Hsslive.co.in: Kerala Higher Secondary News, Plus Two Notes, Plus One Notes, Plus two study material, Higher Secondary Question Paper.

Tuesday, March 1, 2022

इयत्ता सातवी मराठी गोपाळचे शौर्य मराठी स्वाध्याय PDF

 

इयत्ता सातवी मराठी गोपाळचे शौर्य मराठी स्वाध्याय PDF
इयत्ता सातवी मराठी गोपाळचे शौर्य मराठी स्वाध्याय PDF


या लेखात, आम्ही मराठी गोपाळचे शौर्य विषयासाठी इयत्ता सातवी मराठी सोल्यूशन्स देऊ. इयत्ता सातवी मधील विद्यार्थी पाठ्यपुस्तकांमध्ये उपस्थित असलेल्या व्यायामांसाठी प्रश्न आणि उत्तरे डाउनलोड आणि कॉपी करण्यास सक्षम असतील.

इयत्ता सातवी मराठी गोपाळचे शौर्याच्या पुस्तकात महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमातील सर्व प्रश्नांचा समावेश आहे. येथे सर्व प्रश्न पूर्ण स्पष्टीकरणासह सोडवले आहेत आणि डाउनलोड करण्यासाठी विनामूल्य उपलब्ध आहेत. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवी मराठी गोपाळचे शौर्याचे पुस्तक खाली दिले आहे. आम्‍हाला आशा आहे की आमच्‍या इयत्‍ता सातवी वीच्‍या मराठी गोपाळचे शौर्याचे पुस्‍तक तुमच्‍या अभ्यासात मदत करेल! जर तुम्हाला आमचे इयत्ता सातवी चे पुस्तक आवडले असेल तर कृपया ही पोस्ट शेअर करा.


इयत्ता सातवी मराठी गोपाळचे शौर्य स्वाध्याय

मंडळाचे नाव

Maharashtra Board

ग्रेडचे नाव

सातवी

विषय

मराठी गोपाळचे शौर्य

वर्ष

2022

स्वरूप

PDF/DOC

प्रदाता

hsslive.co.in

अधिकृत संकेतस्थळ

mahahsscboard.in


समाधानासह महाराष्ट्र बोर्ड आठवा स्वाध्याय कसे डाउनलोड करायचे?

महाराष्ट्र बोर्ड सातवी स्वाध्याय PDF डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

 1. वेबसाइट- Hsslive ला भेट द्या. 'स्वाध्याय' लिंकवर क्लिक करा.
 2. महा बोर्ड सातवी स्वाध्याय PDF पहा.
 3. आता महाराष्ट्र बोर्ड सातवी स्वाध्याय तपासा.
 4. डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भांसाठी जतन करा.

इयत्ता सातवी मराठी गोपाळचे शौर्य स्वाध्याय उपाय

इयत्ता सातवी स्वाध्याय मधील विद्यार्थी खालील लिंक्सवरून मराठी गोपाळचे शौर्याचे उपाय डाउनलोड करू शकतील.


Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 4 गोपाळचे शौर्य Textbook Questions and Answers

 

1. खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
कर्णागड कुठे वसलेला आहे?
उत्तर:
नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील ‘मोहदी’ या गावापासून आठ-दहा किलोमीटर अंतरावर कर्णागड वसलेला आहे.

प्रश्न आ.
‘गाडी थांबवा’ असे गोपाळ का ओरडला?
उत्तरः
‘गाडी थांबवा’, असे गोपाळ ओरडला कारण घाटाच्या खालच्या बाजूला आग (वणवा) लागली होती व ती आग आपण विझवलीच पाहिजे असा विचार गोपाळच्या मनात आला.

 

प्रश्न इ.
गोपाळने आग विझवण्यासाठी काय केले?
उत्तर:
गोपाळने गाडीतून उडी मारून धावतच जाऊन वाटेलगतच्या शेतातील नदीवरून सुरू असलेला पाण्याने भरलेला रबरी पाइप सर्व शक्तिनिशी ओढायला सुरुवात केली व तो आगीच्या दिशेने ओढत आणला.

प्रश्न ई.
आग वेळेवर विझली नसती तर कोणते नुकसान झाले असते?
उत्तर:
आग वेळेवर विझली नसती तर पशु, पक्षी व झाडाझुडपांबरोबरच काही गुराखी मुलेही त्या आगीत भाजली असती.

2. कोण, कोणास म्हणाले ते सांगा.

प्रश्न अ.
“अरे वेन्या, ही जंगलाची आग कशी काय विझवू शकू?”
उत्तरः
शिक्षक गोपाळला म्हणाले.

प्रश्न आ.
“माणसं असो का जनावरं त्यांना वाचवलंच पाहिजे ना!”
उत्तर:
गोपाळ गुराख्याकडे पाहून सर्वांना म्हणाला.

 

प्रश्न इ.
“पण साहेब, हे कसं शक्य आहे? मला तर वेडेपणाच वाटतो.”
उत्तर:
शिक्षक दुसऱ्या गाडीतील गृहस्थाला म्हणाले.

3. गोपाळचा कोणता गुण तुम्हाला आवडला? का वे लिहा?

प्रश्न 1.
गोपाळचा कोणता गुण तुम्हाला आवडला? का वे लिहा?
उत्तर:
गोपाळचे शौर्य व प्रसंगावधानता हे गुण आम्हाला आवडले, कारण गोपाळने धाडस दाखवून गाडीतून उडी मारली नसती तर तो वणवा सगळीकडे पसरला असता. त्यात अनेक झाडे जळून खाक झाली असती. झाडांबरोबर पशु-पक्षी व गुराख्यांचेही प्राण वाचले नसते.

चर्चा करा. सांगा.

 • नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्ती म्हणजे काय?
 • नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती कोणत्या, त्यांची यादी करा.
 • जंगलामध्ये वणवा लागू नये यासाठी कोणते उपाय करणे आवश्यक आहे, याबाबत मित्रांशी चर्चा करा.

 

खेळूया शब्दांशी.

(अ) खालील अधोरेखित शब्दांमधील नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे रिकाम्या चौकटीत भरा.

प्रश्न 1.
1. कर्णागड नावाचा एक पौराणिक गड आहे.
2. ड्रायव्हरने लगेच गाडीचा वेग वाढवला.
3. तो लांब पाइप गोपाळने ओडत आणला.
4. सर्वांचेच चेहरे उजळले होते.
5. उन्हाळ्यात गडावर वाळलेला पाला-पाचोळा दिसतो.
6. मंदाकिनी नदी बारामाही झुळझुळत असते.

उत्तर:

नाम सर्वनाम विशेषण क्रियापद
(अ) कर्णागड आहे
(आ) ड्रायव्हर, गाडी     वाढवला
(इ) पाइप, गोपाळ तो लांब आणला
(ई)   चेहरे होते

 

(आ) कंसात दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्ये पूर्ण करा.
(अकल्पित’, कौतुकास्पद, प्रत्यक्षदर्शी’, पोशिंदा)

प्रश्न 1.
(अ) सचिन तेंडुलकरच्या यशस्वी फलंदाजीचे अनेक साक्षीदार ……………… आहेत.
(आ) भूज येथे घडलेली भूकंपाची घटना ……………… होती.
(इ) …………………….. शेतकऱ्याला भारताचा म्हणतात,
(ई) ……………………….. काम करणारा विदयार्थी सर्वांना नेहमीच आवडतो.
उत्तरः
(अ) प्रत्यक्षदर्शी
(आ) अकल्पित
(इ) पोशिंदा
(ई) कौतुकास्पद

(इ) “गैर” हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द खाली दिले आहेत. “बिन”, “परा” हे उपसर्ग लावून तयार होणारे शब्द लिहा.

प्रश्न 1.
“गैर” हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द खाली दिले आहेत. “बिन”, “परा” हे उपसर्ग लावून तयार होणारे शब्द लिहा.

उत्तरः

 • गैर – गैरहजर, गैरसोय, गैरसमज
 • बिन – बिनतारी, बिनकामाचा, बिनासंदेश
 • परा – परार्थी, पराभव, पराजय

 

खालील वाक्यांतील क्रियाविशेषण अव्यये ओळखून लिहा.

प्रश्न 1.
(अ) माझे हसणे क्षणोक्षणी वाढतच गेले.
(आ) मंदा लिहिताना नेहमी चुका करते.
(इ) आईने आशाला शंभरदा बजावले.
(ई) सभोवार दाट झाडी होती.
उत्तरः
(अ) क्षणोक्षणी
(आ) नेहमी
(इ) शंभरदा
(ई) दाट

कंसात दिलेली क्रियाविशेषण अव्यये वापरून खालील वाक्ये पूर्ण करा.
(समोरून, सगळीकडे, पूर्वी, घटाघटा)

प्रश्न 1.
(अ) ………………… वाहतुकीची साधने कमी होती.
(आ) मी ………………….. पाणी प्यायलो.
(इ) मला आई ……………….. येताना दिसली.
(ई) …………………. हिरवेगार गवत उगवले होते.
उत्तर:
(अ) पूर्वी
(आ) घटाघटा
(इ) समोरून
(ई) सगळीकडे

 

खालील वाक्ये वाचा.

(अ) मी घरी गेले; पण घरा
(आ) अश्विनी खेळायला गेली; परंतु मैदानावर कोणीच नव्हते.
दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडायची असल्यास ‘;’ हे चिन्ह वापरले जाते. त्यास अर्धविराम असे म्हणतात.

सुविचार

 • आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही.
 • शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळवणे म्हणजे शिक्षण होय.
 • अनुभवासारखा उत्तम शिक्षक नाही.

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 4 गोपाळचे शौर्य Important Additional Questions and Answers

खाली दिलेल्या वाक्यांतील रिकाम्या जागी योग्य शब्द भरून वाक्य लिहा.

प्रश्न 1.

 1. गडाच्या पायथ्याशी …………………… नदी बारमाही झुळझुळत असते.
 2. नदीच्या दोन्ही तीरांवरील ……………….. बारा महिने हिरवेगार असतात.
 3. गडावरील फेरफटका पूर्ण झाल्यावर प्रत्येकाने आपापले …………………. सादर केले.
 4. पायथ्याची आग हळूहळू ……………….. होत होती.
 5. आता तो पाइप सहजगत्या ………………. पाणी फेकू लागला.
 6. आता सर्वांचेच ………. उजळले होते. सर्वांनाच नवी ………… मिळाली होती.
 7. गोपाळचे हे काम खरंच ………………. आहे.
 8. दुसऱ्या दिवशीच्या ………….. ही बातमी सर्वच लोकांना कळाली.
 9. परिसरातील नागरिक गोपाळच्या या …………….. भरभरून कौतुक करत होते.

उत्तरः

 1. मंदाकिनी
 2. शेतमळे
 3. कलागुण
 4. शांत
 5. चौफेर
 6. चेहरे, उर्जा
 7. कौतुकास्पद
 8. वर्तमानपत्रातून
 9. शौर्याचे

 

प्रश्न 2.
एक किंवा दोन शब्दांत उत्तरे लिहा.

 1. नरखेड तालुक्यातील खेडेगावाचे नाव
 2. नरखेड तालुक्यातील गडाचे नाव
 3. सहलप्रेमी, ट्रेकिंगप्रेमी जाताना दिसतात
 4. गड्याच्या पायथ्याशी बाहमाही वाहणारी नदी
 5. आदीवासी जंगलांना मानतात

उत्तरः

 1. मोहदी
 2. कर्णागड
 3. कर्णागडावर
 4. मंदाकिनी
 5. पोशिंदे

खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
शिक्षकांनी गोपाळच्या कामाचे कौतुक कोणत्या शब्दांत केले?
उत्तरः
“गोपाळनं निरपेक्ष भावनेनं, जिवाची पर्वा न करता धाडस केलं. आज केवळ गडच नव्हे, तर गुरं आणि सर्व गुराख्यांचेही प्राण गोपाळने वाचवले,” या कौतुकास्पद शब्दांत शिक्षकांनी गोपाळच्या कामाचे कौतुक केले.

कोण, कोणास म्हणाले ते सांगा.

प्रश्न 1.
“गडावर पुढे पुढे पसरत असलेली आगही आटोक्यात आणली पाहिजे.”
उत्तर:
दुसऱ्या गाडीतील गृहस्थ शिक्षकांना व इतर सर्वांना म्हणाले.

 

प्रश्न 2.
“अरे तो बघा वणवा! वणवा लागलाय, वणवा!”
उत्तरः
गाडीतील एकजण ओरडून सर्वांना म्हणाला.

प्रश्न 3.
“लय बेस झालं बापा”
उत्तर:
गुराखी मुलांना म्हणाले.

खालील प्रश्नांची तीन-चार वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
कर्णागडच्या निसर्ग सौंदर्याचे वर्णन करा.
उत्तरः
कर्णागड नावाचा एक पौराणिक गड आहे. गुरे चारणारे गुराखी, सहल काढणारे, ट्रेकिंगप्रेमी तेथे नेहमी जात असतात. गडाच्या पायथ्याशी मंदाकिनी नदी बारमाही झुळझुळत असते. नदीच्या दोन्ही तीरांवरील शेतमळे बारा महिने हिरवेगार असतात. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हा प्रदेश पाचूचा वाटतो. उन्हाळ्यात रानमेव्याची अनेक प्रकारची झाडे तिथे मोसमी’ फळभाराने बहरलेली दिसतात.

प्रश्न 2.
गाईवासरं घेऊन आलेल्या गुराख्याला गहिवरून का आले?
उत्तर:
आग शांत झाल्यावर गाईवासरं घेऊन काही गुराखी मुलांजवळ आले. त्यातील एक जण हात जोडून म्हणाला, खूप चांगले झाले आग विझली. गडावरील कित्येक झाडेझडपे होरपळून गेली. जरासा जरी उशीर झाला असता तर आम्हीही भाजून निघालो असतो आणि आमच्यातल्या कोणाला कोणाचा पत्ताही लागला नसता, तुमच्या मदतीमुळे आम्ही वाचलो हे सांगताना गुराख्याला गहिवरून आले.

 

पुढील उत्तर वाचून सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
गडाबरोबरच गोपाळने कोणाचे प्राण वाचवले ।
उत्तरः

प्रश्न 2.
रिकाम्या जागा भरा.
(i) वीस मिनिटांच्या आतच पंधरा-वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या ……….” अग्निशामक दलाच्या दोन गाड्या गडाच्या पायथ्याशी हजर झाल्या.
(ii) “गडावरचीतं कितीकंच …………………. भाजून निघालीत”.
उत्तरः
(i) नरखेडहून
(ii) झाडं-झुडपं

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
चौकट पूर्ण करा.
(i) त्या गृहस्थाने फोन करून कोणाला बोलावलं. [ ]
(ii) गोपाळच्या शौर्याची बातमी दुसऱ्या दिवशी कशी कळली. [ ]
उत्तरः
(i) अग्निशामक दलाच्या गाड्यांना
(ii) वर्तमानपत्रातून

 

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न i.
अग्निशामक दलाच्या गाड्या कुठे हजर झाल्या?
उत्तरः
अग्निशामक दलाच्या गाड्या गडाच्या पायथ्याशी हजर झाल्या.

प्रश्न ii.
गोपाळच्या शौर्याचे कौतुक कोण करत होते?
उत्तरः
गोपाळच्या शौर्याचे कौतुक परिसरातील नागरिक करत होते.

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील शब्दांचे वचन बदला.
(i) गाडी (ii) चेहरे (iii) हात (iv) शिक्षक
उत्तरः
(i) गाड्या (ii) चेहरा (iii) हात (iv) शिक्षक

 

प्रश्न 2.
खालील वाक्यांत लेखननियमानुसार बदल करा.
प्रश्न i.
सर्वांनाच नवि उर्जा मिळाली होती.
उत्तरः
सर्वांनाच नवी ऊर्जा मिळाली होती.

प्रश्न ii.
हे सांगताना त्याला गहीवरून आले होते.
उत्तर:
हे सांगताना त्याला गहिवरून आले होते.

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
शौर्याचं कौतुक होईल अशी घटना तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या आजूबाजूला घडली आहे का? असल्यास तिचे वर्णन करा.
उत्तर:
हो. अशीच एक घटना आमच्या आवारात घडली. आमच्या आवारात राहणाऱ्या एका आजीबाईचा बटवा एका भामट्याने चोरला व तो तिथून पळाला. आजीबाईंना काही त्याचा पाठलाग करता आला नाही. पण तिथूनच जाणाऱ्या लहानग्या रमेशने ही घटना पाहिली. तो त्या भामट्याच्या मागे-मागे त्याच्या ठिकाणावर गेला आणि तो तिथेच राहतो हे पाहून माघारी घरी आला. आल्यावर त्याने ती घटना व त्या भामट्या चोराचा पत्ता आवारातील सगळ्यांना सांगितला. मग सगळे पोलिसांना घेऊनच तिथे गेले व चोराला रंगेहाथ पकडलं. तेरा वर्षांच्या रमेशच्या शौर्याचे खूप कौतुक झाले.

 

व्याकरण व भावाभ्यास :

खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा.

प्रश्न 1.

 1. गाव
 2. पौराणिक
 3. गड
 4. नदी
 5. शक्ती
 6. तीर
 7. मोसमी
 8. भव्य
 9. नाहक
 10. उद्देश
 11. आग
 12. प्राण
 13. कौतुक
 14. धाडस

उत्तरः

 1. ग्राम
 2. पुरातन
 3. किल्ला, दुर्ग
 4. सरीता
 5. ताकद
 6. काठ
 7. हंगामी
 8. प्रशस्त
 9. विनाकारण
 10. हेतू
 11. अग्नी
 12. जीव
 13. प्रशंसा
 14. धैर्य, साहस

 

खाली शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहा.

प्रश्न 1.

 1. खेडे
 2. पौराणिक
 3. पायथा
 4. भव्य
 5. नाइलाज
 6. उतरणे
 7. सूर्यास्त
 8. मंदावणे
 9. हजर
 10. निरपेक्ष

उत्तरः

 1. शहर
 2. आधुनिक
 3. माथा
 4. चिमुकली
 5. इलाज
 6. चढणे
 7. सूर्योदय
 8. जोरावणे
 9. गैरहजर
 10. अपेक्ष

खालील शब्दांचे लिंग बदला,

प्रश्न 1.

 1. शिक्षक
 2. विदयार्थी
 3. मुले
 4. गुराखी
 5. वेडा
 6. माय

उत्तर:

 1. शिक्षिका
 2. विदयार्थीनी
 3. मुली
 4. गुराखीण
 5. वेडी
 6. बाप

 

खालील शब्दांचे वचन बदला.

प्रश्न 1.

 1. महिना
 2. वणवा
 3. गाडी
 4. शेत
 5. नदी
 6. जनावर
 7. वर्तमानपत्र

उत्तरः

 1. महिने
 2. वणवे
 3. गाड्या
 4. शेते
 5. नया
 6. जनावरे
 7. वर्तमानपत्रे

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा.

प्रश्न 1.
हतबल होणे – निराश होणे
उत्तरः
प्रयत्न करुनही नृत्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत प्रेवश मिळाला नाही म्हणून मी हतबल झाले,

प्रश्न 2.
जिवाची पर्वा न करणे – जिवाची काळजी न करणे
उत्तर:
बाजीप्रभु देशपांडेनी जिवाची पर्वा न करता पावनखिंड लढविली.

प्रश्न 3.
गहिवरून येणे – भावना दाटून येणे
उत्तरः
सासरी निघालेल्या मुलीकडे पाहून आईचे मन गहिवरून आले.

 

प्रश्न 4.
कौतुक करणे – स्तुती करणे
उत्तर:
आपला विदयार्थी एक मोठा अधिकारी झाला म्हणून त्याचा सत्कार करताना शिक्षकांनी त्याचे कौतुक केले.

प्रश्न 5.
आटोक्यात आणणे – ताबा मिळविणे
उत्तर:
वर्गातील बेशिस्त मुलाला गुरुजींनी हळहळू आटोक्यात आणले.

प्रश्न 6.
चेहरे उजळणे – चेहऱ्यावर आनंद दिसणे
उत्तरः
सीमेवरून लढून परत आलेल्या मुलाला पाहून आईचा चेहरा उजळला.

खालील वाक्यांत अर्थविरामचिन्हाचा वापर करा.

प्रश्न 1.

 1. दोघींनीही भेटीला जाण्याची तयारी केली पण पुरेसे पैसे जवळ नव्हते.
 2. मी वाहून जाण्याच्या बेतात होतो परंतु कसाबसा बाहेर आलो.

उत्तरः

 1. दोघींनीही भेटीला जाण्याची तयारी केली; पण पुरेसे पैसे जवळ नव्हते.
 2. मी वाहून जाण्याच्या बेतात होतो; परंतु कसाबसा बाहेर आलो.

 

लेखन विभाग चर्चा करा व लिहा.

प्रश्न 1.
नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्ती म्हणजे काय?
उत्तरः
पृथ्वीच्या हालचालीमुळे किंवा निसर्गात होणाऱ्या इतर बदलांमुळे जी संकटे येतात किंवा बदल होतात त्याला ‘नैसर्गिक आपत्ती’ असे म्हणतात. त्याचा परिणाम आर्थिक व सामाजिक परिस्थितीवर होतो. उदा. ज्वालामुखी, भूकंप, महापूर, चक्रीवादळ इ. मानवाने निर्मित केलेल्या वस्तूंमुळे जी संकटे येतात, त्याला ‘मानवनिर्मित आपत्ती’ असे म्हणतात. याचा सामाजिक व आर्थिक परिस्थितीवर परिणाम होत असतो. उदा. न्यूक्लियर बॉम्ब, अणुक्षेपणास्त्र, मोठमोठ्या इमारती इ.

प्रश्न 2.
नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती कोणत्या त्यांची यादी करा.
उत्तर:

नैसर्गिक आपत्ती मानवनिर्मित आपत्ती
वादळ, हिमस्खलन3 आग लागणे, घर पडणे, अपघात होणे
वणवा, वीज कोसळणे रासायनिक वायू गळती
दुष्काळ, भूकंप न्यूक्लियर बॉम्ब
त्सुनामी, महापूर, पूल, मोठमोठ्या इमारती कोसळणे
चक्रीवादळ नैसर्गिक नद्यांचे स्त्रोत बंद करणे

 

प्रश्न 3.
जंगलामध्ये वणवा लागू नये यासाठी काय उपाय करणे आवश्यक आहे, याबाबत मित्रांशी चर्चा करा व लिहा.
उत्तर:
जंगलामध्ये वणवा लागू नये यासाठी जंगलात गेल्यावर कोठेही आगपेटीची जळकी काडी फेकू नये. विडी किंवा सिगारेट सारख्या पदार्थांनी धूम्रपान करून ती तशीच अर्धवट जंगलात टाकू नयेत. जंगलामध्ये नैसर्गिक सहलीचा आनंद घेताना आगीशी संबंध येईल असे ज्वलंत पदार्थ सोबत बाळगू नयेत.

वाचा
गवत जाळल्यामुळे पुढील वर्षी पावसाळ्यात गवताची चांगली वाढ होते, या समजुतीतून डोंगरावरील गवताला आग लावली जाते. काही ठिकाणी मोहफूल, तेंदूपत्ता गोळा करताना स्थानिक लोकांकडूनही काही भागांत आग लावली जाते; परंतु त्यावर नियंत्रण न राखता आल्याने ही आग रौद्ररूप धारण करते.

त्यामध्ये डोंगरावरील गवत जळून नष्ट होते, त्याबरोबरच अनेक लहानमोठी झाडेही जळतात. झाडांच्या आसऱ्याला राहणारे अनेक पक्षी व प्राणी हेही आगीचे भक्ष्य’ बनतात. वनसंपदेबरोबरच वणव्याचा मोठा परिणाम प्राण्यांच्या अन्नसाखळीवर होत आहे. हिरव्या पाल्याच्या शोधात तृणभक्षी प्राणी जंगलाकडे वळतात; परंतु अशा वणव्यांमुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण होतो.

बऱ्याच वेळा डोंगरभागात फिरायला म्हणून जाणारे काही पर्यटक धूम्रपान करतात. विडी पेटवण्यासाठीची आगपेटीची जळती काडी जंगलात फेकतात. या जळत्या काडीमुळे वाळलेले गवत पेट घेते आणि पुढे त्याचे वणव्यात रूपांतर होते. या वणव्यामुळे जंगलांमध्ये पुनर्निर्मिती व चाऱ्याची उपलब्धता यांवर विपरीत परिणाम होत आहे. प्राणी व वृक्ष वाचवण्यासाठी, वणवा लागू नये यासाठी सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

 

वरील उत्तर वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
गवताला आग का लावली जाते?
उत्तर:
गवत जाळल्यामुळे पुढील वर्षी पावसाळ्यात गवताची चांगली वाढ होते, या समजुतीतून डोंगरावरील गवताला आग लावली जाते.

प्रश्न 2.
डोंगरावर आग लावल्यामुळे काय परिणाम होतात?
उत्तर:
डोंगरावरील गवत जळून नष्ट होते, त्याबरोबरच अनेक लहानमोठी झाडेही जळतात. झाडांच्या आसऱ्याला राहणारे अनेक पक्षी व प्राणी हेही आगीचे भक्ष्य होतात.

प्रश्न 3.
वनसंपदेबरोबरच वणव्याचा परिणाम कशावर होतो?
उत्तर:
वनसंपदेबरोबरच वणव्याचा परिणाम प्राण्यांच्या अन्न साखळीवर होतो. हिरव्या पाल्याच्या शोधात तृणभक्षी (गवत खाणारे) प्राणी जंगलाकडे वळतात; परंतु अशा वणव्यांमुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण होतो.

 

प्रश्न 4.
फिरायला गेलेले पर्यटक वणवा लागण्याचे कारण कसे ठरतात?
उत्तर:
बऱ्याच वेळा डोंगरभागात फिरायला म्हणून जाणारे काही पर्यटक धूम्रपान करतात. विडी, सिगारेट पेटवण्यासाठीची आगपेटीची जळती काडी जंगलात फेकतात. या जळत्या काडीमुळे वाळलेले गवत पेट घेते आणि पुढे त्याचे वणव्यात रूपांतर होते.

प्रश्न 5.
वणव्यामुळे कशावर विपरीत परिणाम होत आहे?
उत्तर:
वणव्यामुळे जंगलांमध्ये पुनर्निर्मिती व चाऱ्याची उपलब्धता यांवर विपरीत परिणाम होत आहे.

अग्निशमन सेवा

कोठेही आग लागली, तर एक लाल रंगाची गाडी जोरजोरात घंटा वाजवत आगीच्या ठिकाणी येते. त्यातील कर्मचारी पाण्याच्या मोठमोठ्या नळकांड्या घेऊन आग आटोक्यात आणतात. आग विझवतात. या दलातील कर्मचाऱ्यांच्या हालचाली खूप वेगवान व शिस्तबद्ध असतात, आग विझवण्याचे हे प्रात्यक्षिक बघण्यासारखे असते.

आग लागणे, घर पडणे, झाड पडणे, मोठा अपघात होणे अशा आपत्कालीन परिस्थितीतून आपल्याला बाहेर काढण्याचे काम अग्निशमन दल करते. या दलास पाचारण करण्यासाठी 101 या करमुक्त दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधतात व आपत्कालीन घटना घडलेल्या ठिकाणचा पत्ता व थोडक्यात तपशीला देतात.

अग्निशमन दल घटनास्थळी तात्काळ पोहोचते. आपल्याला मदत करण्यासाठी आलेल्या या कर्मचाऱ्यांना आपण सहकार्य केले पाहिजे. ते देत असलेल्या सूचनांनुसार वागले पाहिजे. त्यांच्या कामात व्यत्यय येणार नाही, असे आवर्जून पाहिले पाहिजे, कारण अग्निशमन दल’ हा आपला मित्र आहे.

 

वरील उत्तर वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
अग्निशमन दल कोणते काम करते?
उत्तर:
आग लागणे, घर पडणे, झाड पडणे, मोठा अपघात होणे अशा आपत्कालीन परिस्थितीतून आपल्याला बाहेर काढण्याचे काम अग्निशमन दल करते.

प्रश्न 2.
या दलाला पाचारण करण्यासाठी कोणत्या क्रमांकावर संपर्क साधावा?
उत्तर:
अग्निशमन दलाला पाचारण करण्यासाठी 101 या करमुक्त दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

प्रश्न 3.
‘अग्निशमन दल’ आपला मित्र आहे असे का म्हणतात?
उत्तरः
आपल्या आपत्कालीन परिस्थितीत आपल्याला अग्निशमन दल’ मदत करते म्हणून ‘अग्निशमन दल’ आपला मित्र आहे असे म्हणतात.

 

प्रश्न 4.
अग्निशमन दलास कसे सहकार्य केले पाहिजे?
उत्तर:
अग्निशमन दलाकडून येत असलेल्या सूचनांनुसार वागले पाहिजे. त्यांच्या कामात व्यत्यय येणार नाही, असे आवर्जून पाहिले पाहिजे.

गोपाळचे शौर्य Summary in Marathi

पाठ परिचय :

मोहदी येथील माध्यमिक शाळेचे शिक्षक, विदयार्थी कर्णागड येथे सहलीला गेले होते. संपूर्ण दिवस आनंदात गेला आणि परतताना घाटाच्या खालच्या बाजूने आग लागलेली दिसताच गोपाळ क्षणाचाही विचार न करता ती आग विझवण्यासाठी धडपड करू लागला. हळूहळू तेथील सर्व गोपाळच्या मदतीला धावले आणि आग विझविण्यात यशस्वी झाले. गोपाळने निरपेक्ष भावनेने, जिवाची पर्वा न करता हे धाडस केले. त्याच्या धैर्याला व शौर्याला तोड व जोड नव्हती. डोंगरावर अचानक लागलेला वणवा व त्याची आग विझवण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी केलेले प्रयत्न, त्यांच्या शौर्याची कथा लेखिका लक्ष्मीकमल गेडाम’ ह्यांनी रोमांचकारी शब्दांत कथन केली आहे.

Teachers and students of Secondary School of Mohadi had gone for a picnic at Karnagad. The entire day went well but while returning Gopal saw fire at the bottom of the wharf (Ghat) and he at once started to do his best to extinguish that fire. Slowly everyone rushed to help and got success in quenching the fire. Gopal’s unconditional*kindness, courage, bravery were exceptional. The forest fire on the mountain top the school students’ efforts to quench it and their courage has been narrated by the writer ‘Laxmikamal Gedam’ in very thrilling words.

 

शब्दार्थ :

 1. गुण्यागोविंदाने – आनंदाने, स्नेहाने – amicably
 2. पौराणिक – पुराणातील – mythological
 3. गड – किल्ला, दुर्ग – fort
 4. पायथा – गडाची पायाकडची – fort of a hill बाजू
 5. पाचू – एक हिरवे रल – an emerald
 6. प्रदेश – परिसर – a region
 7. फेरफटका – फिरणे – a walk
 8. वणवा – जंगल इ. मध्ये पेटलेली आग – conflagration
 9. वेग – गती – speed
 10. उद्देश – हेतू – intention
 11. नाहक – विनाकारण – unnecessarily
 12. नाइलाज – निरुपाय, असहाय – helpless
 13. वक्तव्यावर – बोलण्यावर – speech
 14. परेतनंच – प्रयत्न – an effort
 15. परीघ – घेर – circumference
 16. न्याहाळणे – निरखणे – to look minutely
 17. हतबल – निराश, नाउमेद – nervous
 18. चौफेर – चारही बाजूंनी – from all sides
 19. निरपेक्ष – अपेक्षा न ठेवता, नि:स्वार्थी – an attitude of not expecting anything in return, selfless
 20. ऊर्जा – शक्ती – energy
 21. कौतुकास्पद – प्रशंसनीय – worth admiration
 22. नैसर्गिक आपत्ती – Natural calamity
 23. मानवनिर्मित आपत्ती – Man-made calamity
 24. हिमस्खलन – बर्फलाट (Avalanche)
 25. ज्वलंत – पटकन पेटणारे (Ablaze, Combustible)
 26. भक्ष्य – खाक्य, अन्न (Food)
 27. पुनर्निमिती – पुन्हा निर्माण होणे (redevelopment)
 28. पाचारण करणे – बोलावणे (To call)
 29. तपशील – बारीक गोष्टी (Detail)
 30. व्यत्यय – अडथळा (Interruption)
 31. मोसमी – ठराविक मोसमात मिळणारी (seasonal)
 32. खाक होणे – नष्ट होणे (to vanish)
 33. पोशिंदे – पालनकर्ता,आश्रयदाता (supporter, apatron)
 34. गुराखी – गुरे राखणारा (cowherd)
 35. अकल्पित – आकस्मिक (unexpectedness)
 36. प्रत्यक्षदर्शी – प्रत्यक्षात पाहणारा (eyewitness)

 

वाक्प्रचार :

 1. गुण्यागोविंदाने राहणे – आनंदाने राहणे
 2. फेरफेटका मारणे – फिरणे
 3. उद्देश असणे – हेतू असणे
 4. दरडावून सांगणे – रागावून बोलणे
 5. हजर होणे – उपस्थित असणे
 6. चेहरे उजळणे – खूप आनंद होणे
 7. जिवाची पर्वा न करणे – कोणतेही काम करण्यास प्राणाचीही पर्वा न करणे
 8. कौतुक करणे – प्रशंसा करणे
 9. गहिवरून येणे – मन भरून येणे
 10. हतबल होणे – निराश होणे
 11. आटोक्यात आणणे – ताबा मिळवणे

टिपा :

 1. पाचू – किमती रत्नांपैकी एक हिरव्या रंगाचे रत्न (emerald)
 2. अग्निशमन दल – आग विझवण्यासाठी कार्यरत असणारी यंत्रणा (fire brigade)
 

इयत्ता सातवी मराठी स्वाध्याय उपाय

निष्कर्ष

आम्हाला आशा आहे की महाराष्ट्रावरील हा लेख तुम्हाला 'सातवी मराठी गोपाळचे शौर्य स्वाध्याय' मदत करेल. तुम्हाला काही प्रश्न असल्यास, त्यांना खाली टिप्पणी विभागात मोकळ्या मनाने पोस्ट करा. आम्ही लवकरात लवकर तुमच्याकडे परत येऊ.
Share:

0 Comments:

Post a Comment

Plus Two (+2) Previous Year Question Papers

Plus Two (+2) Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Physics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Chemistry Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Maths Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Zoology Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Botany Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Computer Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Computer Application Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Commerce Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Humanities Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Economics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) History Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Islamic History Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Psychology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Sociology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Political Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Geography Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Accountancy Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Business Studies Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) English Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Hindi Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Arabic Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Kaithang Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Malayalam Previous Year Chapter Wise Question Papers

Plus One (+1) Previous Year Question Papers

Plus One (+1) Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Physics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Chemistry Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Maths Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Zoology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Botany Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Computer Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Computer Application Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Commerce Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Humanities Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Economics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) History Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Islamic History Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Psychology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Sociology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Political Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Geography Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Accountancy Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Business Studies Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) English Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Hindi Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Arabic Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Kaithang Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Malayalam Previous Year Chapter Wise Question Papers
Copyright © HSSlive: Plus One & Plus Two Notes & Solutions for Kerala State Board About | Contact | Privacy Policy