारचे विविध खेळ खेळल्याने मनुष्याचे शरीर लवचीक बनते. खेळ खेळल्याने एक प्रकारची शक्ती अंगात निर्माण होते. व्यक्तीमध्ये वक्तशीरपणा येतो. एकतेचे महत्त्व कळते. एखादया खेळात चांगल्या प्रकारचे प्रावीण्य व कौशल्य मिळविल्यास प्रसिद्धी मिळते. खेळ खेळणे म्हणजे एक प्रकारची कसरतच असते, त्यामुळे शरीराचा नियमितपणे व्यायाम होत असतो. खेळामुळे व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक क्रियांचे संतुलन राखले जाते. म्हणून मनुष्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासात क्रीडेचे महत्त्व अनन्यसाधारण असते.

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः

खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1.
ऑलिंपिकचे ब्रीदवाक्य कशावर लिहिलेले आहे?
उत्तर:
ऑलिंपिकच्या ध्वजावर ऑलिंपिकचे ब्रीदवाक्य लिहिलेले आहे.

प्रश्न 2.
ऑलिंपिकच्या ब्रीदवाक्यातील ‘ऑल्टियस’ या शब्दाचा अर्थ काय होतो?
उत्तर:
ऑलिंपिकच्या ब्रीदवाक्यातील ‘ऑल्टियस’ या शब्दाचा अर्थ ‘उच्चता’ असा होतो.

प्रश्न 3.
ऑलिंपिक सामने म्हणजे कोणासाठी एक पर्वणीच असते?
उत्तर:
ऑलिंपिक सामने म्हणजे क्रीडापटू आणि क्रीडाशौकिनांसाठी एक पर्वणीच असते.

प्रश्न 4.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
1. या ध्वजस्तंभाजवळ एक स्फूर्तिदायक …………. सतत तेवत असते. (मशाल, दगड, चिन्ह, पताका)
2. …………. सुमारे सत्तर ते ऐंशी हजार प्रेक्षक बसण्याची सोय असते. (मैदानात, तलावाजवळ, खोल्यांमध्ये, प्रेक्षागारात)
उत्तर:
1. मशाल
2. प्रेक्षागारात

प्रश्न 5.
काय ते लिहा.
1. ‘सिटियस, ऑल्टियस, फॉर्टियस’ असा संदेश देणारा
2. ध्वजस्तंभाजवळ सतत तेवत असणारी –
उत्तर:
1. ऑलिंपिकचा ध्वज
2. मशाल

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
चूक की बरोबर ते लिहा.
1. जिंकण्यासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजेत.
2. पोहण्याच्या शर्यतीसाठी चार-पाच तलावही बांधलेले असतात.
उत्र:
1. चूक
2. बरोबर

प्रश्न 2.
ऑलिंपिक ब्रीदवाक्यातील शब्द आणि त्याचे अर्थ यांचे वर्गीकरण करा.

उत्तर:

शब्द अर्थ
सिटियस गतिमानता
ऑल्टियस उच्चता
फॉर्टियस तेजस्विता

प्रश्न 3.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:

प्रश्न 4.
सहसंबंध लिहा.
कमी : जास्त :: गैरसोय : …………….
उत्तरः
सोय

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्य लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
या ध्वजावर ऑलीपिकचे ब्रिदवाक्य लिहिलेले आहे.
उत्तर:
या ध्वजावर ऑलिंपिकचे ब्रीदवाक्य लिहिलेले आहे.

प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन नामे लिहा.
उत्तर:

  1. ध्वज
  2. खेळाडू
  3. मशाल
  4. क्रीडापटू
  5. पृथ्वी
  6. राष्ट्र
  7. स्त्री
  8. तलाव
  9. प्रेक्षक
  10. ब्रीदवाक्य
  11. लोक
  12. पर्वणी
  13. संदेश

प्रश्न 3.
अचूक शब्द लिहा.
1. गतिनामता, गतिमानता, गतीमानता, गतीतानमा – [ ]
2. परवणी, पर्वणि, पर्वणी, र्पवणी – [ ]
उत्तर:
1. गतिमानता
2. पर्वणी

प्रश्न 4.
लिंग बदला
पुरुष – [ ]
उत्तर:
स्त्री

प्रश्न 5.
समानार्थी शब्द लिहा.
1. कष्ट – [ ]
2. देश – [ ]
उत्तर:
1. श्रम
2. राष्ट्र

प्रश्न 6.
विरुद्धार्थी शब्द लिहा.
कमी × [ ]
उत्तरः
जास्त

प्रश्न 7.
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
उत्तर:
1. खेळाडू
2. सामने

प्रश्न 8.
खालील अधोरेखित शब्दांच्या जाती ओळखा.
असा संदेश हा ध्वज खेळाडूंना देत असतो.
उत्तर:
ध्वज – नाम, देत असतो – क्रियापद

प्रश्न 9.
खालील वाक्यातील काळ ओळखा.
या ध्वजावर ऑलिंपिकचे ब्रीदवाक्य लिहिलेले आहे.
उत्तर:
वर्तमानकाळ

प्रश्न 10.
वाक्यातील काळ बदला. (भूतकाळ करा)
या ध्वजस्तंभाजवळ एक स्फूर्तिदायक मशाल सतत तेवत आहे.
उत्तरः
या ध्वजस्तंभाजवळ एक स्फूर्तिदायक मशाल सतत तेवत होती.

प्रश्न 11.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तरः

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
गतिमानता, उच्चता व तेजस्विता ही तीन सूत्रे खेळाडूंसाठी फार आवश्यक असतात, या कथनावर तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तरः
खेळाडू म्हटला म्हणजे तो कुशल, चपळ, प्रवीण व तरबेज असला पाहिजे. यासाठी खेळाडूला गतिमान होणे आवश्यक असते. प्रत्येक खेळाडूने आपआपल्या खेळात प्रावीण्य मिळविण्यासाठी खेळाचा जास्तीत जास्त सराव केला पाहिजे की जेणेकरून त्याच्या खेळ खेळण्याच्या गतीत वाढ होईल. खेळाडूने आपल्या खेळात कौशल्य संपादन करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली पाहिजे, तसेच त्याने स्वत:चे शरीर सुदृढ बनविण्यासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजेत. खेळाडूला नियमित व्यायाम करणे फारच गरजेचे असते जेणेकरून एक विशिष्ट प्रकारचे तेज त्याच्या शरीरात निर्माण होईल. अशा प्रकारे गतिमानता, उच्चता व तेजस्विता ही तीन सूत्रे खेळाडूंसाठी फार आवश्यक असतात.

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः

प्रश्न 2.
उत्तर लिहा.
उत्तरः

प्रश्न 3.
जोड्या जुळवा.
उत्तरः

‘अ’ गट ‘ब’ गट
1. रहदारीसाठी बांधलेल्या (अ) असंख्य खोल्या
2. निवासासाठी बांधलेल्या (ब) विशाल उपाहारगृहे
3. प्रेक्षकांच्या श्रमपरिहारासाठी (क) प्रचंड प्रेक्षागार
4. विशाल मैदानाभोवताली (ड) अनेक सडका

प्रश्न 4.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः

खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1.
प्रेक्षकांच्या श्रमपरिहारासाठी ‘ऑलिंपिक व्हिलेज’ येथे कोणती सोय करण्यात आली आहे ?
उत्तरः
प्रेक्षकांच्या श्रमपरिहारासाठी ‘ऑलिंपिक व्हिलेज’ येथे सुसज्ज अशी उपाहारगृहे तयार करण्यात आली आहेत.

प्रश्न 2.
‘ऑलिंपिक व्हिलेज’ वसवण्याची कल्पना कोठे मांडण्यात आली?
उत्तर:
‘ऑलिंपिक व्हिलेज’ वसवण्याची कल्पना मेलबोर्न येथे मांडण्यात आली.

प्रश्न 3.
ऑलिंपिक सामने किती वर्षांनी होतात?
उत्तर:
ऑलिंपिक सामने दर चार वर्षांनी होतात.

कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.
1. ‘ऑलिंपिक व्हिलेज’वसवण्याची कल्पना इ. स. … मध्ये मेलबोर्न येथे मांडण्यात आली. (1957, 1956, 1976, 1946)
2. इ.स.पूर्व ७७६ मध्ये हे सामने झाल्याची पहिली नोंद ………… देशाच्या इतिहासात सापडते. (ग्रीस, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, भारत)
उत्तर:
1. 1956
2. ग्रीस

सहसंबंध लिहा.

प्रश्न 1.
विशाल : मैदान :: असंख्य : …………………
इ.स.पूर्व ७७६: सामने सुरू झाले :: इ.स.पूर्व 394: ………………….
उत्तर:
1. खोल्या
2. सामने बंद पडले

प्रश्न 2.
पुढे दिलेल्या सालातील घडलेल्या घटना लिहा.
उत्तर:

साल घटना
इ.स. 1956 ऑलिंपिक व्हिलेज वसवण्याची कल्पना
इ.स. पूर्व 773 ऑलिंपिक सामन्यांची सुरुवात
इ.स. पूर्व 394 ऑलिंपिक सामने बंद पडले

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
इ.स.पूर्वी 394 मध्ये ऑलिंपिक सामने बंद पडले; कारण …………..
(अ) पुढे ग्रीक सत्तेचा हास झाला.
(ब) खेळाडू जखमी होतात.
(क) जागेअभावी
(ड) अंतर्गत राजकारणांमुळे
उत्तरः
इ.स.पूर्वी 394 मध्ये ऑलिंपिक सामने बंद पडले; कारण पुढे ग्रीक सत्तेचा -हास झाला.

प्रश्न 2.
कोण ते लिहा.
1. इ.स. 1956 मध्ये मेलबोर्न येथे वसवण्यात आलेले – [ ]
2. ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून, गौरव करण्यात येणारे – [ ]
उत्तर:
1. ऑलिंपिक व्हिलेज
2. यशस्वी खेळाडू ऑलिव्ह

प्रश्न 3.
कोष्टक पूर्ण करा.
उत्तर:

प्रश्न 4.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:

प्रश्न 5.
चूक की बरोबर लिहा.
1. ‘ऑलिंपिक व्हिलेज’ वसवण्याची कल्पना इ.स. 1957 मध्ये मेलबोर्न येथे मांडण्यात आली.
2. पूर्वी ऑलिंपिक सामने पाच दिवस चालत.
उत्तर:
1. चूक
2. बरोबर

कृती 3 : व्याकरण कृती

खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.

प्रश्न 1.
1. पहीले ‘ऑलिंपिक विलेज’ तिथलेच.
2. पुढे ग्रीक सतेचा हास झाला.
उत्तर:
1. पहिले ‘ऑलिंपिक व्हिलेज’ तिथलेच.
2. पुढे ग्रीक सत्तेचा -हास झाला.

प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन विशेषणे शोधून लिहा.
उत्तरः

  1. असंख्य
  2. सुसज्ज
  3. विशाल
  4. मोठे
  5. अनेक
  6. यशस्वी
  7. प्रचंड

प्रश्न 3.
अचूक शब्द लिहा.
1. राहदारी, रहादारी, रहदारी, रदारी – [ ]
2. उपहारगृह, उपाहारगृह, उपाहरगृह, उपहरगृह – [ ]
उत्तर:
1. रहदारी
2. उपाहारगृह

प्रश्न 4.
समानार्थी शब्द लिहा.
1. भव्य – [ ]
2. रस्ते – [ ]
उत्तर:
1. विशाल
2. सडका

प्रश्न 5.
विरुद्धार्थी शब्द लिहा.
1. लहान ×
2. अयशस्वी ×
उत्तर:
1. मोठे
2. यशस्वी

प्रश्न 6.
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
उत्तर:

  1. शहरे
  2. सडका
  3. लोहमार्ग
  4. खेळाडू
  5. खोल्या
  6. इमारती
  7. वसतिगृहे
  8. प्रेक्षक
  9. उपाहारगृहे
  10. सामने

प्रश्न 7.
वाक्यातील काळ बदला. (भविष्यकाळ करा)
ऑलिंपिक सामने दर चार वर्षांनी होतात.
उत्तर:
ऑलिंपिक सामने दर चार वर्षांनी होतील.

प्रश्न 8.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर:

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
ऑलिंपिकमध्ये यशस्वी झालेल्या भारतीय खेळाडूंचा आपल्या देशात कशा प्रकारे सन्मान केला जातो, यावर थोडक्यात तुमचे विचार लिहा.
उत्तरः
आपल्या भारत देशात ऑलिंपिकमध्ये यशस्वी झालेले अनेक खेळाडू आहेत. त्यांना ऑलिंपिक मध्ये कांस्य पदक मिळो, वा रजत पदक मिळो वा सुवर्ण पदक. संपूर्ण भारत देश त्यांचे स्वागत करण्यास सुसज्ज होतो. खेळाडू ज्या राज्यातील असतो, ते राज्य तर त्यांना सरकारी खात्यात मोठमोठ्या पदांवर नियुक्त करते. तसेच लाखो रुपयांची धनराशी देखील दिली जाते. भारत सरकार त्यांना अर्जुन पुरस्कार किंवा पद्मभूषण देऊन त्यांचा आदरसत्कार करते. भारतातील विविध संस्था आपआपल्या कुवतीनुसार त्यांचा यथोचित सत्कार करतात. देशातील सर्व राज्यांत त्यांना सन्मान दिला जातो.

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
उत्तरे लिहा.
1. इ.स. 1894 साली या देशात ‘ऑलिंपिक काँग्रेस’ भरवण्यात आली होती.
2. ऑलिंपिक सामन्यांचे पुनरुज्जीवन करणारे क्रीडातज्ज्ञ –
उत्तर:
1. फ्रान्स
2. कुबर टीन

प्रश्न 2.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.

  1. 1896 पासून ऑलिंपिक सामने दर चार वर्षांनी वेगवेगळ्या देशांत भरवले जातात.
  2. इ.स. 1894 साली फ्रान्स देशात एक ऑलिंपिक काँग्रेस भरवण्यात आली होती.
  3. प्राचीन ऑलिंपिक सामन्यांप्रमाणेच यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धा भरवाव्यात असे ठरले.
  4. कुबर टीन नावाच्या फ्रेंच क्रीडातज्ज्ञाने या काँग्रेसमध्ये ऑलिंपिक सामन्यांचे पुनरुज्जीवन केले.

उत्तर:

  1. इ.स. 1894 साली फ्रान्स देशात एक ऑलिंपिक काँग्रेस भरवण्यात आली होती.
  2. कुबर टीन नावाच्या फ्रेंच क्रीडातज्ज्ञाने या काँग्रेसमध्ये ऑलिंपिक सामन्यांचे पुनरुज्जीवन केले.
  3. प्राचीन ऑलिंपिक सामन्यांप्रमाणेच यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धा भरवाव्यात असे ठरले.
  4. 1896 पासून ऑलिंपिक सामने दर चार वर्षांनी वेगवेगळ्या देशांत भरवले जातात.

खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1.
कोणत्या साली आधुनिक जगाला ऑलिंपिक सामन्यांची आठवण झाली?
उत्तर:
इ.स. 1894 साली आधुनिक जगाला ऑलिंपिक सामन्यांची आठवण झाली.

प्रश्न 2.
ऑलिंपिक सामन्यांचे पुनरुज्जीवन कोणी केले?
उत्तर:
‘कुबर टीन’ नावाच्या फ्रेंच क्रीडातज्ज्ञाने ऑलिंपिक सामन्यांचे पुनरुज्जीवन केले.

कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.
1. ………. पासून ऑलिंपिक सामने दर चार वर्षांनी वेगवेगळ्या देशांत भरवले जातात. (1895, 1796, 1986, 1896)
2. ………… सामन्यांसाठी लागणारा खर्च फारच मोठा असतो. (अंतर्गत, विदेशी, देशी, ऑलिंपिक)
उत्तर:
1. 1896
2. ऑलिंपिक

सहसंबंध लिहा.

प्रश्न 1.
1. फ्रान्स : नाम :: अनेक :
2. वेगवेगळे : सामने :: पैसा :
उत्तर:
1. विशेषण
2. स्पर्धक देश

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
1896 पासून ऑलिंपिक सामने ……………
(अ) दर पाच वर्षांनी वेगवेगळ्या देशांत भरवले जातात.
(ब) दर सहा वर्षांनी वेगवेगळ्या देशांत भरवले जातात.
(क) दर चार वर्षांनी वेगवेगळ्या देशांत भरवले जातात.
(ड) दर सात वर्षांनी वेगवेगळ्या देशांत भरवले जातात.
उत्तरः
1896 पासून ऑलिंपिक सामने दर चार वर्षांनी वेगवेगळ्या देशांत भरवले जातात.

प्रश्न 2.
कोण ते लिहा.

  1. मैत्रीचा मंत्र सांगणारे – [ ]
  2. ऑलिंपिक सामन्यांच्या व्यवस्थेसाठी नेमलेली समिती – [ ]
  3. इ.स. 1894 साली ‘ऑलिंपिक काँग्रेस’ भरवण्यात आलेला देश – [ ]

उत्तर:

  1. ऑलिंपिक सामने
  2. ‘आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती’
  3. फ्रान्स

प्रश्न 3.
चूक की बरोबर ते लिहा.
1. ऑलिंपिक सामन्यासांठी लागणारा सर्व पैसा स्पर्धक देश उभा करतात.
2. ऑलिंपिक सामन्यांत पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी एकत्र सामने होतात.
उत्तर:
1. बरोबर
2. चूक

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
1. हा सर्व पैशा स्पधर्क देश उभा करतात.
2. त्या काँगेसला अनेक राष्ट्रांचे प्रतिनीधी हजर होते.
उत्तर:
1. हा सर्व पैसा स्पर्धक देश उभा करतात.
2. त्या काँग्रेसला अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी हजर होते.

प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन नामे शोधून लिहा.
उत्तर:

  1. फ्रान्स
  2. ऑलिंपिक
  3. काँग्रेस
  4. कुबर टीन
  5. क्रीडातज्ज्ञ
  6. देश
  7. खेळ
  8. पुरुष
  9. स्त्रिया

प्रश्न 3.
अचूक शब्द लिहा.
1. मित्रत्वाची, मीत्रत्वाची, मित्रत्वाचि, मितरत्वाचि
2. आंतराष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, आंतरराष्ट्रिय, आंतराष्ट्रिय
उत्तर:
1. मित्रत्वाची
2. आंतरराष्ट्रीय

प्रश्न 4.
समानार्थी शब्द लिहा.

  1. स्मरण – [ ]
  2. उपस्थित – [ ]
  3. ताकद – [ ]
  4. दोस्ती – [ ]

उत्तर:

  1. आठवण
  2. हजर
  3. बल
  4. मैत्री

प्रश्न 5.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. प्राचीन ×
  2. गैरहजर ×
  3. जमा ×
  4. दुश्मनी ×

उत्तर:

  1. आधुनिक
  2. हजर
  3. खर्च
  4. मैत्री

प्रश्न 6.
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
उत्तर:

  1. सामने
  2. प्रतिनिधी
  3. देश

प्रश्न 7.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर:

शब्द प्रत्यय विभक्ती
मैंत्रीचा चा षष्ठी
सामन्यांची ची षष्ठी
निमित्ताने ने तृतीया
स्पर्धांत सप्तमी

प्रश्न 8.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर:

शब्द सामान्यरूप
राष्ट्रांचे राष्ट्रां
खेळांच्या खेळां

प्रश्न 9.
वाक्यातील काळ ओळखा.
1. त्या वर्षी फ्रान्स देशात एक ‘ऑलिंपिक काँग्रेस’ भरवण्यात आली होती.
2. या सामन्यांत निरनिराळ्या एकवीस खेळांची तरतूद आहे.
उत्तर:
1. भूतकाळ
2. वर्तमानकाळ

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
‘ऑलिंपिक खेळांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
उत्तरः
‘ऑलिंपिक’ हा खेळ दर 4 वर्षांनी खेळला जातो. या खेळात संपूर्ण जग सहभागी होते. प्रत्येक देशातील खेळाडू स्पर्धक म्हणून ऑलिंपिकमध्ये सहभागी होतात. प्रत्येक देशाचे अन्य देशांशी मैत्रीचे व जिव्हाळ्याचे संबंध निर्माण व्हावेत, म्हणून या क्रीडास्पर्धा भरविल्या जातात. स्त्री व पुरुष यांना या खेळात समान संधी दिली जाते. येथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो. संपूर्ण जगात प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, समता, सद्भावना, शिस्त, ऐक्य व मैत्री वाढीस लागावी हाच या स्पर्धेचा प्रमुख उद्देश असतो. संपूर्ण विश्व हे एक कुटुंबच आहे म्हणून एकमेकांशी बंधुभावाने वागले पाहिजे, अशी ही स्पर्धा आपणांस प्रेरणा देते.

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती कराः

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः

प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
1. सर्वांना समान संधी मिळणारे क्षेत्र –
2. मानवी रेल्वे इंजिन’ अशी ख्याती मिळवलेला – ___
उत्तर:
1. क्रीडा
2. एमिल झेटोपेक

प्रश्न 3.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:

खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1.
हेलसिंकी येथे ऑलिंपिक सामने कोणत्या साली झाले होते?
उत्तरः
1952 साली हेलसिंकी येथे ऑलिंपिक सामने झाले होते.

प्रश्न 2.
झेटोपेकने कोणत्या नावाने ख्याती मिळविली होती?
उत्तरः
झेटोपेकने ‘मानवी रेल्वे इंजिन’ या नावाने ख्याती मिळविली.

कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.
1. ……….”वर्ण, त्याचा देश हे सर्व विसरून साऱ्या जगाने त्याची प्रशंसा केली. (ध्यानचंदचा, कुबरचा, ओवेन्सचा, झेटोपेकचा)
2. एमिल झेटोपेक हा ……….. खेळाडू. (बर्लिनचा, अमेरिकेचा, भारताचा, झेकोस्लोव्हाकियाचा)
उत्तर:
1. ओवेन्सचा
2. झेकोस्लोव्हाकियाचा

प्रश्न 2.
सहसंबंध लिहा.
1. 1936: बर्लिन :: 1952 : ……………….
2. समान : संधीः: नवे :
उत्तर:
1. हेलसिंकी
2. उच्चांक

प्रश्न 3.
शब्दसमूहासाठी एक शब्द चौकटीत लिहा.
उत्तर:
शिल्प तयार करणारा – [शिल्पकार]

प्रश्न 4.
पुढील खेळाडूंचे त्यांच्या देशांनुसार वर्गीकरण करा.
(जेसी ओवेन्स, अमेरिका, एमिल झेटोपेक, झेकोस्लोव्हाकिया)
उत्तर:

खेळाडू देश
जेसी ओवेन्स अमेरिका
एमिल झेटोपेक झेकोस्लोव्हाकिया

आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
क्रीडेच्या क्षेत्रात सर्वांना समान संधी मिळते; कारण …………………
(अ) क्रीडेच्या क्षेत्रात जातिभेद, धर्मभेद, वर्णभेद होतो.
(ब) क्रीडेच्या क्षेत्रात पंच असतात.
(क) क्रीडेच्या क्षेत्रात जातिभेद नाही, धर्मभेद नाही की वर्णभेद नाही.
(ड) क्रीडेच्या क्षेत्रात न्याय असतो.
उत्तरः
क्रीडेच्या क्षेत्रात सर्वांना समान संधी मिळते; कारण क्रीडेच्या क्षेत्रात जातिभेद नाही, धर्मभेद नाही की वर्णभेद नाही.

प्रश्न 2.
कोण ते लिहा.
1. अमेरिकेतील वंशाने आफ्रिकी असणारा खेळाडू – [ ]
2. 1936 मध्ये ऑलिंपिक सामने भरलेले ठिकाण – [ ]
उत्तर:
1. जेसी ओवेन्स
2. बर्लिन

प्रश्न 3.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:

प्रश्न 4.
चूक की बरोबर लिहा.
1. क्रीडेच्या क्षेत्रात जातिभेद, धर्मभेद, वर्णभेद केला जातो.
2. जेसी ओवेन्स हा झेकोस्लोव्हाकियाचा खेळाडू.
उत्तर:
1. चूक
2. चूक

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्य लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
अमेरीकेच्या यशाचा तो मोठा शिप्लकार ठरला.
उत्तर:
अमेरिकेच्या यशाचा तो मोठा शिल्पकार ठरला.

प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन विशेषणे शोधून लिहा.
उत्तर:

  1. मोठा
  2. साऱ्या
  3. नवा
  4. एक

प्रश्न 3.
अचूक शब्द लिहा.
1. क्रिडेच्या, क्रीडेच्या, कीरडेच्या, किड्रेच्या
2. अजिक्यपदे, अंजिक्यपदे, अजिंक्यपदे, अजीक्यपदे
उत्तर:
1. क्रीडेच्या
2. अजिंक्यपदे

प्रश्न 4.
खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे समान अर्थ लिहून वाक्य पुन्हा लिहा.
1. साऱ्या जगाने ओवेन्सची स्तुती केली.
2. क्रीडेच्या विभागात जातिभेद नाही.
उत्तर:
1. साऱ्या जगाने ओवेन्सची प्रशंसा केली.
2. क्रीडेच्या क्षेत्रात जातिभेद नाही.

प्रश्न 5.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. असमान ×
  2. जुने ×
  3. लहान ×
  4. निंदा ×
  5. अनादर ×

उत्तर:

  1. समान
  2. नवे
  3. मोठा
  4. कौतुक
  5. आदर

प्रश्न 6.
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
उत्तर:
1. नवे
2. देश

प्रश्न 7.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर:

शब्द प्रत्यय विभक्ती
जगाने ने तृतीया
खेळाडूचा चा षष्ठी

प्रश्न 8.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर:

शब्द सामान्यरूप
क्रीडेच्या क्रीडे
अमेरिकेच्या अमेरिके

प्रश्न 9.
वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा.
ख्याती मिळविणे
उत्तर:
अर्थ: प्रसिद्धी मिळविणे.
वाक्य: सायना नेहवालने बॅडमिंटन या खेळामध्ये ख्याती मिळविली.

प्रश्न 10.
वाक्यातील काळ ओळखा.
1. येथे सर्वांना समान संधी मिळते.
2. क्रीडेच्या क्षेत्रात जातिभेद नाही, धर्मभेद नाही की वर्णभेद नाही.
उत्तर:
1. वर्तमानकाळ
2. वर्तमानकाळ

प्रश्न 11.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर:

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
क्रीडेच्या क्षेत्रात जातिभेद, धर्मभेद व वर्णाला थारा नसतो. सर्वांना समान संधी हेच क्रीडेचे ब्रीदवाक्य असते, त्यावर तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तरः
क्रीडा सर्वांसाठी मुक्त असते. क्रीडेचे सर्वांना स्वातंत्र्य असते. तेथे जातिभेद, धर्मभेद व वर्णभेदाला मुळीच स्थान नसते. सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणे हेच क्रीडेचे ब्रीदवाक्य असते. प्रत्येक खेळाडू हा आपआपल्या क्षमतेनुसार व कुवतीनुसार खेळात पारंगत होत असतो व त्यावरूनच त्याची श्रेणी ठरविली जाते. आपल्या भारत देशात विविध प्रांतातील विविध धर्माचे खेळाडू आहेत. आज आपल्या देशात क्रिकेट संघ, हॉकी संघ, कबड्डी संघ अशा विविध खेळांचे संघ आहेत. या संघातून खेळणारे खेळाडू हे भारताच्या विविध प्रांतातील आहेत. तेथे जात, पात, भाषा, धर्म किंवा राज्य यांना मुळीच स्थान नाही.

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः

प्रश्न 2.
जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. अबेबे बिकिला (अ) 1948
2. फॅनी बँकर्स (ब) आफ्रिका
3. ध्यानचंद (क) ऑलिंपिक ध्वज
4. संदेश देणारा (ड) भारत

उत्तरः

‘अ’ गट ‘ब’ गट
1. अबेबे बिकिला (ब) आफ्रिका
2. फॅनी बँकर्स (अ) 1948
3. ध्यानचंद (ड) भारत
4. संदेश देणारा (क) ऑलिंपिक ध्वज

खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1.
अबेबे बिकिला हा कुठला खेळाडू होता?
उत्तरः
अबेबे बिकिला हा आफ्रिकेतील इथियोपियाचा खेळाडू होता.

प्रश्न 2.
ध्वजावरील पाच वर्तुळे जगाला कोणता संदेश देत असतात?
उत्तर:
ध्वजावरील पाच वर्तुळे समतेचा व विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात.

कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.
1. …………. या स्त्री खेळाडूने तर 1948 साली ऑलिंपिकचे मैदान दणाणून सोडले. (अॅनी बँकर्स, फनी बँकर्स, फॅनी बेकर्स, मॅनी बॅकर्स)
2. भारताने …………….. स्पर्धेत अनेक वर्षे अजिंक्यपद टिकवले.
(कबड्डीच्या, नेमबाजीच्या, हॉकीच्या, धावण्याच्या)
उत्तर:
1. फॅनी बँकर्स
2. हॉकीच्या

सहसंबंध लिहा.

प्रश्न 1.
1. अबेबे बिकिला : लांब पल्ल्याची शर्यत :: फॅनी बँकर्स : …………………
2. प्रयत्नवादाचा संदेश देणारा : ध्वजः: क्षुद्र विचारांचा अहंकार घालवणारी : ………………….
उत्तर:
1. 100 व 200 मीटर शर्यत
2. ज्योत

प्रश्न 2.
पुढील खेळाडूंशी संबंधित असणारे खेळ लिहा.
उत्तर:

खेळाडू खेळ
अबेबे बिकिला लांब पल्ल्याची मॅरेथॉन
फॅनी बँकर्स 100 व 200 मीटरची शर्यत
ध्यानचंद हॉकी

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
त्या ध्वजावरील पाच खंडांची पाच वर्तुळे ………………..
(अ) समतेचा व विश्वबंधुत्वाचा संदेश खेळाडूंना देत असतात.
(ब) असमतेचा व विश्वबंधुत्वाचा संदेश खेळाडूंना देत असतात.
(क) समतेचा व शत्रुत्वाचा संदेश खेळाडूंना देत असतात.
(ड) समतेचा व विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात.
उत्तर:
त्या ध्वजावरील पाच खंडांची पाच वर्तुळे समतेचा व विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात.

प्रश्न 2.
कोण ते लिहा.
1. अनवाणी पायाने लांब पल्ल्याची शर्यत जिंकणारा – [ ]
2. सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू. – [ ]
उत्तर:
1. अबेबे बिकिला
2. ध्यानचंद

प्रश्न 3.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:

चूक की बरोबर लिहा.

प्रश्न 1.
1. त्या ध्वजावरील पाच खंडांची सहा वर्तुळे समतेचा :
विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात.
2. अबेबे बिकिला हा आशियातील खेळाडू होता.
उत्तर:
1. चूक
2. चूक

कृती 3: व्याकरण कती

प्रश्न 1.
खालील वाक्य लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
भारताने हॉकिच्या स्पर्धेत अनेक वर्षे अजिक्यपद टिकवले.
उत्तर:
भारताने हॉकीच्या स्पर्धेत अनेक वर्षे अजिंक्यपद टिकवले.

प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन सर्वनामे शोधून लिहा.
उत्तर:
1. त्याने
2. यांचे

प्रश्न 3.
अचूक शब्द लिहा.
1. वतुळे, तुळे, वर्तुळे, वरतुळे
2. प्रयन्तवादाचा, प्रयत्नवादाचा, प्रत्यनवादाचा, प्रयत्नवदाचा
उत्तर:
1. वर्तुळे
2. प्रयत्नवादाचा

प्रश्न 4.
समानार्थी शब्द लिहा.

  1. क्रीडांगण- [ ]
  2. निरोप – [ ]
  3. झेंडा – [ ]
  4. क्रीडापटू – [ ]

उत्तर:

  1. मैदान
  2. संदेश
  3. ध्वज
  4. खेळाडू

प्रश्न 5.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. हाताने ×
  2. उजेड ×
  3. कुप्रसिद्ध ×

उत्तर:

  1. पायाने
  2. अंधकार
  3. सुप्रसिद्ध

प्रश्न 6.
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
उत्तरः

  1. वर्षे
  2. खेळाडू
  3. वर्तुळे

प्रश्न 7.
तकता पूर्ण करा.
उत्तरः

शब्द प्रत्यय विभक्ती
पायाने ने तृतीया
खंडांची ची षष्ठी

प्रश्न 8.
तकता पूर्ण करा.
उत्तरः

शब्द सामान्यरूप
समतेचा समते
विश्वबंधुत्वाचा विश्वबंधुत्वा
पराक्रमाचा पराक्रमा

प्रश्न 9.
खालील दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा.
सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू ध्यानचंद यांचे नाव कित्येक वर्षे जगात सर्वांच्या जिभेवर नाचत होते.
उत्तरः
भूतकाळ

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
‘ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ’ यातून तुम्हांला कोणती प्रेरणा मिळतो, हे थोडक्यात सांगा.
उत्तरः
पाच वर्तुळे एकमेकांत गुंफून त्याचा गोफ बनवून ती ऑलिंपिकच्याध्वजावर रेखाटली आहेत. ही पाचवर्तुळे जगातील पाच खंडांचे प्रतीक आहेत. जणू हे पाच खंड एकमेकांशी मैत्रीने व प्रेमाने जुळले गेलेले आहेत असे या गोफातून दिसून येते. ही वर्तुळे जणू आपणास समतेचा, ऐक्याचा व विश्वबंधुत्वाचा संदेश देतात. जगातील सर्व लोकांशी प्रेमाने, समतेने, सद्भावनेने व आपुलकीने वागण्यास शिकवितात. संपूर्ण विश्व हे आपले कुटुंबच आहे, असे जणू आपणास सांगतात. या पाच वर्तुळांच्या जवळच तेवत असणारी ज्योत आपल्या हृदयातून क्षुद्र विचारांचा अंधकार मिटविण्यास स्वयंसिद्ध होते.


इयत्ता नववी मराठी स्वाध्याय उपाय

निष्कर्ष

आम्हाला आशा आहे की महाराष्ट्रावरील हा लेख तुम्हाला 'नववी ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ स्वाध्याय' मदत करेल. तुम्हाला काही प्रश्न असल्यास, त्यांना खाली टिप्पणी विभागात मोकळ्या मनाने पोस्ट करा. आम्ही लवकरात लवकर तुमच्याकडे परत येऊ.
Share:

0 Comments:

Post a Comment

Plus Two (+2) Previous Year Question Papers

Plus Two (+2) Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Physics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Chemistry Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Maths Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Zoology Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Botany Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Computer Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Computer Application Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Commerce Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Humanities Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Economics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) History Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Islamic History Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Psychology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Sociology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Political Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Geography Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Accountancy Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Business Studies Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) English Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Hindi Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Arabic Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Kaithang Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Malayalam Previous Year Chapter Wise Question Papers

Plus One (+1) Previous Year Question Papers

Plus One (+1) Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Physics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Chemistry Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Maths Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Zoology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Botany Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Computer Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Computer Application Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Commerce Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Humanities Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Economics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) History Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Islamic History Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Psychology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Sociology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Political Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Geography Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Accountancy Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Business Studies Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) English Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Hindi Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Arabic Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Kaithang Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Malayalam Previous Year Chapter Wise Question Papers
Copyright © HSSlive: Plus One & Plus Two Notes & Solutions for Kerala State Board About | Contact | Privacy Policy