Hsslive.co.in: Kerala Higher Secondary News, Plus Two Notes, Plus One Notes, Plus two study material, Higher Secondary Question Paper.

Saturday, March 5, 2022

इयत्ता सहावी मराठी अप्पाजींचे चातुर्य मराठी स्वाध्याय PDF

 

इयत्ता सहावी मराठी अप्पाजींचे चातुर्य मराठी स्वाध्याय PDF
इयत्ता सहावी मराठी अप्पाजींचे चातुर्य मराठी स्वाध्याय PDF


या लेखात, आम्ही मराठी अप्पाजींचे चातुर्य विषयासाठी इयत्ता सहावी मराठी सोल्यूशन्स देऊ. इयत्ता सहावी मधील विद्यार्थी पाठ्यपुस्तकांमध्ये उपस्थित असलेल्या व्यायामांसाठी प्रश्न आणि उत्तरे डाउनलोड आणि कॉपी करण्यास सक्षम असतील.

इयत्ता सहावी मराठी अप्पाजींचे चातुर्याच्या पुस्तकात महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमातील सर्व प्रश्नांचा समावेश आहे. येथे सर्व प्रश्न पूर्ण स्पष्टीकरणासह सोडवले आहेत आणि डाउनलोड करण्यासाठी विनामूल्य उपलब्ध आहेत. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावी मराठी अप्पाजींचे चातुर्याचे पुस्तक खाली दिले आहे. आम्‍हाला आशा आहे की आमच्‍या इयत्‍ता सहावी वीच्‍या मराठी अप्पाजींचे चातुर्याचे पुस्‍तक तुमच्‍या अभ्यासात मदत करेल! जर तुम्हाला आमचे इयत्ता सहावी चे पुस्तक आवडले असेल तर कृपया ही पोस्ट शेअर करा.


इयत्ता सहावी मराठी अप्पाजींचे चातुर्य स्वाध्याय

मंडळाचे नाव

Maharashtra Board

ग्रेडचे नाव

सहावी

विषय

मराठी अप्पाजींचे चातुर्य

वर्ष

2022

स्वरूप

PDF/DOC

प्रदाता

hsslive.co.in

अधिकृत संकेतस्थळ

mahahsscboard.in


समाधानासह महाराष्ट्र बोर्ड आठवा स्वाध्याय कसे डाउनलोड करायचे?

महाराष्ट्र बोर्ड सहावी स्वाध्याय PDF डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

  1. वेबसाइट- Hsslive ला भेट द्या. 'स्वाध्याय' लिंकवर क्लिक करा.
  2. महा बोर्ड सहावी स्वाध्याय PDF पहा.
  3. आता महाराष्ट्र बोर्ड सहावी स्वाध्याय तपासा.
  4. डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भांसाठी जतन करा.

इयत्ता सहावी मराठी अप्पाजींचे चातुर्य स्वाध्याय उपाय

इयत्ता सहावी स्वाध्याय मधील विद्यार्थी खालील लिंक्सवरून मराठी अप्पाजींचे चातुर्याचे उपाय डाउनलोड करू शकतील.


Marathi Sulabhbharti Class 6 Solutions Chapter 14 अप्पाजींचे चातुर्य Textbook Questions and Answers

 

1. एका वाक्यात उत्तर लिहा.

प्रश्न अ.
अप्पाजींनी बैलगाडीत कशाचे पीक घ्यायला लावले?
उत्तर:
अप्पाजींनी बैलगाडीत कोबीचे पीक घ्यायला लावले.

प्रश्न आ.
उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कोणती?
उत्तरः
ज्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तेथेच अडून राहिली, ती तिसरी मूर्ती उत्कृष्ट दर्जाची होय.

प्रश्न इ.
कलिंगचा राजा संतुष्ट का झाला?
उत्तरः
अप्पाजींनी तीनही मूर्तीचा दर्जा बरोबर ओळखल्याने कलिंग राजा संतुष्ट झाला.

2. तीन – चार वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
अप्पाजींनी ताजी कोबी कलिंग देशाकडे कशी पाठवली?
उत्तरः
राजाने अप्पाजींच्या सांगण्याप्रमाणे एका गाडीत माती भरून त्यात कोबीच्या बिया पेरून ती कलिंग राज्याकडे रवाना केली. गाडीवान प्रवासात रोज कोबींच्या रोपांना पाणी देत असे. तीन महिन्यांनी ती बैलगाडी कलिंग राज्यात पोहचली. अशाप्रकारे कलिंग राजाला ताजी कोबी मिळाली.

प्रश्न आ.
कलिंगच्या राजाने अप्पाजींची दुसऱ्यांदा कशी परीक्षा घेतली?
उत्तरः
कलिंगच्या राजाने दुसऱ्यांदा एकसारख्या दिसणाऱ्या तीन मूर्ती मागवल्या व म्हणाला, ‘या तीनही मूर्ती दिसायला सारख्या असल्या, तरी यांतली एक मूर्ती निकृष्ट आहे, दुसरी मध्यम दर्जाची आहे आणि तिसरी उत्कृष्ट आहे. या सारख्या दिसणाऱ्या तीन मूर्तीमधील उत्कृष्ट कोणती ते मला
सांगा.’

अप्पाजींनी एक लवचिक तार घेतली. ती पहिल्या मूर्तीच्या कानात घातली. ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली. अप्पाजी म्हणाले, ‘ही निकृष्ट मूर्ती आहे! नंतर अप्पाजींनी ती तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली. ती तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. अप्पाजी म्हणाले, ‘ही मध्यम दर्जाची मूर्ती होय.’ तिसऱ्या मूर्तीवरही अप्पाजींनी हाच प्रयोग केला. त्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून वा दुसऱ्या कानातून कोठूनच बाहेर पडली नाही. अप्पाजी म्हणाले, ‘ही उत्कृष्ट मूर्ती.’ अशा प्रकारे परीक्षा घेतली.

प्रश्न इ.
मूर्तीच्या तोंडात घातलेली तार तोंडातून बाहेर येते याचा अप्पाजींनी कोणता अर्थ लावला?
उत्तरः
एखादा माणूस ज्या अफवा ऐकतो, त्याचा खरेखोटेपणा पडताळून न पाहता जर तो त्या दुसऱ्यांना सांगू लागला, तर त्याचे व समाजाचेही हित होत नाही. असा अर्थ मूर्तीच्या कानात घातलेली तार तोंडातून बाहेर पडलेल्या मूर्तीबद्दल सांगितला.

प्रश्न ई.
अप्पाजींच्या मते उत्तम माणूस कोणता?
उत्तरः
अफवा ऐकल्यावर जो माणूस दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही किंवा लगेच ती दुसऱ्याला सांगत नाही, तर तिच्या खरेखोटेपणाची खात्री करून घेतो आणि आपण काय ऐकले ते पुराव्याशिवाय सांगत नाही, तो माणूस उत्तम. असे अप्पाजींचे मत आहे.

3. पाणी टंचाईमुळे तुम्हांला पाणी दुरून आणायचे आहे. कमी श्रमात ते आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल?

प्रश्न 1.
पाणी टंचाईमुळे तुम्हांला पाणी दुरून आणायचे आहे. कमी श्रमात ते आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल?

4. विरूद्धार्थी शब्द लिहा.

प्रश्न 1.
विरूद्धार्थी शब्द लिहा.
उत्तरः
(अ) हित × अहित
(आ) निकृष्ट × उत्कृष्ट

5. खाली दिलेल्या उदाहरणाप्रमाणे चौकट पूर्ण करा.

प्रश्न 1.
खाली दिलेल्या उदाहरणाप्रमाणे चौकट पूर्ण करा.

उत्तरः

गाडी – गाडीवान चतुर – चतुराई खरा – खरेपणा
धन – धनवान महाग – महागाई साधे – साधेपणा
दया – दयावान स्वस्त – स्वस्ताई शहाणा – शहाणपणा
बल – बलवान नवल – नवलाई भोळा – भोळेपणा

6. खालील शब्द वाचा व समजून घ्या.

प्रश्न 1.
खालील शब्द वाचा व समजून घ्या.
उत्तर:

  1. चतुर – चातुर्य
  2. चोरी – चौर्य
  3. क्रूर – कौर्य
  4. शूर – शौर्य
  5. सुंदर – सौंदर्य
  6. धीर – धैर्य

7. खालील शब्दांना तो, ती, ते शब्द लावून लिंग ओळखा.

प्रश्न 1.

  1. दरी
  2. पान
  3. पुस्तक
  4. माठ
  5. लाडू
  6. वही

उत्तर:

  1. ती दरी – स्त्रीलिंग
  2. ते पान – नपुंसकलिंग
  3. ते पुस्तक – नपुंसकलिंग
  4. तो माठ – पुल्लिंग
  5. तो लाडू – पुल्लिंग
  6. ती वही – स्त्रीलिंग

8. तुमच्या मित्राच्या / मैत्रिणीच्या चतुरपणाचे कौतुक झाल्याचा प्रसंग घरी व वर्गात सांगा.

प्रश्न 1.
तुमच्या मित्राच्या / मैत्रिणीच्या चतुरपणाचे कौतुक झाल्याचा प्रसंग घरी व वर्गात सांगा.
उत्तर:
आज रस्त्याने जात असता एक तरूण मुलगा कानात हेडफोन घालून मोबाईलची गाणी ऐकत रस्ता पार करत होता. त्याने डावी व उजवीकडे गाडी येताना पाहिलेच नाही. तेवढ्यात समोरून एक सुसाट गाडी येताना माझ्या मित्राला दिसली. ती गाडी सतत हॉर्न वाजवत होती, पण त्याच्या कानावर तो आवाज गेला नाही. आता अपघात होणारच होता एवढ्यात माझ्या तनय नावाच्या मित्राने समयसुचकता दाखवून त्याला पटकन मागे ओढले. म्हणून तो अपघात टळला. तनयचे कौतुक करावे तेवढे थोडेच.

9. अप्पाजींसारख्या अनेक चतुर व्यक्ती इतिहासात होऊन गेल्या आहेत. उदा., बिरबल, तेनालीराम. यांच्या गोष्टी मिळवा. वाचा. वर्गात सांगा.

प्रश्न 1.
अप्पाजींसारख्या अनेक चतुर व्यक्ती इतिहासात होऊन गेल्या आहेत. उदा., बिरबल, तेनालीराम. यांच्या गोष्टी मिळवा. वाचा. वर्गात सांगा.

10. खालील वेबमध्ये दिलेल्या शब्दांस विशेषणे लावा.

प्रश्न 1.

उत्तरः

  1. चवदार कोबी
  2. बेचव कोबी
  3. ताजी कोबी
  4. शिळी कोबी

प्रश्न 2.

उत्तरः

  1. मातीची मूर्ती
  2. देखणी मूर्ती
  3. सजवलेली मूर्ती
  4. सुंदर मूर्ती

खालील तक्ता वाचा. समजून घ्या.

प्रश्न 1.


उत्तर:

वतमान काळ भूतकाळ भविष्य काळ
1. माया खेळते माया खेळली माया खेळेल
2. तो खेळतो तो खेळला तो खेळेल
3. तुम्ही खेळता तुम्ही खेळलात तुम्ही खेळाल
4. आम्ही खेळतो आम्ही खेळलो आम्ही खेळू
5. त्या खेळतात त्या खेळल्या त्या खेळतील

दिलेल्या सूचनांप्रमाणे खालील वाक्यांत बदल करा.

प्रश्न 1.
रिमा सहलीला गेली. (भविष्यकाळ करा)
उत्तर:
रिमा सहलीला जाईल.

प्रश्न 2.
मला आंबा आवडतो. (भूतकाळ करा)
उत्तर:
मला आंबा आवडला.

प्रश्न 3.
चंदाने लाडू खाऊन संपवला. (वर्तमानकाळ करा)
उत्तर:
चंदा लाडू खात आहे.

प्रश्न 4.
सुभाष माझा मित्र आहे. (भूतकाळ करा)
उत्तर:
सुभाष माझा मित्र होता.

प्रश्न 5.
वंदना अभ्यास करते. (भूतकाळ करा)
उत्तर:
वंदनाने अभ्यास केला.

प्रश्न 6.
संजू क्रिकेट खेळतो. (भविष्यकाळ करा)
उत्तर:
संजू क्रिकेट खेळेल.

पूर, गाव, नगर,बाद ही अक्षरे असणाऱ्या गावांची, शहरांची, ठिकाणांची नावे खालील तक्त्यात लिहा.

प्रश्न 1.
पूर, गाव, नगर,बाद ही अक्षरे असणाऱ्या गावांची, शहरांची, ठिकाणांची नावे खालील तक्त्यात लिहा.

उत्तर:

गाव पूर नगर बाद
1. मानगाव सोलापूर अहमदनगर औरंगाबाद
2. नागाव कोल्हापूर सह्याद्रीनगर दौलताबाद
3. सोनगाव नागपूर संभाजीनगर उस्मानाबाद
4. भरतगाव कानपूर हनुमाननगर फिरोजाबाद
5. धरणगाव राजापूर वैभवनगर अहमदाबाद
6. शेगाव तारापूर जामनगर हैद्राबाद

Class 6 Marathi Chapter 14 अप्पाजींचे चातुर्य Additional Important Questions and Answers

खालील प्रश्नांची प्रत्येकी एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
कृष्णदेवराय कोणत्या नगराचा राजा होता?
उत्तरः
कृष्णदेवराय विजयनगरचा राजा होता.

प्रश्न 2.
विजयनगरच्या प्रधानाचे नाव काय होते?
उत्तरः
विजयनगरच्या प्रधानाचे नाव अप्पाजी होते.

प्रश्न 3.
उत्तरकडे कोणते राज्य होते?
उत्तरः
उत्तरेकडे कलिंग राज्य होते.

प्रश्न 4.
त्या काळी वाहतूक कशातून होत असे?
उत्तरः
त्या काळी बैलगाडीतून वाहतूक होत असे.

प्रश्न 5.
बैलगाड्या कलिंग राज्यात पोहचायला किती महिने लागत?
उत्तरः
बैलगाड्या कलिंग राज्यात पोहचायला तीन महिने लागत.

प्रश्न 6.
कलिंग राजाने एकूण किती मूर्त्या आणल्या?
उत्तरः
कलिंग राजाने एकूण तीन मूर्त्या आणल्या.

प्रश्न 7.
निकृष्ट दर्जाची मूर्ती कोणती?
उत्तरः
मूर्तीच्या कानातून घातलेली तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली ही निकृष्ट दर्जाची मूर्ती होय.

प्रश्न 9.
मध्यम दर्जाची मूर्ती कोणती?
उत्तर:
ज्या मूर्तीच्या एका कानातून घातलेली तार दुसऱ्या कानातून बाहेर पडली ती मूर्ती मध्यम दर्जाची होय.

व्याकरण व भाषाभ्यास

प्रश्न 1.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

  1. जुनी
  2. गोष्ट
  3. चतुर
  4. राजा
  5. निरोप
  6. निकृष्ट
  7. उत्कृष्ट
  8. कान
  9. माणूस
  10. खात्री
  11. संतुष्ट
  12. पुरावा

उत्तर:

  1. पुराणी
  2. कथा
  3. हुशार
  4. नृप
  5. सांगावा
  6. तकलादू
  7. चांगली
  8. कर्ण
  9. मनुष्य
  10. विश्वास
  11. समाधानी
  12. दाखला

प्रश्न 2.
खालील शब्दांचे विरूद्धार्थी शब्द लिहा.

  1. जुनी
  2. उत्तर
  3. प्रश्न
  4. चतुर
  5. चवदार
  6. इच्छा
  7. जलद
  8. ताजी
  9. सारखा
  10. बाहेर
  11. माणूस
  12. खरे
  13. नुकसान

उत्तर:

  1. नवी
  2. दक्षिण
  3. उत्तर
  4. मुर्ख
  5. बेचव
  6. अनिच्छा
  7. सावकाश
  8. शिळी
  9. वेगळा
  10. आत
  11. स्त्री
  12. खोटे
  13. फायदा

अप्पाजींचे चातुर्य Summary in Marathi

पाठपरिचय:

विजयनगरमध्ये असणाऱ्या कृष्णदेवरायच्या राज्यात त्याचे प्रधान अप्पाजी फार चतुर होते. उत्तरेकडे असलेल्या कलिंग राजाने अप्पाजींची चतुराई कशी पारखली, त्याच्या परीक्षेला अप्पाजींनी कसे कौशल्याने तोंड दिले याचे वर्णन या पाठात आले आहे.

शब्दार्थ:

  1. चातुर्य – हुशारी (cleverness)
  2. जुनी – प्राचीन (Many year’s ago)
  3. प्रधान – मंत्री (Minister)
  4. उत्तर – North
  5. चतुराई – हुशारी (cleverness)
  6. निरोप – संदेश (Message)
  7. चवदार – रुचकर (tasty)
  8. कोबी – एक फळभाजी (cabbage)
  9. आस्वाद – चव (taste, flavour)
  10. त्या काळी – त्या वेळी (that time)
  11. जलद – गतीमान (fast)
  12. साधने – वाहने (vehicle)
  13. बैलगाडी – Bullock cart
  14. राज्य – state
  15. ताजी – Fresh
  16. कुजून – सडून (rotten)
  17. गाडीवान – गाडी चालवणारा, वाहक (Driver)
  18. बी – बीज (seed)
  19. पेरणे – जमिनीत बी टाकणे (sowing)
  20. रवाना – पाठवणे (to send)
  21. कौतुक – प्रशंसा (to admire)
  22. परीक्षा – कसोटी (test)
  23. एकसारख्या – समान, सारख्या (same)
  24. मूर्ती – प्रतिमा (Statue)
  25. निकृष्ट – कमी दर्जाची (in ferier)
  26. उत्कृष्ट – उत्तम (superior, excellent)
  27. लवचिक – हलणारी (Flexible)
  28. तार – धातूचा तंतू (wire)
  29. अफवा – खोटी बातमी (rumour)
  30. हित – कल्याण, भले (interest)
  31. नुकसान – तोटा (Loss)
  32. संतुष्ट – समाधानी (satisfied)
  33. पुरावा – दाखला (proof, evidence)

वाक्प्रचार व अर्थ:

  1. चतुराई पाहणे – हुशारी पाहणे
  2. परीक्षा घेणे – कौशल्य तपासून पाहणे
  3. खरेखोटेपणा पडताळणे – सत्य, असत्य तपासणे
  4. हित नसणे – भले नसणे, कल्याण नसणे
  5. अफवा ऐकणे – खोटी बातमी ऐकणे.
  6. खात्री करणे – तपासून, चौकशी करणे

इयत्ता सहावी मराठी स्वाध्याय उपाय

निष्कर्ष

आम्हाला आशा आहे की महाराष्ट्रावरील हा लेख तुम्हाला 'सहावी मराठी अप्पाजींचे चातुर्य स्वाध्याय' मदत करेल. तुम्हाला काही प्रश्न असल्यास, त्यांना खाली टिप्पणी विभागात मोकळ्या मनाने पोस्ट करा. आम्ही लवकरात लवकर तुमच्याकडे परत येऊ.
Share:

0 Comments:

Post a Comment

Plus Two (+2) Previous Year Question Papers

Plus Two (+2) Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Physics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Chemistry Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Maths Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Zoology Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Botany Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Computer Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Computer Application Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Commerce Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Humanities Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Economics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) History Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Islamic History Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Psychology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Sociology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Political Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Geography Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Accountancy Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Business Studies Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) English Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Hindi Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Arabic Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Kaithang Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Malayalam Previous Year Chapter Wise Question Papers

Plus One (+1) Previous Year Question Papers

Plus One (+1) Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Physics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Chemistry Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Maths Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Zoology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Botany Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Computer Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Computer Application Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Commerce Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Humanities Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Economics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) History Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Islamic History Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Psychology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Sociology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Political Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Geography Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Accountancy Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Business Studies Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) English Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Hindi Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Arabic Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Kaithang Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Malayalam Previous Year Chapter Wise Question Papers
Copyright © HSSlive: Plus One & Plus Two Notes & Solutions for Kerala State Board About | Contact | Privacy Policy