Hsslive.co.in: Kerala Higher Secondary News, Plus Two Notes, Plus One Notes, Plus two study material, Higher Secondary Question Paper.

Tuesday, March 1, 2022

इयत्ता सातवी मराठी दादास पत्र मराठी स्वाध्याय PDF

 

इयत्ता सातवी मराठी दादास पत्र मराठी स्वाध्याय PDF
इयत्ता सातवी मराठी दादास पत्र मराठी स्वाध्याय PDF


या लेखात, आम्ही मराठी दादास पत्र विषयासाठी इयत्ता सातवी मराठी सोल्यूशन्स देऊ. इयत्ता सातवी मधील विद्यार्थी पाठ्यपुस्तकांमध्ये उपस्थित असलेल्या व्यायामांसाठी प्रश्न आणि उत्तरे डाउनलोड आणि कॉपी करण्यास सक्षम असतील.

इयत्ता सातवी मराठी दादास पत्राच्या पुस्तकात महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमातील सर्व प्रश्नांचा समावेश आहे. येथे सर्व प्रश्न पूर्ण स्पष्टीकरणासह सोडवले आहेत आणि डाउनलोड करण्यासाठी विनामूल्य उपलब्ध आहेत. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवी मराठी दादास पत्राचे पुस्तक खाली दिले आहे. आम्‍हाला आशा आहे की आमच्‍या इयत्‍ता सातवी वीच्‍या मराठी दादास पत्राचे पुस्‍तक तुमच्‍या अभ्यासात मदत करेल! जर तुम्हाला आमचे इयत्ता सातवी चे पुस्तक आवडले असेल तर कृपया ही पोस्ट शेअर करा.


इयत्ता सातवी मराठी दादास पत्र स्वाध्याय

मंडळाचे नाव

Maharashtra Board

ग्रेडचे नाव

सातवी

विषय

मराठी दादास पत्र

वर्ष

2022

स्वरूप

PDF/DOC

प्रदाता

hsslive.co.in

अधिकृत संकेतस्थळ

mahahsscboard.in


समाधानासह महाराष्ट्र बोर्ड आठवा स्वाध्याय कसे डाउनलोड करायचे?

महाराष्ट्र बोर्ड सातवी स्वाध्याय PDF डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

 1. वेबसाइट- Hsslive ला भेट द्या. 'स्वाध्याय' लिंकवर क्लिक करा.
 2. महा बोर्ड सातवी स्वाध्याय PDF पहा.
 3. आता महाराष्ट्र बोर्ड सातवी स्वाध्याय तपासा.
 4. डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भांसाठी जतन करा.

इयत्ता सातवी मराठी दादास पत्र स्वाध्याय उपाय

इयत्ता सातवी स्वाध्याय मधील विद्यार्थी खालील लिंक्सवरून मराठी दादास पत्राचे उपाय डाउनलोड करू शकतील.


Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 5.1 दादास पत्र Textbook Questions and Answers

 

1. खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
विदयार्थ्यांनी अभयारण्यात सहलीला जाण्याचा हट्ट का धरला?
उत्तर:
जानेवारी महिन्यात विज्ञान केंद्रातर्फे शाळेत पक्ष्यांसंबंधीची चित्रफीत दाखवली होती. ती पाहून विद्यार्थ्यांनी अभयारण्यात सहलीला जाण्याचा हट्ट धरला.

 

प्रश्न आ.
अभयारण्यातून फिरताना सरांनी विद्यार्थ्यांना माळढोक पक्ष्याबद्दल काय सांगितले?
उत्तर:
अभयारण्यातून फिरत असताना सरांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, ‘भारतातून नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक या अत्यंत देखण्या पक्ष्याला वाचवण्यासाठी वनविभागानं हे अभयारण्य घोषित केललं आहे.’

चर्चा करा. सांगा.

 • पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे, याविषयी पालकांसोबत चर्चा करा.
 • पक्ष्यांची संख्या वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता, याविषयी मित्रांसोबत चर्चा करून यादी तयार करा.

माहिती मिळवूया.

माहिती घेण्यासाठी किंवा देण्यासाठी अनेक साधने वापरली जातात. खाली माहिती देवाणघेवाण करण्याची/संवादाची काही साधने दिली आहेत. त्यांतील काही साधने एकतर्फी व काही साधने दुतर्फी माहितीची/संवादाची देवाणघेवाण करतात. त्यांची माहिती मिळवा व दिलेल्या तक्त्यात वर्गीकरण करा.
फॅक्स, पत्र, ई-मेल, मोबाइल, आंतरजाल, रेडिओ, वर्तमानपत्र, मोबाइल संदेश, चर्चा, मुलाखत, जाहिरात, भाषण, संभाषण.

उपक्रम:
तुम्ही भेट दिलेल्या एखादया पर्यटनस्थळाचे वर्णन करणारे पत्र मित्राला/मैत्रिणीला लिहा.

 

शब्दकोडे सोडवूया.

खालील चौकोनांतील अक्षरांमध्ये क्रियाविशेषण अव्यये लपलेली आहेत. उभ्या,आडव्यावतिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन क्रियाविशेषण अव्यये बनवावदिलेल्या जागेत लिहा.

प्रश्न 1.
खालील चौकोनांतील अक्षरांमध्ये क्रियाविशेषण अव्यये लपलेली आहेत. उभ्या,आडव्यावतिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन क्रियाविशेषण अव्यये बनवावदिलेल्या जागेत लिहा.

उत्तर:
हळू, काही, आज, तिकडे, थोडासा, मोजके, तसा, वर, जरा, खाली, अनेक, तर.

 

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 5.1 दादास पत्र Important Additional Questions and Answers

एक किंवा दोन शब्दांत उत्तरे लिहा.

प्रश्न 1.

 1. दादाला पत्र लिहणारी – …………………….
 2. सहल कुठे गेली होती? …………………….
 3. भारतात नष्ट होण्याच्या मार्गावर असलेला पक्षी – …………………….
 4. माळढोक पक्षी कोणाचा मित्र आहे? …………………….
 5. माळढोक पक्षी वर्षातून किती वेळा अंडी घालतो? …………………….
 6. माळढोक पक्ष्यांबरोबर पाहिलेले पक्षी – …………………….
 7. पक्ष्यांचे फोटो काढण्यापूर्वी कोणाची पूर्वपरवानगी घ्यावी लागते – …………………….
 8. संतुलित’ पर्यावरणाचा अविभाज्य घटक कोणाला म्हटले आहे – …………………….
 9. अभयारण्यातून फिरताना बहिणीला कोणाची खूप आठवण आली? …………………….

उत्तरः

 1. आयेशा
 2. माळढोक अभयारण्यात
 3. माळढोक
 4. शेतकऱ्याचा
 5. वर्षातून एकदाच
 6. चंडोल, माळटिटवी
 7. वनखात्याची
 8. पक्ष्यांना
 9. दादाची

 

शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

प्रश्न 1.

 1. खूप जण मिळून एकत्र फिरायला जाणे
 2. पडक्यावर एकामागोमाग एक दाखविलेले चित्र
 3. पशू-पक्षी सुरक्षिततेसाठी असलेली जागा
 4. फोटो काढण्यासाठी वापरण्यात येणारे साधन
 5. मनातील भावनांना, विचारांना लेखी उद्गार देणारे साधन

उत्तरः

 1. सहल
 2. चित्रफीत
 3. अभयारण्य
 4. कॅमेरा
 5. पत्र

खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
‘माळढोक पक्ष्याला शेतकऱ्याचा मित्र असे का म्हटले आहे?
उत्तर:
माळढोक पक्ष्याला शेतकऱ्याचा मित्र असे म्हटले आहे, कारण शेतातील किड्यांवर तो गुजराण करतो. त्यामुळे शेतातील किडे कमी होऊन पिकांचे त्यांपासून रक्षण होते.

 

प्रश्न 2.
माळढोक पक्ष्यांची संख्या कमी का होत आहे?
उत्तर:
माळढोक पक्षी वर्षातून एकदाच अंडी घालतो. शिवाय त्यांची अंडी जमिनीवर असल्याने इतर प्राणी ती तुडवून जातात, त्यामुळे माळढोक पक्ष्यांची संख्या कमी होत आहे.

प्रश्न 3.
सरांनी पक्ष्यांबद्दल सांगितलेली कोणती गोष्ट मुलांना पटली?
उत्तर:
सरांनी पक्ष्यांबद्दल सांगितले की, “पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे. प्रदूषण टाळण्यात, ङ्केवियांचं वाहन करण्यात त्यांची प्रमुख भूमिका असते.’

प्रश्न 4.
अभयारण्यातून फिरताना बहिणीला सर्वांत जास्त कोणाची आठवण आली व का?
उत्तर:
अभयारण्यातून फिरताना बहिणीला सर्वांत जास्त दादाची आठवण आली कारण दादालाही पक्षी खूप आवडत.

 

आकृतिबंध पूर्ण करा.

प्रश्न 1.
माळढोक अभयारण्यात पाहिलेले पक्षी
उत्तर:

प्रश्न 2.
पक्ष्यांची या गोष्टीत प्रमुख भूमिका असते
उत्तरः

पुढील उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा.

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा..
उत्तरः

प्रश्न 2.
रिकाम्या जागा भरा.
1. माळढोक पक्ष्यांबरोबरच आम्ही चंडोल, …………… तसेच इतर पक्षीही पाहिले.
2. पक्ष्यांचे फोटो काढण्यापूर्वी ………… पूर्वपरवानगी घ्यावी.
उत्तर:
1. माळटिटवी
2. वनखात्याची

 

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
उत्तरे लिहा.
1. भारतातून नष्ट होण्याच्या मार्गावर असलेला पक्षी – [ ]
2. माळढोक पक्ष्यांबरोबरच पाहिलेले इतर पक्षी – [ ]
उत्तर:
1. माळढोक
2. चंडोल, माळटिटवी

प्रश्न 2.
खालील प्रश्नांची एका वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न i.
माळढोक अभयारण्य कोणत्या मार्गावर वसले आहे?
उत्तर:
माळढोक अभयारण्य सोलापूर-बार्शी मार्गावर वसले आहे

प्रश्न ii.
माळढोक पक्ष्यांची संख्या कमी कधी होते?
उत्तर:
इतर प्राण्यांनी माळढोक पक्ष्यांची अंडी तुडवल्यास माळढोक पक्ष्यांची संख्या कमी होते.

 

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
समानार्थी शब्द लिहा.
(i) सुंदर (ii) खग (iii) जंगल (iv) सखा
उत्तर:
(i) देखणी (ii) पक्षी (iii) वन (iv) मित्र

प्रश्न 2.
वचन बदला.
(i) वन (ii) गाव (iii) किडे (iv) पक्षी
उत्तर:
(i) वने (ii) गावे (iii) किडा (iv) पक्षी

प्रश्न 3.
खालील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा.

प्रश्न i.
सहलिच्या दिवसी आम्ही पहाटेच निघालो.
उत्तर:
सहलीच्या दिवशी आम्ही पहाटेच निघालो.

प्रश्न ii.
माळढोक पक्षी शेतकरयाचा मीत्र आहे.
उत्तर:
माळढोक पक्षी शेतकऱ्याचा मित्र आहे.

 

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे, याविषयी तुमचे मत लिहा.
उत्तर:
निसर्ग हा सजीव व निर्जीव घटकांनी बनला आहे. यातील ङ्केप्रत्येक पटकांचा आकार, रंग, गुण हे वैशिष्टयपूर्ण असतात. पक्षीसुद्धा निसर्गाच्या या अविभाज्य घटकांपैकीच एक आहेत. निसर्गाच्या अन्नसाखळीत ते कुणाचे तरी भक्ष्य बनत असतात तर कुणाचे तरी ते भक्षक बनत असतात. अन्नसाखळीतील त्यांच्या या भूमिकेमुळे पर्यावरणाचा समतोल साधला जातो.

प्रश्न 2.
पक्ष्यांची संख्या वाढण्यासाठी तुम्ही काय करू शकता, याबद्दलची तुमची भूमिका स्पष्ट करा.
उत्तर:
आजकाल निसर्गातील अनपेक्षित व अनिष्ट बदलांचा परिणाम प्राणीजीवनाबरोबरच पक्ष्यांवरही होताना दिसतो. दिवसेंदिवस वाढणारी उष्णता व त्याच वेगाने निर्माण होणारी पाण्याची कमतरता यांमुळे पक्षांचे जीवन संकटात सापडले आहे. त्यांच्या वेगवेगळ्या प्रजातींची संख्या वाढवण्यासाठी शासकीय पातळीवर पक्षी अभयारण्ये उभारण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेऊ, तसेच मनुष्यवस्ती असलेल्या भागांत त्यांच्या दाणापाण्याची व्यवस्था करू.

त्याचबरोबर पक्ष्यांचे जीवन सुसहर होण्यासाठी वृक्षलागवडीसारखे उपक्रम हाती घेऊ. एवढेच नाही तर ज्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत अशा प्रजातींचे रक्षण करण्यासाठी शासकीय स्तरावर त्यांच्या शिकारीस व हत्येस प्रतिबंध करू.

 

व्याकरण व भाषाभ्यास

खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

प्रश्न 1.

उत्तरः

 1. मित्र × शत्रू
 2. संतुलित × असंतुलित
 3. काल × आज
 4. देखणा × कुरूप

प्रश्न 2.
खालील वाक्यांतील नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद ओळखा.
1. इतका देखणा पक्षी मी यापूर्वी कधीही बघितला नव्हता.
2. अभयारण्यातून फिरताना मला तुझी खूप आठवण आली
उत्तर:

नाम सर्वनाम विशेषण क्रियापद
1.  पक्षी मी देखणा नव्हता
2. अभयारण्य मला, तुझी खूप आली

प्रश्न 3.
खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा.
उत्तर:
1. घोषित करणे – क्रिकेटच्या संघाचा संघप्रमुख म्हणून माझे नाव घोषित करण्यात आले.
2. निरखून बघणे – मी झाडावरील पक्ष्याला त्याचे घरटे बांधताना निरखून बघत होतो.

 

शब्दकोडे सोडवूया.

खालील चौकोनांतील अक्षरांमध्ये क्रियाविशेषण अव्यये लपलेली आहेत. उभ्या,आडव्यावतिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन क्रियाविशेषण अव्यये बनवावदिलेल्या जागेत लिहा.

प्रश्न 1.

उत्तरः
एकदा, मजेशीर, तेथून, लगबगीने, मुळीच, तसाच, जरा, मागे, आता, पुढे.

खालील वाक्ये शुद्ध करून लिहा.

प्रश्न 1.
दादा, आम्ही हा माळढोक पक्षी जवळुन नीरखून बघीतला.
उत्तर:
दादा आम्ही ह्य माळढोक पक्षी जवळून निरखून बघितला.
उदा.

 1. जाता-येता
 2. चार-पाच
 3. कधी-कधी

खालील वाक्यांत संयोग चिन्हाचा वापर करा. उदा.

प्रश्न 1.
कोणतीही गोष्ट कष्टाशिवाय साध्य होत नाही. विदयार्थांनी देखील अभ्यास करताना या कष्टाचा पाठपुरावा’ करावा रोज दोन तीन तास वाचन करावे.
उत्तरः
कोणतीही गोष्ट कष्टाशिवाय साध्य होत नाही. विदयार्थ्यां नी देखील अभ्यास करताना या कष्टाचा पाठपुरावा करावा. रोज दोन-तीन तास वाचन करावे.

 

लेखन विभाग

प्रश्न 1.
माहिती घेण्यासाठी किंवा देण्यासाठी अनेक साधने वापरली जातात. खाली माहिती देवाणघेवाण करण्याची । संवादाची काही साधने दिली आहेत. त्यातील काही साधने एकतर्फी व काही साधने दुतर्फी माहितीची / संवादाची देवाणघेवाण करतात, त्यांची माहिती मिळवा व दिलेल्या तक्त्यात वर्गीकरण करा.
फॅक्स, पत्र, ई-मेल, मोबाइल, आंतरजाल, रेडिओ, वर्तमानपत्र, मोबाइल संदेश, चर्चा, मुलाखत, जाहिरात, भाषण, संभाषण.
उत्तर:

एकतर्फी माहीतीची/ संवादाची साधने दुतर्फी माहितीची संवादाची साधने
फॅक्स, पत्र, आंतरजाल, रेडिओ, वर्तमानपत्र, जाहिरात, भाषण ई-मेल, मोबाइल, मोबाइल संदेश, चर्चा, मुलाखत, संभाषण

 

प्रश्न 2.
चर्चा करा, सांगा व लिहा.
उत्तर:
पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे, या विषयी पालकांसोबत चर्चा करा.

 • आई : राधिका त्या चिमणीसाठी भांड्यात थोडे पाणी ठेव पाहू.
 • राधिका : मी नाही.
 • आई : राधिका या उन्हाळ्याच्या दिवसात माणसांप्रमाणे पक्ष्यांनाही खूप तहान लागते.
 • राधिका : मला का सांगते? ती का माझी मैत्रिण आहे?
 • आई : राधिका, पक्षी हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात.
 • राधिका : सांग पाहू कसे ते?
 • आई : पक्षी आपण टाकून दिलेल्या फळांच्या बिया खातात, व त्यांच्या विष्ठेतून त्या बाहेर पडतात. त्यातूनच काही बिया रूजतात व झाडे उगवतात.
 • राधिका : खरचं आई?
 • आई : होय! जंगलात झाडे लावायला आपण जातो का?
 • राधिका : नाही?
 • आई : ती सर्व झाडे पक्ष्यांमुळेच उगवतात. आपल्या आजूबाजूला जी बडा-पिंपळाची झाडे दिसतात ना, ती ही तशाच प्रकारे उगवली आहेत.
 • राधिका : आई, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. अजून पक्षी कोणते काम करतात?
 • आई : पक्षी मेलेले उंदीर किंवा इतर नको असलेला कचरा किंवा छोट्या किटकांना खातात. त्यामुळे आपला परिसर स्वच्छ राहतो व पर्यावरण संतुलित राहायला मदत होते.
 • राधिका : आई मी माझ्या मित्रमैत्रिणींना सुद्धा पक्ष्यांची काळजी घ्यायला सांगेन.

प्रश्न 3.
पक्ष्यांची संख्या वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता, या विषयी मित्रांसोबत चर्चा करून यादी तयार करा.
उत्तर:
सुवर्णा : अरे राज, तू चिमणी पाहिली आहेस का?
राज : दोन-तीन वर्षांपूर्वी मी एक चिमणी पाहिली होती, पण हल्ली चिमण्या कुठेच दिसत नाहीत.
सुवर्णा : याचे काय कारण आहे हे तुला माहीत आहे का?
राज : नाही
सुवर्णा : थांब मी तुला सांगते. आपल्या सर्व मित्र मैत्रिणींना पण तू बोलव! (सर्व मित्र मैत्रिणी एकत्र येतात.) आपल्याला सर्वांना पक्ष्यांची संख्या वाढविण्यासाठी काय करता येईल. यावर चर्चा करावयाची आहे. तर मग सांगा पाहू. (एकेक जण सांगू लागतात.) (1) आपण सर्वांत प्रथम झाडांची संख्या वाढवली पाहिजे. (2) पक्ष्यांसाठी पाण्याची सोय केली पाहिजे. (3) त्यांची घरटी सुरक्षित राहतील याकडे लक्ष दिले पाहिजे. (4) काहीजण पक्ष्यांची अंडी दुष्टपणे फोडून टाकतात ती वाचवली पाहिजेत.

(5) पक्ष्यांसाठी कृत्रिम घरे तयार करायला पाहिजेत. (6) पक्षी ओल्या कचऱ्याबरोबर कधीतरी प्लॅस्टिक पण खातात. यासाठी ओला व सुका कचरा वेगळा केला पाहिजे. (7) पक्षी झाडांकडे आकर्षित होतील अशा हिरव्यागार झाडांची संख्या वाढविली पाहिजे. (8) पक्ष्याना त्रास होणार नाही यासाठी मोठमोठ्या ध्वनिक्षेपकांचा आवाज टाळला पाहिजे. (9) फटाके उडविताना त्यांचा मोठा आवाज होतो त्यामुळे पक्षी घाबरतात, यासाठी आवाजविरहीत फटाके वाजविले पाहिजेत. (10) पक्ष्यांसाठी अन्नधान्य शेतात व इतर ठिकाणी राखून ठेवले पाहिजे.

 

प्रश्न 4.
तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या पर्यटन स्थळाचे वर्णन करणारे पत्र मित्राला : मैत्रिणीला लिहा.
उत्तर:
॥श्री ।।

अ.ब. क.
सुयश अपार्टमेंट,
गांधी मार्ग, मधली आळी,
पनवेल 400805
दि.10 जुन 2018

प्रिय मित्र सुनिल यास,
सप्रेम नमस्कार तुझे पत्र मिळाले. यावेळी मे महिन्यात आई बाबांबरोबर मी महाबळेश्वरला गेलो होतो. त्यामुळे तुला पत्र लिहू शकलो नाही.

महाबळेश्वर हे उत्तम पर्यटन स्थळ आहे. अरे तिथले वातावरण तर खूपच सुंदर आहे. आम्ही तिचे सनसेट पॉईंटला गेलो होतो. तिथे इतका जोराचा वारा येतो की मला क्षणभर वाटले की मी ही वाऱ्याबरोबर उडून जातो की काय?

तसेच तेथे घोड्यावर रपेटही मारली. बोटींग केले. शेतातून काढलेली ताजी टवटवीत स्ट्रॉबेरीही आम्हांला खायला मिळाली.

तेथील बाजारात किती तरी हस्तकौशल्याच्या वस्तूही बघायला मिळाल्या. तेथील निसर्गरम्य वातावरणातून परत येण्याची इच्छाच होत नव्हती; पण काय करणार यावेच लागले. माझा अभ्यास व्यवस्थित सुरू आहे. तुझी खुशाली वरचेवर कळव.

तूबै एकदा महाबळेश्वरला जाऊन ये. तुझ्या आई बाबांना माझा शि. सा. नमस्कार. बाकी सर्व ठीक आहे.

तुझा मित्र.
अ. ब. क.

दादास पत्र Summary in Marathi

पाठ परिचय :

पत्र हे दोन व्यक्ती/संस्था यांच्यामधील वैचारिक, भावनिक देवाणघेवाण, संबंध आणि संवाद प्रस्थापित करणारे प्रभावी माध्यम आहे. मनातील भावनांना, विचारांना वाट करून देणारे ते साधन. संगणकाच्या व मोबाइलच्या जगात पत्र लिहिणे माणसे विसरूनच गेली आहेत. ‘दादास पत्र’ या पाठात बहिणीने आपल्या भावाला पत्राद्वारे सहलीला केलेल्या गमती व खुशाली कळविली आहे.

A letter is a strong medium of communication between two people or institutions to share ideologies, emotions, relationships and dialogues. It gives way to express one’s emotions or thoughts. In the world of computers and mobiles, people have forgotten to write letters. In ‘Dadas Patra’, a sister has written about her cherished memories of a picnic to her brother through a letter.

 

शब्दार्थ :

 1. सहल – पर्यटन, फेरफटका – a picnic
 2. चित्रफीत – सिनेमा – acinema/film
 3. हट्ट – कळकळीची विनवणी – insistence
 4. देखण्या – मोहक, सुंदर – charming
 5. तुडवणे – पायाखाली चिरडणे – to crush under feet
 6. पूर्व परवानगी – आगाऊ अनुमती, – prior permission
 7. संमती संतुलित – समतोल – balance
 8. पर्यावरण – अवतीभवतीची सजीव-निर्जीव सृष्टी – environment
 9. प्रदूषण – अशुद्धता – pollution
 10. पटणे – खात्री होणे – to be convinced
 11. अविस्मरणीय – न विसरण्यासारखे – unforgettable
 12. खुशाली – निरोगी व सुखी स्थिती – health and happiness
 13. संतुलित – संतुलन राखलेले (Balanced)
 14. अविभाज्य – विभागले न जाणारे (Integral)
 15. वनविभाग (वनखाते) – अरण्यांची देखभाल करणारे खाते (forest department)
 16. वहन – वाहून नेण्याची क्रिया (carrying)
 17. पाठपुरवठा करणे – सतत मागे रहाणे/लागणे (persuance)
 18. एकतर्फी – एका बाजूने (one way)
 19. दुतर्फी – दोन्ही बाजूने (both way)
 20. ध्वनिक्षेपक – speakers

वाक्प्रचार :

 1. नष्ट होणे – नाहीसा होणे
 2. घोषित करणे – जाहीर करणे
 3. गुजराण करणे – निर्वाह करणे
 4. निरखून पाहणे – बारकाईने निरीक्षण करणे

टिपा :

 • चंडोल पक्षी – चिमणीसारखा दिसणारा हा पक्षी फार सुंदर गातो. त्यांची पिसे तपकिरी, राखाडी, वाळूसारखी काळी व पांढरी अशा विविध रंगाची असतात. मोकळ्या मैदानात व चराऊ गवताळ प्रदेशात त्यांचे वास्तव्य आढळते.
 • माळटिटवी पक्षी – तितराइतका आकार असणाऱ्या या पक्ष्याचे पाय लांब तर पोट पांढरे व डोळे काळे असते. यास पिवळ्या गाठीची टिटवी असे म्हणतात. पडीक शेतीचा प्रदेश व धान्याची कापलेली शेते याठिकाणी हे पक्षी वास्तव्य करतात.
 • माळढोक अभयारण्य – ‘जवाहरलाल नेहरू माळढोक अभयारण्य’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अभयारण्याची स्थापना सन 1979 मध्ये झाली. हे महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठे अभयारण्य आहे. सोलापूर व नगर जिल्ह्यातील मोठ्या भूभागावर हे वसलेले आहे. याचे क्षेत्रफळ 8496 चौ.कि.मी. इतके आहे.
 

इयत्ता सातवी मराठी स्वाध्याय उपाय

निष्कर्ष

आम्हाला आशा आहे की महाराष्ट्रावरील हा लेख तुम्हाला 'सातवी मराठी दादास पत्र स्वाध्याय' मदत करेल. तुम्हाला काही प्रश्न असल्यास, त्यांना खाली टिप्पणी विभागात मोकळ्या मनाने पोस्ट करा. आम्ही लवकरात लवकर तुमच्याकडे परत येऊ.
Share:

0 Comments:

Post a Comment

Plus Two (+2) Previous Year Question Papers

Plus Two (+2) Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Physics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Chemistry Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Maths Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Zoology Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Botany Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Computer Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Computer Application Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Commerce Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Humanities Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Economics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) History Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Islamic History Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Psychology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Sociology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Political Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Geography Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Accountancy Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Business Studies Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) English Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Hindi Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Arabic Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Kaithang Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Malayalam Previous Year Chapter Wise Question Papers

Plus One (+1) Previous Year Question Papers

Plus One (+1) Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Physics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Chemistry Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Maths Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Zoology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Botany Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Computer Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Computer Application Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Commerce Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Humanities Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Economics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) History Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Islamic History Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Psychology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Sociology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Political Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Geography Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Accountancy Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Business Studies Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) English Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Hindi Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Arabic Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Kaithang Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Malayalam Previous Year Chapter Wise Question Papers
Copyright © HSSlive: Plus One & Plus Two Notes & Solutions for Kerala State Board About | Contact | Privacy Policy