Hsslive.co.in: Kerala Higher Secondary News, Plus Two Notes, Plus One Notes, Plus two study material, Higher Secondary Question Paper.

Wednesday, March 9, 2022

इयत्ता पाचवी मराठी अनुभव-१ मराठी स्वाध्याय PDF

 

इयत्ता पाचवी मराठी अनुभव-१ मराठी स्वाध्याय PDF
इयत्ता पाचवी मराठी अनुभव-१ मराठी स्वाध्याय PDF


या लेखात, आम्ही मराठी अनुभव-१ विषयासाठी इयत्ता पाचवी मराठी सोल्यूशन्स देऊ. इयत्ता पाचवी मधील विद्यार्थी पाठ्यपुस्तकांमध्ये उपस्थित असलेल्या व्यायामांसाठी प्रश्न आणि उत्तरे डाउनलोड आणि कॉपी करण्यास सक्षम असतील.

इयत्ता पाचवी मराठी अनुभव-१ाच्या पुस्तकात महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमातील सर्व प्रश्नांचा समावेश आहे. येथे सर्व प्रश्न पूर्ण स्पष्टीकरणासह सोडवले आहेत आणि डाउनलोड करण्यासाठी विनामूल्य उपलब्ध आहेत. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता पाचवी मराठी अनुभव-१ाचे पुस्तक खाली दिले आहे. आम्‍हाला आशा आहे की आमच्‍या इयत्‍ता पाचवी वीच्‍या मराठी अनुभव-१ाचे पुस्‍तक तुमच्‍या अभ्यासात मदत करेल! जर तुम्हाला आमचे इयत्ता पाचवी चे पुस्तक आवडले असेल तर कृपया ही पोस्ट शेअर करा.


इयत्ता पाचवी मराठी अनुभव-१ स्वाध्याय

मंडळाचे नाव

Maharashtra Board

ग्रेडचे नाव

पाचवी

विषय

मराठी अनुभव-१

वर्ष

2022

स्वरूप

PDF/DOC

प्रदाता

hsslive.co.in

अधिकृत संकेतस्थळ

mahahsscboard.in


समाधानासह महाराष्ट्र बोर्ड आठवा स्वाध्याय कसे डाउनलोड करायचे?

महाराष्ट्र बोर्ड पाचवी स्वाध्याय PDF डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

 1. वेबसाइट- Hsslive ला भेट द्या. 'स्वाध्याय' लिंकवर क्लिक करा.
 2. महा बोर्ड पाचवी स्वाध्याय PDF पहा.
 3. आता महाराष्ट्र बोर्ड पाचवी स्वाध्याय तपासा.
 4. डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भांसाठी जतन करा.

इयत्ता पाचवी मराठी अनुभव-१ स्वाध्याय उपाय

इयत्ता पाचवी स्वाध्याय मधील विद्यार्थी खालील लिंक्सवरून मराठी अनुभव-१ाचे उपाय डाउनलोड करू शकतील.


5th Standard Marathi Digest Chapter 13 अनुभव – १ Textbook Questions and Answers

 

1. एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न (अ)
मारियाच्या घराला कुलूप का होते?
उत्तर:
मारियाचे आईबाबा लग्नाला गेले होते, म्हणून तिच्या दाराला कुलूप होते.

प्रश्न (आ)
मारियाने दारे, खिडक्या का बंद केल्या?
उत्तर:
ढगांच्या गडगडाटासह व विजांच्या कडकडाटासह धोधो पाऊस कोसळू लागला, म्हणून मारियाने दारे, खिडक्या बंद केल्या.

प्रश्न (इ)
पानांआड लपलेले पक्षी केव्हा बाहेर आले?
उत्तर:
पाऊस कमी झाल्यावर पानांआड लपलेले पक्षी बाहेर आले.

प्रश्न (ई)
मारिया आईला का बिलगली?
उत्तर:
आईची वाट पाहत मारिया कंटाळलेली होती, म्हणून आईला पाहाताक्षणीच मारिया आईला बिलगली.

2. जोड्या जुळवा.

प्रश्न 1.
जोड्या जुळवा.

‘अ गट’ ‘ब गट
1. ढगांचा (अ) खळखळाट
2. विजांचा (ब) फडफडाट
3. पाण्याचा (क) गडगडाट
4. पंखांचा (ड) कडकडाट

उत्तर:

‘अ गट’ ‘ब गट
1. ढगांचा (क) गडगडाट
2. विजांचा (ड) कडकडाट
3. पाण्याचा (अ) खळखळाट
4. पंखांचा (ब) फडफडाट

3. वाचा. सांगा. लिहा.

प्रश्न 1.
वाचा. सांगा. लिहा.
(अ) शब्दांची पुनरावृत्ती झालेले शब्द. उदा., धाड्धाड्.
(आ) नादमय शब्द. उदा., कडकडाट, गडगडाट. यांसारखे तुम्हांला माहीत असलेले शब्द सांगा.

4. खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा.

प्रश्न 1.
खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा.
(अ) घड्याळ
(आ) खिडक्या
(इ) हळूहळू
(ई) गुणगुणू
(उ) रिमझिम
(ऊ) खळखळाट
उत्तर:
(अ) दार
(आ) खिडकी

5. रिकाम्या जागी विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्ये पूर्ण लिहा.

प्रश्न (अ)
पाऊस सुरू झाला.
उत्तर:
पाऊस बंद झाला.

प्रश्न (आ)
मारिया सावकाश दाराकडे गेली.
उत्तर:
मारिया भरभर दाराकडे गेली.

6. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

प्रश्न 1.
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
(अ) चढणे ×
(आ) आठवणे ×
(इ) उंच ×
(ई) बाहेर ×
(उ) स्वच्छ ×
(ऊ) थांबणे ×
उत्तर:
(अ) उतरणे
(आ) विसरणे
(इ) ठेंगणे
(ई) आत
(उ) अस्वच्छ
(ऊ) चालणे

7. पावसाळ्यातील तुमचा अनुभव सांगा.

8. पावसाळ्यात तुम्ही आरोग्याविषयी कोणती काळजी घ्याल?

9. खाली दोन प्रकारचे शब्दसमूह दिलेले आहेत, ते वाचा. कोणत्या शब्दसमूहांचा अर्थ कळतो व कोणत्या शब्दांवरून कळतो ते समजून घ्या.


मागील तक्त्यातील दुसऱ्या शब्दसमूहांत कोणती क्रिया झाली हे दाखवणारे शब्द दिले आहेत. उदा., उघडले, बंद केल्या, बिलगली. क्रिया सांगणाऱ्या या शब्दांमुळे वाक्यांचा अर्थ कळतो. या शब्दांना क्रियापद म्हणतात.

10. खालील शब्दसमूह वाचून त्यातील क्रियापदे ओळखा.

प्रश्न 1.
खालील शब्दसमूह वाचून त्यातील क्रियापदे ओळखा.
(अ) पक्षी बाहेर आले.
(आ) मारियाने आकाशाकडे पाहिले.
(इ) दारावरची बेल वाजली.
(ई) मारिया पळत दाराकडे गेली.
(उ) तिने गणवेश बदलला.
उत्तर:
(अ) आले
(आ) पाहिले
(इ) वाजली
(ई) गेली
(उ) बदलला

11. क्रियापदे घालून वाक्ये पूर्ण करा.

प्रश्न 1.
क्रियापदे घालून वाक्ये पूर्ण करा.
(अ) मारिया घरी ……………..
(आ) मारिया कविता गुणगुणू …………………..
(इ) मी चेंडू ……………………
(ई) ताई पुस्तक ………………….
(उ) मारियाने दार ………………..
उत्तरः
(अ) आली
(आ) लागली
(इ) टाकला
(ई) वाचते
(उ) उघडले

12. खालील शब्द वाचा, त्या शब्दांत आलेली ‘र’ ची रूपे शोधा. शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.

प्रश्न 1.
खालील शब्द वाचा, त्या शब्दांत आलेली ‘र’ ची रूपे शोधा. शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
उत्तरः
(अ) सूर्य = स + ऊ + र्रय
(आ) पर्वत = प + र् + व + त
(इ) चंद्र- च + न + द + र् – (र)
(ई) समुद्र = स + म + उ + द् + र्
(उ) कैऱ्या = क + अ + र् + य + आ
(ऊ) पऱ्या = प + र् + या
(ए) प्राणी = प + र् + आ + ण + ई (र)
(ऐ) प्रकाश = प + र् + क + आ + श
(ओ) महाराष्ट्र = म + ह + आ + र + आ + ष + ट् + र् (र)
(औ) ट्रक = ट + र् + क

उपक्रम:

पावसाबरोबर आलेले शब्द वाचा. त्या शब्दांचा उपयोग करून वाक्ये सांगा.
उदा., पावसाची बुरबुर सुरू झाली.

Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 13 अनुभव – १ Additional Important Questions and Answers

1. एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
उन्हाने ग्रासल्यावर सगळेजण आतुरतेने कशाची वाट पाहतात?
उत्तर:
उन्होने ग्रासल्यावर सगळेजण पावसाची आतुरतेने वाट पाहतात.

प्रश्न 2.
मारियाने दुपारी शाळेतून घरी आल्यावर काय केले?
उत्तर:
मारियाने दुपारी शाळेतून आल्यावर खिडक्या उघडल्या, गणवेश बदलला व हातपाय धुतले.

प्रश्न 3.
मारियाचे आई, बाबा कुठे गेले होते?
उत्तर:
मारियाचे आई, बाबा लग्नाला गेले होते.

प्रश्न 4.
खुर्चीत बसल्या बसल्या मारियाला काय आठवू लागले?
उत्तर:
खुर्चीत बसल्या बसल्या मारियाला पावसाच्या कविता आठवू लागल्या.

प्रश्न 5.
पानांआड बसलेले पक्षी बाहेर येऊन काय करू लागले?
उत्तर:
पानांआड बसलेले पक्षी बाहेर येऊन पंखांची फडफड करू लागले.

प्रश्न 6.
सगळीकडे कसे वातावरण होते?
उत्तरः
सगळीकडे स्वच्छ, सुंदर वातावरण होते.

प्रश्न 7.
आईने कुणाला जवळ घेतले?
उत्तर:
आईने मारियाला जवळ घेतले.

प्रश्न 8.
मारियाचे लक्ष कुठे गेले?
उत्तर:
मारियाचे लक्ष घड्याळाकडे गेले.

प्रश्न 9.
कुणाला पाहून मारियाला आनंद झाला?
उत्तर:
आईला पाहून मारियाला आनंद झाला.

थोडक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
पाऊस पडण्याआधी वातावरणात कोणते बदल होतात?
उत्तर:
थंडगार वारा वाहू लागतो, आभाळात काळ्या ढगांची गर्दी होते, ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू होतो, पाऊस पडण्याआधी वातावरणात हे बदल होतात.

प्रश्न 2.
तुम्ही कधी तुमच्या घराच्या खिडकीतून पावसाळ्यातील वातावरणाचा अनुभव घेतला आहे का?
उत्तर:
हो, आम्ही पहिल्या पावसाची चातकासारखी वाट पाहत असतो; त्यावेळी मातीचा धुरळा उडतो. वातावरणात थंडपणा येतो. लहान लहान पाखरे हवेत फिरू लागतात. काळ्या ढगांची गर्दी होते. गडगडाट व वीजांसह पावसाचे आगमन होते. मातीचा सुवास मन प्रसन्न करतो.

प्रश्न 3.
पावसाळ्यात तुम्ही आरोग्याविषयी कोणती काळजी घेता?
उत्तर:
1. पावसाळ्यात आम्ही पाणी उकळून पितो.
2. पावसाळ्यात पावसात भिजू नये यासाठी छत्री किंवा रेनकोटचा वापर करतो.
3. पावसाळ्यात शक्यतोवर बाहेर अन्नपदार्थ खाणे टाळतो.

प्रश्न 4.
पावसाबरोबर आलेले शब्द वाचा. त्या शब्दांचा उपयोग करून वाक्ये सांगा.

उत्तर:

 1. पानावर टपटपणाऱ्या पावसाचा आवाज येत होता.
 2. काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
 3. पावसाची बुरबुर सुरू झाली.
 4. जोरदार पावसाने शेतकरीवर्ग खूश झाला.
 5. तलाव क्षेत्रात दमदार पाऊस झाला.
 6. दिवसभर रिमझिम पाऊस पडत होता.

व्याकरण व भाषाभ्यास:

अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा.

प्रश्न 1.
राम स्वच्छ कपडे घालतो.
उत्तर:
राम घाणेरडे कपडे घालतो.

प्रश्न 2.
गणपत झाडावर चढला.
उत्तर:
गणपत झाडावरून उतरला.

प्रश्न 3.
शिक्षकांनी प्रश्न विचारले.
उत्तर:
शिक्षकांनी उत्तर विचारले.

प्रश्न 4.
मुले अंधारात खेळत होती.
उत्तर:
मुले उजेडात खेळत होती.

प्रश्न 5.
पूर्वी लोकांनी गरिबीत दिवस काढले.
उत्तर:
पूर्वी लोकांनी श्रीमंतीत दिवस काढले.

शब्द शुद्ध करून लिहा.

प्रश्न 1.
शब्द शुद्ध करून लिहा.

 1. दूपार
 2. कुलुप
 3. पाणि
 4. सवच्छ
 5. गरदी
 6. उशिर
 7. सूंदर
 8. उन
 9. वीज
 10. पशी

उत्तर:

 1. दुपार
 2. कुलूप
 3. पाणी
 4. स्वच्छ
 5. गर्दी
 6. उशीर
 7. सुंदर
 8. ऊन
 9. विज
 10. पक्षी

प्रश्न 2.
वचन बदला.

 1. घर
 2. कुलूप
 3. दारे
 4. झाड
 5. पान
 6. पंख
 7. कविता

उत्तर:

 1. घरे
 2. कुलुपे
 3. घड्याळे
 4. झाडे
 5. पाने
 6. पंख

प्रश्न 3.
लिंग बदला.

 1. आई
 2. पक्षी
 3. मुलगी

उत्तरः

 1. बाबा
 2. पक्षिण
 3. मुलगा

प्रश्न 4.
समानार्थी शब्द लिहा.

 1. दुपार
 2. खिडकी
 3. दार
 4. लग्न
 5. उशीर
 6. जवळ
 7. आवाज
 8. पाऊस
 9. पाणी
 10. पंख
 11. पान
 12. ऊन
 13. पान

उत्तर:

 1. मध्यान्ह
 2. गवाक्ष
 3. दरवाजा
 4. विवाह
 5. विलंब
 6. निकट
 7. ध्वनी
 8. वर्षा
 9. जल, नीर
 10. पर
 11. पर्ण
 12. सूर्यप्रकाश
 13. पर्ण

प्रश्न 5.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

 1. उघड
 2. लक्ष
 3. कमी
 4. उशीर
 5. ऊन
 6. कंटाळा
 7. विचार
 8. स्वच्छ

उत्तर:

 1. बंद
 2. दुर्लक्ष
 3. जास्त
 4. लवकर
 5. सावली
 6. उत्साह
 7. अविचार
 8. अस्वच्छ

प्रश्न 6.
क्रियापदे घालून वाक्ये पूर्ण करा.

 1. गणेश शाळेत ………………..
 2. आम्ही अभ्यास ………………..
 3. उदया ते सहलीला ………………..
 4. गाडी 5 वाजता …………………….
 5. पाऊस पडू …………………….

उत्तरः

 1. गेला
 2. करतो
 3. जातील
 4. येईल
 5. लागला

अनुभव – १ Summary in Marathi

पदयपरिचय:

‘अनुभव’ या पाठात मारिया या लहान मुलीने घेतलेला पावसाळ्याचा अनुभव वर्णन केला आहे. एकटेपणा व निसर्गाचा लहरीपणा, सौंदर्य हे सारे घटक या पाठात आले आहेत.

शब्दार्थ:

 1. दुपारी – मध्यान्ह (afternoon)
 2. कुलूप – दरवाजा बंद करण्याचे साधन (a lock)
 3. गणवेश – शाळेत घालण्याचा पोशाख (uniform)
 4. वारा – समीर (wind)
 5. गडगडाट – मेघगर्जना (thundering)
 6. उशीर – वेळाने (late)
 7. रिमझिम – पावसाच्या सतत पडणाऱ्या सरी (drizzling)
 8. लख्ख उन – (bright sunlight)
 9. बिलगणे – चिकटणे, खेटणे (to cling too closely)
 10. गुणगुणणे – हलक्या आवाजात गाणे (to huma tune)
 11. पंख – पर (wings)
 12. धो धो पाऊस – (heavy rain)

इयत्ता पाचवी मराठी स्वाध्याय उपाय

निष्कर्ष

आम्हाला आशा आहे की महाराष्ट्रावरील हा लेख तुम्हाला 'पाचवी मराठी अनुभव-१ स्वाध्याय' मदत करेल. तुम्हाला काही प्रश्न असल्यास, त्यांना खाली टिप्पणी विभागात मोकळ्या मनाने पोस्ट करा. आम्ही लवकरात लवकर तुमच्याकडे परत येऊ.
Share:

0 Comments:

Post a Comment

Plus Two (+2) Previous Year Question Papers

Plus Two (+2) Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Physics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Chemistry Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Maths Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Zoology Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Botany Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Computer Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Computer Application Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Commerce Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Humanities Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Economics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) History Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Islamic History Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Psychology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Sociology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Political Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Geography Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Accountancy Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Business Studies Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) English Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Hindi Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Arabic Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Kaithang Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Malayalam Previous Year Chapter Wise Question Papers

Plus One (+1) Previous Year Question Papers

Plus One (+1) Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Physics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Chemistry Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Maths Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Zoology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Botany Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Computer Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Computer Application Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Commerce Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Humanities Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Economics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) History Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Islamic History Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Psychology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Sociology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Political Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Geography Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Accountancy Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Business Studies Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) English Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Hindi Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Arabic Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Kaithang Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Malayalam Previous Year Chapter Wise Question Papers
Copyright © HSSlive: Plus One & Plus Two Notes & Solutions for Kerala State Board About | Contact | Privacy Policy