Hsslive.co.in: Kerala Higher Secondary News, Plus Two Notes, Plus One Notes, Plus two study material, Higher Secondary Question Paper.

Saturday, February 5, 2022

इयत्ता दहावी दोन दिवस मराठी स्वाध्याय PDF

 

इयत्ता दहावी दोन दिवस मराठी स्वाध्याय PDF
इयत्ता दहावी दोन दिवस मराठी स्वाध्याय PDF


या लेखात, आम्ही दोन दिवस विषयासाठी इयत्ता दहावी मराठी सोल्यूशन्स देऊ. इयत्ता दहावी मधील विद्यार्थी पाठ्यपुस्तकांमध्ये उपस्थित असलेल्या व्यायामांसाठी प्रश्न आणि उत्तरे डाउनलोड आणि कॉपी करण्यास सक्षम असतील.

इयत्ता दहावी दोन दिवसाच्या पुस्तकात महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमातील सर्व प्रश्नांचा समावेश आहे. येथे सर्व प्रश्न पूर्ण स्पष्टीकरणासह सोडवले आहेत आणि डाउनलोड करण्यासाठी विनामूल्य उपलब्ध आहेत. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी दोन दिवसाचे पुस्तक खाली दिले आहे. आम्‍हाला आशा आहे की आमच्‍या इयत्‍ता दहावी वीच्‍या दोन दिवसाचे पुस्‍तक तुमच्‍या अभ्यासात मदत करेल! जर तुम्हाला आमचे इयत्ता दहावी चे पुस्तक आवडले असेल तर कृपया ही पोस्ट शेअर करा.


इयत्ता दहावी दोन दिवस स्वाध्याय

मंडळाचे नाव

Maharashtra Board

ग्रेडचे नाव

दहावी

विषय

दोन दिवस

वर्ष

2022

स्वरूप

PDF/DOC

प्रदाता

hsslive.co.in

अधिकृत संकेतस्थळ

mahahsscboard.in


समाधानासह महाराष्ट्र बोर्ड आठवा स्वाध्याय कसे डाउनलोड करायचे?

महाराष्ट्र बोर्ड दहावी स्वाध्याय PDF डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

  1. वेबसाइट- Hsslive ला भेट द्या. 'स्वाध्याय' लिंकवर क्लिक करा.
  2. महा बोर्ड दहावी स्वाध्याय PDF पहा.
  3. आता महाराष्ट्र बोर्ड दहावी स्वाध्याय तपासा.
  4. डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भांसाठी जतन करा.

इयत्ता दहावी दोन दिवस स्वाध्याय उपाय

इयत्ता दहावी स्वाध्याय मधील विद्यार्थी खालील लिंक्सवरून दोन दिवसाचे उपाय डाउनलोड करू शकतील.


प्रश्न 1.
कृती पूर्ण करा.
(अ) ‘रोजची भूक भागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांमुळे आयुष्याचे दिवस वाया गेलेत’ या आशयाची कवितेतील ओळ शोधा.
उत्तर:
‘भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली’.

(आ) कवीचा प्रयत्नवाद आणि आशावाद दाखवणारी ओळ लिहा.
उत्तर:
‘दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो’

प्रश्न 2.
एका शब्दांत उत्तर लिहा.
(अ) कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट – [             ]
(आ) कवीचा जवळचा मित्र – [             ]
उत्तर:
(अ) हात
(आ) अश्रु

प्रश्न 3.
खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
(अ) माना उंचावलेले हात ……………………….
(आ) कलम केलेले हात ……………………….
(इ) दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात ……………………….
उत्तर:
(i) माना उंचावलेले हात – आशावादाने उभारलेले हात.
(i) कलम केलेले हात – निराशेने खाली झुकलेले हात.
(iii) दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात – हतबल झालेले हात.

प्रश्न 4.
काव्यसौंदर्य.

(अ) खालील ओळींचे रसग्रहण करा.
‘दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे’
उत्तरः
नारायण सुर्वे यांच्या ‘दोन दिवस’ या कवितेच्या वरील दोन ओळीतून आपल्या जीवनाचा आलेख अगदी साध्या सोप्या भाषेत मांडला आहे. जीवन जगण्याच्या संघर्षात अडकलेल्या प्रत्येक साधारण माणसाच्या मनोव्यवस्थेचे प्रतिनिधीत्व ते आपल्या कवितेतून करतात.

रोज तेच दु:ख, रोज नवी समस्या, रोजची तीच निराशा, रोजचा तोच संघर्ष पण जीवन जगण्याचा कविचा आशावाद प्रचंड आहे. दोन चांगल्या दिवसाची ते वाट पाहतात. आयुष्याचे दिवस किती शिल्लक राहिलेत याचा हिशोब करतात.

(आ) ‘दु:ख पेलावे आणि पुन्हा जगावे’, या वाक्यामागील तुम्हांला जाणवलेला विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तरः
कवी नारायण सुर्वे यांच्या जीवनसंघर्षाचे वर्णन दोन दिवस या कवितेतून केले आहे. कवी म्हणतो की जीवनातल्या दुःखाला न घाबरता न डगमगता सामोरे जावे. कारण दुःख माणसाला खूप काही शिकवून जाते. दु:खावर मात करत असतांना आपल्यातल्या अनेक क्षमतांची अनुभुती येऊन परिस्थितीवर मात करणे, समायोजन करणे, नवीन पर्याय शोधणे या अनेक बाबीतून दु:ख पेलण्याची ताकद माणसात निर्माण होते. म्हणून कवी म्हणतो. जीवनातल्या दुःखाने निराश, हताश न होता सामर्थ्याने विपरित परिस्थितीला सामोरे जावे आणि जीवनात पुन्हा ताकदीने उभे रहावे. हेच जिवनचे खरे सत्य आहे.

(इ) कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी तुमच्या भावना लिहा.
उत्तरः
‘दोन दिवस’ या नारायण सुर्वे यांच्या कवितेवरून विविध सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कष्टकऱ्यांचे जीवनचित्र समोर उभे राहते. अनेक ठिकाणी, अनेक प्रकारचे कष्ट आणि अत्यंत श्रमाचे काम करणारे कष्टकरी आपण पाहतो. ऊन, वारा, पाऊस अशा सगळ्या गोष्टी अंगावर झेलून ते सदैव श्रम करत असतात, जीवनासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी त्यांना उपलब्ध करून दिलेल्या नसतात. जीवनाची हमी नसते. अत्यंत कमी वेतनावर ते प्रचंड मेहनतीचे काम करत असतात. त्यांना जीवन जगणे खूप कठीण जाते. रोज काम मिळण्याची शाश्वती नसते. अशाप्रकारे आपल्या देशात कष्टकऱ्यांचे जीवन अत्यंत कठीण आहे.

(ई) ‘कवितेत व्यक्त झालेले जीवनसत्य’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तरः
माणसाच्या जीवनात सुख आणि दुःख या दोन गोष्टी सदैव असतात. कधी सुखाचे दिवस असतात, तर कधी दुःखाचे, असे असले तरी कोणताही काळ हा कायम राहत नाही. दुःखातून माणूस अनेक गोष्टी शिकतो व उदयाच्या चांगल्या दिवसाची अपेक्षा करत जगत राहतो. माणसाने कवी सारखं आशावादी राहिलं पाहिजे. दुःखातही सुख येईल अशी आशा बाळगली पाहिजे, म्हणजे जगणं सोपं होतं.

Marathi Akshar Bharati Class 10 Textbook Solutions Chapter 5 दोन दिवस Additional Important Questions and Answers

प्रश्न १. पुढील पक्ष्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:
कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा.

प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
(i) भाकरीचा चंद्र शोधण्यात बरबाद झालेली – कवीची जिंदगी
(ii) कवीचे सर्वस्व – कवीचे हात
(iii) कवीच्या मदतीसाठी धावून आलेला मित्र – अश्रु
(iv) झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे शेकले – कवीचे आयुष्य

प्रश्न 3.
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
(i) कवीने याचा विचार हरघडी केला……
(अ) भाकरीचा
(आ) दुःखाचा
(इ) जीवनाचा
(ई) दुनियेचा
उत्तर:
दुनियेचा

कृती २: आकलन कृती

प्रश्न 1.
खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
(i) साहाय्यास धावून येणारे कवीचे मित्र कोण?
उत्तर :
साहाय्यास धावून येणारे कवीचे मित्र म्हणजे कवीचे अश्रू होय.

(i) कवीने चंद्राला कोणाची उपमा दिली आहे?
उत्तर :
कवीने चंद्राला ‘भाकरीची’ उपमा दिली आहे.

प्रश्न 2.
योग्य जोड्या जुळवा.
‘अ’ गट – ‘ब’ गट
(i) कवी मोजत असलेले – (अ) पोलाद
(ii) कवीची शाळा – (ब) जीवनाचे दिवस
(iii) कवीचे सर्वस्व – (क) संपूर्ण जग
(iv) झोतभट्टी – (ड) कवीचे हात
उत्तर:
(i – ब),
(ii – क),
(iii – ड),
(iv – अ)

प्रश्न 3.
आकृतिबंध पूर्ण करा,

प्रश्न 4.
‘दुनियेचा’ असे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तर:
कवीने हरघडी कोणाचा विचार केला?

प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) ………………… करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे. (हिशोब, गणित, मोजत, जमा)
(ii) झोतभट्टीत शेकावे ………………… तसे आयुष्य छान शेकले. (सोने, चांदी, पोलाद, लोखंड)
उत्तर:
(i) हिशोब
(ii) पोलाद

कृती ३: कवितेतील शब्दांचा अर्थ

प्रश्न 1.
खालील कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा.
(i) दिवस
(ii) हिशोब
(iii) डोईवर
(iv) चंद्र
उत्तर:
(i) दिन
(ii) गणना
(iii) डोक्यावर
(iv) शशी, सुधाकर

कृती ४ : काव्यसौंदर्य

प्रश्न 1.
‘झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले’ वरील ओळीतून कवी नारायण सुर्वे यांना काय सांगायचे आहे ते तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
गरिबीत जीवन जगत असलेले नारायण सुर्वे जगाच्या प्रचंड मोठ्या शाळेत शिकत होते. रोजचे नव-नवे दाहक अनुभव, अपमान, उपेक्षा, भूकेचा संघर्ष, कधी प्रेमाचा ओलावा तर कधी तिरस्काराचा फटकारा सहन करत होते. या रोजच्या अनुभवातून ते खूप काही शिकत होते. धडपडत होते, निराश होत होते, पण जगणं निरंतर सुरू होतं. त्यांच्या भोवतीच जग म्हणजे त्यांच्यासाठी एखादया मोठ्या प्रचंड तप्त भट्टीसारखं होतं. जसं भट्टीत पोलाद तप्त होत आणि मजबूत होऊन बाहेर पडतं. अगदी त्याचप्रमाणे कवी नारायण सुर्वे दुःख, दारिद्र्याशी सामना करत जीवन जगण्यासाठी नव्या उमेदीने तयार होत.

प्रश्न २. दिलेल्या मुद्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवाः

(१) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री:
नारायण सुर्वे

(२) प्रस्तुत कवितेचा विषयः
कष्टकरी, गरीब जनतेचा जगण्यासाठीचा संघर्ष दाखवून दिला आहे.

(४) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश:
माणसाच्या जीवनात सुख आणि दुःख सतत येत असतात. कधी सुखाचे दिवस असतात तर कधी दुःखाचे दिवस येतात. असे असले तरी कोणताही काळ हा कायम राहत नाही. दुःखातून माणूस अनेक गोष्टी शिकतो व उदयाच्या चांगल्या दिवसाची अपेक्षा करत जगत राहतो. माणसाने कवीसारखे आशावादी राहिले पाहिजे. दुःखातही सुख येईल अशी आशा बाळगली पाहिजे म्हणजे आपले जगणे सोपे होते, असाच संदेश या कवितेतून मिळतो…

(५) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारणः
कवी नारायण सुर्वे यांची ‘दोन दिवस’ ही कविता मला खूप आवडली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे भाकरीचा चंद्र शोधण्यात ज्यांची जिंदगी बरबाद होते त्या सगळ्या कष्टकरी, कामगार,श्रमिक, गरीब लोकांचा सोशिकपणा, त्यांचा संयम, त्यांचे दु:ख कवीने सहजपणे वाचकांसमोर मांडले आहे. कवीने वेदनेचा भाव कोणत्याही प्रकारची चीड, संताप किंवा आक्रस्ताळेपणाने न मांडता अत्यंत संयमी आणि सुयोग्य प्रतिकांचा वापर करून मांडले आहे. सर्वस्व असलेले हात, माना उंचावलेले हात, कलम झालेले हात यांसारखी प्रतिके मनाला अंतर्मुख करून जातात. त्यामुळेच ही कविता मनाला भिडते.

(६) प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ:
(i) रात्र – रजनी, निशा
(ii) जिंदगी – आयुष्य, जीवन
(iii) बरबाद – नष्ट
(iv) हात – हस्त, कर

स्वाध्याय कृती

प्रश्न 1.
काव्यसौंदर्य

(i) दुःख पेलावे आणि पुन्हा जगावे, या वाक्यातील तुम्हाला जाणवलेला विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तरः
कवी नारायण सुर्वे यांच्या जीवनसंघर्षाचे वर्णन दोन दिवस या कवितेतून केले आहे. कवी म्हणतो की जीवनातल्या दुःखाला न घाबरता न डगमगता सामोरे जावे. कारण दुःख माणसाला खूप काही शिकवून जाते. दु:खावर मात करत असतांना आपल्यातल्या अनेक क्षमतांची अनुभुती येऊन परिस्थितीवर मात करणे, समायोजन करणे, नवीन पर्याय शोधणे या अनेक बाबीतून दु:ख पेलण्याची ताकद माणसात निर्माण होते. म्हणून कवी म्हणतो. जीवनातल्या दुःखाने निराश, हताश न होता सामर्थ्याने विपरित परिस्थितीला सामोरे जावे आणि जीवनात पुन्हा ताकदीने उभे रहावे. हेच जिवनचे खरे सत्य आहे.

(ii) कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी तुमच्या भावना लिहा.
उत्तरः
‘दोन दिवस’ या नारायण सुर्वे यांच्या कवितेवरून विविध सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कष्टकऱ्यांचे जीवनचित्र समोर उभे राहते. अनेक ठिकाणी, अनेक प्रकारचे कष्ट आणि अत्यंत श्रमाचे काम करणारे कष्टकरी आपण पाहतो. ऊन, वारा, पाऊस अशा सगळ्या गोष्टी अंगावर झेलून ते सदैव श्रम करत असतात, जीवनासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी त्यांना उपलब्ध करून दिलेल्या नसतात. जीवनाची हमी नसते. अत्यंत कमी वेतनावर ते प्रचंड मेहनतीचे काम करत असतात. त्यांना जीवन जगणे खूप कठीण जाते. रोज काम मिळण्याची शाश्वती नसते. अशाप्रकारे आपल्या देशात कष्टकऱ्यांचे जीवन अत्यंत कठीण आहे.

(iii) ‘कवितेत व्यक्त झालेले जीवनसत्य’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तरः
माणसाच्या जीवनात सुख आणि दुःख या दोन गोष्टी सदैव असतात. कधी सुखाचे दिवस असतात, तर कधी दुःखाचे, असे असले तरी कोणताही काळ हा कायम राहत नाही. दुःखातून माणूस अनेक गोष्टी शिकतो व उदयाच्या चांगल्या दिवसाची अपेक्षा करत जगत राहतो. माणसाने कवी सारखं आशावादी राहिलं पाहिजे. दुःखातही सुख येईल अशी आशा बाळगली पाहिजे, म्हणजे जगणं सोपं होतं.

दोन दिवस Summary in Marathi

दोन दिवस भावार्थ‌

दोन‌ ‌दिवस‌ ‌वाट‌ ‌पाहण्यात‌ ‌गेले;‌ ‌दोन‌ ‌दुःखात‌ ‌गेले.‌ ‌
हिशोब‌ ‌करतो‌ ‌आहे‌ ‌किती‌ ‌राहिलेत‌ ‌डोईवर‌ ‌उन्हाळे‌‌

कवी‌ ‌नारायण‌ ‌सुर्वे‌ ‌यांचा‌ ‌एकंदरीत‌ ‌जीवन‌ ‌प्रवासच‌ ‌अत्यंत‌ ‌संघर्षमय‌ ‌व‌ ‌खडतर‌ ‌होता.‌ ‌आलेला‌ ‌रोजचा‌ ‌दिवस‌ ‌ते‌ ‌उद्याच्या‌ ‌आशावादावर‌ ‌जगत,‌ ‌म्हणून‌ ‌कवी‌ ‌म्हणतात‌ ‌माझ्या‌ ‌जीवनाचे‌ ‌दोन‌ ‌दिवस‌ ‌उक्या‌ ‌येणाऱ्या‌ ‌चांगल्या‌ ‌दिवसाची‌ ‌वाट‌ ‌पाहण्यात‌ ‌गेले‌ ‌आणि‌ ‌दोन‌ ‌दिवस‌ ‌आहे‌ ‌त्या‌ ‌दुःखात‌ ‌व्यतीत‌ ‌झाले.‌ ‌माझ्या‌ ‌जीवनाचे‌ ‌किती‌ ‌दिवस‌ ‌अजून‌ ‌शिल्लक‌ ‌आहेत‌ ‌याचाच‌ ‌मी‌ ‌हिशोब‌ ‌करतो‌ ‌आहे.‌‌

शेकडो‌ ‌वेळा‌ ‌चंद्र‌ ‌आला;‌ ‌तारे‌ ‌फुलले,‌ ‌रात्र‌ ‌धुंद‌ ‌झाली;‌ ‌भाकरीचा‌ ‌चंद्र‌ ‌शोधण्यातच‌ ‌जिंदगी‌ ‌बरबाद‌ ‌झाली.‌‌

जीवन‌ ‌जगत‌ ‌असताना‌ ‌अवती-भोवती‌ ‌अशा‌ ‌अनेक‌ ‌गोष्टी‌ ‌होत्या‌ ‌की‌ ‌त्या‌ ‌हव्या‌ ‌हव्याशा‌ ‌वाटत‌ ‌होत्या,‌ ‌पण‌ ‌जीवनाचे‌ ‌वास्तव‌ ‌इतके‌ ‌दाहक‌ ‌होते‌ ‌की‌ ‌त्या‌ ‌कधीच‌ ‌मिळू‌ ‌शकत‌ ‌नव्हत्या.‌ ‌त्यांच्या‌ ‌भुकेच्या‌ ‌तीव्र‌ ‌भावनेत‌ ‌आकाशाचा‌ ‌सुंदर‌ ‌चंद्र‌ ‌देखील‌ ‌त्यांना‌ ‌भाकरीसारखा‌ ‌दिसत‌ ‌होता.‌ ‌म्हणूनच‌ ‌कवी‌ ‌म्हणतो‌ ‌की,‌ ‌मी‌ ‌चंद्राच्या‌ ‌सौंदर्याचा‌ ‌आस्वाद‌ ‌तर‌ ‌कधी‌ ‌घेऊ‌ ‌शकलो‌ ‌नाही;‌ ‌पण‌ ‌माझ्या‌ ‌पोटासाठी‌ ‌भाकरीचा‌ ‌चंद्र‌ ‌मिळवण्यातच‌ ‌माझे‌ ‌सगळे‌ ‌आयुष्य‌ ‌बरबाद‌ ‌(नष्ट)‌ ‌झाले.‌‌

हे‌ ‌हात‌ ‌माझे‌ ‌सर्वस्व;‌ ‌दारिद्र्याकडे‌ ‌गहाणच‌ ‌राहिले‌ ‌
कधी‌ ‌माना‌ ‌उंचावलेले,‌ ‌कधी‌ ‌कलम‌ ‌झालेले‌ ‌पाहिले‌‌

कवी‌ ‌म्हणतात,‌ ‌माझे‌ ‌हात‌ ‌माझे‌ ‌सर्वस्व‌ ‌आहेत.‌ ‌या‌ ‌हातांच्या‌ ‌साहाय्याने‌ ‌मी‌ ‌अनेक‌ ‌नवीन‌ ‌चांगल्या‌ ‌गोष्टी‌ ‌करू‌ ‌शकलो‌ ‌असतो;‌ ‌पण‌ ‌मी‌ ‌नेहमी‌ ‌या‌ ‌गरिबीतच‌ ‌अडकून‌ ‌राहिलो.‌ ‌रोजचे‌ ‌जीवन‌ ‌जगण्यासाठीच‌ ‌मी‌ ‌माझ्या‌ ‌हाताचा‌ ‌उपयोग‌ ‌केला.‌ ‌फक्त‌ ‌कष्टच‌ ‌करत‌ ‌राहिले.‌ ‌पण‌ ‌कधी-कधी‌ ‌दारिद्र्यात‌ ‌गुंतलेले‌ ‌हात‌ ‌मी‌ ‌मनात‌ ‌उंचावलेले‌ ‌पाहिले.‌ ‌म्हणजे‌ ‌नवीन‌ ‌काहीतरी‌ ‌करण्याची‌ ‌इच्छा‌ ‌माझ्या‌ ‌मनात‌ ‌निर्माण‌ ‌झाली;‌ ‌पण‌ ‌जसे‌ ‌सभोवतालची‌ ‌परिस्थिती‌ ‌किंवा‌ ‌वास्तवाची‌ ‌जाणीव‌ ‌झाली‌‌ की,‌ ‌असे‌ ‌वाटायचे‌ ‌की‌ ‌माझे‌ ‌हात‌ ‌जणू‌ ‌कोणीतरी‌ ‌छाटून‌ ‌टाकले‌ ‌आहेत.‌ ‌माझ्या‌ ‌सगळ्या‌ ‌आशा,‌ ‌उमेदी‌ ‌संपून‌ ‌जातात.‌‌

हरघडी‌ ‌अश्रू‌ ‌वाळविले‌ ‌नाहीत;‌ ‌पण‌ ‌असेही‌ ‌क्षण‌ ‌आले‌
‌तेव्हा‌ ‌अश्रूच‌ ‌मित्र‌ ‌होऊन‌ ‌साहाय्यास‌ ‌धावून‌ ‌आले.‌‌

कवी‌ ‌नारायण‌ ‌सुर्वे‌ ‌यांना‌ ‌आपल्या‌ ‌जीवनात‌ ‌सतत‌ ‌हालअपेष्टा,‌ ‌अपमान,‌ ‌उपेक्षा‌ ‌यांचा‌ ‌सामना‌ ‌करावा‌ ‌लागला.‌ ‌परिस्थितीशी‌ ‌सतत‌ ‌संघर्ष‌ ‌करावा‌ ‌लागला.‌ ‌अशा‌ ‌या‌ ‌जीवनसंघर्षातून‌ ‌जात‌ ‌असताना‌ ‌कधी‌ ‌कधी‌ ‌त्यांना‌ ‌खूप‌ ‌रडावेसे‌ ‌वाटले‌ ‌पण‌ ‌त्यांनी‌ ‌आपले‌ ‌मन‌ ‌घट्ट‌ ‌केले.‌ ‌डोळयांतून‌ ‌अश्रू‌ ‌वाहू‌ ‌दिले‌ ‌नाही;‌ ‌पण‌ ‌कधी‌ ‌कधी‌ ‌असेही‌ ‌प्रसंग‌ ‌आले‌ ‌की,‌ ‌मनात‌ ‌दडवलेले‌ ‌दुःख,‌ ‌वेदना‌ ‌यांना‌ ‌मोकळी‌ ‌वाट‌ ‌करून‌ ‌देण्यासाठी‌ ‌अश्रूच‌ ‌मित्रासारखे‌ ‌मदतीला‌ ‌धावून‌ ‌आले.‌ ‌म्हणजेच‌ ‌काही‌ ‌प्रसंगी‌ ‌आपल्या‌ ‌मनातले‌ ‌दुःख‌ ‌इतरांजवळ‌ ‌व्यक्त‌ ‌न‌ ‌करता‌ ‌ते‌ ‌फक्त‌ ‌मनसोक्त‌ ‌रडले.‌ ‌रडल्यामुळे‌ ‌त्यांचे‌ ‌दु:ख‌ ‌हलके‌ ‌झाले.‌ ‌त्यांच्या‌ ‌दुःखात‌ ‌त्यांना‌ ‌त्यांच्याच‌ ‌अणूंनी‌ ‌एखाद्या‌ ‌मित्राप्रमाणे‌ ‌साथ‌ ‌दिली.‌‌

दुनियेचा‌ ‌विचार‌ ‌हरघडी‌ ‌केला,‌ ‌अगा‌ ‌जगमय‌ ‌झालो‌ ‌
दुःख‌ ‌पेलावे‌ ‌कसे,‌ ‌पुन्हा‌ ‌जगावे‌ ‌कसे,‌ ‌याच‌ ‌शाळेत‌ ‌शिकलो‌‌

कवी‌ ‌नारायण‌ ‌सुर्वे‌ ‌जिथे‌ ‌राहत‌ ‌होते‌ ‌तिथे‌ ‌त्यांच्या‌ ‌आजुबाजूला‌ ‌सगळी‌ ‌गोरगरिबांचीच‌ ‌वस्ती‌ ‌होती.‌ ‌सगळ्यांचे‌ ‌जीवन‌ ‌हालअपेष्टांनी‌ ‌भरलेले‌ ‌होते.‌ ‌कवी‌ ‌नारायण‌ ‌सुर्वे‌ ‌यांना‌ ‌आजुबाजूच्या‌ ‌समाजबांधवांचे‌ ‌दुःख‌ ‌पाहवत‌ ‌नव्हते.‌ ‌स्वतः‌ ‌दुःखी-कष्टी‌ ‌असूनही‌ ‌त्यांनी‌ ‌नेहमी‌ ‌इतरांच्या‌ ‌दुःखाचा‌ ‌विचार‌ ‌केला.‌ ‌प्रत्येक‌ ‌क्षणी‌ ‌त्यांनी‌ ‌दुनियेचा‌ ‌विचार‌ ‌केला.‌ ‌मान-अपमान,‌ ‌बरे-वाईट,‌ ‌सुख-दुःख‌ ‌सगळं‌ ‌सगळं‌ ‌पचवून‌ ‌ते‌ ‌संपूर्ण‌ ‌जगाशी‌ ‌एकरूप‌ ‌झाले.‌ ‌जगातल्या‌ ‌अनेक‌ ‌बऱ्या-वाईट‌ ‌घटनांशी‌ ‌ते‌ ‌समरूप‌ ‌झाले.‌ ‌जगाच्या‌ ‌या‌ ‌शाळेत‌ ‌दु:ख‌ ‌कसे‌ ‌सहन‌ ‌करावे,‌ ‌दुःखावर‌ ‌मात‌ ‌करून‌ ‌पुन्हा‌ ‌नव्या‌ ‌उमेदीने‌ ‌जीवनाला‌ ‌कसे‌ ‌सामोरे‌ ‌जावे.‌ ‌हसत‌ ‌हसत‌ ‌कसे‌ ‌जगावे‌ ‌ते‌ ‌याच‌ ‌जगाच्या‌ ‌शाळेने‌ ‌त्यांना‌ ‌शिकवले.‌ ‌म्हणजेच‌ ‌या‌ ‌जगानेच‌ ‌त्यांना‌ ‌दु:खही‌ ‌दिले‌ ‌आणि‌ ‌या‌ ‌जगानेच‌ ‌दु:ख‌ ‌विसरून‌ ‌आनंदाने‌ ‌कसे‌ ‌जगावे‌ ‌हे‌ ‌देखील‌ ‌शिकवले.‌‌

झोतभट्टीत‌ ‌शेकावे‌ ‌पोलाद‌ ‌तसे‌ ‌आयुष्य‌ ‌छान‌ ‌शेकले‌
‌दोन‌ ‌दिवस‌ ‌वाट‌ ‌पाहण्यात‌ ‌गेले;‌ ‌दोन‌ ‌दुःखात‌ ‌गेले.‌‌

कवी‌ ‌परळच्या‌ ‌चाळीत‌ ‌वाढले.‌ ‌कमालीचे‌ ‌दारिद्र्य,‌ ‌अपरंपार‌ ‌काबाडकष्ट‌ ‌आणि‌ ‌जगण्यासाठी‌ ‌केलेला‌ ‌संघर्ष‌ ‌यातून‌ ‌त्यांचे‌ ‌आयुष्य‌ ‌चांगलेच‌ ‌शेकून‌ ‌निघाले.‌ ‌म्हणून,‌ ‌कवी‌ ‌म्हणतो‌ ‌एखादया‌ ‌भट्टीत‌ ‌पोलाद‌ ‌जसे‌ ‌तापून‌ ‌निघते‌ ‌त्या‌ ‌प्रमाणे‌ ‌दुनियेच्या‌ ‌दाहक‌ ‌अनुभवातून‌ ‌माझे‌ ‌आयुष्यदेखील‌ ‌दुःख‌ ‌झेलून‌ ‌जगण्यास‌ ‌सिद्ध‌ ‌व‌ ‌समर्थ‌ ‌झाले‌ ‌आहे.‌ ‌माझे‌ ‌दोन‌ ‌दिवस‌ ‌जगण्याच्या‌ ‌नव्या‌ ‌उमेदीची‌ ‌वाट‌ ‌पाहण्यात‌ ‌गेले‌ ‌आणि‌ ‌दोन‌ ‌दिवस‌ ‌आहे‌ ‌त्या‌ ‌दुःखात‌ ‌गेले,‌ ‌जणू‌ ‌दुःख‌ ‌दुःखात‌ ‌विरून‌ ‌गेले.‌‌


इयत्ता दहावी मराठी स्वाध्याय उपाय

निष्कर्ष

आम्हाला आशा आहे की महाराष्ट्रावरील हा लेख तुम्हाला 'दहावी दोन दिवस स्वाध्याय' मदत करेल. तुम्हाला काही प्रश्न असल्यास, त्यांना खाली टिप्पणी विभागात मोकळ्या मनाने पोस्ट करा. आम्ही लवकरात लवकर तुमच्याकडे परत येऊ.
Share:

0 Comments:

Post a Comment

Plus Two (+2) Previous Year Question Papers

Plus Two (+2) Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Physics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Chemistry Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Maths Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Zoology Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Botany Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Computer Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Computer Application Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Commerce Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Humanities Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Economics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) History Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Islamic History Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Psychology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Sociology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Political Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Geography Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Accountancy Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Business Studies Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) English Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Hindi Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Arabic Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Kaithang Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Malayalam Previous Year Chapter Wise Question Papers

Plus One (+1) Previous Year Question Papers

Plus One (+1) Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Physics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Chemistry Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Maths Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Zoology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Botany Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Computer Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Computer Application Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Commerce Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Humanities Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Economics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) History Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Islamic History Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Psychology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Sociology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Political Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Geography Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Accountancy Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Business Studies Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) English Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Hindi Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Arabic Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Kaithang Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Malayalam Previous Year Chapter Wise Question Papers
Copyright © HSSlive: Plus One & Plus Two Notes & Solutions for Kerala State Board About | Contact | Privacy Policy