Hsslive.co.in: Kerala Higher Secondary News, Plus Two Notes, Plus One Notes, Plus two study material, Higher Secondary Question Paper.

Thursday, February 3, 2022

इयत्ता ११ मुद्रितशोधन मराठी स्वाध्याय PDF

 

इयत्ता ११ मुद्रितशोधन मराठी स्वाध्याय PDF
इयत्ता ११ मुद्रितशोधन मराठी स्वाध्याय PDF


या लेखात, आम्ही मुद्रितशोधन विषयासाठी इयत्ता ११ मराठी सोल्यूशन्स देऊ. इयत्ता ११ मधील विद्यार्थी पाठ्यपुस्तकांमध्ये उपस्थित असलेल्या व्यायामांसाठी प्रश्न आणि उत्तरे डाउनलोड आणि कॉपी करण्यास सक्षम असतील.

इयत्ता ११ मुद्रितशोधनाच्या पुस्तकात महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमातील सर्व प्रश्नांचा समावेश आहे. येथे सर्व प्रश्न पूर्ण स्पष्टीकरणासह सोडवले आहेत आणि डाउनलोड करण्यासाठी विनामूल्य उपलब्ध आहेत. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता ११ मुद्रितशोधनाचे पुस्तक खाली दिले आहे. आम्‍हाला आशा आहे की आमच्‍या इयत्‍ता ११ वीच्‍या मुद्रितशोधनाचे पुस्‍तक तुमच्‍या अभ्यासात मदत करेल! जर तुम्हाला आमचे इयत्ता ११ चे पुस्तक आवडले असेल तर कृपया ही पोस्ट शेअर करा.


इयत्ता ११ मुद्रितशोधन स्वाध्याय

मंडळाचे नाव

Maharashtra Board

ग्रेडचे नाव

११

विषय

मुद्रितशोधन

वर्ष

2022

स्वरूप

PDF/DOC

प्रदाता

hsslive.co.in

अधिकृत संकेतस्थळ

mahahsscboard.in


समाधानासह महाराष्ट्र बोर्ड आठवा स्वाध्याय कसे डाउनलोड करायचे?

महाराष्ट्र बोर्ड ११ स्वाध्याय PDF डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

 1. वेबसाइट- Hsslive ला भेट द्या. 'स्वाध्याय' लिंकवर क्लिक करा.
 2. महा बोर्ड ११ स्वाध्याय PDF पहा.
 3. आता महाराष्ट्र बोर्ड ११ स्वाध्याय तपासा.
 4. डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भांसाठी जतन करा.

इयत्ता ११ मुद्रितशोधन स्वाध्याय उपाय

इयत्ता ११ स्वाध्याय मधील विद्यार्थी खालील लिंक्सवरून मुद्रितशोधनाचे उपाय डाउनलोड करू शकतील.


कृती

खालील कृती करा.

प्रश्न 1.
मुद्रितशोधकाच्या भूमिकेचे आजच्या काळातील महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
व्याकरणाच्या परिपूर्ण अभ्यासाने जाणीवपूर्वक लक्ष देऊन लेखनातील त्रुटी काळजीपूर्वक दूर करण्याचे काम करणारी व्यक्ती म्हणजे मुद्रितशोधक. कोणतेही लेखन करताना महत्त्वाचा घटक म्हणजे त्यातील लिखित मजकुराची शुद्धता सांभाळणे. लिखित मजकुरातील व्याकरण शुद्धतेबरोबरच आशयाचे अचूक संपादन करणे आवश्यक असते. ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी लेखकाबरोबरच ते लेखन निर्दोष करण्यासाठी मुद्रिकशोधक हा घटक महत्त्वाचा असतो.

हस्तलिखित मजकुरापेक्षा छपाईतील मजकूर हा वाचकांच्या मनावर चांगला परिणाम करतो. आज वृत्तपत्रे, नियतकालिके, ग्रंथ, पुस्तके, हस्तपुस्तिका, दिवाळी अंक, लहान मोठी पत्रके, संस्थाचे अहवाल, स्मरणिका, शुभेच्छा पत्रे, इत्यादी विविध प्रकारांमध्ये मुद्रित साहित्याची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यात काळानुसार वाढच होणार आहे. ही वाढ समाजाच्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील जागृतीचे आणि प्रगतीचे लक्षण मानले जाते.

कोणत्याही प्रकारच्या लेखनाचे अंतिम मुद्रण होण्यापूर्वी मुद्रिते बारकाईने वाचून त्यातील त्रुटी दूर करून ते लेखन वाचनीय व निर्दोष होणे, यासाठी मुद्रितशोधकाची भूमिका फार महत्त्वाची आहे. मुद्रितशोधक व्यावसायिक दृष्टीने प्रभावी कार्य करू शकतो. स्थानिक ते जागतिक स्तरावर संगणक युगातदेखील वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी त्याचे स्वरूप, मांडणी, त्यातील आशय उत्तमरित्या वाचकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.

मुद्रितशोधन ही एक कला असून ते एक शास्त्रही आहे तसेच तो एक व्यवसायसुद्धा आहे. उत्तम मुद्रितशोधक या व्यवसायाला आपल्या अभ्यासातील सातत्याने, अनुभवाने उत्तम दर्जा प्राप्त करून देऊ शकतो.

प्रश्न 2.
मुद्रितशोधनासाठी लागणारी कौशल्ये सविस्तर विशद करा.
उत्तर :
मुद्रितशोधन म्हणजे लेखकांकडून प्रमाण लेखनात अनवधानाने राहिलेल्या त्रुटी दूर करून लेखनातील दोष काढणे. व्याकरणाच्या परिपूर्ण अभ्यासाने जाणीवपूर्वक लक्ष देऊन लेखनातील त्रुटी दूर करण्याचे मुद्रितशोधकाचे काम असते. त्यासाठी लागणारी कौशल्ये पुढीलप्रमाणे होत.

 • मुद्रितशोधकाला भाषेची उत्तम जाण हवी.
 • केवळ प्रमाणभाषेनुरूप व्याकरणाची शुद्धता तपासणे एवढेच काम मुद्रितशोधकाचे नसून लिहिलेला मजकूर हा अर्थपूर्ण तसेच बिनचूक आहे का? त्यातील संदर्भ अचूक व योग्य आहेत का? हे तपासणे सुद्धा आहे.
 • मुद्रितशोधकाला मुद्रणविषयातील तंत्र, दृष्टी व परिपूर्ण ज्ञान असावयास हवे.
 • आपले ज्ञान अदययावत ठेवण्याची आवश्यकता असते.
 • कामावरील निष्ठा, अनेक विषयांसहित मजकुरामधील रुची व जाण असण्याची गरज असते.
 • कामाचा अनुभव हा मुद्रितशोधकाला परिपूर्ण व प्रगल्भ करत असतो.
 • सक्षम मुद्रितशोधकासाठी चिकाटी, अभ्यासातील सातत्य व सराव या गोष्टींची आवश्यकता असते.
 • प्रतिभासंपन्न लेखक व जागरुक प्रकाशक यांच्याप्रमाणे तज्ज्ञ मुद्रितशोधक हा तपश्चर्येने आपली ओळख बनवू शकतो.
 • मुद्रितशोधनासाठी ग्रंथाच्या विषयानुरूप त्या, त्या विषयांचे ज्ञान व भाषेची जाण असणे आवश्यक असते.
 • अनेक विषयांची रुची व समज असण्याचीसुद्धा आवश्यकता असते.

प्रश्न 3.
‘मुद्रितशोधनातील नजरचुकीने राहिलेली चूक अर्थाचा अनर्थ करते’, या विधानाची सत्यता स्पष्ट करा.
उत्तर :
लेखकांकडून प्रमाण लेखनात अनावधानाने राहिलेल्या त्रुटी दूर करून लेखन निर्दोष करणे म्हणजे मुद्रितशोधन. वृत्तपत्रे, सप्ताहिके, ग्रंथ, पुस्तके, शुभेच्छपत्रे, दिवाळी अंक अशा विविध साहित्याची वाचक संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे त्यामध्ये लिहिलेला मजकूर आशयदृष्ट्या व्याकरणदृष्ट्या तसेच वाक्यरचना, त्यांतील संदर्भ, लेखननियमानुसार लेखन अचूक आहे की नाही हे पाहणे फार महत्त्वाचे ठरते.

त्यामुळे मुद्रितशोधकाची जबाबदारीही वाढते कारण मुद्रितशोधनातील नजरचुकीने राहिलेली चूक अर्थाचा अनर्थ करू शकते. उदा. ‘सुप्रसिद्ध संगीतकाराचा गौरव’ या शीर्षकाऐवजी जर ‘कुप्रसिद्ध संगीतकाराचा गौरव’ असे प्रसिद्ध झाले तर किती गोंधळ होऊ शकतो हे सांगण्याची गरज नाही. एखादया वाक्याची पुनरावृत्ती झाली किंवा एखादे वाक्य किंवा परिच्छेद गाळला गेला तरी वाचकाला त्या वाक्यांचे अर्थ लागत नाहीत.

वाचनातील सलगता निघून जाते. ‘दिन’ या शब्दाचा अर्थ दिवस व ‘दीन’ या शब्दाचा अर्थ गरीब. मग कोणताही दिन असेल जसे वर्धापनदिन किंवा पर्यावरण दिन तो ‘दीन’ असा लिहिला गेला तर एका हस्व वेलांटीमुळे त्या शब्दाचा पूर्ण अर्थच बदलून जातो. असे प्रत्येक भाषेत विविध शब्द आहेत ज्यांच्यामधील एका अक्षरामध्ये जरी व्याकरणदृष्ट्या चूक झाली तर अर्थाचा अनर्थ होऊन गंभीर परिस्थितीतही विनोदनिर्मिती होते आणि हे टाळण्यासाठी मुद्रितशोधनात खूप बारकाईने अचूक दुरुस्त्या करून त्यातील त्रुटी दूर करून लेखन आशयदृष्ट्या शुद्ध करणे गरजेचे ठरते.

प्रश्न 4.
थोडक्यात वर्णन करा.

(a) मुद्रितशोधनाची गरज
उत्तरः
मराठी भाषेत लेखन करतेवेळी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मजकुराच्या लेखनातील शुद्धता तपासणे. लेखनातील व्याकरणाच्या शुद्धतेबरोबरच अचूक संपादन करणेही तितकेच महत्त्वाचे असते. कोणत्याही मजकुरातील आशयाची शुद्धता व ते अचूक असण्याची जबाबदारी लेखकाची असली तरी व्याकरणाच्या दृष्टीने ते लेखन निर्दोष असणे आवश्यक असते. त्यासाठी मुद्रितशोधनाची गरज असते. तसेच लेखनाचे सखोल ज्ञान लेखकाला असतेच असे नाही. त्यामुळे लिहिण्याच्या ओघात अनवधानाने काही त्रुटी राहून जातात व लेखनात पुनरुक्तीही होऊ शकते त्यासाठी मुद्रितशोधनाची गरज असते.

(b) मुद्रितशोधन प्रक्रिया
उत्तरः

 • मूळ लेखन व टंकलिखित मजकुराचे साहाय्यकाच्या मदतीने वाचन करणे.
 • पहिल्या वाचनात खूप शंका व दुरुस्त्या असतील तर त्याचे निराकरण दुसऱ्या वाचनात करून किंवा नवीन आढळलेल्या दुरुस्त्या करणे. पृष्ठ मांडणी, पृष्ठ क्रमांक, अनुक्रमणिका, चित्रे व आकृत्या इत्यादींची योग्य मांडणी अपेक्षित असते.
 • तिसऱ्या वाचनात दुसऱ्या मुद्रितातील दुरुस्त्या तपासून मजकूर अंतिम छपाईला जाण्याआधी लेखक व मुद्रितशोधकाने कटाक्षाने वाचन करणे.
 • मुद्रितशोधकाने मजकूर. तपासताना मुद्रितातील चुका मुद्रितशोधनाच्या खुणांचा उपयोग करून बाजूला प्रत्येक खुणेनंतर तिरकी रेष करावी.
  मूळ प्रतीतील वाचन मुद्रितात शोधावे. प्रत्येक विरामचिन्हाचा लक्षपूर्वक विचार करायचा असतो.
 • नंतर लेखक सॉफ्ट कॉपी मुद्रकाकडे पाठवतो. ती योग्य आहे की नाही हे तपासून पुन्हा ती मुद्रक लेखकाकडे पाठवतो. अंतिम मुद्रित निर्दोष करण्यासाठी पुन्हा ते मुद्रितशोधकाकडे येते. त्यातील काम पूर्ण झाल्यानंतर ती निर्दोष होऊन पुन्हा मुद्रणासाठी पाठविण्यात येते.

प्रश्न 5.
खालील खुणांचा अर्थ स्पष्ट करा.

उत्तरः

प्रश्न 6.
खालील तक्ता पूर्ण करा.

उत्तरः

प्रश्न 7.
खालील गद्य उताऱ्याचे मुद्रितशोधन करून उतारा पुन्हा लिहा.
रामण अतीषय उत्कृष्ट व्याख्याते होते त्याच व्याख्यान एकायला ५००० पेक्षा जास्त लोक जमतत त्यांच भाषण ज्ञान वर्धक असायचच पण अनेक विनोदी आणी किस्से यांनी ते व्याख्यान आपल रंगऊन टाकत ते बोलायला लागले की लोकाला वेळेचं भान च राहत नसे लोकांचे चेरे आनंदं आणि हास्य यांनी फूलुन जा असत असे हे रामन
उत्तरः
मुद्रितशोधन करून उतारा :
रामन अतिशय उत्कृष्ट व्याख्याते होते. त्यांचे व्याख्यान ऐकायला ५००० पेक्षा जास्त लोक जमत. त्यांचे भाषण ज्ञानवर्धक असायचेच; पण अनेक विनोदी किस्से यांनी ते आपलं व्याख्यान रंगवून टाकत. ते बोलायला लागले की लोकांना वेळेचं भानच राहत नसे. लोकांचे चेहरे आनंद आणि हास्य यांनी फुलून जात असत, असे हे रामन.

11th Marathi Book Answers Chapter 4.2 मुद्रितशोधन Additional Important Questions and Answers

खालील कृती करा.

प्रश्न 1.
मुद्रितशोधन व व्याकरण यांचा सहसंबंध सविस्तर लिहा.
उत्तर :
लेखन करताना महत्त्वाचा घटक म्हणजे मजकुराची शुद्धता सांभाळणे. त्या मजकुराची आशयशुद्धतेची व अचूकतेची जबाबदारी लेखकाएवढीच मुद्रितशोधकाचीही असते. कोणताही मजकूर वाचताना व्याकरण, वाक्यरचना आणि लेखनानियानुसार लेखन या घटकांचा विचार करून त्यातील त्रुटी दूर करून ते लेखन निर्दोष करणे म्हणजेच मुद्रितशोधन. भाषेचा दर्जा उत्तम असेल तर एखादा ग्रंथ किंवा पुस्तक परिपूर्ण वाचनीय होते.

त्यासाठी मुद्रितशोधनात व्याकरणाचे महत्त्व अधिक आहे. वाक्यरचना, शब्दांची पुनरावृत्ती होत नाही ना, तसेच त्यातील संदर्भ योग्य व अर्थपूर्ण आहेत का याचबरोबरच नाम, कर्म, कर्ता, विशेषण, क्रियापद यांचा अभ्यासही मुद्रितशोधनासाठी महत्वाचा असतो. छापून आलेला मजकूर हा लेखननियमानुसारच असणार अशी वाचकाची अपेक्षा असते. त्यातील संदर्भ तो प्रमाण मानत असतो. त्यासाठी शब्दांच्या जातीचा योग्य क्रम, योग्य विरामचिन्हांचा वापर ते लेखन निर्दोष करते. त्यासाठी मुद्रितशोधकाचा व्याकरणाचा सखोल अभ्यास असणे आवश्यक आहे.

कारण मराठी भाषेत असे अनेक शब्द आहेत की ज्यांना भिन्न अर्थ आहेत. त्याचा वापर वाक्यात कुठे व कसा वापरायचा त्यावर त्याचे अर्थ अवलंबून असतात. उदाहरण दयायचे झाले तर – हार – फुलांचा हार किंवा हार – पराभव, नाद – आवाज किंवा नाद – छंद मग वाक्यात कोणता शब्द अचूक बसतो हे मुद्रितशोधनात पाहण्याची गरज आहे. कारण वाक्यातील त्या शब्दांच्या उपाययोजनावर त्या वाक्याचा अर्थ अवलंबून असतो. त्यासाठी मुद्रितशोधन आणि व्याकरण यांचा सहसंबंध खूप जवळचा आहे. त्याचा अभ्यास हा मुद्रितशोधन या शास्त्रात खूप परिणामकारक ठरतो.

प्रश्न 2.
संगणकाबरोबर स्पेलचेकर असताना मुद्रितशोधनाची आवश्यकता स्पष्ट करा.
उत्तर :
आजच्या नवीन संगणकीय तंत्रज्ञानानुसार मुद्रितशोधनाचे काम खूप सोपे झाले असले तरी ते निर्दोष झाले आहे असे म्हणता येणार नाही.

संगणकीय शब्दलेखन तपासण्याचे काम करणारा (स्पेलचेकर) शब्द बरोबर आहे किंवा चूक आहे एवढेच तपासतो. उदा. ball हा शब्द boll असा मुद्रितामध्ये type झाला असेल तर ‘0’ च्या जागी तो a ही दुरुस्ती करू शकतो. तसेच एखादया शब्दाला पर्यायी शब्द देखील वापरू शकतो. परंतु तो शब्द त्या वाक्यात योग्य आहे की नाही, त्या शब्दाचा वाक्याच्या अर्थाशी संबंध अचूक आहे का? हे त्याला समजत नाही. ते काम मुद्रितशोधकाचे असते.

एखादया शब्दाला योग्य विशेषण किंवा वाक्याच्या अर्थाला योग्य क्रियापद वापरणे हे मुद्रितशोधकच पाहू शकतो. मजकुरातील एखादा परिच्छेद गाळला गेला, चुकीचे संदर्भ दिले गेले, वाक्याचा क्रम चुकीचा असला तर या गोष्टी स्पेलचेकरच्या लक्षात येत नाहीत. मूळ मजकुरानुसार तपासला जाणारा मजकूर पाहण्याचे काम मुद्रितशोधकाचे असते. स्पेलचेकर हा मुद्रितशोधकाला पर्याय नसून तो मुद्रितशोधकाचा साहाय्यक म्हणून काम करत असतो.

त्यामुळे स्पेलचेकरवर संपूर्णतः अवलंबून राहता येत नाही. त्या मजकुरातील त्रुटी दूर करण्याचे आणि शुद्धतेचे काम मुद्रितशोधकालाच करावे लागते. त्यामुळे संगणकाबरोबर स्पेलचेकर असतानादेखील मुद्रितशोधनाची आवश्यकता असते.

कृती : खालील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सुचनेनुसार कृती करा.

प्रश्न 1.
घटनांचे परिणाम लिहा.
घटना – परिणाम
(१) एखादया राष्ट्राची भाषा विकसित झाली – …………………………………
(२) भाषा जितक्या दर्जेदारपणे वाचकांसमोर येईल – …………………………………
उत्तर :
घटना – परिणाम
(१) एखादया राष्ट्राची भाषा विकसित झाली – की राष्ट्र विकसित होते
(२) भाषा जितक्या दर्जेदारपणे वाचकांसमोर येईल – त्या प्रमाणात समाजाची दिशा ठरू लागते.

प्रश्न 2.
साहित्य निर्मिती व्यवहारातील घटकांच्या या बाबी ग्रंथाला उच्च निर्मिती क्षमता प्राप्त करून देतात.
(१) [ ……………… ]
(२) [ ……………… ]
(३) [ ……………… ]
(४) [ ……………… ]
उत्तर :
साहित्य निर्मिती व्यवहारातील घटकांच्या या बाबी ग्रंथाला उच्च निर्मिती क्षमता प्राप्त करून देतात.
(१) [त्यांची तज्ज्ञता]
(२) [त्या क्षेत्रातील अधिकार]
(३) [सौंदर्यदृष्टी]
(४) [निष्ठा]

भाषा आणि समाज यांचे ………………………………………… अधिक महत्त्वाचे मानतो. (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ९४)

प्रश्न 3.

उत्तर :

प्रश्न 4.

उत्तर :

प्रश्न 5.

उत्तर :

प्रश्न 6.
चूक की बरोबर ते लिहा.

(a) भाषा आणि समाज यांचे अनन्यसाधारण नाते नसते.
(b) लेखकांनंतर मजकुराचे वारंवार वाचन करणारा जर कोणी असेल तर तो मुद्रितशोधक असतो.
(c) मुद्रितशोधन ही कला असून ते एक शास्त्र आहे.
उत्तर :
(a) चूक
(b) बरोबर
(c) बरोबर

प्रश्न 7.
तुम्हांला माहीत असलेल्या दोन प्रकाशकांची नावे लिहा.
(a) [ ]
(b) [ ]
उत्तर :
तुम्हांला माहीत असलेल्या दोन प्रकाशकांची नावे लिहा.
(a) मॅजेस्टिक प्रकाशन
(b) ग्रंथाली प्रकाशन

प्रश्न 8.
तुम्हाला आवडणाऱ्या दोन लेखकांची नावे लिहा.
(a) …………………
(b) …………………
उत्तर :
तुम्हाला आवडणाऱ्या दोन लेखकांची नावे लिहा.
(a) पु. ल. देशपांडे
(b) कुसुमाग्रज / वि. वा. शिरवाडकर

प्रश्न 9.
खालील तक्ता पूर्ण करा.

उत्तर :

कृती : खालील वाक्ये मुद्रितशोधन करून पुन्हा लिहा.

प्रश्न 1.
पिंपळावर मोरपिसाप्रमाणे मऊ मुलायम पाणे उमलली आहेत.
उत्तर :
पिंपळावर मोरपिसाप्रमाणे मऊ मुलायम पाने उमलली आहेत.

प्रश्न 2.
तेथील हवामानाचा परिणाम शेतीवर होते.
उत्तर :
तेथील हवामानाचा परिणाम शेतीवर होतो.

प्रश्न 3.
मी अनेक प्रक्षणीय स्थळांना भेटी दिल्या आहेत.
उत्तर :
मी अनेक प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या आहेत.

स्वमत :

प्रश्न 1.
भाषा आणि समाज यांचे अनन्यसाधारण नाते असते.
उत्तर :
भाषा आणि समाज यांचा परस्परसंबंध आहे म्हणून त्यांचे अनन्यासाधारण नाते आहे. आपल्या मनातील भावना, विचार आणि कल्पना व्यक्त करण्याचे भाषा हे एक महत्त्वाचे संवादमाध्यम आहे. मानव जेव्हा आदिमानवाच्या काळात रहात होता तेव्हापासून त्याची भाषा त्याच्यासोबत होती. मात्र तेव्हा त्या भाषेचे वेगळे स्वरूप होते. हळूहळू तो समाज करून राहू लागला तेव्हा हावभाव, चित्र, खाणाखुणा या चिन्ह भाषेच्या स्वरूपातून आपल्या भावभावना दुसऱ्यांपर्यंत पोहचवत होता. मग त्याने चिन्हव्यवस्था निर्माण केली. निसर्ग, परिसर, दृश्य-अदृश्य गोष्टी यांना त्याने शब्द दिले.

ध्वनीच्या मार्फत आपण बोलू शकतो याची त्याला जाणीव झाली. मग मानवाचा हळूहळ भाषिक विकास होऊ लागला. भाषेचा विकास होता होता त्याचा सामाजिक विकास होऊ लागला. राजकीय स्थित्यंतरे, आक्रमणे होत जातात तेव्हा समाज बिथरतो, मिसळतो त्यामुळे भाषेचीसुद्धा सरमिसळ होते. महाराष्ट्रावर पोर्तुगीज, यवन, फ्रेंच यांची आक्रमणं झाली त्यावेळी त्या लोकांनी आपल्या बोलीभाषेतले बरेचसे शब्द आपल्याला दिले.

आपल्या भाषेने ते शब्द स्वीकारले म्हणून तर आपल्या भाषेत उर्दू, अरबी, फारसी, इंग्रजी अशा शब्दांचा मिलाप झालेला दिसतो. भाषा ही सतत परिवर्तनशील, प्रवाही असते. काळाप्रमाणे आपले आजी-आजोबा, आई-बाबा आपली भावंडे, आपल्या मित्रांची भाषा, व्हॉटस् अॅपची भाषा यातही बदल होत गेलेले दिसून येतात.

मुद्रितशोधन प्रास्ताविक

कोणत्याही प्रकारच्या लेखनात त्या लेखनातील व्याकरण शुद्धतेबरोबर आशयाचे संपादन हे महत्त्वाचे असते. त्याची जबाबदारी लेखकाबरोबरच लेखन निर्दोष करणाऱ्या मुद्रितशोधकाचीही तेवढीच असते. हस्तलिखित मजकुरापेक्षा छपाई केलेल्या मजकुराचा वाचकांच्या मनावर चांगला परिणाम होतो. हे मुद्रण कलेचा जन्म होण्यापूर्वी मानवाने या संदर्भात अनेक प्रयोग केले होते. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मुद्रितशोधनाचे महत्त्व अधिक आहे.

मुद्रितशोधन स्वरूप :

मुद्रितशोधन – लेखकांकडून प्रमाण लेखनात अनवधानाने राहिलेल्या त्रुटी दूर करून लेखन निर्दोष करणे म्हणजे ‘मुद्रितशोधन’ (Proof Reading) होय.

मुद्रितशोधक – व्याकरणाच्या परिपूर्ण अभ्यासाने जाणीवपूर्वक लक्ष देऊन लेखनातील त्रुटी काळजीपूर्वक दूर करण्याचे काम करणारी व्यक्ती म्हणजे ‘मुद्रितशोधक’ (Proof Reader) होय.

लेखकाला प्रत्येक वेळी लेखनाचे सखोल ज्ञान असतेच असे नाही. त्यामुळे लिहिण्याच्या ओघात अनवधानाने काही लिहावयाचे राहून जाते व त्यात पुनरावृत्ती होऊ शकते. व्याकरण व लेखननियमानुसार लेखन अचूक व निर्दोष होण्यासाठी मुद्रितशोधनाची गरज असते. स्थानिक ते जागतिक स्तरावर लिखित मजकुराची आवश्यकता असल्याने मुद्रितशोधनाची व्याप्ती मोठी आहे.

मुद्रितशोधकाचे महत्त्व : भाषा व समाज यांच्यात अनन्यसाधारण नाते आहे. एखादया राष्ट्राच्या भाषेचा विकास झाला की राष्ट्राचा विकास होत असतो.त्याची सर्वांगीण प्रगती होते. भाषा लिहिणारे, वाचणारे, बोलणारे यांचे प्रमाणही वाढते. या भाषेचा दर्जा जेवढा उत्तम असेल तेवढी समाजाची प्रगती अधिक.

त्या भाषेचे जतन संवर्धन योग्य पद्धतीने करण्याची जबाबदारी मुद्रितशोधकाची असते. साहित्य निर्मितीमध्ये लेखक, टंकलेखक, मुद्रितशोधक, मुद्रक व प्रकाशक हे अत्यंत महत्त्वाचे घटक असून त्यांचे सखोल ज्ञान, भाषाप्रभुत्व, सौंदर्यदृष्टी, साहित्य निष्ठा या गोष्टी ग्रंथाच्या उच्चनिर्मितीसाठी कारणीभूत असतात. लेखकांनंतर तो ग्रंथ परिपूर्ण व वाचनीय करण्याचे काम मुद्रितशोधक करतो.

लेखक व मुद्रक यांमधील तो दुवा तर असतोच शिवाय भाषेचा संवर्धक, रक्षणकर्ता, प्रकाशकांचा मित्र व वाचकांचा प्रतिनिधी अशा विविध भूमिका तो पार पाडत असतो. उत्तम मुद्रिकशोधक मुद्रितशोधन या व्यवसायाला उत्तम दर्जाचे स्थान देऊ शकतो.

मुद्रितशोधकाची भूमिका : मुद्रिकशोधकाला भाषेची उत्तम जाण येण्यासाठी भाषेच्या अभ्यासासोबत, स्वयंअध्ययन, विविध वाचन, व्याकरणाची जाण, लेखन, चिंतन या गोष्टींची गरज असते. मुद्रितशोधनाची भूमिका ही केवळ प्रमाणभाषेतील लेखन तपासणे इतकी मर्यादित नसून वाक्ये अर्थपूर्ण आहेत का? त्यातील संदर्भ योग्य आहेत का? शब्दांची पुनरावृत्ती होत नाही ना? याचीही काळजी त्याला घ्यावी लागते.

पुस्तकांचे पृष्ठ क्रमांक, अनुक्रमाणिका, मजकुराची सलगता याकडेही त्याचे दुर्लक्ष होता कामा नये. त्याला मजकुरासंदर्भात काही शंका निर्माण झाल्या तर त्या निदर्शनास आणून देणेही गरजेचे असते. लेखकाचा मजकूर निर्दोष व सुंदर करून तो वाचकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी मुद्रितशोधकाची असते.

पुस्तकाचे संपादन, सूची, शब्दांकन, लेखन, भाषांतर, अनुवाद अशा कामे करून जाणकार, मुद्रितशोधक आपली क्षमता विकसित करू शकतो. कारण चांगला मुद्रितशोधक होणे ही एक तपश्चर्याच आहे.

मुद्रितशोधनासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये : मुद्रितशोधकाला भाषेची उत्तम जाण हवी. प्रमाणभाषेनुरूप व्याकरण शुद्धतेबरोबरच लिहिलेला मजकूर अर्थपूर्ण व बिनचूक आहे का? हे तपासणे व याची जाण असणे मुद्रितशोधकासाठी आवश्यक असते.

मुद्रितशोधकाला मुद्रणविषयक तंत्र व दृष्टी हवी. आपले ज्ञान अदययावत ठेवणेही महत्त्वाचे असते. अनेक विषयांतील रुची, कामावरील निष्ठा या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. उत्तम मुद्रितशोधक होण्याच्या दृष्टीने चिकाटी, अभ्यासातील सातत्य, सराव या गोष्टींना महत्त्व असून या गोष्टी मुद्रितशोधकाला परिपूर्ण व प्रगत करतात. या गोष्टींमुळे तो स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू शकतो. मुद्रितशोधकाची साधनसामग्री – ज्या भाषेतील मुद्रिते तपासयाची त्या भाषेतील शब्दकोश उदा. मराठी, हिंदी, इंग्रजी, व्याकरणविषयक पुस्तके, संदर्भ ग्रंथ, मुद्रित शोधनाच्या खुणांचा तक्ता.

शैली पुस्तिका, प्रमाणभाषेची नियमावली पुस्तिका या साधनांचा उपयोग केल्याने मुद्रितशोधकाचे काम निर्दोष व सुलभ होते.

मुद्रितशोधनाचे तंत्र – कोणत्याही मुद्रिताची किमान तीन वाचने होतात. पहिले वाचन – मूळ मजकूर, टंकलिखित मजकूर यांचे वाचन साहायकाच्या मदतीने करून पहिल्या वाचनातील असंख्य दुरुस्त्यांचे निराकरण करणे.

दुसरे वाचन – पहिल्या मुद्रितातील त्रुटी व शंकांची तपासणी करून नव्याने आढळलेल्या दुरुस्त्या करणे. पृष्ठमांडणी, पृष्ठक्रमांक, अनुक्रमणिका, चित्रे, आकृत्या इत्यादींची योग्य मांडणी करून त्याचे पुन्हा वाचन होणे आवश्यक असते.

तिसरे वाचन – दुसऱ्या मुद्रितातील दुरुस्त्या तपासणे. अंतिम छपाईला जाण्यापूर्वी लेखक व मुद्रितशोधक जाणीवपूर्वक वाचन व दुरुस्त्या तिसऱ्या वाचनात करतात. कारण छापल्यानंतर दुरुस्ती होणे शक्य नसते. मजकूर तपासताना मुद्रितशोधकाने मुद्रितातील चुका मुद्रितशोधनाच्या खुणांचा उपयोग करून बाजूच्या मोकळ्या जागेत करून प्रत्येक खुणेनंतर तिरकी रेष मारावी. मुद्रितशोधकाचे काम मूळ प्रतीत जे आहे ते मुद्रितात शोधणे होय.

मजकूर तपासताना येणाऱ्या शंकांची नोंद ठेवणे. शब्दकोश व संदर्भग्रंथ यांचा गरजेनुसार वापर करण्याची सवय हवी. प्रत्येक विरामचिन्ह व व्याकरणाचा विचार करण्याची गरज असते. नंतर लेखक मुद्रकाकडे सॉफ्ट कॉपी पाठवतो. मुद्रकाकडून ती निर्दोषित झाल्यावर ती मुद्रितशोधकाकडे येते. मुद्रित मजकुराची योग्य मांडणी करून मुद्रितशोधक ती पुन्हा लेखकाकडे पाठवतो. अंतिम मुद्रित परिपूर्ण व निर्दोष करण्याचे मुद्रितशोधकाचे काम पूर्ण झाल्यावर ते मुद्रणासाठी पाठवण्यात येते.

संगणकावर स्पेलचेक असताना मुद्रितशोधकाची गरज काय?

आजच्या संगणक युगात तंत्रज्ञानामुळे मुद्रितशोधकाचे काम सोपे झाले आहे. परंतु ते निर्दोष झाले आहे असे म्हणता येणार नाही. स्पेलचेकर शब्द बरोबर आहे म्हणजे एखादया शब्दाचे (Spelling) बरोबर आहे की नाही ते तपासतो. परंतु तो शब्द त्या जागी योग्य आहे का हे त्याला समजणे कठीण आहे. म्हणून स्पेलचेकरला कायम सावधगिरी बाळगणे आवश्यक असते.

कारण अनेक विशेषणांपैकी एखादया शब्दाला कोणते विशेषण अनुरूप आहे हे बघणे त्याचे काम असते. एखादा परिच्छेद गाळला गेला, वाक्यांचे अर्थ लागले नाही हे स्पेलचेकरला समजत नाही. ते काम मुद्रितशोधक करू शकतो. कारण नाम-विशेषण, कर्ता, कर्म, क्रियापद यांचा अभ्यास व ज्ञान मुद्रितशोधकाकडे असते. स्पेलचेकरची भूमिका ही मदतनीसाची असते त्यावर आपण अवलंबून राहू शकत नाही.

मुद्रण व्यवसायाशी संबंधित काही संज्ञा, घटक आणि प्रक्रिया यांची माहिती खाली दिली आहे.

मुद्रण व्यवसायाशी संबंधित विविध घटक आणि व्यक्ती

मुद्रक Printer मजकुराची छपाई करणारा
मुद्रण प्रत Press Copy छपाईसाठी मजकुराची तयार प्रत
मुद्रित Proof तपासणीसाठी काढलेली प्रत
मुद्रण Printing मजकुराची छपाई
मुद्रितशोधक Proof Reader मुद्रितातील त्रुटी सुधारणारा
मुद्रितशोधनाच्या खुणा Proof Marks मजकूर दुरुस्त करण्याची चिन्हे
मुद्रितशोधन Proof Reading मजकूर निर्दोष करण्याची प्रक्रिया
मुद्रित प्रत Print Out छपाईनंतरची प्रत 
मुद्रणालय Press छापखाना

इयत्ता ११ मराठी स्वाध्याय उपाय

निष्कर्ष

आम्हाला आशा आहे की महाराष्ट्रावरील हा लेख तुम्हाला '११ मुद्रितशोधन स्वाध्याय' मदत करेल. तुम्हाला काही प्रश्न असल्यास, त्यांना खाली टिप्पणी विभागात मोकळ्या मनाने पोस्ट करा. आम्ही लवकरात लवकर तुमच्याकडे परत येऊ.
Share:

0 Comments:

Post a Comment

Plus Two (+2) Previous Year Question Papers

Plus Two (+2) Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Physics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Chemistry Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Maths Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Zoology Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Botany Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Computer Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Computer Application Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Commerce Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Humanities Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Economics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) History Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Islamic History Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Psychology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Sociology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Political Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Geography Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Accountancy Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Business Studies Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) English Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Hindi Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Arabic Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Kaithang Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Malayalam Previous Year Chapter Wise Question Papers

Plus One (+1) Previous Year Question Papers

Plus One (+1) Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Physics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Chemistry Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Maths Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Zoology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Botany Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Computer Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Computer Application Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Commerce Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Humanities Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Economics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) History Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Islamic History Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Psychology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Sociology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Political Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Geography Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Accountancy Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Business Studies Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) English Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Hindi Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Arabic Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Kaithang Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Malayalam Previous Year Chapter Wise Question Papers
Copyright © HSSlive: Plus One & Plus Two Notes & Solutions for Kerala State Board About | Contact | Privacy Policy