Hsslive.co.in: Kerala Higher Secondary News, Plus Two Notes, Plus One Notes, Plus two study material, Higher Secondary Question Paper.

Tuesday, March 1, 2022

इयत्ता सातवी मराठी प्रार्थना मराठी स्वाध्याय PDF

 

इयत्ता सातवी मराठी प्रार्थना मराठी स्वाध्याय PDF
इयत्ता सातवी मराठी प्रार्थना मराठी स्वाध्याय PDF


या लेखात, आम्ही मराठी प्रार्थना विषयासाठी इयत्ता सातवी मराठी सोल्यूशन्स देऊ. इयत्ता सातवी मधील विद्यार्थी पाठ्यपुस्तकांमध्ये उपस्थित असलेल्या व्यायामांसाठी प्रश्न आणि उत्तरे डाउनलोड आणि कॉपी करण्यास सक्षम असतील.

इयत्ता सातवी मराठी प्रार्थनााच्या पुस्तकात महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमातील सर्व प्रश्नांचा समावेश आहे. येथे सर्व प्रश्न पूर्ण स्पष्टीकरणासह सोडवले आहेत आणि डाउनलोड करण्यासाठी विनामूल्य उपलब्ध आहेत. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवी मराठी प्रार्थनााचे पुस्तक खाली दिले आहे. आम्‍हाला आशा आहे की आमच्‍या इयत्‍ता सातवी वीच्‍या मराठी प्रार्थनााचे पुस्‍तक तुमच्‍या अभ्यासात मदत करेल! जर तुम्हाला आमचे इयत्ता सातवी चे पुस्तक आवडले असेल तर कृपया ही पोस्ट शेअर करा.


इयत्ता सातवी मराठी प्रार्थना स्वाध्याय

मंडळाचे नाव

Maharashtra Board

ग्रेडचे नाव

सातवी

विषय

मराठी प्रार्थना

वर्ष

2022

स्वरूप

PDF/DOC

प्रदाता

hsslive.co.in

अधिकृत संकेतस्थळ

mahahsscboard.in


समाधानासह महाराष्ट्र बोर्ड आठवा स्वाध्याय कसे डाउनलोड करायचे?

महाराष्ट्र बोर्ड सातवी स्वाध्याय PDF डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

 1. वेबसाइट- Hsslive ला भेट द्या. 'स्वाध्याय' लिंकवर क्लिक करा.
 2. महा बोर्ड सातवी स्वाध्याय PDF पहा.
 3. आता महाराष्ट्र बोर्ड सातवी स्वाध्याय तपासा.
 4. डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भांसाठी जतन करा.

इयत्ता सातवी मराठी प्रार्थना स्वाध्याय उपाय

इयत्ता सातवी स्वाध्याय मधील विद्यार्थी खालील लिंक्सवरून मराठी प्रार्थनााचे उपाय डाउनलोड करू शकतील.


Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 1 प्रार्थना Textbook Questions and Answers

 

रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.

 1. नमस्कार माझा या ………………. .
 2. शब्दरूप …………… दे …………… भक्ती दे.
 3. …………………. दे अम्हांस एक ………………, एक ध्यास.
 4. होऊ आम्ही …………… कलागुणी
 5. ………………. कळस जाय उंच अंबरा।।

उत्तरः

 1. ज्ञानमंदिरा
 2. शक्ती, भावरूप
 3. विदयाधन, छंद’
 4. नीतिमंत, बुद्धिमंत
 5. कीर्तिचा

 

प्रश्न 2.
जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गटी
1. शब्दरूप (अ) भक्ती
2. भावरूप (ब) शक्ती
3. प्रगतीचे (क) कळस
4. कीर्तिचा (ड) पंख

उत्तरः

‘अ’ गट ‘ब’ गटी
1. शब्दरूप (ब) शक्ती
2. भावरूप (अ) भक्ती
3. प्रगतीचे (ड) पंख
4. कीर्तिचा (क) कळस

 

खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
प्रार्थना या कवितेचे कवी कोण आहेत?
उत्तर:
‘प्रार्थना’ या कवितेचे कवी ‘जगदीश खेबूडकर’ हे आहेत.

प्रश्न 2.
जगदीश खेबूडकर यांनी कशासाठी मोठ्या प्रमाणावर गीतांचे लेखन केले आहे?
उत्तर:
जगदीश खेबूडकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीसाठी मोठ्या प्रमाणावर गीतांचे लेखन केले आहे.

प्रश्न 3.
मुले कोणाला नमस्कार करीत आहेत?
उत्तरः
मुले ज्ञानमंदिराला (शाळेला) नमस्कार करीत आहेत.

 

प्रश्न 4.
प्रार्थनेतून कोणती शक्ती विद्यार्थी मागत आहेत?
उत्तरः
प्रार्थनतून शब्दरूप शक्ती विदयार्थी मागत आहेत.

प्रश्न 5.
कोणते पंख देण्याची विदयार्थी विनंती करत आहेत?
उत्तर:
प्रगतीचे पंख देण्याची विद्यार्थी विनंती करत आहेत.

प्रश्न 6.
चिमणपाखरे कोणाला म्हटले आहे?
उत्तरः
चिमणपाखरे विदयार्थ्यांना म्हटले आहे.

 

प्रश्न 7.
कोणत्या गोष्टीचा ध्यास व छंद जडावा, अशी प्रार्थना विद्यार्थी करत आहेत?
उत्तर:
विदयाधनाचा ध्यास व छंद जडावा, अशी प्रार्थना विद्यार्थी करत आहेत.

प्रश्न 8.
आम्ही कसे होऊ, अशी विदयार्थी प्रार्थना करत आहेत?
उत्तरः
आम्ही नीतिमंत, कलागुणी, बुद्धिमंत होऊ अशी विदयार्थी प्रार्थना करत आहेत.

प्रश्न 9.
कीर्तिचा कळस कोठे जाणार आहे?
उत्तरः
कीर्तिचा कळस उंच अंबरात जाणार आहे.

 

खालील कवितेच्या ओळींचा अर्थ स्पष्ट करा.

प्रश्न 1.
विदयाधन दे अम्हांस
एक छंद एक ध्यास
नाव नेई पैलतीरी दयासागरा।।
उत्तरः
मुले ईश्वराकडे प्रार्थना करत आहेत की शाळेत आम्हांला विदयाधन मिळू दे हा एकच ध्यास आहे, एकच छंद आहे. हे ईश्वरा, “आम्ही शिकून खूप मोठे होऊ व आमच्या देशाचे नाव जगात सगळीकडे पसरवू.”

व्याकरण व भाषाभ्यास:

प्रश्न 1.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

 1. नमस्कार
 2. छंद
 3. नाव
 4. अंबर

उत्तर:

 1. वंदन
 2. नाद
 3. होडी
 4. आकाश

 

प्रश्न 2.
खालील विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा,

 1. प्रगती
 2. कीर्ति
 3. कळस
 4. माझा

उत्तरः

 1. अधोगती
 2. अपकीर्ति
 3. पायथा
 4. तुझा

प्रश्न 3.
कवितेत आलेले यमक जुळणारे शब्द लिहा,

 1. शक्ती
 2. नीतिमंत
 3. सुंदरा
 4. भावरूप

उत्तर:

 1. भक्ती
 2. बुद्धिमंत
 3. अंबरा
 4. शब्दरूप

 

प्रश्न 4.
खालील शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.
‘चिमणपाखरा’
उत्तरः

 1. चिमण
 2. पाखरा
 3. खण
 4. पारा
 5. चिरा

प्रश्न 5.
‘नमस्कार’ शब्द वापरून दोन वाक्ये लिहा.
उत्तरः

 1. मी सकाळी उठल्यावर देवाला नमस्कार करतो.
 2. गुरुजींना नमस्कार करून मी कबड्डीच्या स्पर्धेत उतरलो.

प्रार्थना Summary in Marathi

काव्य परिचयः

प्रस्तुत प्रार्थनेतून शाळेविषयी प्रेम, जिव्हाळा, कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे. प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती. प्रार्थना केवळ मुखाने नव्हे, तर अंत:करणापासून केली पाहिजे.

The poet has expressed love, affection and gratitude towards the school, through this poem. Prayer is the strength to get closer to the God. Prayer should be recited not only by mouth but also from the bottom of the heart.

 

कवितेचा भावार्थः

ज्ञानरूपी मंदिर असलेल्या आमच्या या शाळेला आमचा नमस्कार आहे. सत्य, शिव व सुंदर अशी मूल्ये जपणारी आमची शाळा आहे. ।। तू आम्हांला शब्दरूपी शक्ती दे. भावपूर्ण भक्ती दे. आम्हां मुलांना, चिमण्यापाखरांना ध्येय गाठण्यासाठी प्रगतीचे पंख दे. ।।1।। तू आम्हांला विदयेचे, ज्ञानाचे धन दे. अभ्यासाचा छंद लागू दे, ओढ लागू दे. ज्ञानाचा ध्यास असू दे. आमची जीवनाची नाव (होडी) यशाच्या पैलतीराला लागू दे. ।।2।। तुझ्या आशिर्वादाने आम्ही सद्वर्तनी होऊ, कलागुण संपन्न होऊ. हुशार, बुद्धिमंत होऊ. आमच्या कीर्तीचा कळस उंच आकाशात जाऊ दे. यश मिळू दे. ।।3।।

शब्दार्थ:

 1. प्रार्थना – आराधना, नमन – prayer
 2. नमस्कार – वंदन, नमन, – a reverential आदरपूर्वक केलेले bow, an अभिवादन obeisance
 3. ज्ञानमंदिर – ज्ञानाचे घर – school
 4. शक्ती – ताकद, सामर्थ्य – strength
 5. भक्ती – श्रद्धा, निष्ठा – deep devotion
 6. प्रगती – विकास – progress
 7. पंख – पर – a wing
 8. चिमणपाखरा – लहान मुले – small children
 9. चिमण – लहान – small
 10. पाखरू – पक्षी – bird
 11. धन पैसा, संपत्ती, – money, wealth ऐश्वर्य
 12. छंद – आवड – hobby, liking
 13. ध्यास – विशिष्ट गोष्टीचे – constant सतत केलेले चिंतन thinking
 14. नीतिमंत – सदाचरणी, मूल्य – good conduct, जपणारी virtuous
 15. नीती – शिष्टाचार, – etiquette सदाचाराचे नियम
 16. बुद्धिमंत – बुद्धिमान – intelligent
 17. कीर्ति – नावलौकिक, – fame ख्याती
 18. कळस – शिखर – the spire
 19. उंच – उत्तुंग – high
 20. अंबर – आकाश – the sky
 21. जाय – जाणे – to go
 22. नाव – होडी – boat, craft
 23. पैलतीर – पलीकडचा किनारा – opposite side of the bank of river

इयत्ता सातवी मराठी स्वाध्याय उपाय

निष्कर्ष

आम्हाला आशा आहे की महाराष्ट्रावरील हा लेख तुम्हाला 'सातवी मराठी प्रार्थना स्वाध्याय' मदत करेल. तुम्हाला काही प्रश्न असल्यास, त्यांना खाली टिप्पणी विभागात मोकळ्या मनाने पोस्ट करा. आम्ही लवकरात लवकर तुमच्याकडे परत येऊ.
Share:

0 Comments:

Post a Comment

Plus Two (+2) Previous Year Question Papers

Plus Two (+2) Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Physics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Chemistry Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Maths Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Zoology Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Botany Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Computer Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Computer Application Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Commerce Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Humanities Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Economics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) History Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Islamic History Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Psychology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Sociology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Political Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Geography Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Accountancy Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Business Studies Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) English Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Hindi Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Arabic Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Kaithang Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Malayalam Previous Year Chapter Wise Question Papers

Plus One (+1) Previous Year Question Papers

Plus One (+1) Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Physics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Chemistry Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Maths Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Zoology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Botany Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Computer Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Computer Application Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Commerce Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Humanities Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Economics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) History Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Islamic History Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Psychology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Sociology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Political Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Geography Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Accountancy Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Business Studies Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) English Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Hindi Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Arabic Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Kaithang Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Malayalam Previous Year Chapter Wise Question Papers
Copyright © HSSlive: Plus One & Plus Two Notes & Solutions for Kerala State Board About | Contact | Privacy Policy