Hsslive.co.in: Kerala Higher Secondary News, Plus Two Notes, Plus One Notes, Plus two study material, Higher Secondary Question Paper.

Thursday, February 3, 2022

इयत्ता ११ हसवाफसवी मराठी स्वाध्याय PDF

 

इयत्ता ११ हसवाफसवी मराठी स्वाध्याय PDF
इयत्ता ११ हसवाफसवी मराठी स्वाध्याय PDF


या लेखात, आम्ही हसवाफसवी विषयासाठी इयत्ता ११ मराठी सोल्यूशन्स देऊ. इयत्ता ११ मधील विद्यार्थी पाठ्यपुस्तकांमध्ये उपस्थित असलेल्या व्यायामांसाठी प्रश्न आणि उत्तरे डाउनलोड आणि कॉपी करण्यास सक्षम असतील.

इयत्ता ११ हसवाफसवीाच्या पुस्तकात महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमातील सर्व प्रश्नांचा समावेश आहे. येथे सर्व प्रश्न पूर्ण स्पष्टीकरणासह सोडवले आहेत आणि डाउनलोड करण्यासाठी विनामूल्य उपलब्ध आहेत. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता ११ हसवाफसवीाचे पुस्तक खाली दिले आहे. आम्‍हाला आशा आहे की आमच्‍या इयत्‍ता ११ वीच्‍या हसवाफसवीाचे पुस्‍तक तुमच्‍या अभ्यासात मदत करेल! जर तुम्हाला आमचे इयत्ता ११ चे पुस्तक आवडले असेल तर कृपया ही पोस्ट शेअर करा.


इयत्ता ११ हसवाफसवी स्वाध्याय

मंडळाचे नाव

Maharashtra Board

ग्रेडचे नाव

११

विषय

हसवाफसवी

वर्ष

2022

स्वरूप

PDF/DOC

प्रदाता

hsslive.co.in

अधिकृत संकेतस्थळ

mahahsscboard.in


समाधानासह महाराष्ट्र बोर्ड आठवा स्वाध्याय कसे डाउनलोड करायचे?

महाराष्ट्र बोर्ड ११ स्वाध्याय PDF डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

  1. वेबसाइट- Hsslive ला भेट द्या. 'स्वाध्याय' लिंकवर क्लिक करा.
  2. महा बोर्ड ११ स्वाध्याय PDF पहा.
  3. आता महाराष्ट्र बोर्ड ११ स्वाध्याय तपासा.
  4. डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भांसाठी जतन करा.

इयत्ता ११ हसवाफसवी स्वाध्याय उपाय

इयत्ता ११ स्वाध्याय मधील विद्यार्थी खालील लिंक्सवरून हसवाफसवीाचे उपाय डाउनलोड करू शकतील.


कृती

1.

प्रश्न अ.
कृष्णराव हेरंबकर यांच्या मुंबईपर्यंतच्या प्रवासाचा ओघतक्ता तयार करा.

उत्तरः

प्रश्न आ.
कारणे लिहा.

1. फ्लॅशच्या प्रकाशाने कृष्णराव चिडतात कारण…
उत्तरः
कृष्णराव हेरंबकर हे एक ज्येष्ठ संगीत नाट्यकलावंत. रंगमंचावर काम केल्यामुळे त्यांना तशी प्रकाश, लाईट यांची सवय असतेच. पण आता त्यांचे वय झाले होते. त्यात त्यांच्या डोळ्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले होते. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे संयोजक श्री. वाघमारे शाल-श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करत असताना तिथला फोटोग्राफर त्यांना न विचारता, न सांगता आगंतुकासारखे त्यांचे फोटो काढत असतो. तो सारखं त्यांना ‘इथे बघा’, ‘तिथे बघा’ अशा सूचना देत असतो. त्यामुळे कॅमेऱ्याचा प्रखर प्रकाश हेरंबकरांच्या डोळ्यांवर पड्न त्यांना त्रास होत असतो. डॉक्टरांनी प्रखर प्रकाशाला सामोरे जाण्यासाठी त्यांना सक्त मनाई केलेली असते. म्हणून ते फोटोग्राफरवर चिडतात आणि परत आलास तर थोबाडीत देईन अशी धमकी त्याला देतात.

2. कृष्णराव कोंबड्यांच्या गाडीत बसायला तयार झाले कारण”
उत्तरः
कृष्णराव हेरंबकर हे स्वत:च्या सत्कार समारंभासाठी कोकणातून थेट मुंबईला येत असतात. त्यासाठी त्यांना पैशाची थैली व प्रवासभत्ता मिळणार असतो. वाटेत ट्रेनमध्ये एक चाहता त्यांना भेटतो. या चाहत्याने अगदी लहानपणापासून हेरंबकर यांची नाटके पाहिलेली आहेत. तो त्यांना त्याच्या कर्जतच्या घरी चलण्यासाठी आग्रह करत असतो. त्याचा आग्रह कृष्णराव हेरंबकर यांना मोडवत नाही. कारण तो त्याच्या डॉज गाडीतून कृष्णरावांना मुंबईपर्यंत सोडेन असे आश्वासन देतो. प्रत्यक्षात गाडी एकदम खटारा असते. रस्त्यात तिचा एकेक टायर पंक्चर होत जातो. शेवटी चारही टायर सपाट झाल्यावर गाडी रस्त्यातच बसते. त्यावेळी कोंबड्यांच्या गाडीत त्यांना लिफ्ट मिळते. मुंबईच्या कार्यक्रमाला जायला उशीर होत असल्याने नाईलाजास्तव कृष्णराव हेरंबकर कोंबड्यांच्या गाडीत बसायला तयार होतात.

2. थोडक्यात वर्णन करा.

प्रश्न अ.
कृष्णराव यांच्या सत्काराचे स्वरूप.
उत्तरः
कृष्णराव या ज्येष्ठ अशा संगीत नाट्य कलाकाराच्या सत्कार समारभाचे आयोजन मुंबई येथे श्री. वाघमारे यांनी केलेले असते. त्यासाठी त्यांना पैशाची थैली व प्रवासखर्च देण्यात येईल अशी बोली झालेली असते. म्हणूनच कृष्णराव या सत्कार समारंभात यायला तयार झाले आहेत. या समारंभात त्यांना शाल व श्रीफळ देण्यात येते. धांदरट वाघमारे शाल प्रदान करताना शालीत कृष्णरावांना पार गुरफटवून टाकतात. श्रीफळ दिल्यानंतर कृष्णराव कानाशी श्रीफळ नेऊन त्यात पाणी आहे की नाही ते हलवून बघतात. हे सर्व घडत असताना एक फोटोग्राफर मध्ये मध्ये येऊन कॅमेऱ्याचा फ्लॅश त्यांच्या डोळ्यावर मारून सतत त्यांचे फोटो काढत असतो. असा मजेशीर प्रसंग सत्कारसमारंभात घडतो.

प्रश्न आ.
कृष्णराव यांनी कर्जतपर्यंत केलेला प्रवास.
उत्तरः
कृष्णराव हेरंबकर या कोकणात वास्तव्य करणाऱ्या संगीत नाट्य कलाकाराचा मुंबई येथे सत्कार होणार असतो. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ते सपत्नीक कोकणातील अंबुर्डी या गावातून टांग्यातून प्रवास करत कुंदनपूरला पोहोचतात. तिथून मग ते एस.टी पकडतात आणि पुण्याला पोहोचतात. मग तिथून ट्रेनेन मुंबईला येत असताना एका चाहत्याच्या आग्रहाला बळी पडून कर्जतला त्याच्या बंगल्यावर जातात.

3. थोडक्यात लिहा.

प्रश्न अ.
मुंबईला जात असलेल्या आगगाडीतील प्रसंग.
उत्तरः
ज्येष्ठ नाटककार कृष्णराव हेरंबकर स्वत:च्या सत्कार समारभासाठी कोकणातल्या अंबुर्डी गावाहून मुंबईला यायला निघालेले असतात. टांगा, एस.टी असा प्रवास करत पुण्याहून ट्रेनने मुंबईला येत असताना त्यांच्या नाटकाचा निस्सिम चाहता त्यांना ट्रेनमध्ये भेटतो. कृष्णरावांना पाहून त्याला आनंदाचे भरते येते. ते इतके की तो थेट ट्रेनमध्येच कृष्णरावांना साष्टांग नमस्कार घालतो. अतिउत्साहाच्या भरात ट्रेनमध्ये बसलेल्या गुजराती बायकांना आपले पाय लागले हे ही त्याच्या ध्यानात येत नाही. त्याच्या पायाच्या धक्क्याने त्या बायकांच्या हातातले फरसाण आणि पापडी खाली सांडते. फरसाण खाली पडताना, त्यातील मसाला त्या गुजराती बायकांच्या नाकातोंडात जातो. तरीही हा चाहता स्वत:च्या आनंदात मश्गूल असतो. “माझ्या कर्जतच्या घरी तुम्ही येण्याचे कबुल करत असाल तरच मी तुमचे पाय सोडेन.” अशी धमकीवजा सूचना तो कृष्णराव यांना करतो. जोपर्यंत ते हो म्हणत नाहीत तोपर्यंत त्यांचे पाय गदागदा हालवत राहतो. शेवटी ते पडतील या भीतीने बायको त्यांना होकार दयायला लावते.

प्रश्न आ.
कृष्णराव यांच्या चाहत्याची प्रेमाची जबरदस्ती.
उत्तरः
ज्येष्ठ नाटककार कृष्णराव कोकण ते मुंबई असा प्रवास करत असतात. याचे कारण असते मुंबईत संयोजक वाघमारे यांनी आयोजित केलेला त्यांचा सत्कार समारंभ. टांगा-एस.टी., ट्रेन असा टप्प्याटप्प्याने त्यांचा प्रवास चालला आहे. ट्रेनमध्ये प्रवासात त्यांना त्यांच्या नाटकांवर, त्यांच्या अभिनयावर, त्यांच्या गायकीवर प्रेम करणारा चाहता भेटतो. गच्च भरलेल्या ट्रेनमध्ये हा कृष्णरावांना साक्षात साष्टांग नमस्कार घालतो. त्यांच्या पायात आडवे पडून पाय गदागदा हलवतो व “कर्जतच्या माझ्या घरी यायला तयार झाल्याशिवाय मी तुमचे पाय सोडणार नाही.” असा धमकीवजा इशारा देतो. शेवटी कृष्णराव कर्जतला त्याच्या घरी जाण्यास तयार होतात. या चाहत्याने अगदी लहानपणापासून कृष्णरावांची नाटके पाहिली आहेत. तो प्रेमाने कृष्णराव व त्यांची पत्नी यांना कर्जतच्या बंगल्यावर घेऊन जातो. तिथे त्या दोघांना ओवाळतो आणि निघताना कोथिंबिरीच्या २१ जुड्या भेट म्हणून देतो. शिवाय मुंबईपर्यत जाण्यासाठी स्वतःची डॉज गाडी ड्रायव्हर सकट देतो.

4. स्वमत.

प्रश्न अ.
प्रस्तुत नाट्यउताऱ्यावरून कृष्णरावांचे व्यक्तिचित्र रेखाटा.
उत्तरः
‘हसवाफसवी’ ही नाट्यसंहिता दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेली आहे. कृष्णराव हेरंबकर या संगीत नाट्यकलावंताचा सत्कार समारभ संयोजक श्री. वाघमारे यांनी मुंबईला आयोजित केला आहे. या समारंभात कृष्णराव सपत्नीक हजर होतात. वय वर्षे ८७ पण तरीही तल्लख मेंदू, बोलण्यात मिस्किलपणा. तर वागण्यात खट्याळपणा. प्रसंगनिष्ठ विनोद आणि शब्दनिष्ठ विनोद यांचे उत्कृष्ट बेअरिंग सांभाळत आपल्या बोलण्याने आणि कृतीने सतत हास्याची कारंजी उडवतात. अनेक पावसाळे पाहिल्यामुळे अनुभवातून आता शहाणपण आले आहे.

त्यामुळेच सत्कार स्वीकारताना मिळालेले श्रीफळ हे कानाजवळ नेऊन हलवून पाहतात आणि आत पाणी असल्याची खात्री करून घेतात. प्रवासभत्ता व थैली मिळणार होती त्याचे काय झाले हे सारखे विचारून घेतात व स्वत:तील व्यवहार शहाणपणा दाखवून देतात. कोकणी माणसाचा स्वभाव, त्यांची तैलबुद्धी त्यांच्या नसानसांत भिनलेली आहे. आपल्यातील कलाकाराचा त्यांना अभिमान आहे. खाडिलकर, गडकरी, देवल इत्यादी श्रेष्ठ नाटककारांच्या नाटकात आपण काम केले आहे ही बाब त्यांच्यातील कलाकाराला सुखावते. कोकण ते मुंबई हा प्रवास किती त्रासदायक आहे हे ते अत्यंत मार्मिकतेने स्पष्ट करतात. आपला चाहता वर्ग आजही आपल्यावर तेवढेच प्रेम करतो या भावनेने ते सुखावतात.

म्हणूनच ट्रेनमध्ये भेटलेल्या चाहत्याच्या आग्रहामुळे वाट वाकडी करून कर्जतला त्याच्या बंगल्यावर जातात. या चाहत्याने त्यांना घातलेला साष्टांग नमस्कार, त्याचे गुजराती बायकांना लागलेले पाय, त्या बायकांच्या हातातील खाली पडलेले फरसाण याचे ते साग्रसंगीत विनोदी ढंगाने वर्णन करतात आणि स्वत:मधील मिश्किलपणाचे दर्शन घडवतात. ‘उतारवयात काय करता?’ या प्रश्नाचे उत्तर ‘आत्मचरित्र लिहितो’ असे देतात व कलाकाराला म्हातारपणी असे उदयोग करून पैसा कमवावा लागतो हे सांगून या मायावी दुनियेची दुसरी वास्तव बाजू उघड करतात.

मुद्दामहून एखादयाच्या नावाचा विचित्र उच्चार करून विनोद निर्माण करणे त्यांना आवडते. कर्जतहून मुंबईकडे प्रवास करताना चाहत्याने दिलेली डॉज गाडी बंद पडल्यामुळे त्यांना कोंबड्यांच्या गाडीतून प्रवास करावा लागतो. त्याही गाडीचा अपघात होतो. पण चाहत्यांच्या प्रेमाचे पुण्य पाठीशी असल्याने आपण वाचलो अशी कृतज्ञता ते व्यक्त करतात. आगरकरांनी त्यांच्या ‘सुधारक’ या पत्रात त्यांना ‘कृष्णराव’ हे नाव दिले याचे त्यांना विशेष कौतुक वाटते. पूर्वी काळी दोन मध्ये गाणारे कृष्णराव आता काळी शून्य मध्ये तरी गाऊ शकतील की नाही यविषयी खंत व्यक्त करतात.

असे अत्यंत मार्मिक, विनोदी, व्यवहारदक्ष तरीही आतून हळवे असणारे कृष्णराव रसिकांच्या हृदयात कायमचे स्थान मिळवून आहेत. वय झाले तरी त्यांचा उत्साह संपलेला नाही. माणसामाणसांतील आपुलकी जपावी. पडदयामागील साथीदारांशी देखील जिव्हाळ्याने बोलावे, त्यांना प्रोत्साहन दयावे हा त्यांचा स्वभावविशेष आहे. कारण शेवटी नाटक हे टीमवर्क आहे याची त्यांना जाण आहे. स्वत:च्या आरोग्याविषयी ते दक्ष आहेत. त्यासाठी पाळावी लागणारी पथ्य जगाला सांगून सगळ्यांना शहाणे करून सोडावे या प्रवृत्तीचे ते आहेत.

प्रश्न आ.
‘कंसातील मजकूर नाट्यउतारा समजण्यासाठी उपयुक्त ठरतो’, तुमचे मत लिहा.
उत्तरः
नाटकात महत्त्वाची असते ती संहिता. संहिता जितकी परिपूर्ण, दर्जेदार तितके नाटकाचे यश खात्रीलायक असते. नाटकाचे कथानक, शब्द जितके सशक्त तितके नाटक अधिक उंचीवर जाते. त्यामुळे नाटकातील कथानकाला साजेशी पात्ररचना नाटककाराला करावी लागते. नाटकातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे संवाद! खटकेबाज, चुरचुरीत, नर्मविनोदी संवाद नाटकाची रंगत वाढवतात. नाट्यविषयाला साजेसे संवाद असतील तर आशय प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोहोचतो. संवाद, रंगसूचना आणि स्वगत या तीन्ही गोष्टी मिळून नाट्यसंहिता तयार होते. कथानकातील प्रसंगबदल, दृश्यबदल, बदललेला काळ इत्यादी संबंधीची सूचना नाटककार कंसातील रंगसूचनांमधून देतो. त्यामुळे कथानकाचे अस्पष्ट दुवे जोडले जातात. संदर्भ अधिक स्पष्ट होतात. कथानकाचा प्रवाह वेगात पुढे जातो.

प्रश्न इ.
प्रस्तुत नाट्यउताऱ्यातील दिलीप प्रभावळकर यांच्या शाब्दिक विनोद निर्मितीची दोन वैशिष्ट्ये लिहा.
उत्तरः
प्रस्तुत उताऱ्यातील दोन शाब्दिक विनोदाच्या उदाहरणांतून दिलीप प्रभावळकर यांच्या शाब्दिक विनोद निर्मितीची वैशिष्ट्ये स्पष्ट करता येतात. पहिला प्रसंग म्हणजे कार्यक्रम संयोजकांची साहाय्यक मोनिका ही आपले नाव सांगते त्यावेळी कृष्णराव ‘मनुका’ असा तिचा उल्लेख करतात. आणि दोन्हीचा अर्थ एकच असे स्पष्टीकरण देतात. मोनिका – मनुका अशी जोडी निर्माण करून त्यातून शब्दनिष्ठ विनादाची पेरणी करतात. मोनिका ही गोड स्त्री आणि मनुका हे गोड फळ. त्यामुळे मोनिका जेव्हा नावाची दुरुस्ती करते तेव्हा दोन्हीचा अर्थ एकच आहे असे सांगून कृष्णराव शब्दकोटी करतात.

दुसऱ्या प्रसंगात मोनिका त्यांना “सध्या काय करता ? असा प्रश्न विचारते तेव्हा ‘आत्मचरित्र लिहतोय’ आणि त्याचे नाव ‘एक झाड – दोन कावळे’ असे आहे हे स्पष्ट करतात. त्यावर मोनिकाचा पुढचा प्रश्न असतो. प्रकृती कशी आहे ? या प्रश्नाचा रोख खरंतर कृष्णरावांची प्रकृती कशी आहे याकडे असतो पण मुद्दाम आपल्याला प्रश्नाचा रोख कळला नाही असे दाखवून कृष्णराव कुणाची, कावळ्यांची? असे विचारून तिला निरुत्तर करतात.

शाब्दिक विनोदाचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे. मोनिका तिच्या भूमिकेनुसार त्यांना त्यांची नाटके, दौरे, गायन यांविषयी प्रश्न विचारत राहते आणि कृष्णराव हेकेखोरपणे त्यांना हवी ती भलत्याच विषयाची उत्तरे देत बसतात. म्हणजे प्रश्न एका विषयाचा तर उत्तर भलत्या विषयाचे अशी रचना लेखकाने केली आहे. त्यातून शाब्दिक विनोद तर कधी प्रासंगिक विनोद घडत राहतात. कोंबड्यांच्या गाडीतून त्यांनी केलेला प्रवास किंवा ट्रेनमध्ये एका चाहत्याने भर गर्दीत घातलेला साष्टांग नमस्कार हे प्रसंग बोलण्याच्या ओघात येतात आणि त्यातून प्रंसगनिष्ठ विनोद घडत जातो.

5. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
मोनिका व कृष्णराव यांच्यातील संवादाची तुम्हाला समजलेली वैशिष्ट्ये लिहा.

प्रश्न आ.
कृष्णरावांच्या संवादातून स्पष्ट झालेली त्यांच्या पत्नीची स्वभाववैशिष्ट्ये लिहा.
उत्तरः
संगीत नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ कलावंत कृष्णराव हेरंबकर यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन संयोजक वाघमारे यांनी मुंबईला केलेले असते. या कार्यक्रमासाठी आपल्या पत्नीसह कोकणातून मुंबईपर्यंतचा प्रवास करत कृष्णराव येतात. कृष्णरावांच्या बऱ्यावाईट काळात पत्नीने त्यांना मनापासून साथ दिली आहे याची कृष्णरावांना जाण आहे. आपल्या पत्नीला आपली खूप काळजी आहे याचे त्यांना विशेष कौतुक आहे. ट्रेन प्रवासात एक चाहता त्यांच्या पायात पडून पाय गदागदा हलवतो आणि माझ्या घरी येण्याचे कबुल केल्याशिवाय पाय सोडणार नाही अशी आदेशवजा धमकी देतो.

त्यावेळी गदागदा हलणाऱ्या पायांमुळे कृष्णराव पडतील अशी भीती वाटून पत्नी त्यांना चाहत्याचे आमंत्रण स्वीकारायला लावते. तिला प्रसिद्धीची अजिबात हौस नाही. त्यामुळे संयोजक रंगमंचावर तिने यावे याविषयी आग्रही असतानाही ती सामान्य रसिकांप्रमाणे प्रेक्षकांत बसणे पसंत करते. ग्रामीण भागात वास्तव्य असल्याने असेल कदाचित पण ती पशु – पक्षी – प्राणी यांच्यावर मनापासून प्रेम करते. म्हणूनच कर्जत ते मुंबई हा प्रवास करताना कोंबड्यांच्या गाडीतून प्रवास करावा लागतो तरी ती कटकट करत नाही. उलट कोंबड्यांशी सवाद साधत तिचा प्रवास मजेत पार पडतो.

कृष्णराव खूप बडबड करतात, अनावश्यक गोष्टी लोकांना सांगत बसतात हे तिला आवडत नाही. त्यामुळे त्यांच्या संवादाची गाडी स्टेजवर घसरली तर ती प्रेक्षकांमध्ये बसून त्यांना ‘पुरे पुरे’ चे इशारे करते. तिला प्रखर दिव्यांची तसेच लोकांसमोर येण्याची भीती वाटते कारण गावाकडील घरात ती कंदिलाच्या प्रकाशात वावरते. अशी अत्यंत साधी भोळी, पतीला सर्व ठिकाणी मनापासून साथ देणारी पण पतीच्या प्रसिद्धी वलयापासून दूर राहणारी कृष्णरावांची पत्नी सामान्य प्रेमळ स्त्रीचे प्रतिनिधित्व करते.

प्रश्न इ.
‘पायधूळ झाडा. त्याशिवाय मी तुमचे पाय सोडणार नाही’, या वाक्यांतील लक्ष्यार्थ स्पष्ट करा.
उत्तरः
लक्ष्यार्थ म्हणजे शब्दाच्या मूळ अर्थापेक्षा वेगळा अर्थ संदर्भानुसार समजून घेणे. म्हणजे शब्दश: अर्थ लक्षात न घेता त्याच्याशी सुसंगत असलेला दुसरा अर्थ लक्षात घेणे. दुसरा अर्थ सूचित करण्याच्या शब्दाच्या या शक्तीला ‘लक्षणा’ असे म्हणतात आणि त्यातून सूचित झालेल्या दुसऱ्या अर्थाला ‘लक्ष्यार्थ असे म्हणतात. वरील वाक्यात ‘लक्ष्यार्थ’ या भाषिक संपत्तीचा यथार्थ वापर केला आहे.

‘पायधूळ झाडणे’ याचा सरळ शब्दश: अर्थ म्हणजे पायाला लागलेली धूळ झाडणे. हे वाक्य कृष्णराव यांच्या चाहत्याच्या तोंडी आहे. ट्रेनमध्ये कृष्णराव भेटल्यानंतर त्याला अतिशय आनंद होतो. अतिउत्साहाने तो भर ट्रेनमध्ये त्यांना साष्टांग नमस्कार घालत त्यांच्या पायाशी लोटांगण घालतो आणि वरील वाक्य उच्चारतो. त्याचा अर्थ ‘तुमच्या पायाची धूळ जोपर्यंत तुम्ही माझ्या घरात झाडणार नाही म्हणजेच जोपर्यंत तुम्ही माझ्या घरी येणार नाहीत, तोपर्यंत मी तुमचे पाय सोडणार नाही. असा इशारा तो देतो. म्हणजेच इथे शब्दांच्या मूळ अर्थापक्षा वेगळा अर्थ संदर्भानुसार सूचित होतो म्हणून हे ‘लक्ष्यार्थ’ भाषिक शक्तीचे उत्तम उदाहरण आहे.

11th Marathi Book Answers Chapter 3.1 हसवाफसवी Additional Important Questions and Answers

कृती : २
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

प्रश्न 1.
‘कृष्णराव’ हे नाव ज्या भूमिकेवरून पडले ती भूमिका व नाटक

उत्तरः

प्रश्न 2.
आगरकरांनी प्रसिद्ध केलेले पत्रक – [ ]
उत्तरः
सुधारक

आम्हांला कुठल्याही दिव्याचं काही वाटत नाही ……………………………….. पुरे, पुरे, किती गातोस. (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ७२)

प्रश्न 3.
नाटक करण्यामागे कृष्णरावांचा हेतू –
उत्तरः
लोकांचं रंजन करणे.

प्रश्न 4.
आगरकर आणि टिळक यांच्यातील संबंधावर प्रकाश टाकणारे परिच्छेदातील वाक्य.
उत्तरः
आगरकर व टिळक या दोघांमध्ये वैचारिक मतभेद होते.

प्रश्न 5.
नाटकात उल्लेख झालेले थोर नाटककार
[ ] [ ] [ ]
उत्तरः
[गडकरी] [खाडिलकर] [देवल]

स्वमतः

प्रश्न 1.
कृष्णराव गात असताना पांडू शिवलीकर यांच्यावर ओढवणारा प्रसंग तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तरः
कृष्णराव हेरंबकर हे संगीत नाटकांमध्ये काम करणारे हरहुन्नरी कलाकार आहेत. राम गणेश गडकरी, गोविंद बल्लाळ देवल, कृष्णाजी खाडिलकर इत्यादी नाटककारांनी निर्माण केलेल्या संगीत नाटकात कृष्णराव काम करत असत. त्यांच्या कामाची दखल साक्षात समाजसुधारक आगरकर यांनीही घेतलेली आहे. असे हे हेरंबकर रंगमंचावर उभे रहात तेव्हा लोकांचं मनोरजन करणे हा एकमेव हेतू त्यांच्या डोळ्यासमोर असे. समोरचा प्रेक्षक जर दाद देणारा असेल तर त्यांच्यातील गायकाची कळी अगदी खुलून जायची.

शास्त्रीय संगीताच्या तानावर ताना घेत ते पहाटेपर्यंत गात बसत. लोक वन्समोअर म्हणत की यांचा उत्साह अधिक वाढत असे. सौभद्र नाटकात ते कृष्णाची भूमिका करत तर पांडू शिवलीकर रुक्मिणीची भूमिका करत असे. त्यासाठी त्याला एका पायावर भार देऊन उभे रहावे लागे. उभे राहून त्याचा पाय दुखला की तो दुसऱ्या पायावर उभा राही. पण प्रेक्षकांनी दाद दिली की कृष्णराव हेरंबकर थांबतच नसत.

एकच पद अनेक वेळेला आळवत बसत. पांडू बिचारा थकून जात असे. त्यामुळे तो गाणाऱ्या कृष्णरावांना मागून टोचायचा आणि ‘पुरे पुरे ‘ अशी सूचना दयायचा. जेवढे कृष्णराव फॉर्मात यायचे तेवढा त्याचा उभे राहण्याचा कालावधी वाढत असे. त्यामुळे बिचाऱ्याचे पाय खूप दुखत असत. पण कृष्णरावांना त्याचे काही वाटत नसे. प्रेक्षकांना आनंद देणे हे त्यांचे ध्येय असल्याने पांडूच्या सूचनेकडे ते सरळ दुर्लक्ष करून आपले गाणे पुढे रेटत राहायचे.

प्रश्न 2.
मराठी संगीत रंगभूमीविषयी तुम्हांला असलेली माहिती थोडक्यात लिहा.
उत्तरः
संगीत नाटक हा नाट्यप्रकार संगीत या कलाप्रकाराच्या आणि नाटक या साहित्य प्रकाराच्या संकरातून निर्माण झाला आहे. संगीत नाटक हा नाट्यप्रकार मराठी रंगभूमीचे खास वैशिष्ट्य आहे. संगीत नाटक लिहिणारे नाटककार हे काव्य आणि नाट्य यांखेरीज संगीत कलेतही प्रवीण होते. शास्त्रीय संगीताची योग्य जाण असणारे कलाकारच यात भूमिका करू शकतात कारण नाटकाचा बहुतांश भाग हा पदयात असतो. तो भाग कलाकार गाऊन सादर करतात.

मराठीमध्ये ‘संगीत स्वयंवर,’ ‘संगीत संशयकल्लोळ’, ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत शारदा’, ‘संगीत देवबाभळी’, ‘संगीत मृच्छकटिक’ अशी एकापेक्षा एक सरस नाटके त्या काळात सादर केली गेली. अण्णासाहेब किर्लोस्कर, राम गणेश गडकरी, गोविंद बल्लाळ, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर असे थोर नाटककार मराठी नाट्यसृष्टीत होऊन गेले. या नाटकांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे फार मोठे कार्य पार पाडले गेले.

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीने जागतिक रंगभूमीला दिलेली देणगी आहे असे मानले जाते. विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीचा श्रीगणेशा केला तर संगीत नाटकाचा लौकिक अर्थाने प्रांरभ अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या शाकुंतल (१८८०) या नाटकाने झाला. त्यांनतर ‘सौभद्र’, ‘रामराज्यवियोग’, ‘द्रौपदी’, ‘शारदा’, ‘स्वयंवर’, ‘मानापमान’, संशयकल्लोळ, ‘एकच प्याला’ अशा संगीत नाटकांची पंरपराच निर्माण झाली. १८८० ते १९३० हा काळ संगीत नाटकांचा सुवर्ण काळ होता.

हसवाफसवी प्रास्ताविक :

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते म्हणून सर्वांना सुपरिचित असणारे दिलीप प्रभावळकर एक ख्यातनाम लेखकही आहेत. ‘झपाटलेला’ ‘एक डाव भुताचा’ ‘चौकट राजा’ इत्यादी चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. ‘बोक्या सातबंडे’ ‘चूकभूल दयावी घ्यावी’. इत्यादी त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. ‘बालसाहित्य पुरस्कार’, संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार इ. पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

‘हसवाफसवी’, ‘सूर्याची पिल्ले’, ‘वासूची सासू’, ‘आप्पा आणि बाप्पा’, ‘जावई माझा भला’ इ. विविध नाटकांमधून त्यांनी लोकांचे मनोरंजन केले आहे. त्याचबरोबर दूरचित्रवाणीवरून अनेक वर्षे लोकांची त्यांनी करमणूक केली आहे. श्रीयुत गंगाधर टिपरे यांसारखी त्यांची मालिका आजही रसिकांच्या स्मरणात आहे.

हसवाफसवी पाठाचा परिचय :

‘हसवाफसवी’ ही दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेली नाट्यसंहिता आहे. हा एक आगळावेगळा निखळ आणि निर्भेळ करमणुकीचा नाट्यप्रयोग आहे. हे नाटक एकीकडे लोकांना हसवते व त्याचबरोबर अंतर्मुखही करते. प्रस्तुत पाठात सुप्रसिद्ध गायक आणि नट असलेले कृष्णराव हेरंबकर यांच्या सत्काराचा प्रसंग आहे. या नाटकात दिलीप प्रभावळकर यांनी स्वत: वेगवेगळ्या भूमिका साकारून रंगमंचावर धमाल उडवून दिली.

या प्रसंगात कृष्णराव हेरंबकर यांच्या सरकार दरबारी होणाऱ्या सत्कार कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी झालेल्या एका घरगुती सत्कार समारंभाचे वर्णन येते. कोकणातून अंबुर्डी गाव, मग तिथून एस.टी. ने पुण्याला आणि पुण्याहून ट्रेनने मुंबईपर्यंतचा त्यांचा सपत्नीक प्रवास सुरू आहे. ‘येणार आहेत – यायला निघाले आहेत – आले आहेत’ असा टप्प्याटप्प्याने त्यांचा हा प्रवास प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे.

या सत्कार समारंभाचे आयोजक – संयोजक वाघमारे हे धांदरट आहेत. त्यांची स्मार्ट साहाय्यक मोनिका त्यांचा धांदटपणा आणखीनच वाढवते. अफलातून कल्पना, प्रसंगनिष्ठ विनोद, शाब्दिक विनोद, संवादात्मकता यांमुळे या नाटकातील प्रंसग रंगतदार झाले आहेत.

येण्याजाण्याचा खर्च आणि मानधन म्हणून पैशाची थेली त्यांना देण्यात येईल असे आयोजकांनी सांगितलेले असते. त्यामुळे आल्या आल्या ते पहिले आपल्या प्रवासाचा तपशील संयोजकांना पुरवतात. कधी ते पैसे आपल्या हातात पडतील याची त्यांना घाई झाली आहे. त्यांना सत्कार समारंभात पोहोचायला उशीर का झाला असा प्रश्न मोनिका विचारते. त्यावर एक चाहता गाडीत कसा भेटला. त्याने भर गाडीत लोटांगण कसे घातले. त्या प्रक्रियेत त्याचे पाय गुजराती बायकांना लागून त्यांचे फरसाण, पापडी कसे गाडीतच खाली सांडले याचे साग्रसंगीत वर्णन ते मोनिकापुढे करतात.

त्या चाहत्याबरोबर ते त्याच्या कर्जतच्या बंगल्यावर जातात. तिथे भेट म्हणून त्यांना २१ कोथिंबिरीच्या जुड्या दिल्या जातात. खरंतर तो चाहता त्यांना परतीच्या प्रवासाला स्वत:ची डॉज गाडी देणार असतो. पण ती मध्येच पंक्चर होते. मग पुढचा प्रवास ते आणि त्यांची पत्नी कोंबड्यांच्या गाडीत बसून पूर्ण करतात. कोंबड्यांच्या आवाजाने हेरंबकरांचे डोके उठते तरी पत्नी मात्र मजेत कोंबड्यांबरोबर संवाद साधत असते.

कृष्णराव त्यांनी केलेल्या अजरामर भूमिकांची माहिती मोनिकाला देतात. मध्ये मध्ये शाब्दिक, प्रसंगनिष्ठ विनोद निर्माण करून गंमत उडवून देतात. मोनिका जो प्रश्न विचारते त्याला थेट उत्तर न देता स्वत:ला हवे तेच म्हणणे सतत पुढे दामटत राहतात. बोलण्याच्या ओघात स्वत:च्या दीर्घायुष्याचे रहस्य सांगून टाकतात. इतकेच नव्हे तर आपल्या गायकीचे प्रदर्शन करून सर्वांना खुश करतात.

हसवाफसवी समानार्थी शब्द/पर्यायी शब्द :

सत्कार – आतिथ्य, मानपान (honour), सोहळा – उत्सव (festive ceremony), तसदी – त्रास (trouble, pain), पांघरणे – अंगावर घेणे (to cast loosely around the body, to cover), प्रवासभत्ता – प्रवासखर्च (travelling allowance), चाहता – कलाकारावर, कलाकाराच्या कलेवर प्रेम करणारा (fan), कंदिल – दिवा (lantern), फाफलणे – बोलताना भलतेच शब्द मुखावाटे बाहेर येणे. भग्नावशेष – नष्ट झालेला, उरलेला भाग (broken, shattered remaining part) आहार – खाणे, पथ्य (food, diet), आत्मचरित्र – जीवनचरित्र (biography), कलकलाट – गोंधळयुक्त आवाज (a great confused noise), जबरदस्ती – बळजबरी (great force).

हसवाफसवी वाक्प्रचारः

आत सटकणे – आतल्या बाजूस निघून जाणे, थोतरीत लावून देणे – थोबाडीत देणे, हर्षवायू होणे – आनंद होणे, चमत्कारिक वाटणे – ओशाळवाणे वाटणे, लाजल्यासारखे होणे, पायधूळ झाडणे – प्रवेश करणे, कलकलाट करणे – गोंधळ करणे, डोकं उठणे – डोकं दुखणे, कानपटीत मारणे – थोबाडीत मारणे, पथ्य पाळणे – आहाराच्या संदर्भात विशिष्ट काळजी घेणे किंवा आहाराविषयी विशिष्ट नियम पाळणे, मश्गूल होणे – मग्न होणे.


इयत्ता ११ मराठी स्वाध्याय उपाय

निष्कर्ष

आम्हाला आशा आहे की महाराष्ट्रावरील हा लेख तुम्हाला '११ हसवाफसवी स्वाध्याय' मदत करेल. तुम्हाला काही प्रश्न असल्यास, त्यांना खाली टिप्पणी विभागात मोकळ्या मनाने पोस्ट करा. आम्ही लवकरात लवकर तुमच्याकडे परत येऊ.
Share:

0 Comments:

Post a Comment

Plus Two (+2) Previous Year Question Papers

Plus Two (+2) Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Physics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Chemistry Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Maths Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Zoology Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Botany Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Computer Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Computer Application Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Commerce Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Humanities Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Economics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) History Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Islamic History Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Psychology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Sociology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Political Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Geography Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Accountancy Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Business Studies Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) English Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Hindi Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Arabic Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Kaithang Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Malayalam Previous Year Chapter Wise Question Papers

Plus One (+1) Previous Year Question Papers

Plus One (+1) Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Physics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Chemistry Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Maths Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Zoology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Botany Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Computer Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Computer Application Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Commerce Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Humanities Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Economics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) History Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Islamic History Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Psychology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Sociology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Political Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Geography Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Accountancy Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Business Studies Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) English Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Hindi Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Arabic Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Kaithang Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Malayalam Previous Year Chapter Wise Question Papers
Copyright © HSSlive: Plus One & Plus Two Notes & Solutions for Kerala State Board About | Contact | Privacy Policy