Hsslive.co.in: Kerala Higher Secondary News, Plus Two Notes, Plus One Notes, Plus two study material, Higher Secondary Question Paper.

Friday, February 11, 2022

इयत्ता नववी संतवाणी संतकृपा झाली – संत बहिणाबाई मराठी स्वाध्याय PDF

 

इयत्ता नववी संतवाणी संतकृपा झाली – संत बहिणाबाई मराठी स्वाध्याय PDF
इयत्ता नववी संतवाणी संतकृपा झाली – संत बहिणाबाई मराठी स्वाध्याय PDF


या लेखात, आम्ही संतवाणी संतकृपा झाली – संत बहिणाबाई विषयासाठी इयत्ता नववी मराठी सोल्यूशन्स देऊ. इयत्ता नववी मधील विद्यार्थी पाठ्यपुस्तकांमध्ये उपस्थित असलेल्या व्यायामांसाठी प्रश्न आणि उत्तरे डाउनलोड आणि कॉपी करण्यास सक्षम असतील.

इयत्ता नववी संतवाणी संतकृपा झाली – संत बहिणाबाईाच्या पुस्तकात महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमातील सर्व प्रश्नांचा समावेश आहे. येथे सर्व प्रश्न पूर्ण स्पष्टीकरणासह सोडवले आहेत आणि डाउनलोड करण्यासाठी विनामूल्य उपलब्ध आहेत. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता नववी संतवाणी संतकृपा झाली – संत बहिणाबाईाचे पुस्तक खाली दिले आहे. आम्‍हाला आशा आहे की आमच्‍या इयत्‍ता नववी वीच्‍या संतवाणी संतकृपा झाली – संत बहिणाबाईाचे पुस्‍तक तुमच्‍या अभ्यासात मदत करेल! जर तुम्हाला आमचे इयत्ता नववी चे पुस्तक आवडले असेल तर कृपया ही पोस्ट शेअर करा.


इयत्ता नववी संतवाणी संतकृपा झाली – संत बहिणाबाई स्वाध्याय

मंडळाचे नाव

Maharashtra Board

ग्रेडचे नाव

नववी

विषय

संतवाणी संतकृपा झाली – संत बहिणाबाई

वर्ष

2022

स्वरूप

PDF/DOC

प्रदाता

hsslive.co.in

अधिकृत संकेतस्थळ

mahahsscboard.in


समाधानासह महाराष्ट्र बोर्ड आठवा स्वाध्याय कसे डाउनलोड करायचे?

महाराष्ट्र बोर्ड नववी स्वाध्याय PDF डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

 1. वेबसाइट- Hsslive ला भेट द्या. 'स्वाध्याय' लिंकवर क्लिक करा.
 2. महा बोर्ड नववी स्वाध्याय PDF पहा.
 3. आता महाराष्ट्र बोर्ड नववी स्वाध्याय तपासा.
 4. डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भांसाठी जतन करा.

इयत्ता नववी संतवाणी संतकृपा झाली – संत बहिणाबाई स्वाध्याय उपाय

इयत्ता नववी स्वाध्याय मधील विद्यार्थी खालील लिंक्सवरून संतवाणी संतकृपा झाली – संत बहिणाबाईाचे उपाय डाउनलोड करू शकतील.


स्वाध्याय :

1. चौकटी पूर्ण करा.

प्रश्न 1.
चौकटी पूर्ण करा.

उत्तर:

2. कंसातील उत्तरांच्या आधाराने संकल्पना स्पष्ट करा.

‘प्रश्न 1.
कंसातील उत्तरांच्या आधाराने संकल्पना स्पष्ट करा.

(परिसर प्रचाराने व्यापक केला, वैभवापर्यंत पोहोचवला, वारकरी संप्रदायाची स्थापना, संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले.)
उत्तर:

3. भावार्थाधारित. 

प्रश्न 1.
‘तुका झालासे कळस । भजन करा सावकाश।।’ या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा.
उत्तरः
भक्तीची अंतिम अवस्था म्हणजेच संत तुकाराम. ज्ञानेश्वरांनी ज्ञानाच्या साहाय्याने निर्मिती केलेल्या वारकरी संप्रदायरूपी इमारतीला आपल्या अलौकिक भक्तीचा कळस चढवून खऱ्या अर्थाने तुकारामांनी परिपूर्णता प्राप्त करून दिली. भक्तीच्या परिपूर्ण वैभवापर्यंत पोहोचवली. तसेच पूजाअर्चा, कर्मकांड यांमध्ये न पडता नामस्मरण (भजन) हा भक्तीचा सोपा मार्ग सर्वांना सांगितला.

प्रश्न 2.
‘ज्ञानदेवे रचिला पाया। उभारिलें देवालया ।।’ या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा.
उत्तरः
वारकरी संप्रदायरूपी इमारतीचा पाया ज्ञानेश्वरांनी रचिला. आपल्या ज्ञान व भक्ती यांच्या जोरावर ‘ज्ञानेश्वरी’ या इमारतीचा पाया निर्माण केला. वारकरी संप्रदायाची स्थापना केली. त्यामुळेच आज शेकडो वर्षे झाली तरी हा वारकरी संप्रदाय दिवसेंदिवस वाढतच आहे.

उपक्रम :

‘भक्तिगंगेच्या वाटेवर’ या हे. वि. इनामदार यांच्या पुस्तकाचे वर्गात सामूहिक वाचन करा.

भाषाभ्यास :

अलंकाराच्या संदर्भातील महत्त्वाचे शब्द पुढीलप्रमाणे असतात.

 1. उपमेय – ज्याची तुलना करायची ते उपमेय.
  उदा., आंबा साखरेसारखा गोड आहे. या उदाहरणात आंबा हे उपमेय आहे.
 2. उपमान – ज्याच्याबरोबर तुलना करावयाची ते उपमान.
  उदा., इथे साखर हे उपमान.
 3. समान धर्म – दोन वस्तूंत असलेला सारखेपणा किंवा दोन वस्तूतील समान गुणधर्म.
  उदा., गोडपणा.
 4. साम्यवाचक शब्द – वरील सारखेपणा दाखवण्यासाठी वापरलेला शब्द. उदा., सारखा.

खालील उदाहरणातील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व समान गुण ओळखा.
(अ) आईचे प्रेम सागरासारखे असते.
(आ) आमच्या गावचे सरपंच कर्णासारखे दानशूर आहेत.
(इ) राधाचा आवाज कोकिळेसारखा मधुर आहे.

Marathi Akshar Bharati Class 9 Textbook Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली – संत बहिणाबाई Additional Important Questions and Answers

पुढील पक्ष्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:

प्रश्न 2.
उत्तर लिहा.
उत्तर:

प्रश्न 3.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. वारकरी संप्रदायावर कोणाची कृपा झाली असे अभंगात म्हटले आहे?
उत्तर:
वारकरी संप्रदायावर संतांची कृपा झाली असे अभंगात म्हटले आहे.

ii. वारकरी संप्रदायाचा किंकर कोणास म्हटले आहे?
उत्तर:
वारकरी संप्रदायाचा किंकर संत नामदेव यांना म्हटले आहे.

iii. संत जनार्दन व संत एकनाथ यांनी वारकरी संप्रदायाला काय दिले?
उत्तर:
संत जनार्दन व संत एकनाथ यांनी वारकरी संप्रदायाला भागवत संप्रदायरूपी खांब दिला.

iv. संत बहिणाबाईंनी स्वीकारलेले कार्य कोणते?
उत्तर:
वारकरी संप्रदायाचा ध्वज सतत फडकत ठेवणे, हे संत बहिणाबाईंनी स्वीकारलेले कार्य आहे.

v. संत बहिणाबाईंनी भजन कसे करण्यास सांगितले आहे?
उत्तर:
संत बहिणाबाईनी भजन सावकाश करण्यास सांगितले आहे.

vi. संत बहिणाबाईंनी वारकरी संप्रदायाच्या प्रचारासाठी स्वीकारलेला मार्ग कोणता?
उत्तर:
संत बहिणाबाईंनी वारकरी संप्रदायाच्या प्रचारासाठी स्वीकारलेला मार्ग निरूपणाचा आहे.

प्रश्न 4.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा,

 1. संतकृपा झाली । इमारत …………….. आली ।। (मुळा, कळा, फळा, माळा)
 2. रचिला पाया । उभारिलें देवालया ।। (जनार्दनें, नामा, ज्ञानदेवें, एकनाथ)
 3. नामा तयाचा ………….”। तेणें रचिलें तें आवार ।। (दास, किंकर, सेवक, खांब)
 4. तुका झालासे ………… भजन करा सावकाश ।। (शिखर, माथा, कळस, गाभा)
 5. बहिणी म्हणे फडकती …………. निरूपणा केलें बोजा। (पताका, ध्वजा, झेंडा, निशाण)

उत्तर:

 1. फळा
 2. ज्ञानदेवेंवें
 3. किंकर
 4. कळस
 5. ध्वजा

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
समान अर्थाच्या काव्यपंक्ती शोधून लिहा.
i. (अ) संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाचा दास बनून संप्रदायाचा विस्तार केला.
(ब) संतांची कृपा झाल्यामुळे वारकरी संप्रदायाची निर्मिती झाली.
उत्तर:
(अ) नामा तयाचा किंकर । तेणें रचिलें तें आवार ।।
(ब) संतकृपा झाली । इमारत फळा आली ।।

ii. (अ) संत तुकाराम भक्तीच्या जोरावर वारकरी संप्रदायरूपी इमारतीचा कळस झाले.
(ब) संतांनी वारकरी संप्रदायाला भागवत धर्माची जोड दिली.
उत्तर:
(अ) तुका झालासे कळस ।
(ब) जनार्दन एकनाथ । खांब दिधला भागवत।।

प्रश्न 2.
जोड्या जुळवा.

i.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. संतकृपा (अ) आवार
2. ज्ञानदेवें (ब) किंकर
3. नामा (क) पाया
4. रचिलें (ड) इमारत फळा

उत्तर:

‘अ’ गट ‘ब’ गट
1. संतकृपा (ड) इमारत फळा
2. ज्ञानदेवें (क) पाया
3. नामा (ब) किंकर
4. रचिलें (अ) आवार

ii.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. संत जनार्दन, संत एकनाथ (अ) फडकती ध्वजा
2. तुका झालासे (ब) खांब
  (क) कळस

उत्तर:

‘अ’ गट ‘ब’ गट
1. संत जनार्दन, संत एकनाथ (ब) खांब
2. तुका झालासे (क) कळस

प्रश्न 3.
काव्यपंक्तींचा योग्य क्रम लावा.
i. (अ) तेणें रचिलें तें आवार।।
(ब) इमारत फळा आली।।
(क) उभारिलें देवालया।।
(ड) नामा तयाचा किंकर।।
उत्तर:
(अ) इमारत फळा आली।।
(ब) उभारिलें देवालया।।
(क) नामा तयाचा किंकर।।
(ड) तेणें रचिलें तें आवार।।

ii. (अ) तुका झालासे कळस।
(ब) निरूपणा केलें बोजा।
(क) खांब दिधला भागवत।
(ड) भजन करा सावकाश।
उत्तर:
(अ) खांब दिधला भागवत।
(ब) तुका झालासे कळस ।
(क)भजन करा सावकाश।
(ड) निरूपणा केलें बोजा।

प्रश्न 4.
काव्यपंक्तींवरून शब्दांचा योग्य क्रम लावा.
i. (अ) पाया, इमारत, फळा, आवार
(ब) नामा, संतकृपा, ज्ञानदेवें, देवालया
उत्तर:
(अ) इमारत, फळा, पाया, आवार
(ब) संतकृपा, ज्ञानदेवें, देवालया, नामा

ii. (अ) बोजा, खांब, भजन, सावकाश
(ब) तुकाराम, एकनाथ, बहिणी, जनार्दन
उत्तर:
(अ) खांब, भजन, सावकाश, बोजा
(ब) जनार्दन, एकनाथ, तुकाराम, बहिणी

प्रश्न 5.
कोण ते लिहा.
उत्तर:

प्रश्न 6.
सहसंबंध लिहा.
i. सावकाश : भजन :: फडकती :
ii. एकनाथ : खांब :: तुकाराम :
उत्तर:
i. ध्वजा
ii. कळस

कृती 3 : काव्यसौंदर्य

प्रश्न 1.
पुढील ओळींचा अर्थ स्पष्ट करा.
i. जनार्दन एकनाथ। खांब दिधला भागवत ।।
उत्तरः
संत जनार्दन व संत एकनाथ यांनी भागवत संप्रदायाची निर्मिती करून वारकरी संप्रदायाला त्याची जोड दिली. वारकरी संप्रदायाला व्यापक स्वरूप देण्याचा आटोकाट प्रयत्न या दोन्ही
संतांनी केला. संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले.

ii. तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।
उत्तरः
भक्तीची अंतिम अवस्था म्हणजेच संत तुकाराम महाराज होय. ज्ञानेश्वरांनी ज्ञानाच्या साहाय्याने निर्मिती केलेल्या या वारकरी संप्रदायरूपी इमारतीवर आपल्या अलौकिक भक्तीचा कळस चढवून खऱ्या अर्थाने तुकारामांनी वारकरी संप्रदायरूपी इमारतीला परिपूर्णता प्राप्त करून दिली. भक्तीच्या परिपूर्ण वैभवापर्यंत पोहोचवली. तसेच पूजाअर्चा, कर्मकांड यांमध्ये न पडता नामस्मरण (भजन) हा भक्तीचा सोपा मार्ग त्यांनी सर्वांना सांगितला.

iii. बहिणी म्हणे फडकती ध्वजा। निरूपणा केलें बोजा ।।
उत्तरः
संत बहिणाबाई सांगतात, या वारकरी संप्रदायरूपी इमारतीची
ध्वजा सतत फडकत ठेवण्याचे कार्य, त्याची धुरा सांभाळण्याचे काम मी माझ्या खांद्यावर घेतले आहे. ती एक प्रकारची जबाबदारी माझ्यावर आहे. निरूपणाच्या माध्यमातून मी वारकरी धर्माचा प्रचार व प्रसार करत आहे. निरूपणातून मी ही जबाबदारी पार पाडत आहे.

प्रश्न 2.
खालील काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्पष्ट करा,
i. संतकृपा झाली । इमारत फळा आली ।।1।।
उत्तरः
महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. या संतांनी आपल्या अलौकिक विचारांनी महाराष्ट्रात विठ्ठल भक्तीच्या वारकरी संप्रदायाची निर्मिती केली. या वारकरी संप्रदायरूपी इमारतीला संतांनी आपल्या विचारांनी, भक्तीच्या जोरावर मूर्तिमंत रूप दिले. जणूकाही संतांनी त्यावर कृपाच केली,

ii. ज्ञानदेवे रचिला पाया । उभारिलें देवालया ।।2।।
उत्तरः
या वारकरी संप्रदायरूपी इमारतीचा पाया ज्ञानेश्वरांनी रचला. आपल्या ज्ञान व भक्ती यांच्या जोरावर ‘ज्ञानेश्वरांनी’ या इमारतीचा पाया उभा केला. वारकरी संप्रदायाची स्थापना केली. त्यामुळेच आज शेकडो वर्षे झाली तरी हा वारकरी संप्रदाय दिवसेंदिवस वाढतच आहे.

ii. नामा तयाचा किंकर । तेणें रचिलें तें आवार ।।3।।
उत्तरः
संत बहिणाबाई सांगतात, या वारकरी संप्रदायाचा दास बनण्याचे महान कार्य संत नामदेव यांनी केले. त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार संपूर्ण भारतभर केला. वारकरी संप्रदायाचा दास बनून जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत वारकरी संप्रदायाचे संवर्धन व संगोपन केले, वारकरी संप्रदायाला व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले.

प्रश्न 3.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, यावर तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तरः
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकारामांपर्यंत अशा अनेक संतांचा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे. सर्व संतांनी जरी पंढरीच्या विठ्ठलाची भक्ती केलेली असली, तरीही समाजसेवेचे अनमोल कार्य करून त्यांनी लोकांना दया, क्षमा, प्रेम, भक्ती, शांती इत्यादी मूल्यांची ओळख करून दिलेली आहे. महाराष्ट्रातील संतांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अभंग रचना करून मराठी भाषेचा गोडवा वाढविलेला आहे. वारीला जाताना आजही लोक ज्ञानबा तुकाराम’ यांच्या नावाचा जयघोष करतात.

प्रश्न 4.
संतांचे कार्य नेहमी मार्गदर्शकच ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तरः
संत प्रकाशस्तंभाप्रमाणे असतात. ते भक्ताला अंधारातून बाहेर काढून ज्ञानज्योतीच्या दिव्य प्रकाशात नेत असतात. संत आपल्या आचरणातून इतरांना शिकवण देतात, म्हटलेच आहे की ‘आधी केले मग सांगितले’. संत ज्ञानेश्वरांनी स्वत:च्या आचरणातून लोकांना दया, क्षमा, शांती, परोपकार, अहिंसा अशा अनेक मूल्यांचे महत्त्व पटवून दिलेले आहे. नम्रपणा हा व्यक्तीचा सर्वात मोठा अलंकार आहे. हे पटवून देताना त्यांनी चांगदेवाचे केलेले गर्वहरण आपण कसे विसरू बरे.

समाजाचे भले करताना कितीही यातना झाल्या तरी त्या सोसाव्यात असे तुकोबा सांगतात, म्हणूनच संत जनाबाई म्हणतात, ‘संत जेणे व्हावे तेणे जगबोलणे सोसावे.’ अशाप्रकारे संतांचे कार्य हे आपणास नेहमी प्रेरणा देणारे असते. जीवनात येत असलेल्या संकटांना सामोरे जाण्याची शक्ती संतांच्या कार्यातूनच आपल्याला मिळते. म्हणून संतांचे कार्य नेहमी मार्गदर्शकच ठरते.

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा.

1. कवी/कवयित्रीचे नाव – संत बहिणाबाई
2. संदर्भ- ‘संतकृपा झाली’ हा अभंग संत बहिणाबाई यांनी लिहिला आहे. हा अभंग ‘सकलसंतगाथा खंड दुसरा: संत बहिणाबाईचे अभंग’ या पुस्तकातून घेतला आहे.
3. प्रस्तावना – ‘संतकृपा झाली’ हा अभंग ‘संत बहिणाबाई’ यांनी लिहिला आहे. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे, याचे सुंदर वर्णन या अभंगामध्ये ‘संत बहिणाबाई यांनी केले आहे.
4. वाङ्मयप्रकार – ‘संतकृपा झाली’ ही कविता एक अभंग आहे.
5. कवितेचा विषय – महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा आहे हे, दर्शविणारा संत बहिणाबाईंचा ‘संतकृपा झाली’ हा अभंग एक उत्कृष्ट भक्तिगीत आहे.

6. कवितेतील आवडलेली ओळ –
ज्ञानदेवे रचिला पाया।
उभारिलें देवालया।।

7. मध्यवर्ती कल्पना – महाराष्ट्र ही संतांची भूमी मानली आहे. या भूमीत अनेक संत जन्माला आले. या सगळ्या संतांनी तन, मन, धन अर्पण करून पंढरीच्या विठ्ठलाची भक्ती केली. त्याच्या भक्तीत सदैव दंग असलेल्या वारकरी संप्रदायाची उभारणी या संतांनी केली. त्यामध्ये संतांनी केलेल्या सहकार्याचे वर्णन ‘संतकृपा झाली’ या अभंगामध्ये केलेले आढळते.

8. कवितेतून मिळणारा संदेश –
महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत अनेक संतांनी जन्म घेतला आहे. या साऱ्या संतांनी सर्वस्व अर्पण करून पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती केली. त्याचे नामस्मरण केले. शिवाय सर्वसामान्य लोकांना भक्तिमार्गाकडे वळवले. त्यासाठी वारकरी संप्रदायाची उभारणी या महाराष्ट्रात केली. त्या संतांच्या कार्याचे महत्त्व अभ्यासून, आपणसुद्धा भक्तिमार्गाचा स्वीकार करावा, हाच संदेश ‘संतकृपा झाली’ या अभंगातून आपणास मिळतो.

9. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे –
‘संतकृपा झाली’ ह्य संत बहिणाबाई यांचा अभंग मला खूप आवडला आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची उभारणी संतांनी केली आहे. त्यांचे मोलाचे सहकार्य त्यासाठी लाभले आहे. या सर्वांचे भक्तिपूर्ण वर्णन करताना संत बहिणाबाईंनी या वारकरी संप्रदायाला देवालयाच्या इमारतीचे प्रतीक मानले आहे. इमारतीचा पाया, त्याचा किंकर, खांब, कळस, फडकणारी ध्वजा या प्रतिमांचा अगदी योग्य वापर संत बहिणाबाईंनी केलेला दिसतो.

10. भाषिक वैशिष्ट्ये –
संत बहिणाबाई यांच्या काव्यरचनेवर संत तुकारामांच्या काव्यरचनेचा प्रभाव दिसतो. तसेच त्यांच्या अभंगातून भक्तिभावना उत्कटपणे जाणवते. शिवाय त्यांच्या अभंगाची भाषा अतिशय साधी, सोपी, रसाळ आहे.

खालील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.

प्रश्न 1.
संतकृपा झाली। इमारत फळा आली।।
ज्ञानदेवे रचिला पाया। उभारिलें देवालया।।
उत्तर:
संत बहिणाबाई यांच्या ‘संतकृपा झाली’ या कवितेतून वरील काव्यपंक्ती घेतली आहे. संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे, याचे वर्णन केले आहे.

माराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. या संतांनी आपल्या अलौकिक विचारांनी महाराष्ट्रात विठ्ठलभक्तीच्या वारकरी संप्रदायाची निर्मिती केली. या वारकरी संप्रदायरूपी इमारतीला संतांनी आपल्या विचारांनी, भक्तीच्या जोरावर मूर्तिमंत रूप दिले. जणूकाही संतांनी त्यावर कृपाच केली. या वारकरी संप्रदायरूपी इमारतीचा पाया ज्ञानेश्वरांनी रचला.

‘ज्ञान’ व ‘भक्ती’ यांच्या जोरावर ज्ञानेश्वरांनी या इमारतीची पायाभरणी केली. वारकरी संप्रदायाची स्थापना केली. त्यामुळेच आज शेकडो वर्षे झाली तरी हा वारकरी संप्रदाय दिवसेंदिवस वाढतच आहे. संत बहिणाबाई यांच्या काव्यरचनेवर संत तुकारामांच्या काव्यरचनेचा प्रभाव दिसतो. तसेच त्यांच्या अभंगातून भक्तिभावना उत्कटपणे जाणवते. त्यांच्या अभंगाची भाषा अतिशय साधी, सोपी, रसाळ आहे.

प्रश्न 2.
नामा तयाचा किंकर । तेणे रचिलें तें आवार।।
जनार्दन एकनाथ। खांब दिधला भागवत।।
उत्तर:
संत बहिणाबाई यांच्या ‘संतकृपा झाली’ या कवितेतून वरील काव्यपंक्ती घेतली आहे. संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे, याचे वर्णन केले आहे. संत बहिणाबाई सांगतात, या वारकरी संप्रदायाचा दास बनण्याचे महान कार्य संत नामदेव यांनी केले. त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार संपूर्ण भारतभर केला.

वारकरी संप्रदायाचा दास बनून जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत वारकरी संप्रदायाचे संवर्धन व संगोपन केले. वारकरी संप्रदायाला व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले. संत जनार्दन व संत एकनाथ यांनी भागवत संप्रदायाची निर्मिती करून वारकरी संप्रदायाला त्याची जोड दिली. त्याला व्यापक स्वरूप देण्याचा आटोकाट प्रयत्न या दोन्ही संतांनी केला.

त्यांनी आपल्या या वारकरी संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले. संत बहिणाबाई यांच्या काव्यरचनेवर संत तुकारामांच्या काव्यरचनेचा प्रभाव दिसतो. तसेच त्यांच्या अभंगातून भक्तिभावना उत्कटपणे जाणवते. त्यांच्या अभंगाची भाषा अतिशय साधी, सोपी, रसाळ आहे.

प्रश्न 3.
तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।।
बहिणी म्हणे फडकती ध्वजा। निरूपणा केलें बोजा।।
उत्तर:
संत बहिणाबाई यांच्या ‘संतकृपा झाली’ या कवितेतून वरील काव्यपंक्ती घेतली आहे. संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे, याचे वर्णन केले आहे.

ज्ञानेश्वरांनी निर्मिती केलेल्या वारकरी संप्रदायरूपी इमारतीवर तुकारामांनी आपल्या अलौकिक भक्तीचा कळस चढवून खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायरूपी इमारतीला परिपूर्णता प्राप्त करून दिली. भक्तीच्या परिपूर्ण वैभवापर्यंत ही इमारत त्यांनी पोहोचवली, तसेच पूजाअर्चा, कर्मकांड यांमध्ये न पडता नामस्मरण (भजन) हा भक्तीचा सोपा मार्ग त्यांनी सर्वाना सांगितला.

संत बहिणाबाई सांगतात, अशा या वारकरी संप्रदायरूपी इमारतीची ध्वजा सतत फडकत ठेवण्याचे कार्य, त्याची धुरा सांभाळण्याचे काम मी माझ्या खांद्यावर घेतले आहे. ती एक प्रकारची जबाबदारी माझ्यावर आहे. निरूपणाच्या माध्यमातून मी वारकरी धर्माचा प्रचार व प्रसार करत आहे. निरूपणातून ती जबाबदारी मी पार पाडत आहे.

संत बहिणाबाई यांच्या काव्यरचनेवर संत तुकारामांच्या काव्यरचनेचा प्रभाव दिसतो. तसेच त्यांच्या अभंगातून भक्तिभावना उत्कटपणे जाणवते. त्यांच्या अभंगाची भाषा अतिशय साधी, सोपी, रसाळ आहे.

अभिव्यक्ती.

प्रश्न 1.
संतांचे कार्य नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तरः
संतांनी नेहमीच दया, क्षमा, शांती यांची शिकवण समाजाला दिली. आपल्या ज्ञानाच्या व भक्तीच्या जोरावरच त्यांनी समाजातील अज्ञान, अत्याचार, जातिभेद दूर करण्याचा प्रयत्न केला. मुक्या प्राणिमात्रांवर प्रेम करा, भूतदया हा सर्वात मोलाचा संदेश संतांनी समाजाला दिला. म्हणूनच की काय संत एकनाथांनी चंद्रभागेच्या त्या कडक उन्हाच्या वाळवंटात तहानेने तडफडत असलेल्या गाढवाला पाणी पाजले. त्याच वाळवंटात उन्हाने चटके बसल्यामुळे धाय मोकलून रडणाऱ्या मुलाला उचलून घेतले. म्हणजे नुसता उपदेश न देता आपल्या कृतीतून देखील पटवून दिले.

संतवाणी (आ) संतकृपा झाली – संत बहिणाबाई Summary in Marathi

कवयित्रीचा :

परिचय नाव : संत बहिणाबाई
कालावधी : 1668 – 1700
वारकरी संप्रदायातील संतकवयित्री. संत तुकाराम यांच्या शिष्या. ओव्या, श्लोक, आरत्या इत्यादी रचना प्रसिद्ध. संत तुकाराम यांच्या काव्यरचनेचा आणि व्यक्तिमत्त्वाचा बहिणाबाई यांच्या काव्यरचनेवर प्रभाव जाणवतो. भक्तिभावनेचा उत्कट आविष्कार हा त्यांच्या अभंगरचनेचा विशेष.

प्रस्तावना :

‘संतकृपा झाली’ हा अभंग संत बहिणाबाई यांनी लिहिला आहे. या अभंगात संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे, याचे वर्णन केलेले आहे.

Poetess Saint Bahinabai has written the Abhanga called “Santkrupa zali’. Maharashtra’s creed of Varkari’ and their establishment of religious doctrine has been taken care by saints who play important role in this establishment.

भावार्थ :

संतकृपा झाली । इमारत फळा आली ।।1।।
महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. या संतांनी आपल्या अलौकिक विचारांनी महाराष्ट्रात विठ्ठल भक्तीच्या वारकरी संप्रदायाची निर्मिती केली. या वारकरी संप्रदायरूपी इमारतीला संतांनी आपल्या विचारांनी, भक्तीच्या जोरावर मूर्तिमंत रूप दिले. जणूकाही संतांनी त्यावर कृपाच केली.

ज्ञानदेवे रचिला पाया । उभारिलें देवालया ।।2।।
या वारकरी संप्रदायरूपी इमारतीचा पाया ज्ञानेश्वरांनी रचिला. आपले ज्ञान व भक्ती यांच्या जोरावर ‘ज्ञानेश्वरांनी या इमारतीचा पाया उभा केला. वारकरी संप्रदायाची स्थापना केली. त्यामुळेच आज शेकडो वर्षे झाली तरी हा वारकरी संप्रदाय दिवसेंदिवस वाढतच आहे.

नामा तयाचा किंकर । तेणें रचिलें तें आवार ।।3।।
संत बहिणाबाई सांगतात, या वारकरी संप्रदायाचा दास बनण्याचे महान कार्य संत नामदेव यांनी केले. त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार संपूर्ण भारतभर केला. वारकरी संप्रदायाचा दास बनून जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत वारकरी संप्रदायाचे संवर्धन व संगोपन केले. वारकरी संप्रदायाला व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले.

जनार्दन एकनाथ । खांब दिधला भागवत ।।4।।
संत जनार्दन व संत एकनाथ यांनी भागवत संप्रदायाची निर्मिती करून वारकरी संप्रदायाला त्याची जोड दिली. वारकरी संप्रदायाला व्यापक स्वरूप देण्याचा आटोकाट प्रयत्न या दोन्ही संतांनी केला. संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले.

तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।5।।
भक्तीची अंतिम अवस्था म्हणजेच संत तुकाराम महराज होत. ज्ञानेश्वरांनी ज्ञानाच्या साहाय्याने निर्मिती केलेल्या या वारकरी संप्रदायरूपी इमारतीवर तुकारामांनी आपल्या अलौकिक भक्तीचा कळस चढवून खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायरूपी इमारतीला परिपूर्णता प्राप्त करून दिली. भक्तीच्या परिपूर्ण वैभवापर्यंत ही इमारत त्यांनी पोहोचवली. तसेच पूजाअर्चा, कर्मकांड यांमध्ये न पडता नामस्मरण (भजन) हा भक्तीचा सोपा मार्ग तुकाराम महाराजांनी सर्वांना सांगितला.

बहिणी म्हणे फडकती ध्वजा । निरूपणा केलें बोजा ।।6।।
संत बहिणबाई सांगतात, अशा या वारकरी संप्रदायरूपी इमारतीची ध्वजा सतत फडकत ठेवण्याचे कार्य, त्याची धुरा सांभाळण्याचे काम मी माझ्या खांद्यावर घेतले आहे. ती एकप्रकारची जबाबदारी माझ्यावर आहे. निरूपणाच्या माध्यमातून मी वारकरी धर्माचा प्रचार व प्रसार करत आहे. निरूपणातून ती जबाबदारी मी पार पाडत आहे.


इयत्ता नववी मराठी स्वाध्याय उपाय

निष्कर्ष

आम्हाला आशा आहे की महाराष्ट्रावरील हा लेख तुम्हाला 'नववी संतवाणी संतकृपा झाली – संत बहिणाबाई स्वाध्याय' मदत करेल. तुम्हाला काही प्रश्न असल्यास, त्यांना खाली टिप्पणी विभागात मोकळ्या मनाने पोस्ट करा. आम्ही लवकरात लवकर तुमच्याकडे परत येऊ.
Share:

0 Comments:

Post a Comment

Plus Two (+2) Previous Year Question Papers

Plus Two (+2) Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Physics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Chemistry Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Maths Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Zoology Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Botany Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Computer Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Computer Application Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Commerce Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Humanities Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Economics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) History Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Islamic History Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Psychology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Sociology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Political Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Geography Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Accountancy Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Business Studies Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) English Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Hindi Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Arabic Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Kaithang Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Malayalam Previous Year Chapter Wise Question Papers

Plus One (+1) Previous Year Question Papers

Plus One (+1) Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Physics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Chemistry Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Maths Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Zoology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Botany Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Computer Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Computer Application Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Commerce Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Humanities Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Economics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) History Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Islamic History Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Psychology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Sociology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Political Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Geography Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Accountancy Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Business Studies Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) English Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Hindi Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Arabic Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Kaithang Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Malayalam Previous Year Chapter Wise Question Papers
Copyright © HSSlive: Plus One & Plus Two Notes & Solutions for Kerala State Board About | Contact | Privacy Policy