Hsslive.co.in: Kerala Higher Secondary News, Plus Two Notes, Plus One Notes, Plus two study material, Higher Secondary Question Paper.

Saturday, February 5, 2022

इयत्ता दहावी तू बुद्धी दे मराठी स्वाध्याय PDF

 

इयत्ता दहावी तू बुद्धी दे मराठी स्वाध्याय PDF
इयत्ता दहावी तू बुद्धी दे मराठी स्वाध्याय PDF


या लेखात, आम्ही तू बुद्धी दे विषयासाठी इयत्ता दहावी मराठी सोल्यूशन्स देऊ. इयत्ता दहावी मधील विद्यार्थी पाठ्यपुस्तकांमध्ये उपस्थित असलेल्या व्यायामांसाठी प्रश्न आणि उत्तरे डाउनलोड आणि कॉपी करण्यास सक्षम असतील.

इयत्ता दहावी तू बुद्धी देाच्या पुस्तकात महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमातील सर्व प्रश्नांचा समावेश आहे. येथे सर्व प्रश्न पूर्ण स्पष्टीकरणासह सोडवले आहेत आणि डाउनलोड करण्यासाठी विनामूल्य उपलब्ध आहेत. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी तू बुद्धी देाचे पुस्तक खाली दिले आहे. आम्‍हाला आशा आहे की आमच्‍या इयत्‍ता दहावी वीच्‍या तू बुद्धी देाचे पुस्‍तक तुमच्‍या अभ्यासात मदत करेल! जर तुम्हाला आमचे इयत्ता दहावी चे पुस्तक आवडले असेल तर कृपया ही पोस्ट शेअर करा.


इयत्ता दहावी तू बुद्धी दे स्वाध्याय

मंडळाचे नाव

Maharashtra Board

ग्रेडचे नाव

दहावी

विषय

तू बुद्धी दे

वर्ष

2022

स्वरूप

PDF/DOC

प्रदाता

hsslive.co.in

अधिकृत संकेतस्थळ

mahahsscboard.in


समाधानासह महाराष्ट्र बोर्ड आठवा स्वाध्याय कसे डाउनलोड करायचे?

महाराष्ट्र बोर्ड दहावी स्वाध्याय PDF डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

  1. वेबसाइट- Hsslive ला भेट द्या. 'स्वाध्याय' लिंकवर क्लिक करा.
  2. महा बोर्ड दहावी स्वाध्याय PDF पहा.
  3. आता महाराष्ट्र बोर्ड दहावी स्वाध्याय तपासा.
  4. डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भांसाठी जतन करा.

इयत्ता दहावी तू बुद्धी दे स्वाध्याय उपाय

इयत्ता दहावी स्वाध्याय मधील विद्यार्थी खालील लिंक्सवरून तू बुद्धी देाचे उपाय डाउनलोड करू शकतील.


काव्यपरिचय

‘तू बुद्धी दे’ ही प्रार्थना कवी ‘गुरू ठाकूर’ यांनी लिहिली आहे. या प्रार्थनेत सन्मार्ग, सन्मती आणि सत्संगती यांचे महत्त्व कवीने दाखवून दिले आहे. कायम सत्याची कास धरून संवेदनशीलता जपण्यासाठी ताकद मिळावी, अनाथांचे नाथ होण्यास बळ मिळावे व या शाश्वत सौंदर्याचा ध्यास लागावा, ही भावना कवीने या प्रार्थनेतून व्यक्त केली आहे.

Tu Buddhi de’ is a prayer composed by Guru Thakur. It highlights the importance of the right path, good thoughts, and good company. The poet has prayed for truth and sensitivity. He suggests that one should have courage to be the saviour of orphans.

भावार्थ

तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे
जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे

नित्य पठणीय अशी ही प्रार्थना आहे. कवी सांगतात की, हे ईश्वरा, तू आम्हाला बुद्धी दे. तू नवविचारांचे तेज दे. आपल्यामध्ये नवचेतना जागवण्यास विश्वास दे. या धरतीवर जे सत्य, सुंदर आहे. जे अजरामर आहे, जे सर्व ठिकाणी भरून राहिलेले आहे त्या सर्वांचा ध्यास माझ्या मनात जीवनभर राहू दे. म्हणजेच जे सदैव सत्य, सुंदर आहे त्याचे माझ्याकडून व्यवस्थित पालन व्हावे. तसेच त्याचप्रकारच्या नवनिर्मितीचा ध्यास म्हणजे उत्कट इच्छा आजन्म माझ्या मनात राहू दे.

हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती,
सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी
साधना करिती तुझी जे नित्य तव सहवास दे

ज्यांचा कोणी पालनकर्ता नाही, ज्यांचा सांभाळ करणारे असे कोणी नाही, ज्यांना माया देणारे आभाळ नाही त्यांचा तू सोबती-सखा बन. त्यांना आश्रय देण्याचे काम तू कर. त्यांना मायेची सावली देण्याचे काम कर. जे जीवनाच्या वाटेवर प्रवास करताना भरकटलेले आहेत, ज्यांना जीवनाच्या सार्थकतेची वाट सापडत नाही त्यांचा तू सारथी बनून मार्ग दाखवण्याचे काम कर. तुझी जे साधना करतात, नित्य तुझी जे प्रार्थना करतात. त्यांना तू सतत तुझा सहवास दे. म्हणजेच तू नेहमीच त्यांच्या सोबत राहा.

जाणावया दुर्बलांचे दु:ख आणि वेदना
तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना
धमन्यातल्या रुधिरास या खल भेदण्याची आस दे
सामर्थ्य या शब्दांस आणि अर्थ या जगण्यास दे

या जगात जे दुर्बल आहेत, त्यांचे दुःख आणि वेदना जाणून घेण्यासाठी माझ्या शरीरातील रंधा-रंध्रात सतत संवेदना तेवत ठेवण्याचे काम तू कर. माझ्या मधील संवेदना सतत जागृत ठेवण्याचे काम तू कर. दुःखितांचे दुःख दूर करण्याची आस माझ्या शरीरातील प्रत्येक धमन्यातून वाहणाऱ्या रक्तात असू दे. ही शब्दरूपी काव्य सुमने मी तुझ्यापुढे ठेवतो. त्या सर्व शब्दास आणि माझ्या संपूर्ण जगण्यास एक प्रकारचा अर्थ तू दे. जेणेकरून माझा जन्म दुर्बलांचे दु:ख दूर करण्यासाठी उपयोगी पडेल.

सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती
नीती ना ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती
पंखास या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे

मला सतत चांगला मार्ग आणि चांगली बुद्धी लाभू दे. सतत चांगल्या, सज्जन माणसांची संगत मिळू दे. माझ्या जीवनात कितीही संकटे आली तरी मी माझ्या कर्तव्यापासून कधी दूर होणार नाही, अशी माझी नितीमत्ता राहू दे. माझे आचरण कधीही भ्रष्ट होऊ नये. जीवनरूपी वाटेवरून प्रवास पार करण्यासाठी या पंखांना तू बळ दे. कायम सत्याची कास धरून संवेदनशीलता जपण्यासाठी तसेच आकाशात झेपावण्यासाठी बळ दे. म्हणजेच सतत सौंदर्याचा ध्यास माझ्या मनात राहू दे आणि तो ध्यास पूर्ण करण्यासाठी नवे आकाश म्हणजेच आकाशाएवढ्या नव्या संध्या तू निर्माण कर, की ज्यामध्ये मी माझे कर्तृत्व दाखवू शकेन.

शब्दार्थ

तेज – उत्साह – (energy, vigour)
नव – नवीन – (new) 
चेतना – उत्तेजन, प्रोत्साहन – (inspiration)
सर्वथा – सदैव, सर्व अर्थांनी –
आजन्म – आयुष्यभर, जन्मभर – (lifetime)
ध्यास – उत्कट इच्छा – (agreat longing)
तयांचा – त्यांचा – (to him)
सोबती – सखा, मित्र – (friend)
सापडेना – मिळेना – (not Found)
वाट – रस्ता, मार्ग – (way)
साधना – तपश्चर्या – (learring the hard way)
करिती – करतात – (todo)
नित्य – रोज – (daily)
तव – त्यांना – (to him) 
जाणवाया – जाणून घेण्यासाठी – (to understand)
दुर्बल – ज्यांच्यात बल (शक्ती) नाही – (weak, feeble)
तेवत्या – तेवत (जळणे) – (to be lit)
सदा – सतत – (always)
संवेदना – सह वेदना – (sensation)
खल – दुष्ट – (wicked)
भेदणे – दूर करणे
आस – इच्छा, आवड – (a great longing)
सामर्थ्य – शक्ती – (power, strength)
सन्मार्ग – चांगला मार्ग – (true way)
सन्मती – चांगली बुद्धी – (good thoughts)
लाभो – मिळणे – (to get)
सत्संगती – चांगली संगत (सोबत) – (good company)
भ्रष्ट – वाईट – (polluted)
बळ – शक्ती – (power) 
झेपावण्या – उडण्यासाठी – (to spring or leap)
सारथी – मार्गस रस्ता, दिशा दाखवणारा
रंध – त्वचेवरील अतिसूक्ष्म छिद्र – (pores)
धमन्या – संपूर्ण शरीरभर रक्त वाहून नेणाऱ्या नसा/नाडी – (veins)
रुधिर – रक्त – (blood)
नीती – सदाचाराचे नियम


इयत्ता दहावी मराठी स्वाध्याय उपाय

निष्कर्ष

आम्हाला आशा आहे की महाराष्ट्रावरील हा लेख तुम्हाला 'दहावी तू बुद्धी दे स्वाध्याय' मदत करेल. तुम्हाला काही प्रश्न असल्यास, त्यांना खाली टिप्पणी विभागात मोकळ्या मनाने पोस्ट करा. आम्ही लवकरात लवकर तुमच्याकडे परत येऊ.
Share:

0 Comments:

Post a Comment

Plus Two (+2) Previous Year Question Papers

Plus Two (+2) Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Physics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Chemistry Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Maths Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Zoology Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Botany Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Computer Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Computer Application Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Commerce Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Humanities Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Economics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) History Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Islamic History Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Psychology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Sociology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Political Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Geography Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Accountancy Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Business Studies Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) English Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Hindi Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Arabic Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Kaithang Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Malayalam Previous Year Chapter Wise Question Papers

Plus One (+1) Previous Year Question Papers

Plus One (+1) Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Physics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Chemistry Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Maths Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Zoology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Botany Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Computer Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Computer Application Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Commerce Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Humanities Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Economics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) History Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Islamic History Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Psychology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Sociology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Political Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Geography Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Accountancy Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Business Studies Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) English Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Hindi Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Arabic Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Kaithang Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Malayalam Previous Year Chapter Wise Question Papers
Copyright © HSSlive: Plus One & Plus Two Notes & Solutions for Kerala State Board About | Contact | Privacy Policy