Hsslive.co.in: Kerala Higher Secondary News, Plus Two Notes, Plus One Notes, Plus two study material, Higher Secondary Question Paper.

Saturday, March 5, 2022

इयत्ता सहावी मराठी उद्यानात भेटलेला विद्यार्थी मराठी स्वाध्याय PDF

 

इयत्ता सहावी मराठी उद्यानात भेटलेला विद्यार्थी मराठी स्वाध्याय PDF
इयत्ता सहावी मराठी उद्यानात भेटलेला विद्यार्थी मराठी स्वाध्याय PDF


या लेखात, आम्ही मराठी उद्यानात भेटलेला विद्यार्थी विषयासाठी इयत्ता सहावी मराठी सोल्यूशन्स देऊ. इयत्ता सहावी मधील विद्यार्थी पाठ्यपुस्तकांमध्ये उपस्थित असलेल्या व्यायामांसाठी प्रश्न आणि उत्तरे डाउनलोड आणि कॉपी करण्यास सक्षम असतील.

इयत्ता सहावी मराठी उद्यानात भेटलेला विद्यार्थीाच्या पुस्तकात महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमातील सर्व प्रश्नांचा समावेश आहे. येथे सर्व प्रश्न पूर्ण स्पष्टीकरणासह सोडवले आहेत आणि डाउनलोड करण्यासाठी विनामूल्य उपलब्ध आहेत. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावी मराठी उद्यानात भेटलेला विद्यार्थीाचे पुस्तक खाली दिले आहे. आम्‍हाला आशा आहे की आमच्‍या इयत्‍ता सहावी वीच्‍या मराठी उद्यानात भेटलेला विद्यार्थीाचे पुस्‍तक तुमच्‍या अभ्यासात मदत करेल! जर तुम्हाला आमचे इयत्ता सहावी चे पुस्तक आवडले असेल तर कृपया ही पोस्ट शेअर करा.


इयत्ता सहावी मराठी उद्यानात भेटलेला विद्यार्थी स्वाध्याय

मंडळाचे नाव

Maharashtra Board

ग्रेडचे नाव

सहावी

विषय

मराठी उद्यानात भेटलेला विद्यार्थी

वर्ष

2022

स्वरूप

PDF/DOC

प्रदाता

hsslive.co.in

अधिकृत संकेतस्थळ

mahahsscboard.in


समाधानासह महाराष्ट्र बोर्ड आठवा स्वाध्याय कसे डाउनलोड करायचे?

महाराष्ट्र बोर्ड सहावी स्वाध्याय PDF डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

 1. वेबसाइट- Hsslive ला भेट द्या. 'स्वाध्याय' लिंकवर क्लिक करा.
 2. महा बोर्ड सहावी स्वाध्याय PDF पहा.
 3. आता महाराष्ट्र बोर्ड सहावी स्वाध्याय तपासा.
 4. डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भांसाठी जतन करा.

इयत्ता सहावी मराठी उद्यानात भेटलेला विद्यार्थी स्वाध्याय उपाय

इयत्ता सहावी स्वाध्याय मधील विद्यार्थी खालील लिंक्सवरून मराठी उद्यानात भेटलेला विद्यार्थीाचे उपाय डाउनलोड करू शकतील.


Marathi Sulabhbharti Class 6 Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी Textbook Questions and Answers

 

1. एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
चर्नी रोड उद्यानात केळूस्कर गुरुजी कशासाठी येत ?
उत्तर:
चर्नी रोड उद्यानात केळूस्कर गुरुजी बाकावर बसून पुस्तक वाचण्यासाठी येत.

प्रश्न आ.
उद्यानात गुरुजींचे कोणाकडे लक्ष गेले?
उत्तर:
उद्यानात गुरुजींचे लक्ष थोड्या अंतरावर बसून पुस्तक वाचणाऱ्या विद्यार्थ्याकडे गेले.

प्रश्न इ.
गुरुजींना उद्यानात वाचन करत बसलेल्या विदयार्थ्यांची विचारपूस करावी असे का वाटले ?
उत्तर:
गुरुजींना उद्यानात एक विद्यार्थी सलग तीन दिवस वाचन करत बसलेला दिसला. तो इतर मुलांसारखी मस्ती करताना दिसत नसे, म्हणून गुरुजींना त्याची विचारपूस करावी असे वाटले.

प्रश्न ई.
केळूस्कर गुरुजींची व डॉ. आंबेडकरांची गट्टी का जमली?
उत्तर:
केळूस्कर गुरुजी व डॉ. आंबेडकर यांची रोज उद्यानात भेट होऊ लागली. गुरुजी त्यांना चांगल्या लेखकांची पुस्तके वाचायला देऊ लागले, त्यामुळे दोघांची गट्टी जमली.

प्रश्न उ.
डॉ. आंबेडकरांनी कोणता नावलौकिक मिळवला?
उत्तर:
डॉ. आंबेडकरांनी मिळालेल्या उच्च शिक्षणाच्या संधीचे सोने करून, उच्चविद्याविभूषित होऊन, जगातील एक विद्वान म्हणून नावलौकिक मिळवला.

2. खालील वाक्ये कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.

प्रश्न अ.
“बाळ, तुझं नाव काय?”
उत्तर:
भीमराव रोज उदयानात पुस्तक वाचत असलेला पाहून गुरुजी भीमरावला म्हणाले.

प्रश्न आ.
“चांगली पुस्तके वाचली पाहिजेत.”
उत्तर:
भीमरावला अवांतर वाचनाची आवड असलेली पाहून गुरुजी भीमरावला म्हणाले.

प्रश्न इ.
“मला ती पुस्तके वाचायला आवडतील!”
उत्तर:
काही लेखकांची पुस्तके वाचायला देईन, असे गुरुजींनी सांगितल्यावर भीमराव गुरुजींना म्हणाले.

3. असे का घडले? ते लिहा.

प्रश्न अ.
केळूस्कर गुरुजींच्या मनात उदयानात वाचत बसलेल्या विदयार्थ्याबाबत कुतूहल निर्माण झाले.
उत्तर:
उदयानात वाचत बसलेला विदयार्थी इतर मुलांसारखी मस्ती करताना दिसत नव्हता तर सतत तीन दिवस गुरुजी त्याला वाचन करताना पाहत होते. म्हणूनच त्यांच्या मनात या मुलाबद्दल कुतूहल निर्माण झाले.

प्रश्न आ.
भीमराव उदयानात वाचत बसायचे.
उत्तर:
भीमरावांना शाळेतील पुस्तकांशिवाय अवांतर पुस्तके वाचण्याची आवड होती म्हणून शाळा सुटल्यानंतर उदयानात काही वेळ पुस्तक वाचत बसायचे.

प्रश्न इ.
गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.
उत्तर:
गुरुजी नेहमी भीमरावाला पुस्तके वाचायला देत. भीमरावच्या वाचनामुळे गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.

प्रश्न ई.
गुरुजींनी भीमरावच्या डोक्यावरून हात फिरवला.
उत्तर:
भीमरावला वाचन कसे करावे हे गुरुजींनी समजाविले. काही लेखकांची पुस्तके वाचायला देईन असे जेव्हा गुरुजी म्हणाले तेव्हा भीमरावने वाचनाची तयारी दर्शवली. तेव्हा मायेने गुरुजींनी भीमरावच्या डोक्यावरून हात फिरवला.

प्रश्न उ.
गुरुजींनी भीमरावच्या उच्च शिक्षणासाठी शिफारस केली.
उत्तर:
केळूस्कर गुरुजींनी भीमरावची तल्लख बुद्धिमत्ताओळखून महाविदयालयीन आणि उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्यासाठी सयाजीराव गायकवाड महाराजांकडे शिफारस केली.

4. पाठातील खालील घटना योग्य क्रमाने लिहा. 

प्रश्न 1.
पाठातील खालील घटना योग्य क्रमाने लिहा.
(अ) गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.
(आ) गुरुजींनी विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही.
(इ) त्या विदयार्थ्यानेदेखील गुरुजींकडे बघितले.
(ई) डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली.
(उ) गुरुजींनी भीमरावाला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली.
(ऊ) गुरुजी मुलाजवळ आले.
उत्तरः
(अ) गुरुजींनी विदयार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही.
(आ) त्या विद्यार्थ्यानेदेखील गुरुजींकडे बघितले.
(इ) गुरुजींनी भीमरावाला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली.
(ई) गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली
(उ) डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली.

5. खालील शब्दांत लपलेले शब्द शोधा व लिहा.
उदा., वाचनाला – वाचन, नाच, नाला, लावा, चना.
(अ) तुझ्याजवळ
(आ) दिवसापासून
(इ) मार्गदर्शन
(ई) आवडतील

प्रश्न 1.
खालील शब्दांत लपलेले शब्द शोधा व लिहा.
उदा., वाचनाला – वाचन, नाच, नाला, लावा, चना.
उत्तरः

 1. वाचनाला – वाचला, नाच, नाला, लावा, चना
 2. दिवसापासून – दिवसा, सून, पान, वसा, दिन, पाव, सासू
 3. मार्गदर्शन – मार्ग, दर्श, दमा, दर्शन, मान
 4. आवडतील – वड, आड, आव, आतील, लव
 5. महाविदयालयीन – मन, हाल, महाल, नदया, मल, विमल

6. खालील शब्दांचे वचन बदला.

प्रश्न 1.
खालील शब्दांचे वचन बदला.
(अ) लेखक
(आ) पुस्तक
(इ) शाळा
(ई) भेट
(उ) शिफारस
(ऊ) शब्द
उत्तरः
(अ) लेखक
(आ) पुस्तके
(इ) शाळा
(ई) भेटी
(उ) शिफारसी
(ऊ) शब्द

7. आंतरजालावरून खालील मुद्द्यांच्या आधारे डॉ. आंबेडकर यांची माहिती मिळवा व लिहा.
(अ) पूर्ण नाव
(आ) जन्म स्थळ
(इ) जन्म दिनांक
(ई) आई – वडिलांचे नाव
(उ) शिक्षण
(ऊ) लिहिलेली पुस्तके
(ए) कार्य

प्रश्न 1.
आंतराजालावरून खालील मुद्द्यांच्या आधारे डॉ. आंबेडकर यांची माहिती मिळवा व लिहा.
उत्तर:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर. रत्नागिरी जिल्ह्यात आंबवडे गावात दिनांक 14 एप्रिल 1891 साली त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई व वडिलांचे नाव रामजी होते. त्यांनी एम.ए., पी.एच.डी. पर्यंत शिक्षण घेतलेच पण डी.एस.सी, एल.एल.डी., डी.लि.ट, बॅरिस्टर एंट लॉ. या पदव्याही प्राप्त केल्या. भगवान बुद्ध आणि धम्म, धर्मांतर कां? जातिप्रथेचे विध्वंसन, पुणे करार, शुद्र पूर्वी कोण होते, बुद्ध की कार्ल मार्क्स अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली.

हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती हे स्त्रीविषयक माहितीपर व माझी आत्मकथा हे व्यक्तिचित्रण ही त्यांनी लिहिले आहे. त्यांनी महाडच्या तळ्यातील पाणी अस्पृश्यांना खुले करून दिले. नाशिकच्या काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळवून दिला. ‘शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा’ हा मुलमंत्र त्यांनी दलितांना दिला. त्यांना मरणोत्तर भारतरत्न’ हा किताब भारत सरकारने बहाल केला.

8. खालील शब्द शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
(अ) शब्द – सुशब्द, अपशब्द.
(आ) स्पष्ट – सुस्पष्ट, अस्पष्ट.
(इ) बुद्धी – सुबुद्धी, बुद्धिमत्ता, बुद्धिमान, निर्बुद्ध, दुर्बुद्धी

9. खालील शब्द असेच लिहा.

उपक्रम: वेगवेगळ्या वृत्तपत्रांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी आलेल्या माहितीची कात्रणे गोळा करा व वहीत चिकटवा. त्याचे वाचन करा.

सांगा पाहू.

प्रश्न 1.
कधी हातावर, कधी भिंतीवर जाऊन मी बसतो, तीन हात माझे सतत फिरवत मी असतो, वेळ वाया घालव नका असा नेहमी उपदेश करतो
उत्तर:
घड्याळ

प्रश्न 2.
शिस्तीचे धडे, उत्तम गडे, कणकण शोधते, कधीच न रडे
उत्तर:
मुंगी

Marathi Sulabhbharti Class 6 Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी Important Additional Questions and Answers

चूक की बरोबर ते लिहा.

प्रश्न 1.
चूक की बरोबर ते लिहा.

 1. चर्नी रोड उद्यानात सायंकाळच्या वेळी अनेक नागरिक फिरायला यायचे.
 2. गुरुजी सोबत आणलेले वर्तमानपत्र वाचत.
 3. भीमरावाला अवांतर पुस्तके वाचनाची आवड होती.
 4. इतर मुलांसारखा भीमरावही मस्ती करीत होता.
 5. गुरुजींनी भीमरावला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली.

उत्तर:

 1. बरोबर
 2. चूक
 3. बरोबर
 4. चूक
 5. बरोबर

खालील प्रश्नांची दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
चर्नीरोड उद्यानात सायंकाळी कोण कोण येत?
उत्तर:
चर्नीरोड उदयानात सायंकाळी अनेक नागरिक फिरायला येत. तसेच विल्सन हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि विदयाव्यासंगी लेखक केळूस्कर गुरुजी व भीमराव येत असत.

प्रश्न 2.
भीमरावांनी स्वत:बद्दलची कोणती माहिती गुरुजींना सांगितली?
उत्तर:
भीमराव एलफिन्स्टन हायस्कूल, भायखळा येथे शिकत आहेत. शाळेतील पुस्तकांशिवाय अवांतर पुस्तके वाचण्याची त्यांना आवड आहे व शाळा सुटल्यानंतर ते चर्नी रोड उदयानात काही वेळ पुस्तक वाचत बसतात ही माहिती भीमरावांनी गुरुजींना सांगितली.

प्रश्न 3.
भीमरावांनी संधीचे सोने कसे केले?
उत्तर:
आपल्या तल्लख बुद्धिमत्तेने, वाचनाने व कष्टाने ते जगातील एक विद्वान म्हणून नावलौकिक प्राप्त करणारे उच्च विदयाविभूषित डॉ. बाबासाहेब आंबेडकर झाले. त्यांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली. अशाप्रकारे भीमरावांनी संधीचे सोने केले.

व्याकरण व भाषाभ्यास

प्रश्न 1.
खालील शब्दांचे वचन बदला.

 1. संधी
 2. महाविदयालय
 3. विद्वान
 4. विदयार्थी

उत्तर:

 1. संधी
 2. महाविदयालये
 3. विद्वान
 4. विदयार्थी

खालील वाक्यांत योग्य ठिकाणी विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा.

प्रश्न 1.
बाळ तुझं नाव काय.
उत्तर:
“बाळ तुझं नाव काय?”

प्रश्न 2.
वा छान नाव आहे तुझं.
उत्तर:
“वा! छान नाव आहे तुझं!”

प्रश्न 3.
जरुर दया गुरुजी मला ती पुस्तके वाचायला आवडतील.
उत्तर:
“जरुर दया गुरुजी! मला ती पुस्तके वाचायला आवडतील!”

प्रश्न 4.
खालील शब्दांचे लिंग बदला.

 1. मुख्याध्यापक
 2. विदयार्थी
 3. बालक
 4. माता
 5. महाराजा
 6. विद्वान
 7. शिक्षक
 8. लेखक
 9. मित्र

उत्तर:

 1. मुख्याध्यापिका
 2. विद्यार्थिनी
 3. बालिका
 4. पिता
 5. महाराणी
 6. विदूषी
 7. शिक्षिका
 8. लेखिका
 9. मैत्रिण

खालील वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

प्रश्न 1.
कुतूहल निर्माण होणे – जिज्ञासा निर्माण होणे.
उत्तर:
शास्त्रीय प्रयोगामुळे विदयार्थ्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले.

प्रश्न 2.
संधीचे सोने करणे – वेळेचा सदुपयोग करणे
उत्तर:
अपार कष्टाने डॉ. रघुनाथ माशेलकरांनी संधीचे सोने केले.

प्रश्न 3.
नावलौकिक मिळवणे – प्रसिद्धी मिळवणे
उत्तर:
गायनामुळे लता मंगेशकरने नावलौकिक मिळवला.

लेखन विभाग:

सांगा पाहू.

प्रश्न 1.
भिंतीवर चढतो, खाली पडतो प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. जाळे विणतो, हार न मानतो.
उत्तर:
कोळी

उद्यानात भेटलेला विद्यार्थी Summary in Marathi

पाठ परिचयः

प्रस्तुत पाठात बालपणी डॉ. भीमराव आंबेडकरांना वाचनाची किती आवड होती व त्यांचा हा वाचननाद केळूस्कर गुरुजींनी कसा ओळखला याचे वर्णन केले आहे. पुढे त्यांच्या मार्गदर्शनाने व शिफारसीने भीमराव उच्च शिक्षण घेऊ शकले व उच्च विद्याविभूषित होऊन स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहू शकले, ‘वाचाल तर वाचाल’ हे किती सार्थ आहे हे या पाठातून कळते.

शब्दर्थ:

 1. उदयान – बाग (garden)
 2. सायंकाळ – संध्याकाळ (evening)
 3. नागरिक – रहिवासी (citizen)
 4. विदयाव्यासंगी- अभ्यासाची आवड असणारे (studious)
 5. बाक – बसण्याची जागा (bench)
 6. कुतूहल – जिज्ञासा (curiosity)
 7. आपुलकीने – आपलेपणाने (affectionately)
 8. आदर – सन्मान (respect)
 9. आतुरता – उत्सुकता (excitement, eagerness)
 10. विस्तृत – अफाट, मोठे (vast)
 11. अभेदय – तोडता न येणारी (imperitrable)
 12. तल्लख – तीक्ष्ण (sharp)
 13. गट्टी – मैत्री, दोस्ती (friendship)
 14. शिफारस – नाव सुचविणे (recommendation)
 15. नावलौकिक – प्रसिद्धी (fame, popularity)
 16. राज्यघटना – संविधान (constitution)

वाक्प्रचार व अर्थ:

 1. कुतूहल निर्माण होणे – जिज्ञासा निर्माण होणे
 2. संधीचे सोने करणे – वेळेचा सदुपयोग करणे
 3. नावलौकिक मिळवणे – प्रसिद्धी मिळवणे

इयत्ता सहावी मराठी स्वाध्याय उपाय

निष्कर्ष

आम्हाला आशा आहे की महाराष्ट्रावरील हा लेख तुम्हाला 'सहावी मराठी उद्यानात भेटलेला विद्यार्थी स्वाध्याय' मदत करेल. तुम्हाला काही प्रश्न असल्यास, त्यांना खाली टिप्पणी विभागात मोकळ्या मनाने पोस्ट करा. आम्ही लवकरात लवकर तुमच्याकडे परत येऊ.
Share:

0 Comments:

Post a Comment

Plus Two (+2) Previous Year Question Papers

Plus Two (+2) Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Physics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Chemistry Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Maths Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Zoology Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Botany Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Computer Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Computer Application Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Commerce Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Humanities Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Economics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) History Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Islamic History Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Psychology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Sociology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Political Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Geography Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Accountancy Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Business Studies Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) English Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Hindi Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Arabic Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Kaithang Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Malayalam Previous Year Chapter Wise Question Papers

Plus One (+1) Previous Year Question Papers

Plus One (+1) Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Physics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Chemistry Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Maths Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Zoology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Botany Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Computer Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Computer Application Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Commerce Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Humanities Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Economics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) History Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Islamic History Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Psychology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Sociology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Political Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Geography Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Accountancy Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Business Studies Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) English Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Hindi Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Arabic Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Kaithang Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Malayalam Previous Year Chapter Wise Question Papers
Copyright © HSSlive: Plus One & Plus Two Notes & Solutions for Kerala State Board About | Contact | Privacy Policy