Hsslive.co.in: Kerala Higher Secondary News, Plus Two Notes, Plus One Notes, Plus two study material, Higher Secondary Question Paper.

Saturday, February 12, 2022

इयत्ता नववी ‘बिग ५’ च्या सहवासात मराठी स्वाध्याय PDF

 

इयत्ता नववी ‘बिग ५’ च्या सहवासात मराठी स्वाध्याय PDF
इयत्ता नववी ‘बिग ५’ च्या सहवासात मराठी स्वाध्याय PDF


या लेखात, आम्ही ‘बिग ५’ च्या सहवासात विषयासाठी इयत्ता नववी मराठी सोल्यूशन्स देऊ. इयत्ता नववी मधील विद्यार्थी पाठ्यपुस्तकांमध्ये उपस्थित असलेल्या व्यायामांसाठी प्रश्न आणि उत्तरे डाउनलोड आणि कॉपी करण्यास सक्षम असतील.

इयत्ता नववी ‘बिग ५’ च्या सहवासाताच्या पुस्तकात महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमातील सर्व प्रश्नांचा समावेश आहे. येथे सर्व प्रश्न पूर्ण स्पष्टीकरणासह सोडवले आहेत आणि डाउनलोड करण्यासाठी विनामूल्य उपलब्ध आहेत. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता नववी ‘बिग ५’ च्या सहवासाताचे पुस्तक खाली दिले आहे. आम्‍हाला आशा आहे की आमच्‍या इयत्‍ता नववी वीच्‍या ‘बिग ५’ च्या सहवासाताचे पुस्‍तक तुमच्‍या अभ्यासात मदत करेल! जर तुम्हाला आमचे इयत्ता नववी चे पुस्तक आवडले असेल तर कृपया ही पोस्ट शेअर करा.


इयत्ता नववी ‘बिग ५’ च्या सहवासात स्वाध्याय

मंडळाचे नाव

Maharashtra Board

ग्रेडचे नाव

नववी

विषय

‘बिग ५’ च्या सहवासात

वर्ष

2022

स्वरूप

PDF/DOC

प्रदाता

hsslive.co.in

अधिकृत संकेतस्थळ

mahahsscboard.in


समाधानासह महाराष्ट्र बोर्ड आठवा स्वाध्याय कसे डाउनलोड करायचे?

महाराष्ट्र बोर्ड नववी स्वाध्याय PDF डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

  1. वेबसाइट- Hsslive ला भेट द्या. 'स्वाध्याय' लिंकवर क्लिक करा.
  2. महा बोर्ड नववी स्वाध्याय PDF पहा.
  3. आता महाराष्ट्र बोर्ड नववी स्वाध्याय तपासा.
  4. डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भांसाठी जतन करा.

इयत्ता नववी ‘बिग ५’ च्या सहवासात स्वाध्याय उपाय

इयत्ता नववी स्वाध्याय मधील विद्यार्थी खालील लिंक्सवरून ‘बिग ५’ च्या सहवासाताचे उपाय डाउनलोड करू शकतील.


1. केनिया पार्क्समध्ये फिरण्याचे थ्रिल पुढील मुद्दा विचारात घेऊन लिहा:

प्रश्न 1.
केनिया पार्क्समध्ये फिरण्याचे थ्रिल पुढील मुद्दा विचारात घेऊन लिहा:
गेम ड्राइव्ह
उत्तर:
जंगलाचा फेरफटका मारणे म्हणजे ‘गेम ड्राइव्ह’ करणे व जंगलातील दुर्मीळ जनावरांचा शोध घेणे हे ‘थ्रिल’ असते. केनियाच्या पार्कमध्ये रोज सकाळ-संध्याकाळ प्रत्येकी चार-पाच तास ‘गेम ड्राइव्ह’ करण्याचा कार्यक्रम लेखकांनी आखला होता. पूर्ण प्रवासासाठी मॅटाडोर गाड्या व फोरव्हीलर्स उपलब्ध होत्या. जंगलात फिरताना मोटारीचे छप्पर उघडण्यात येते.

त्यातून जनावरांना जवळून पाहता येते व त्यांचे फोटो मनसोक्त काढता येतात. प्रत्येक मोटारीत वायरलेस सेट असतो. हेतू हा की वाहनांचा एकमेकांशी संपर्क राहतो. आणीबाणीच्या प्रसंगी त्याचा उपयोग होतो. शिवाय कुठे एखादे दुर्मीळ जनावर दिसले, की तिथे पोहोचा, अशा प्रकारच्या सूचनाही देता येतात.

2. टिपा लिहा:

प्रश्न 1.
केनियातील पर्यटन क्षेत्राबाबत तेथील सरकारची भूमिका.
उत्तर : पर्यटन क्षेत्र विकसित करण्याबाबत केनिया सरकार अतिशय दक्ष आहे. पर्यटकांनी जंगलात फिरताना कोणती दक्षता घ्यावी, याबाबत सरकारने काही नियम केले आहेत. मोटारीतून फिरताना पर्यटकांनी शक्यतो मुख्य रस्ता सोडून आत जाऊ नये. एखादा दुर्मीळ प्राणी दिसला, तरच तात्पुरते झुडपात शिरावे, पण लवकर मुख्य रस्त्यावर यावे.

जनावरांशी बोलू नये, टाळ्या वाजवू नयेत व त्यांना खादय देऊ नये. सिंह, गेंडा, लेपर्ड-चित्ता यांच्या सभोवताली पाचपेक्षा जास्त मोटारींनी थांबू नये. जनावरांचा पाठलाग करू नये. त्यांना त्रास देऊ नये. नियमांचे पालन न करणाऱ्या पर्यटकांना दंड करून लगेच पार्कबाहेर काढण्याचे अधिकार केनिया सरकारने तेथील रेंजर्सना दिले आहेत.

प्रश्न 2.
‘बिग 5’चे थोडक्यात वर्णन.
उत्तर:
सिंह, लेपर्ड-चित्ता, गेंडा, हत्ती व जंगली म्हैस या पाचही प्राण्यांची जमिनीवर शिकार करणे अत्यंत अवघड आहे. तसेच ते आकाराने मोठे असल्यामुळे त्यांना ‘बिग 5’ असे म्हणतात. सिंहाचे सुमारे तीस जणांचे कुटुंब असते. दिवसाचे वीस तास सिंह आळसावून पडलेला असतो. तो क्वचित शिकार करतो. सिंहाला जंगलात एकही शत्रू नाही. सिंहाचा एकमेव शत्रू माणूस होय. लेपर्डची शेपटी लांब व टोकापासून मध्यापर्यंत तिच्यावर ठिपके असतात.

लेपर्ड सूर्यास्ताच्या वेळी किंवा रात्री शिकार करतो. तो सावजाला ओढत झाडावर नेतो. त्याचे आयुष्य वीस वर्षे असते. त्याच्या कातडीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जबरदस्त मागणी आहे. चित्ता हा सर्वांत अतिचपळ प्राणी ताशी 100 किमी वेगाने पळतो. त्याची शिकार करण्याची पद्धत वेगळी आहे. तो सावजाजवळ दबकत जातो, एकदम हल्ला करतो व गुदमरून मारतो. शिकार खायची नसेल, तर ती पालापाचोळचाने झाबून ठवतो.

3. पाठाच्या आधारे सिंहाचे कुटुंब व लेखकाचे कुटुंब यांच्या भेटीचा प्रसंग तुमच्या शब्दांत लिहा.

प्रश्न 1.
पाठाच्या आधारे सिंहाचे कुटुंब व लेखकाचे कुटुंब यांच्या भेटीचा प्रसंग तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
लेखक नकुरू ते मसाईमारा असा मोटारीने प्रवास करीत होते. दुपारचे जेवण आटोपून ते मारा सरिना लॉजकडे जात होते. इतक्यात फरीदने गाडी कमरेएवढ्या उंच गवतात घुसवली. पाहतात तो काय, गवतात वनराज सिंह मस्त विश्रांती घेत होते. सारे कुटुंब समोर आले. दोन-तीन सिंहिणी नि त्यांची दहा बाळे. शेजारी एक म्हैस मरून पडली होती. चारपाच बछडे व सिंहिणी त्यावर ताव मारत होत्या.

खाऊन झाल्यामुळे सिंहराज तृप्तीने विसावले होते. एक सिंहीण सिंहाजवळ आली आणि ‘मी पाणी पिऊन येते, तू जरा बछड्यांना सांभाळ’ सिंहाला सांगून निघून गेली, असा जणू त्यांचा संवाद झाला असावा, असे लेखकांना वाटले. सर्व सिंह कुटुंबीय मोटारीला खेटून मोटारीच्या सावलीत मस्त पहुडले होते. एक बछडा सिंहाच्या आयाळीशी खेळत होता. त्यावर सिंहाने पंजा उगारून जणू ‘त्रास देऊ नकोस’ असे त्याला बजावले असावे. हा सगळा चित्तथरारक सोहळा ‘डिस्कव्हरी चॅनेल’वर पाहावा, तसा लेखकांच्या कुटुंबीयांनी अनुभवला.

प्रवासवर्णन लिहूया:

प्रवासवर्णन म्हणजे एखादया स्थळाला भेट देऊन आल्यानंतर त्या ठिकाणचे घेतलेले अनुभव व त्या ठिकाणी पाहिलेल्या स्थळांचे बारकाव्यांसह निरीक्षण शब्दबद्ध करणे होय.

प्रश्न 1.
प्रवासवर्णन कसे लिहावे?
प्रवास वर्णन लिहिताना त्यात खालील मुद्द्यांचा विचार व्हावा.
1. प्रवासाचे ठिकाण: ठरवलेल्या ठिकाणची भौगोलिक, ऐतिहासिक वैशिष्ट्ये, तेथील हवामान स्थिती, नियोजित ठिकाणी पोहोचण्याचे मार्ग या सगळ्याच्या पूर्वतयारीविषयी थोडक्यात माहिती घेणे आवश्यक आहे.

2. नेमके काय पाहिले: जिथे भेट देणार तिथले लोकजीवन, संस्कृती, वेशभूषा, बोलीभाषा खाद्यपदार्थ आणि अर्थातच निसर्ग, ऐतिहासिक, भौगोलिक महत्त्व इत्यादी.

3. सूक्ष्म निरीक्षण: प्रवास करताना निरीक्षणातून लक्षात आलेले छोटे बारकावे, तपशिलांची नोंद करून ठेवावी. लेख लिहिताना अशी काही निरीक्षणे नोंदवल्यास आपल्या लिखाणाला वेगळे परिमाण मिळते.

4. सहज संवादात्मक लेखन: प्रवासवर्णनाची शैली ही उत्कंठावर्धक तरीही सहज असावी. लिखाणातला ओघ कायम राहील याचे भान ठेवावे.

5. संस्मरणीय प्रसंग: प्रवासाचा आनंद घेता-घेता घडणाऱ्या अनपेक्षित घटना, प्रसंग, क्वचितप्रसंगी आलेल्या अडचणी, त्यांवर केलेली मात याचा उल्लेख प्रवासवर्णन लिहिताना जरूर करावा. प्रवासवर्णन म्हणजे प्रवासाच्या तयारीपासून सुरू होणारा हा सिलसिला प्रवास संपून, मूळ जागी येऊन स्वस्थता मिळेपर्यंत अव्याहतपणे आपसूक सुरूच असतो.

प्रवासातील वेगळेपण, निरनिराळ्या व्यक्ती, आलेले हटके अनुभव, काही अद्भुत गोष्टी या सर्वांची एक सुंदर अनुभूती तयार होते. सखोल निरीक्षणातून ती उठावदार बनते. त्यातून प्रवासवर्णन हा एक बोलका, अक्षरबद्ध नजारा तयार होतो. त्यामुळेच निरीक्षणे, माहिती, वैशिष्ट्ये, आलेल्या अडचणी आणि विलक्षण अनुभव तसेच केलेली धमाल, या सर्व गोष्टी सहजपणे लिहिल्या की प्रवासवर्णन तयार होते.


इयत्ता नववी मराठी स्वाध्याय उपाय

निष्कर्ष

आम्हाला आशा आहे की महाराष्ट्रावरील हा लेख तुम्हाला 'नववी ‘बिग ५’ च्या सहवासात स्वाध्याय' मदत करेल. तुम्हाला काही प्रश्न असल्यास, त्यांना खाली टिप्पणी विभागात मोकळ्या मनाने पोस्ट करा. आम्ही लवकरात लवकर तुमच्याकडे परत येऊ.
Share:

0 Comments:

Post a Comment

Plus Two (+2) Previous Year Question Papers

Plus Two (+2) Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Physics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Chemistry Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Maths Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Zoology Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Botany Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Computer Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Computer Application Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Commerce Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Humanities Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Economics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) History Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Islamic History Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Psychology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Sociology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Political Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Geography Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Accountancy Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Business Studies Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) English Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Hindi Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Arabic Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Kaithang Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Malayalam Previous Year Chapter Wise Question Papers

Plus One (+1) Previous Year Question Papers

Plus One (+1) Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Physics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Chemistry Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Maths Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Zoology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Botany Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Computer Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Computer Application Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Commerce Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Humanities Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Economics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) History Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Islamic History Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Psychology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Sociology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Political Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Geography Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Accountancy Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Business Studies Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) English Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Hindi Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Arabic Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Kaithang Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Malayalam Previous Year Chapter Wise Question Papers
Copyright © HSSlive: Plus One & Plus Two Notes & Solutions for Kerala State Board About | Contact | Privacy Policy